Kalpana Chawla Information In Marathi अंतराळात जाणारी पहिली भारतीय महिला म्हणून नावलौकिक मिळवणारी भारतीय वंशाची अंतराळवीर कल्पना चावला आज अत्यंत प्रसिद्ध असून, त्यांना स्पेस शटल मिशन तज्ञ म्हणून देखील ओळखले जाते. मात्र या मोहिमेदरम्यान पुन्हा पृथ्वीवर येत असताना कोलंबिया स्पेस शटल दुर्घटना घडली, आणि त्यातच या अत्यंत बुद्धिमान महिलेचा अंत झाला.

कल्पना चावला यांची संपूर्ण माहिती Kalpana Chawla Information In Marathi
कल्पना चावला यांनी आपली पहिली अंतराळ मोहीम दिनांक १९ नोव्हेंबर १९९७ पासून, ५ डिसेंबर १९९७ पर्यंत आखली होती. या दरम्यान अमेरिकेच्या नासा संस्थेचे ८७ वे कोलंबिया शटल पूर्ण करण्यात यश मिळाले. पुढे १६ जानेवारी २००३ रोजी या यांनाचे अर्थात कोलंबीया यानाचे शेवटचे आणि दुसरे पर्व सुरू झाले.
या प्रवासात काही दिवस व्यवस्थित पार पडल्यानंतर १ फेब्रुवारी २००३ रोजी मात्र या यानाला पृथ्वीवर परतण्यापूर्वीच अपघात झाला, आणि या अपघातात भारतीय वंशाच्या पहिल्या महिला अंतराळवीर ठरणाऱ्या कल्पना चावला यांच्यासह त्यांच्या सहा साथीदारांचे मृत्यू झाले. एक उत्तम अंतराळवीर आणि प्रचंड हुशार असणारी कल्पना चावला भारतासाठी अभिमान असून, आजच्या भागामध्ये आपण या कल्पना चावला यांच्या जीवन चरित्राविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.…
नाव | कल्पना चावला |
जन्म दिनांक | १ जुलै १९६१ |
जन्म स्थळ | कर्नाल |
आईचे नाव | संज्योती चावला |
वडिलांचे नाव | बनारसी लाल चावला |
पतीचे नाव | जॉन पियरे हॅरीसन |
ओळख | पहिली महिला अंतराळवीर |
कार्य | तंत्रज्ञ व अभियंता |
अंतराळामध्ये पहिले उड्डाण | १९९६ |
अंतराळातील दुसरे व शेवटचे उड्डाण | २००३ |
कल्पना चावला यांचे प्रारंभिक आयुष्य:
मित्रांनो, दिनांक १ जुलै १९६१ या दिवशी कल्पना चावला यांचा हरियाणाच्या कर्नाल या अगदी लहान या गावांमध्ये जन्म झाला होता. संजोती चावला आणि बनारसी लाल चावला या दांपत्याच्या पोटी जन्मलेल्या कल्पना चावला लहानपणापासूनच अतिशय हुशार विद्यार्थिनी होत्या.
त्यांना दोन बहिणी व एक भाऊ देखील होता. ज्यांची नावे अनुक्रमे सुनीता, दीपा, आणि संजय अशी होती. सर्वात लहान आपत्य असणारी कल्पना चावला सर्वांचेच प्रचंड लाडाची होती. त्यामुळे कल्पना चावला यांनी देखील या लाडाच्या जोरावर आपले शिक्षण पूर्ण केले होते. लहानपणापासूनच अतिशय खोडकर, आणि मजेदार स्वभावाची असणारी कल्पना चावला सर्वांनाच आवडत असे.
कल्पना चावला यांचे शैक्षणिक आयुष्य:
कल्पना चावला यांनी आपले प्राथमिक शिक्षण आपल्या जन्म गावी अर्थात कर्नल येथे पूर्ण केले. त्यांच्या शाळेचे नाव टागोर पब्लिक स्कूल असे होते. लहानपणापासूनच हुशार असलेल्या कल्पना चावला यांनी शिक्षक होऊन शिक्षण सेवा करावी असे त्यांच्या वडिलांना मनोमन वाटत असे.
मात्र त्यांचा नेहमी विज्ञान क्षेत्रामध्ये कल होता, त्यामुळे त्यांनी एरोनॉटिकल इंजिनिअरिंग शिक्षण पूर्ण करून अंतराळ संशोधन क्षेत्रांमध्ये मोठे कार्य केले होते. त्यांनी यासाठी चंदिगडच्या पंजाब इंजिनिअरिंग कॉलेज येथे एरोनॉटिकल इंजिनिअरिंग चे शिक्षण पूर्ण करून १९८२ या वर्षी इंजीनियरिंग ची पदवी प्राप्त केली होती.
त्यांचे शिक्षण पूर्ण झाल्याच्या वर्षीच त्या अमेरिकेमध्ये गेल्या. येथे त्यांनी १९८२ या वर्षी अर्लींटन कॉलेजमध्ये प्रवेश मिळवला, आणि येथील पदवीधर शिक्षण प्राप्त केले. येथेच त्यांची ओळख जॉन पियरे हॅरीसन यांच्यासोबत झाली. पुढे त्यांनी त्यांच्यासोबत १९८३ या वर्षी विवाह केला. पुढे त्यांनी १९८६ यावर्षी एरोस्पेस इंजिनिअरिंग मधील आणखी एक पदव्युत्तर पदवी मिळवत या क्षेत्रामध्ये उच्च शिक्षण प्राप्त केले.
कल्पना चावला यांची कारकीर्द:
कल्पना चावला यांनी फ्लाईंग सर्टिफिकेट मिळवलेले होते. त्यामुळे त्या फ्लाईट इन्स्ट्रक्टर म्हणून कार्य करण्यास समर्थ होत्या. त्यांच्याकडे पायलाटिंग साठी आवश्यक असणारी प्रमाणपत्र देखील असल्यामुळे त्यांना रेडिओ ऑपरेटर म्हणून कार्य देण्यात आले. पुढे त्यांची नियुक्ती १९९३ या वर्षी नासाच्या ओव्हरसेट मेथड इंक येथील उपाध्यक्षपदी करण्यात आली.
पुढे जाऊन त्यांची पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करणाऱ्या स्पेस शटल मोहिमेकरता निवड करण्यात आली होती. त्यांच्यासोबत इतर सहा अंतराळवीर देखील सहभागी होते. या मोहिमेमध्ये त्यांच्याकडे स्पार्टन सॅटेलाईट चे नियोजन करण्याची जबाबदारी होती, मात्र काही कारणास्तव त्या या पदावर यशस्वी झाल्या नाहीत.
पुढे त्यांना १९९६ यावर्षी अंतराळात जाण्याची संधी मिळाली. त्यांनी ही मोहीम मात्र अतिशय यशस्वीरित्या पूर्ण केली, त्यामुळे त्यांचा नावलौकिक प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढला होता. पुढे २००३ या वर्षी देखील त्यांना कोलंबिया यानाच्या माध्यमातून पुन्हा एकदा अंतराळामध्ये प्रवेश करण्याची संधी मिळाली होती.
या मोहिमेमध्ये देखील त्यांनी अतिशय उत्तम कार्य केले होते. मात्र परतीच्या प्रवासामध्ये त्यांच्या यानाला अपघात झाला, आणि या अपघातामध्ये त्यांचे यान जळून खाक झाले. या दरम्यान कल्पना चावला यांच्यासह त्या यानामध्ये असलेल्या एकूण सहा सहकाऱ्यांना देखील आपले प्राण गमवावे लागले होते. अशा रीतीने दुर्दैवी पद्धतीने भारताच्या एका महान बुद्धिमान महिलेचा अर्थात कल्पना चावला यांचा अंत १ फेब्रुवारी २००३ या दिवशी झाला.
निष्कर्ष:
विज्ञान या क्षेत्रामध्ये संशोधन करण्यासाठी अनेक क्षेत्र खुली असून, विज्ञानामुळे मानवाच्या दैनंदिन जीवनामध्ये फार मोठा अमुलाग्र बदल घडून आलेला आहे. त्यातच अलीकडच्या काळामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाच्या तंत्रज्ञान विकसित झाल्यामुळे शोध लावण्यामध्ये देखील खूपच फायदा होत असून, भारतासह अनेक देशांनी अंतराळ क्षेत्रामध्ये देखील मोठी प्रगती केलेली आहे.
भारतीय लोक पूर्वीपासूनच अंतराळ क्षेत्रामध्ये आघाडीवर असून, आपल्या पूर्वजांनी देखील पंचांगाच्या आधारे विविध भौगोलिक व अंतराळी गोष्टींची मांडणी केलेली आहे. व योगायोगाने म्हणा किंवा त्यांच्या ज्ञानाने म्हणा या गोष्टी अचूक देखील आहेत. फार पूर्वीच्या काळापासून मानवाला अंतराळ विषयी प्रचंड मोठ्या आकर्षण राहिलेले असून’ या अंतराळासाठी फार मोठे कष्ट देखील घेतले जातात.
अनेक देश मोठ्या मोठ्या मोहिमा देखील आखत असतात. या मोहिमांमध्ये भारतीय वंशाची पहिली महिला ठरणारी कल्पना चावला यांचा देखील समावेश होतो. आजच्या भागामध्ये आपण या पहिल्या भारतीय महिला अंतराळवीर असणाऱ्या कल्पना चावला यांच्या बद्दल माहिती बघितलेली आहे.
यामध्ये त्यांचे बालपण, शैक्षणिक आयुष्य, अभियंता म्हणून केलेली कारकीर्द, त्यांना मिळालेले विविध अनुभव, नासामधील त्यांचे अधिकार क्षेत्र, त्यांनी आपल्या कारकिर्दीत केलेले ठळक कार्य, त्यांना मिळालेले विविध पुरस्कार, यांच्यासह त्यांच्या मृत्यूबद्दल व अपघाताबद्दल देखील संपूर्ण माहिती बघितलेली आहे. सोबतच काही त्यांच्याविषयी असणारे तथ्य माहिती देखील बघितलेली आहे.
FAQ
कल्पना चावला यांचा जन्म कोणत्या दिवशी आणि कोणत्या ठिकाणी झाला होता?
कल्पना चावला यांचा जन्म दिनांक १ जुलै १९६१ या दिवशी कर्नाल या ठिकाणी झाला होता.
कल्पना चावला यांच्या आईचे व वडिलांचे नाव काय होते?
कल्पना चावला यांच्या आईचे नाव संज्योती चावला, तर वडिलांचे नाव बनारसी लाल चावला असे होते.
कल्पना चावला यांनी अंतराळ मध्ये एकूण किती उड्डाणे केली, व ती कोणकोणाच्या वर्षी केली होती?
कल्पना चावला यांनी अंतराळामध्ये एकूण दोन उड्डाणी केलेली असून, पहिले उडान १९९६ यावर्षी, तर दुसरे उड्डाण हे २००३ या वर्षी केले होते.
कल्पना चावला यांचे निधन कशामुळे झाले?
कल्पना चावला यांनी आपल्या द्वितीय मोहिमेमध्ये पुन्हा पृथ्वीवर परतताना आपले प्राण गमावले होते. यावेळी त्यांच्या यानामध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळे यान जळाले होते.
कल्पना चावला यांना कोणकोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे?
कल्पना चावला यांना नासा स्पेस फ्लाईट मेडल, काँग्रेसनल स्पेस मेडल ऑफ ऑनर, आणि नासा विशिष्ट सेवा पदक इत्यादी मुख्य पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे.