Mangesh Padgaonkar Information In Marathi मंगेश पाडगावकर म्हटलं की तुमच्या डोळ्यासमोर आपोआप त्यांच्या कविता आणि गाणी उभे राहत असतील. मंगेश पाडगावकर हे महाराष्ट्रातील एक मराठी कवी असून, त्यांचा जन्म सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला या ठिकाणी झाला होता. तो दिवस होता १० मार्च १९२९ त्यांचे संपूर्ण नाव मंगेश केशव पाडगावकर असे होते.
मंगेश पाडगावकर यांची संपूर्ण माहिती Mangesh Padgaonkar Information In Marathi
त्यांच्या पत्नीचे नाव यशोदा पाडगावकर होते, आणि या दांपत्याला अभय पाडगावकर, अजित पाडगावकर आणि अंजली पाडगावकर कुलकर्णी अशी तीन अपत्य होती.
आजच्या भागामध्ये आपण मंगेश पाडगावकर यांच्या विषयी माहिती घेण्याबरोबर त्यांचे जीवनचरित्र जाणून घेणार आहोत…
नाव | मंगेश पाडगावकर |
संपूर्ण नाव | मंगेश केशव पाडगावकर |
जन्म दिनांक | १० मार्च १९२९ |
जन्मस्थळ | वेंगुर्ला, सिंधुदुर्ग, महाराष्ट्र |
मृत्यू दिनांक | ३० डिसेंबर २०१५ |
मृत्यू स्थळ | मुंबई |
मंगेश पाडगावकरांचे प्रारंभिक आयुष्य:
मंगेश पाडगावकर यांचा जन्म १० मार्च १९२९ या दिवशी वेंगुर्ला या ठिकाणी झाला. हा भाग सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये असून कोकण विभाग अंतर्गत येतो. त्यांनी मराठी व संस्कृत या विषयांमध्ये एम ए पदवी मुंबई विद्यापीठातून घेतलेली आहे. तसेच मुंबई येथील रुईया या कॉलेजमध्ये त्यांनी अनेक वर्ष मराठी विषयाचे अध्यापन देखील केलेले आहे.
मंगेश पाडगावकरांचे शैक्षणिक आयुष्य:
मंगेश पाडगावकर यांनी मुंबई विद्यापीठाकडून मराठी व संस्कृत या विषयांमध्ये मास्टर ऑफ आर्ट्स अर्थात एमए ही पदवी मिळवली होती. त्यानंतर १९७९ ते १९९० अशा दोन दशकांच्या कालावधी करिता त्यांनी मुंबईमधील यू एस इन्फॉर्मेशन सर्विस अर्थात यु एस आय एस या ठिकाणी संपदाकाचे कार्य केलेले आहे.
तत्पूर्वी ते अनेक वर्ष मुंबईच्या मातोश्री मिठीबाई महाविद्यालय येथे मराठी विषय शिकवत असत. तसेच काही काळ त्यांनी साधना या साप्ताहिक अंकांमध्ये देखील कार्य केलेले आहे, जेथे ते संपादक होते.
मंगेश पाडगावकरांचे कवी या करिअर कडे वाटचाल:
मंगेश पाडगावकरांनी आपल्या आयुष्यात अनेक भूमिका बजावलेल्या असल्या तरी देखील, आज आपण मंगेश पाडगावकर यांना एक कवी म्हणूनच जास्त ओळखतो. त्यांनी कवितेचा छंद फार लहानपणापासूनच जोपासला होता. अगदी वयाच्या चौदाव्या वर्षापासून ते कविता करत असत.
आजपर्यंत त्यांची ४० प्रकाशाने प्रकाशित झालेली आहेत. जातील बहुतांशी प्रकाशने ही मोज प्रकाशन यांनीच प्रकाशित केलेली असून, त्यांनी आपल्या कवितांद्वारे अनेक सामाजिक विषय हाताळले आहेत. ज्यामध्ये प्रेम कविता, सामाजिक किंवा राजकीय विषयांवरील कविता, निबंध संग्रह, व इंग्रजी भाषेतील मराठी भाषांतर अशा अनेक साहित्य विषयांमध्ये कार्य केलेले आहे.
मंगेश पाडगावकर यांचे लेखन इतके उत्कृष्ट आहे की अमेरिकेच्या लायब्ररी ऑफ काँग्रेस यांच्याद्वारे त्यांच्या सुमारे ३१ कामांचे भाषांतर व संपादन केले गेलेले आहे. त्यांच्या सलाम या कवितासंग्रहामध्ये आजूबाजूच्या भ्रष्ट सामाजिक चालीरीती व आर्थिक शक्ती यांच्या संरचनेवर त्यांनी टीका केलेली आहे.
त्यांनी बाल कादंबरी या विषयाला देखील हात घातलेला आहे, सुट्टी एक सुट्टी ही त्यांची खूप गाजलेली बालकादंबरी आहे. तसेच निंबोणीच्या झाडामागे हा लेखसंग्रह देखील त्यांनी लिहिलेला आहे.
ते मुर्गी क्लब मध्ये सदस्य सुद्धा होते. हा क्लब मराठी साहित्यकांद्वारे अल्गोक्वीन गोलमेज या अनुषंगाने तयार करण्यात आलेला होता. त्यात विंदा करंदीकर, गंगाधर गाडगीळ, वसंत बापट, सदानंद रेगे, श्री पु भागवत यांच्यासह मंगेश पाडगावकरांचा देखील समावेश होता. जे प्रत्येक महिन्याला एकत्र मिळत असत. आणि आपल्या साहित्यिक शब्दांची देवाण घेवाण करत असत.
ज्यावेळी मंगेश पाडगावकर युएसए मध्ये होते, तेव्हा ते मोकळ्या वेळ मध्ये भाषांतराचे काम देखील करत असत. त्यांनी सर्वात प्रथम एक अमेरिकन कादंबरी अनुवादित केली होती, जिचे नाव होते पाथ फाईंडर. या अनुवादित कादंबरीला त्यांनी वाटाड्या नाव दिले होते. त्यानंतर त्यांनी मीराबाईंच्या अनेक कलाकृती देखील अनुवादित केल्या. आणि त्याचा एकत्रित संग्रह १९६५ मध्ये मीरा या नावाने प्रकाशित केला. या कार्यासाठी त्यांना काकासाहेब कालेलकर यांनी शिफारस केली होती.
मंगेश पाडगावकरांना मिळालेले विविध पुरस्कार:
मंगेश पाडगावकर हे पद्मविभूषण पुरस्कार पात्र व्यक्ती आहेत. हा पुरस्कार त्यांना २० एप्रिल २०१३ या दिवशी तत्कालीन राष्ट्रपती श्री प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते देण्यात आला होता.
त्याचप्रमाणे त्यांच्या सलाम या कवितासंग्रह करीता साहित्य अकादमीचा १९८० सालचा पुरस्कार देखील मिळालेला आहे. तसेच एमपी साहित्य पुरस्कार १९५६, १९५३ आणि १९५५ या दोन्ही वर्षाचा महाराष्ट्र राज्य पुरस्कार देखील त्यांना मिळालेला आहे. महाराष्ट्र सरकारने त्यांना २००८ यावर्षी महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन देखील गौरवले आहे.
पुणे विद्यापीठ यांनी त्यांना जीवनसाधना गौरव पुरस्कार इसवी सन २०१२ या वर्षी दिला होता. तसेच त्यांना २०१३ या वर्षी महाराष्ट्र साहित्य परिषदेचा देखील पुरस्कार प्राप्त झालेला आहे.
पाडगावकरांचे काही प्रसिद्ध कवितासंग्रह:
एक कवी आणि गीतकार म्हणून मंगेश पाडगावकर खूपच प्रसिद्ध होते. त्यांनी लिहिलेल्या अनेक कविता प्रसिद्ध झाले असल्या तरी देखील काही मोजक्या निवडक कवितांची नावे देत आहोत ती पुढील प्रमाणे.
धरनृत्य, जिप्सी, छोरी, शर्मिष्ठा, निंबोणीच्या झाडामागे, उत्सव, भोलानाथ, मीरा, वात्रटिका, बबलगम, विदूषक, गझल, तुझे बोलणे, सलाम, राधा, कबीर, झुले बाई झुला, कोकरू, सुगम गीते इत्यादी कविता प्रसिद्ध आहेत.
अशा या साहित्य क्षेत्रातील उत्कृष्ट कवी आणि गीतकाराचा अगदी अल्पशा आजाराने वयाच्या ८६ व्या वर्षी मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूची तारीख ३० डिसेंबर २०१५ व ठिकाण मुंबई आहे.
निष्कर्ष:
साहित्य हे एखाद्या भाषेचे अलंकार असते. साहित्यामुळे त्या भाषेला एक वेगळाच दर्जा प्राप्त होतो. आणि ती भाषा समृद्ध होण्यास मदत होते. आणि या सर्वांमध्ये मोलाची भूमिका बजावतात ते लेखक आणि कवी होय. असेच एक कवी आणि गीतकार म्हणून मंगेश पाडगावकर यांना ओळखले जाते.
आज आपण या मंगेश पाडगावकर यांच्या विषयी माहिती घेतली, त्यामध्ये तुम्हाला त्यांच्या प्रारंभ जीवनाबद्दल माहिती मिळाली असेल. सोबतच त्यांनी कोणते शिक्षण घेतले, करिअर कसे केले, त्यांना कुठ कुठले पुरस्कार मिळालेले आहेत, आणि त्यांच्या मृत्यू बद्दल माहिती इत्यादी सर्व वाचायला मिळालेले असेल.
FAQ
प्रसिद्ध कवी मंगेश पाडगावकर यांचे पूर्ण नाव कोणते आहे?
मंगेश पाडगावकरांचे पूर्ण नाव मंगेश केशव पाडगावकर असे आहे.
श्री मंगेश पाडगावकर यांचा जन्मदिवस केव्हा असतो?
श्री मंगेश पाडगावकर यांचा जन्मदिवस १० मार्च या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी १९२९ यावर्षी त्यांचा जन्म झाला होता.
मंगेश पाडगावकर यांचा मृत्यू केव्हा व कुठे झाला होता?
श्री मंगेश पाडगावकर यांचा मृत्यू ३० डिसेंबर २०१५ या दिवशी मुंबई या ठिकाणी झाला होता.
मंगेश पाडगावकर यांचे जन्म ठिकाण कोणते आहे?
मंगेश पाडगावकर यांचे जन्म ठिकाण वेंगुर्ले या ठिकाणी असून, हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येते. महाराष्ट्राच्या कोकण विभागाअंतर्गत हे ठिकाण आहे.
पाडगावकरांच्या काही गाजलेल्या कलाकृती कोणत्या आहेत?
श्री मंगेश पाडगावकर यांच्या सलाम, जिप्सी, व तुझे गीत गाण्याची ह्या कविता फारच प्रसिद्ध झाल्या होत्या.
मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण मंगेश पाडगावकर यांच्या विषयी माहिती पाहिली. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट मध्ये अवश्य कळवा. तसेच तुमच्या इतरही मित्र-मैत्रिणींना ही माहिती नक्की पाठवा.
धन्यवाद…