Sant Ravidas Information In Marathi समाज हा चालत्या वळणानुसार वळत असतो, मात्र या समाजाला योग्य रस्त्यावर घेऊन जाण्याचे कार्य समाजसुधारक आणि संत महात्मे करत असतात. भारतामध्ये अनेक संत महात्मे झालेले असून, त्यांचे महत्त्व अनन्यसाधारण असे आहे. असेच एक भारतातील संत, तत्त्वज्ञ, समाजसुधारक, आणि संत कवी म्हणून ओळखले जाणारे संत रविदास पंधराव्या शतकातील एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व होऊन गेले. त्यांनी भक्तिमार्गाची चळवळ पुढे घेऊन जात, निर्गुण संप्रदाय प्रसिद्ध केला होता.
संत रविदास यांची संपूर्ण माहिती Sant Ravidas Information In Marathi
संत परंपरेतील एक उत्कृष्ट व उज्वल व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांना ओळखले जाते. त्यांनी भक्ती मार्गांमध्ये अनेक काव्यरचनांचे निर्माण करून, समाजाला प्रेम व भक्ती यांच्या शिकवण दिली होती. अध्यात्मिक व सामाजिक मार्गातून त्यांनी समाजाचे प्रबोधन केले होते.
त्यांनी केलेल्या समाज कार्यामुळे लोक त्यांची देवा स्वरूप पूजा करत असत, तसेच त्यांच्या नावाने अनेक धार्मिक कार्यक्रमांचे देखील आयोजन करत असत. अतिशय उत्कृष्ट भक्ती काव्य देण्यासाठी प्रसिद्ध असणारे संत रविदास यांच्या बद्दल आजच्या भागामध्ये आपण माहिती बघणार आहोत. त्यांच्या या कार्याने उत्तर भारतातील पंजाब, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र यांसारख्या राज्यांमध्ये फार मोठे सामाजिक कार्य घडून आलेले आहे. चला तर मग त्यांच्याविषयी ही माहिती सुरू करूया…
नाव | संत रविदास |
जन्म वर्ष | १३७७ |
आईचे नाव | श्रीमती कलसा देवी |
वडिलांचे नाव | श्री संतोक दास |
आजीचे नाव | सौ लखपती जी |
आजोबांचे नाव | श्री काळुराम जी |
पत्नीचे नाव | सौ लोनाजी |
मुलाचे नाव | विजय दास |
पंथ | निर्गुण पंथ |
ओळख | संत कवी, तत्त्वज्ञ |
कार्यक्षेत्र | महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, आणि पंजाब |
मृत्यू वर्ष | १५४० |
मृत्यू स्थळ | वाराणसी |
पंधराव्या शतकामधील एक प्रसिद्ध कवी, संत, तत्त्वज्ञ, समाजसुधारक या नावाने ओळखले जाणारे श्री संत गुरु रविदास यांचा जन्म १३७७ या वर्षी झाला होता, असे सांगितले जाते. सुरुवातीला उत्तर भारतामध्ये भक्ती चळवळ सुरू केल्यानंतर त्यांनी संपूर्ण भारताचा दौरा केला, त्यामुळे संपूर्ण भारतभर त्यांना ओळखले जाते, व त्यांच्यावर भक्तीचा वर्षाव देखील केला जातो.
त्यांच्या जयंतीच्या दिवशी अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यामध्ये भजन, दोहे, इत्यादींचा समावेश असतो. संपूर्ण भारतभर त्यांना ओळखले जात असले, तरी देखील पंजाब, उत्तर प्रदेश, व महाराष्ट्र या राज्यांमध्ये त्यांना अधिक महत्त्व प्राप्त झालेले आहे.
संत गुरु रविदास जयंती:
प्रत्येक वर्षाच्या मराठी दिनदर्शिका नुसार माग महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी संत गुरु रविदास यांची जयंती असते. हा दिवस पंजाब व हरियाणा मध्ये फार उत्साहाने साजरा केला जातो. त्या दिवशी अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्याचबरोबर अनेक ठिकाणी अन्नदानाचे कार्यक्रम देखील घेतले जातात.
यावर्षीची संत गुरु रविदास यांची जयंती ही ४४७ वी असेल. दरवर्षी त्यांच्या जयंतीच्या दिवशी सिर गोवर्धनपुर वाराणसी येथील श्री गुरु रविदास जन्मस्थान मंदिरामध्ये फार मोठ्या उत्साहात कार्यक्रम साजरा केले जातात. या ठिकाणी जगभरातून अनुयायी भेट देत असतात.
संत गुरु रविदास यांचे बालपण किंवा प्रारंभिक आयुष्य:
वाराणसी येथील एका गरीब दलित कुटुंबामध्ये संत रविदास यांचा जन्म झाला होता. संतोष दास आणि कलसादेवी यांच्या पोटी जन्मलेले संत गुरु रविदास यांच्या जन्म तारखे बद्दल ठोस माहिती उपलब्ध नसली, तरी देखील त्यांचा जन्म १३७६ किंवा १३७७ या दोन वर्षांमध्ये कधीतरी झाला असावा, असे सांगितले जाते. त्यांचे वडील एक व्यवसायिक होते, ज्यांची चप्पल व बूट बनवण्याची कंपनी किंवा कारखाना होता.
ते त्यांच्या गावचे सरपंच देखील होते. लहानपणापासून वडिलांचे व आईंचे देवाप्रती असलेले वेड बघून त्यांना देखील त्यामध्ये आवड निर्माण झाली होती. मात्र तत्कालीन समाजामध्ये जाती परंपरेनुसार अनेक समस्या देखील होत्या, त्यामुळे अनेक उच्चवर्णीय लोकांनी त्यांच्या शिक्षणाला व त्यांच्या मानसन्माला अडथळे निर्माण केले होते.
संत गुरु रविदास यांचे शिक्षण:
तत्कालीन कालावधीमध्ये शिक्षण हे धार्मिक स्वरूपाचे असे. संत गुरु रविदास यांना देखील लहानपणापासून शिक्षणाचा फार व्यासंग होता. त्यांनी सर्वात प्रथम पंडित शारदानंद पाठशाला येथे प्रवेश मिळवला, मात्र तेथील प्रवेशाला धरून अनेक उच्चवर्णीय लोकांनी विरोध केला.
मात्र त्यांची प्रतिभा आणि हुशारी बघून हा विरोध देखील लवकरच मावळला, आणि त्यांनी या ठिकाणी आपले शिक्षण पूर्ण करण्यास सुरुवात केली. अतिशय हुशार व जिज्ञासू विद्यार्थी म्हणून त्यांचा तेथे नावलौकिक झाला होता.
संत रविदास यांनी आपल्या जीवनामध्ये अनेक चमत्कार घडवून आणलेले आहेत. यातीलच एक सर्वांच्या ओळखीतील चमत्कार म्हणजे त्यांचे गुरु श्री पंडित शारदानंद यांचा मुलगा आणि संत रविदास लपाछपीचा खेळ खेळत असताना अंधार झाला, व रात्र झाली. त्यामुळे त्यांनी ठरवले की आता हा उरलेला खेळ उद्या खेळूया.
दुसऱ्या दिवशी ठरलेल्या वेळी संत रविदास खेळण्याचे ठिकाणावर आले. मात्र बराच वेळ वाट बघून देखील त्यांचा मित्र न आल्यामुळे न राहून त्यांनी त्यांच्या घरी जाण्याचे ठरवले.
तेथे गेल्यानंतर त्यांना धक्का देणारी बातमी समजली. त्यांचा मित्र निधन पावला होता, आणि सर्वजण तेथे अश्रू ढाळत बसले होते. संत रविदास यांना देखील फार दुःख झाले व त्या दुःखातच ते त्या मुलाच्या मृतदेहाजवळ गेले, आणि त्याच्या कानाजवळ म्हटले की चला लपाछपी खेळायला जायचे आहे.
अजून झोपायची वेळ झालेली नाही. आणि काय आश्चर्य, त्यांच्या या शब्दाने तो मुलगा जिवंत झाला, आणि हे बघून सर्वांनाच संत गुरु रविदास यांच्या सामर्थ्याची कल्पना आली. आणि तिथूनच ते प्रसिद्ध झाले.
निष्कर्ष:
महाराष्ट्रासह पूर्ण भारतभर अनेक संतांची मांदियाळी निर्माण झालेली आहे. अगदी संत ज्ञानेश्वर, तुकाराम महाराज, यांसारख्या संतापासून सुरू झालेली ही भक्ती परंपरा अनेक संतांनी पुढे चालू ठेवत आजपर्यंत आणलेली आहे. अनेक संतांनी नवनवीन सुधारणा करण्यामध्ये देखील मोलाचा हातभार लावलेला आहे.
समाजाला योग्य मार्गाने घेऊन जाण्याचे कार्य या संतांद्वारे केले जात असते. वेळप्रसंगी त्यासाठी ते कठोर भूमिका देखील घेत असतात. असेच एक उत्कृष्ट संत म्हणून ओळखले जाणारे संत गुरु रविदास यांच्या जीवन चरित्राबद्दल आपण माहिती बघितली आहे.
ज्यामध्ये हे संत रविदास कोण होते, त्यांचा जन्म, त्यांचे बालपण, त्यांचे धार्मिक शिक्षण, त्याचबरोबर वैवाहिक जीवन, संत रविदास यांचा बेगमपूर शहराशी संबंध, त्यांचे सामाजिक कार्य, गुरु रविदास यांनी शिक्षणामध्ये केलेल्या योगदानाबद्दल माहिती, त्यांच्या विविध कथा, कुंभ महोत्सव कार्यक्रम, त्यांच्या मृत्यूचे कारण, इत्यादी बाबींची माहिती बघितली आहे.
FAQ
संत गुरु रविदास यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला होता?
संत गुरु रविदास यांचा जन्म इसवी सन १३७७ यावर्षी झाला होता.
संत गुरु रविदास यांच्या आईचे व वडिलांचे नाव काय होते?
संत गुरु रविदास यांच्या आईचे नाव श्रीमती कलसा देवी, तर वडिलांचे नाव श्री संतोक दास असे होते.
संत गुरु रविदास यांच्या आजी व आजोबांचे नाव काय होते?
संत गुरु रविदास यांच्या आजीचे नाव लखपतीजी तर आजोबांचे नाव श्री काळुराम जी असे होते.
संत गुरु रविदास यांच्या पत्नीचे व मुलाचे नाव काय होते?
संत गुरु रविदास यांच्या पत्नीचे नाव सौ लोनाजी तर मुलाचे नाव विजय दास असे होते.
संत गुरु रविदास यांचा मृत्यू कोणत्या वर्षी व कोणत्या ठिकाणी झाला होता?
संत गुरु रविदास यांचा मृत्यू इसवी सन १५४० यावर्षी वाराणसी या ठिकाणी झाला होता.