Maharashtra Security Force Information In Marathi आज आपण अगदी सुखाने दोन घास खाऊन कुठेही निश्चिंतपणे फिरत असू, तर त्याचे संपूर्ण श्रेय कायदा आणि सुव्यवस्था पाळणाऱ्या विविध दलातील आपल्या सुरक्षा बांधवांना जाते.
महाराष्ट्र सुरक्षा बलची संपूर्ण माहिती Maharashtra Security Force Information In Marathi
भारतासह महाराष्ट्र मध्ये सुद्धा वेगवेगळ्या स्तरांमध्ये सुरक्षा बलांची निर्मिती केलेली आहे, ज्यामध्ये अनेक सुरक्षा बलांचा समावेश होतो. यात महाराष्ट्र सुरक्षा बल ज्याला इंग्रजीमध्ये महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स असे म्हटले जाते ते सुद्धा समाविष्ट आहे.
आजच्या भागामध्ये आपण महाराष्ट्र सुरक्षा बलाबद्दल इत्यंभूत माहिती बघणार आहोत…
बलाचे नाव: | महाराष्ट्र सुरक्षा बल |
इंग्रजी नाव: | Maharashtra Security Force |
पाठबळ पुरवणारी संस्था: | महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ |
नियमन करणारी संस्था/ मंडळ: | महाराष्ट्र राज्य शासन |
स्थापना वर्ष: | २०१० साल |
मुख्यालय: | मुंबई, महाराष्ट्र |
कुठलाही जवान म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर वर्दीमध्ये बंदूकधारी व्यक्ती येतो. भारतामध्ये विविध पातळीवर कायदा आणि सुव्यवस्थेचे नियमन करण्यासाठी अनेक जवानांचे सुसज्ज असे बल तयार करण्यात आलेले आहेत. ज्याप्रमाणे केंद्रीय पातळीवर सीआयएसएफ अर्थात सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स आहे, त्याच धर्तीवर महाराष्ट्र राज्याने महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाशी मिळून इसवी सन २०१० मध्ये महाराष्ट्र सुरक्षा दल स्थापन केले.
सुरुवातीला या बलामध्ये केवळ १५० ते २०० इतकेच जवान होते. आज महाराष्ट्र सुरक्षा बल हे सर्वार्थाने सीआयएसएफ इतकेच प्रभावी आहे, मात्र सीआयएसएफ आणि एम एस एफ जवानांना दिल्या जाणाऱ्या सुविधा, पगार, भत्ते आणि विशेष लाभ यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. त्यामुळे एम एस एफ जवानांमध्ये कुठेतरी कमीपणाची भावना निर्माण होत आहे.
ज्यावेळी २०१० मध्ये महाराष्ट्र सुरक्षा बलाची स्थापना करण्यात आली, त्यावेळी या बलाचे मूळ उद्दिष्ट बेरोजगार तरुणांना नोकऱ्यांमध्ये समाविष्ट करून घेणे, आणि महाराष्ट्र राज्याचे एक बलशाली सुरक्षा पथक तयार करणे हे होते.
यानंतर मात्र महाराष्ट्र सुरक्षा महामंडळाने या एम एस एफ जवानांची अनेक सरकारी आणि बिगर सरकारी संस्था, आस्थापना येथे सुरक्षारक्षक म्हणून नियुक्ती करण्यास सुरुवात केली.
एम एस एफ जवान म्हणून रुजू होण्यासाठी जवानांना इयत्ता बारावी चे शिक्षण घेणे बंधनकारक करण्यात आलेले आहे, तसेच इच्छुक उमेदवारांची शारीरिक स्थिती देखील उत्तम असणे गरजेचे असते. निवड झाल्यानंतर या जवानांना कठोर प्रशिक्षण आणि शारीरिक चाचणीला सामोरे जावे लागते.
महाराष्ट्र सुरक्षा बल आणि जवानांचे रोष:
माहितीनुसार महाराष्ट्र सुरक्षा बलातील बऱ्याचशा जवानांनी नोकरी सोडण्यास प्राधान्य दिले आहे. याचे अनेक कारणे सांगितली जातात, ज्यामध्ये गुप्त माहितीनुसार महामंडळाने काही जवानांवर गोळीबार केला होता. तसेच एमएसएफ जवानांच्या मागणीकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात आहे, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे या जवानांना कर्तव्याच्या तुलनेत अतिशय कमी वेतन दिले जाते.
एम एस एफ मध्ये सहभागी होण्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची पद्धत:
एम एस एफ मध्ये सहभागी होण्यासाठी तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने ऑनलाइन अर्ज करू शकता यासाठी सर्वप्रथम महामंडळाच्या mahasecurity.gov.in या वेबसाईटवर जावे. त्यानंतर तिथे दिलेली सर्व माहिती अगोदर काळजीपूर्वक वाचून घ्यावी, आणि ‘ऑनलाईन अर्ज करा’ या पर्यायास निवडावे.
जर तुम्ही प्रथमच अर्ज करत असाल तर ‘क्लिक हियर फॉर न्यू रजिस्ट्रेशन’ या पर्यायावर क्लिक करा किंवा तुमची नोंदणी आधीच झाली असेल तर ‘सबमिट’ या बटणावर क्लिक करा.
नोंदणीनंतर तुम्हाला तुमचा युजरनेम आणि पासवर्ड मिळेल. त्याने पुन्हा लॉगिन करून फॉर्ममध्ये मागितलेली सर्व माहिती काळजीपूर्वक भरा, त्यानंतर पुढे तुम्हाला तुमचा पासपोर्ट साईज फोटोग्राफ आणि स्वाक्षरी मागितली जाईल. तसेच ओळखपत्रांचे स्कॅन केलेले फोटो किंवा पीडीएफ प्रति मागितल्या जातील. या सर्व प्रती अपलोड केल्यानंतर फॉर्म सबमिट करावा.
एम एस एफ मध्ये जॉईन होण्यासाठी पात्रता:
एम एस एफ जवान म्हणून रुजू होण्यासाठी तुम्हाला शैक्षणिक आणि शारीरिक अशा दोन्ही प्रकारच्या पात्रता पार करणे गरजेचे असते.
शैक्षणिक पात्रता:
एम एस एफ जवान म्हणून भरती होण्यासाठी उमेदवारांनी किमान बारावीपर्यंतचे शिक्षण देणे आवश्यक असते. बारावी मध्ये ज्या उमेदवारांना ७० टक्के गुण मिळालेले असतील त्यांच्यासाठी ही भरती प्रक्रिया अतिशय सोपी होऊन जाते, कारण बारावी मध्ये ७०% पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या उमेदवारांना एमएसएफ भरती प्रक्रियेत ५० गुण अतिरिक्त मिळतात.
शारीरिक पात्रता:
कुठल्याही सेक्युरिटी फोर्स मध्ये जायचे असेल तर शरीर तेवढे सदृढ असावे लागते. त्यामुळे विविध भरती प्रक्रियांमध्ये शारीरिक पात्रतेची अट ठेवण्यात येते. एमएसएफ जवान म्हणून रुजू होण्यासाठी सुद्धा तुम्हाला काही शारीरिक पात्रता निकष पार पाडावी लागतात. ते म्हणजे उंची किमान १७० सेमी पेक्षा जास्त असावी, तसेच वजन देखील ६० किलोग्राम च्या पुढे असावे, छाती बद्दल बोलायचे झाल्यास छातीचा घेर न फुगवता ७९ सेमी तर फुगून ८४ सेमी इतका असायला हवा.
एम एस एफ जवान भरती चे अटी व शर्ती:
एम एस एफ भरती पार पाडण्यासाठी तुम्हाला काही अटी आणि शर्तींचे पालन करावे लागते, ज्यामध्ये भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी उमेदवाराचे वय १८ ते २८ वर्ष यादरम्यानच असले पाहिजे. त्याचप्रमाणे सदर उमेदवार महाराष्ट्राचा नागरिक असावा, म्हणजेच त्याकडे महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र असणे गरजेचे ठरते. भरती प्रक्रियेत ठरवलेल्या गुणचाचणीनुसार त्याला योग्य गुण मिळणे आवश्यक असते.
एम एस एफ जवानांना मिळणारे लाभ व भत्ते:
एम एस एफ जवानांना मासिक १७ हजार रुपये मिळतात त्यामध्ये १२% चा ईपीएफ असतो. तसेच ज्या जवानांना हत्यारे देण्यात आलेले आहेत, त्यांच्यासाठी अतिरिक्त एक हजार रुपये दिले जातात. आणि सर्व जवानांना दरवर्षी एक नवीन युनिफॉर्म दिला जातो.
निष्कर्ष:
कुठलाही देश किंवा राज्य म्हटलं की कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखलीच जावी लागते. त्यासाठी अनेक सुरक्षा दल कसोशीने प्रयत्न करत असतात, आणि डोळ्यात तेल घालून २४ तास देशाची सेवा करत असतात.
सामान्य नागरिकांनी देखील या सर्व जवानांना सहकार्य करत कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मदत केली पाहिजे, तेव्हा कुठेतरी देशांमध्ये शांतता नांदण्यास मदत होईल. बरेचशे जवान अगदी बारा-बारा चौदा-चौदा तास कर्तव्य बजावत असतात. त्यावेळी नागरिकांनी स्वतःहूनच कायदा आणि सुव्यवस्थेसाठी प्रयत्न करणे अपेक्षित असते.
FAQ
महाराष्ट्र सुरक्षा बलाची स्थापना केव्हा करण्यात आली?
महाराष्ट्र सुरक्षा बलाची स्थापना सन २०१० साली करण्यात आली.
महाराष्ट्र सुरक्षा बलाचे मुख्यालय कोठे आहे?
महाराष्ट्र सुरक्षा बलाचे मुख्यालय मुंबई, महाराष्ट्र या ठिकाणी आहे.
महाराष्ट्र सुरक्षा बलाचे नियमन कोणा द्वारे केले जाते?
महाराष्ट्र सुरक्षा बलाचे नियमन महाराष्ट्र शासनाद्वारे केले जाते.
महाराष्ट्र सुरक्षा बलातील कर्मचाऱ्यांना साधारणपणे किती पगार मिळतो?
महाराष्ट्र सुरक्षा बलातील कर्मचाऱ्यांना दरमहा ९९०० ते ११०४०/१७००० रुपये इतका पगार मिळतो.
महाराष्ट्र सुरक्षा बलामध्ये सामील होण्यासाठी किमान शैक्षणिक पात्रता काय असावी लागते?
महाराष्ट्र सुरक्षा बलामध्ये सामील होण्याकरिता उमेदवाराने किमान बारावी इयत्तेचे शिक्षण घेणे गरजेचे असते.
मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण महाराष्ट्र सुरक्षा बल याविषयी संपूर्ण माहिती पाहिली. ही माहिती तुम्हाला करिअरच्या दृष्टीने नक्कीच महत्त्वपूर्ण ठरेल, तसेच नुकतेच बारावी इयत्तेतून उत्तीर्ण झालेल्या आणि जवान म्हणून करिअर करू इच्छिणाऱ्या आपल्या मित्र-मैत्रिणींना ही माहिती शेअर करण्यास विसरू नका. आणि नेहमीप्रमाणे आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा.
धन्यवाद…