Sant Muktabai Information In Marathi संत भूमी म्हणून महाराष्ट्राला ओळखले जाते. आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक संत होऊन गेले, त्यामध्ये स्त्री संतांचा देखील समावेश केला जातो. महाराष्ट्रातील एक संत कवियीत्री म्हणून मुक्ताबाई यांना ओळखले जाते. संत ज्ञानेश्वर यांच्या भगिनी असलेल्या संत मुक्ताबाई यांचा जन्म केव्हा झाला, याबद्दल अजून देखील साशंकता आहे. काही संदर्भानुसार मुक्ताबाई यांचा जन्म १२७७ यावर्षी झाला असावा, असे सांगितले जाते. तर दुसरे सिद्धांत असे देखील सांगतात की, १२७९ यावर्षी त्यांचा जन्म झालेला आहे.
संत मुक्ताबाई यांची संपूर्ण माहिती Sant Muktabai Information In Marathi
जन्म वर्षाबद्दल खात्री नसल्यामुळे त्या अठरा वर्षे जगल्या की वीस वर्षे जगल्या याबद्दल देखील मतभेद आढळून येतात. त्याचबरोबर त्यांचा जन्म कुठे झाला, याबद्दल देखील पुरावा आढळत नाही. काही लोकांच्या मते आपेगाव या ठिकाणी तर काही लोकांच्या मध्ये आळंदी या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला आहे. मात्र आपेगाव या ठिकाणी त्यांचा जन्म झाल्याबद्दल जास्त लोक सांगत आहेत.
आपल्या आयुष्याच्या एकूण कारकीर्दीमध्ये सुमारे ४२ अभंग लिहिणाऱ्या आणि संत ज्ञानेश्वर या आपल्या बंधूंना गुरु मानणाऱ्या संत मुक्ताबाई यांच्या विषयी आजच्या भागामध्ये आपण सखोल माहिती बघणार आहोत…
नाव | मुक्ताबाई किंवा संत मुक्ताई |
जन्मस्थळ | आपेगाव, पैठण, महाराष्ट्र |
जन्म वर्ष | १२७७ किंवा १२७९ |
धर्म | हिंदू धर्म |
परंपरा | वारकरी परंपरा |
तत्व | वैष्णव तत्व |
गुरुचे नाव | संत ज्ञानेश्वर |
मृत्यू वर्ष | १२९७ |
मृत्यू समयी वय | १८ किंवा २० वर्ष |
मित्रांनो, संत ज्ञानेश्वर यांच्या भगिनी म्हणून संत मुक्ताबाई यांना ओळखले जाते. संत मुक्ताबाई यांना अध्यात्म मार्गाचे चांगले ज्ञान होते. त्यांनी स्वतःहाती केलेले अद्भुत अनुभव प्राप्त करून त्या आधारावर इतरांना विविध चमत्कार दाखवले होते. वयाने कमी असणाऱ्या संत मुक्ताबाई यांची बुद्धिमत्ता अतिशय पराकोटीची उच्च होती.
संत मुक्ताबाई ह्या एका वारकरी परंपरा जपणाऱ्या स्त्री संत होत्या. एका ब्राह्मण कुटुंबामध्ये विठ्ठल पंत व रुक्मिणी देवी यांच्या पोटी संत मुक्ताबाई यांचा जन्म झाला होता. त्यांच्या परिवारामध्ये एकूण चार मुले होती. संत ज्ञानेश्वर, सोपान देव, मुक्ताबाई इत्यादींचा समावेश होता.
आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये अनेक अभंगाची रचना करणाऱ्या संत मुक्ताबाई यांना केवळ १८ ते २० वर्षांचे आयुष्य लाभले होते. एकदा संत ज्ञानेश्वर यांनी काही कारणास्तव आपल्या झोपडीचे दार लावून आत मध्ये बसले होते. मात्र संत मुक्ताबाई यांच्या मनामध्ये चलविचल आणि घालमेल होऊ लागली. त्यामुळे त्यांनी संत ज्ञानेश्वर यांना दरवाजा उघडण्यास सांगितले.
यावेळी त्यांनी अभंग रूपामधून संत ज्ञानेश्वर यांना साद घातली होती. तो अभंग म्हणजे ताटी उघडा ज्ञानेश्वरा हा आहे. आज देखील हा अभंग खूप गाजलेला असून, अभंग क्षेत्रातील साहित्याचा एक मैलाचा दगड म्हणून या अभंगाला ओळखले जाते. त्याचबरोबर संत जिने वावे, जग बोले सोसेव हा अभंग देखील त्यांचा अतिशय प्रसिद्ध झालेला आहे.
श्री विठ्ठल गोविंद पंत कुलकर्णी आणि रुक्मिणी कुलकर्णी या दांपत्त्याच्या चार मुलांपैकी सर्वात शेवटची मुलगी म्हणून संत मीराबाई यांना ओळखले जाते. विठ्ठल पंत यांनी वेदअभ्यास केलेला होता. त्यांचा विवाह झाला असला तरी देखील त्यांना अध्यात्मामध्ये फार रुची होती.
त्यामुळे त्यांनी तीर्थयात्रेस जाताना पुण्यापासून जवळच असणाऱ्या आळंदी या ठिकाणी विसावा घेतला. या ठिकाणी त्यांना एक गुरु मिळाले, व त्या गुरूच्या प्रभावाने त्यांनी संन्यास घेतला होता. मात्र आपण विवाहित आहोत ही गोष्ट त्यांनी त्यांच्याकडून पासून लपवली होती. पुढे त्यांचे गुरु त्यांच्या मुळ गावी भटकंती करत आले असता, त्यांनी विठ्ठल पंत यांच्या पत्नी अर्थात रुक्मिणी यांना अपत्य प्राप्तीचे वरदान दिले.
मात्र यावेळी रुक्मिणीबाई यांनी सांगितले की माझ्या नवऱ्याने संन्यास घेतलेला आहे. यावेळी नवऱ्याचे वर्णन करत असताना त्यांच्या गुरूंच्या लक्षात आले की हा व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून विठ्ठल पंत आहेत. त्यांनी विठ्ठल पंत यांची समजूत घालून त्यांना पुन्हा संसारामध्ये सहभागी होण्यास सांगितले. आणि अशा रीतीने गुरूंच्या आदेशाने संन्याशी जीवन जगणारे विठ्ठल पंत पुन्हा गृहस्थाश्रमामध्ये आले. यानंतर त्यांना चार मुले झाली.
मात्र तत्कालीन कर्मठ लोकांनी विठ्ठल पंत यांना आपल्या जातीतून हाकलून दिले. त्यामुळे त्यांच्यावर फार त्रासदायक आयुष्य जगण्याची वेळ आली. पुढे त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या या चार मुलांवर देखील अशीच वेळ आल्यामुळे, या प्रत्येकाने आपले अस्तित्व सिद्ध केले. यातील संत मुक्ताबाई यांनी देखील आपल्या विविध चमत्कारातून आपल्या अस्तित्वाला वाचा फोडली. कुंभाराचा घरी मांडे भाजण्यासाठी मडके आणायला गेलेल्या मुक्ताबाई यांना खाली हाताने परत यावे लागले.
त्यावेळी त्यांनी चमत्कार करून संत ज्ञानेश्वर यांच्या पाठीवर मांडे भाजले होते, व सर्वांचे पोट भरले होते. अशा या सर्वात चमत्कारी आणि अध्यात्मिक असणाऱ्या संत मुक्ताबाई यांना आज जगभरातून पुजले जाते. त्यांच्याकडून अनेक गुण घेण्यासारखे आहेत. ज्यामध्ये संयम, शुद्धता, धार्मिकता, ज्ञान, अफाट बुद्धी यासारखे गुण घेतले जाऊ शकतात.
निष्कर्ष:
मित्रांनो, टाकीचे घाव सोसल्याविना देव पण येत नाही, हे आपण लहानपणापासून ऐकलेले असेलच. या संत मुक्ताबाई यांना देखील समाजाने मोठ्या प्रमाणावर त्रास दिला होता. या त्रासाला न डगमगता त्यांनी खंबीरपणे आपले कार्य केले, आणि अभंगवाणी ची रचना केली. त्यामुळे त्यांना देवत्व प्राप्त झालेले असून, आज मोठ्या प्रसन्नतेने व भक्तिभावाने संत मुक्ताबाई यांना संपूर्ण महाराष्ट्र सह भारतभर पुजले जाते.
आजच्या भागामध्ये आपण या संत मुक्ताबाई यांच्या विषयी इत्यंभूत माहिती बघितली आहे. ज्यामध्ये संत मुक्ताबाई यांची माहिती, त्यांचे बालपण, त्यांचा इतिहास, त्यांच्या पारंपारिक प्रथा परंपरा, त्यांचा जन्म, त्यांचे लग्न, व त्यांच्या अभंगाविषयी इत्यंभूत माहिती बघितली आहे. सोबतच इतरही अवांतर माहिती देखील बघितली आहे. सोबतच काही नेहमी विचारले जाणारे प्रश्न देखील बघितलेले आहेत…
FAQ
संत मुक्ताबाई यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला होता?
संत मुक्ताबाई यांचा जन्म महाराष्ट्रातील पैठण या शहराजवळ असणाऱ्या आपेगाव या गावांमध्ये झाला होता. काही संदर्भानुसार त्यांचा जन्म आळंदी मध्ये झाला असे देखील सांगितले जाते.
संत मुक्ताबाई यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला होता?
संत मुक्ताबाई यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला, याला दोन मतप्रवाह असून काही लोकांच्या मते १२७७ यावर्षी, तर काही लोकांच्या मध्ये १२७९ यावर्षी यांचा जन्म झाला असावा, असे सांगितले जाते.
संत मुक्ताबाई यांनी कोणासोबत विवाह केलेला होता?
संत मुक्ताबाई यांनी विठ्ठल यांच्यासोबत विवाह केला होता असे सांगितले जाते.
आजच्या भागामध्ये आपण स्त्री संत आणि संत कवियत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संत मुक्ताबाई किंवा मुक्ताई यांच्या विषयी संपूर्ण माहिती बघितली आहे. महाराष्ट्रामध्ये स्त्री संत परंपरांची सुरुवात करणाऱ्या आद्य संत म्हणून देखील त्यांचा उल्लेख केला जातो. या मुक्ताबाई यांच्या विषयी या लेखामध्ये देण्यात आलेली माहिती तुम्हाला आवडली असेलच, तर मग तुमच्या प्रतिक्रिया कमेंट सेक्शनमध्ये आवश्य कळवा. आणि तुमच्या ओळखीतील अध्यात्माची ओढ असणाऱ्या लोकांना व मित्र-मैत्रिणींना या माहितीची लिंक शेअर करून त्यांच्यापर्यंत देखील ही माहिती आवश्य पोहोचवा. धन्यवाद…!