Sunil Gavaskar Information In Marathi क्रिकेट म्हटलं की भारतीयांच्या मनामध्ये आणि रक्तामध्ये वेगळेच चैतन्य आणि उत्साह संचारात असतो.भारतीय क्रिकेटसाठी अतिशय वेडे आहेत, अगदी झोपेमध्ये देखील भारतीयांना क्रिकेट दिसत असते. या क्रिकेट इतिहासात अनेक भारतीय खेळाडू देखील होऊन गेलेले आहेत. त्यांनी आपल्या वेगळ्या खेळ शैलीने आपले वेगळे नाव आणि ठसा उमटवला आहे. यातील एक लोकप्रिय नाव म्हणजे सुनील गावस्कर होय.
सुनील गावस्कर यांची संपूर्ण माहिती Sunil Gavaskar Information In Marathi
१० जुलै १९४९ या दिवशी महाराष्ट्र मध्ये जन्म झालेले सुनील गावस्कर सनी अर्थात लिटिल मास्टर या नावाने देखील ओळखले जात असतात. अतिशय उत्तम खेळाडू असणारे सुनील गावस्कर सुप्रसिद्ध मनोहर गावस्कर यांचे पुत्र होते. खेळ प्रशिक्षण संस्थेचे चालक असणारे सुनील गावस्कर मध्यमवर्गीय कुटुंबातील असून, क्रिकेटमध्ये अतिशय उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी त्यांना ओळखले जात असते.
सुनील गावस्कर म्हटलं की काही वर्षांपूर्वी अगदी प्रत्येक जण हातातले काम सोडून त्यांचा सामना बघत असे. बारा महिन्यांच्या कालावधीमध्ये १०००० धावा पूर्ण करून वेगळा विक्रम करणारे सर्वात पहिले नाव सुनील गावस्कर यांचे होते. आणि त्यांनी असे विक्रम तब्बल चार वेळा करून दाखवलेले आहेत.
सुनील गावस्कर यांनी प्रत्येक वेळी नवनवीन विक्रम निर्माण केले होते, व स्वतःचेच विक्रम असंख्य वेळा मोडले देखील होते. त्याचबरोबर इतर लोकांचे विक्रम मोडण्यांमध्ये देखील सुनील गावस्कर यांचे नाव घेतले जात असते. त्यांनी ३४ शतके करत डॉन ब्रॅडमन याचा विक्रम मोडीत काढला होता, त्यामुळे त्यांना खूपच मोठी प्रसिद्धी मिळाली होती. आजच्या भागामध्ये आपण या सुनील गावस्कर यांच्या विषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत…
नाव | सुनील गावस्कर |
संपूर्ण नाव | सुनील मनोहर गावस्कर |
जन्म दिनांक | १० जुलै १९४९ |
जन्म स्थळ | मुंबई, महाराष्ट्र |
आईचे नाव | मीनल गावस्कर |
वडिलांचे नाव | मनोहर गावस्कर |
बहिणींचे नाव | कविता आणि नीता |
पत्नीचे नाव | मार्शनील गावस्कर |
पुत्राचे | नाव रोहन |
सुनील गावस्कर यांची क्रिकेटपटू म्हणून कारकीर्द:
क्रिकेटर चाहत्यांच्या मनावर राज्य करायचे असेल, तर आपल्या विशिष्ट शैलीने क्रिकेट खेळणारा खेळाडू आणि देशासाठी नेहमीच यश संपादन करणारा कसलेला खेळाडू आवश्यक असतो. हे सर्व गुणधर्म असणारे खेळाडू म्हणजे सुनील गावस्कर होय.
आज अनेक भारतीय जनमानसाच्या मनावर राज्य करणाऱ्या सुनील गावस्कर यांचा जन्म १० जुलै १९४९ या दिवशी महाराष्ट्राच्या मुंबई या ठिकाणी झाला होता. एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या सुनील गावस्कर यांच्या आईचे नाव मीनल गावस्कर तर वडिलांचे नाव मनोहर गावस्कर असे होते.
ते तीन भावंड होते, मात्र त्यातील एकमेव मुलगा म्हणून सुनील गावस्कर असल्यामुळे लहानपणापासूनच त्यांचा प्रचंड लाड झाला होता. शालेय जीवनापासूनच सुनील गावस्कर यांना क्रिकेटचा छंद होता. त्याचबरोबर सत्तरच्या दशकाच्या कालखंडा दरम्यान भारतामध्ये अनेक दिग्गज खेळाडूंनी क्रिकेट क्षेत्रामध्ये आपले नाव कमावले होते, त्यामुळे आपण देखील या क्षेत्रामध्ये कार्य करून नावलौकिक मिळवावा असे सुनील गावस्कर यांना नेहमी वाटत असे. आणि त्यातूनच त्यांनी क्रिकेटकडे वळण्याचे ठरविले.
१९८३ च्या आसपास सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून सुनील गावस्कर यांचे नाव सर्वत्र प्रसिद्ध होते. त्यांनी अनेक वर्ष भारतीय संघासाठी कर्णधार पद भूषवून भारताला नेहमीच यश मिळवून देण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. त्यांनी तत्कालीन कालावधीमध्ये केलेल्या कार्यामुळे त्यांना फार मोठी प्रसिद्धी मिळाली होती, व त्यांचा प्रचंड मोठा चाहतावर्ग देखील तयार झाला होता.
त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील भारताला अनेक विजय मिळवून दिलेले असून, त्यांच्या कारकिर्दीमध्ये भारताने विश्वचषक देखील जिंकलेला आहे. आणि कसोटी सामने खेळले असले तरी देखील वेस्ट इंडिजच्या सोबत खेळलेल्या कसोटी सामन्यांमध्ये तब्बल २०५ धावा करून त्यांनी एक द्विशतक करण्याचा विक्रम केला होता. त्याचबरोबर या अंतर्गतच त्यांच्या कसोटी सामन्यातील दहा हजार धावा देखील पूर्ण झाल्या होत्या.
अगदी लहानपणापासूनच क्रिकेटचा छंद असणारे सुनील गावस्कर सतराव्या वर्षीच स्कूल बॉय क्रिकेटर ऑफ द इयर या सन्मानाने सन्मानित झाले होते.
सुनील गावस्कर यांच्या विषयी तथ्य माहिती:
- सुनील गावस्कर यांना सनी आणि लिटल मास्टर या दोन टोपण नावाने देखील ओळखले जाते.
- कसोटी सामन्यांमध्ये खेळाचे पदार्पण करत त्यांनी अवघ्या चारच सामन्यांमध्ये सुमारे ७७४ धावा करून एक विश्वविक्रम नोंदवला होता.
- महाराष्ट्र मध्ये जन्म झालेल्या सुनील गावस्कर यांनी मध्य प्रदेश येथील मार्शनील यांच्याशी विवाह केला होता.
- एकाच सामन्यामध्ये द्विशतक करण्याचा विश्वविक्रम सुनील गावस्कर यांनी केलेला आहे.
- सुनील गावस्कर यांनी अवघ्या १७ व्या वर्षीच क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.
- ज्यावेळी १९८७ मध्ये इंग्लंड संघाने विश्वचषकाच्या उपांत्य फेरीमध्ये भारताचा पराभव केला, त्यावेळी त्यांनी क्रिकेट क्षेत्रामधून राजीनामा दिला होता.
- क्रिकेट क्षेत्रानंतर त्यांनी टेलिव्हिजन वरील समालोचन आणि वृत्तपत्रांसाठी स्तंभ लेखनाचे कार्य केले होते.
- सुनील गावस्कर यांना १९८० मध्ये पद्मभूषण पुरस्कार देखील मिळाला होता. तसेच १९७५ मध्ये अर्जुन पुरस्कारही मिळाला होता.
निष्कर्ष:
आज काल नवीन दमाचे अनेक खेळाडू क्रिकेट क्षेत्रामध्ये नाव कमावत असले, तरी देखील पूर्वीच्या काळी क्रिकेट खेळाला प्रसिद्ध करण्यामागे आणि संपूर्ण भारतीयांच्या मनावर क्रिकेट ठसवण्यासाठी अनेक क्रिकेटपटूंना ओळखले जाते. त्यातीलच एक उत्तम नाव म्हणजे सुनील गावस्कर होय. एक वेगळा ठसा आणि आपल्या वेगळ्या खेळण्याच्या शैलीसाठी ओळखले जाणारे सुनील गावस्कर एक उत्तम क्रिकेटपटू होते.
त्यांनी अनेक विक्रम तयार करण्याबरोबरच जुने विक्रम देखील मोडीत काढले होते, त्यामुळे त्यांना खूप मोठी प्रसिद्धी मिळाली होती. अतिशय प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचले तरी देखील आपले पाय जमिनीवरच ठेवणाऱ्या खेळाडूंमध्ये त्यांचा समावेश होतो. अगदी मध्यमवर्गीय कुटुंबातून आल्यामुळे त्यांना परिस्थितीची नेहमीच जाण असे.
ते विद्यार्थ्यांसाठी खेळ प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेचे संचालक व मालक देखील असून, क्रिकेट म्हणजे त्यांच्यासाठी जणूकाही जीव की प्राण होता. क्रिकेटसाठी लहानपणापासूनच वेडे असणारे सुनील गावस्कर यांनी अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय आणि एकदिवसीय क्रिकेट सामने देखील खेळलेले आहेत.
त्याचबरोबर एक दिवशी सामन्यांमध्ये देखील त्यांची खेळण्याची शैली अतिशय वाखाणण्याजोगी आहे. आजच्या भागामध्ये आपण सुनील गावस्कर यांची माहिती व त्यांचे जीवन चरित्र जाणून घेतलेले आहे. त्यामध्ये त्यांनी देशांतर्गत खेळलेल्या क्रिकेट बद्दलच्या माहिती सह आंतरराष्ट्रीय व एका दिवशी आंतरराष्ट्रीय सामन्यांबद्दल देखील माहिती घेतलेली आहे.
सुनील गावस्कर यांच्या प्राथमिक माहितीसह त्यांची खेळण्याची शैली कशी होती, कर्णधार म्हणून त्यांनी केलेली कामगिरी, त्यांच्या कारकीर्दीमध्ये भारताला मिळालेले यश, तसेच त्यांच्या कारकिर्दीमध्ये काही घडलेले वाद याविषयी संपूर्ण माहिती बघितलेली आहे.
FAQ
सुनील गावस्कर या सुप्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटूंचे संपूर्ण नाव काय होते?
सुनील गावस्कर या सुप्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटूचे संपूर्ण नाव सुनील मनोहर गावस्कर असे होते.
सुनील गावस्कर यांचा जन्म कोणत्या दिवशी व कोणत्या ठिकाणी झाला होता?
सुनील गावस्कर या भारतीय क्रिकेटपटू चा जन्म दिनांक १० जुलै १९४९ या दिवशी झाला होता, व त्यांच्या जन्माचे ठिकाण महाराष्ट्राचे मुंबई हे समजले जाते.
सुनील गावस्कर यांच्या बहिणींची नावे काय काय होती?
सुनील गावस्कर यांच्या बहिणींची नावे कविता गावस्कर आणि नीता गावस्कर असे होते.
सुनील गावस्कर यांच्या पत्नीचे आणि मुलाचे नाव काय काय आहे?
सुनील गावस्कर यांच्या पत्नीचे नाव मार्शनील गावस्कर, तर मुलाचे नाव रोहन गावस्कर असे आहे.
सुनील गावस्कर यांच्या आईचे व वडिलांचे नाव काय होते?
सुनील गावस्कर यांच्या आईचे नाव मीनल गावस्कर असे होते, तर वडिलांचे नाव मनोहर गावस्कर असे होते.