Leopard Animal Information In Marathi आजकाल वर्तमानपत्रांमध्ये बिबट्याच्या हल्ल्याबाबत नेहमी बातम्या वाचायला मिळतात. या गोष्टीमुळे आपल्याला बिबट्याशी बरीच ओळख झालेली आहे, मात्र जंगलामध्ये राहणारा हा बिबट्या मानवी वसाहतीमध्ये कसा आला याचे उत्तर देखील मानवाकडेच आहे. बेसुमार जंगलतोड आणि बिबट्यांच्या नैसर्गिक अधिवासाचे नाश करणे हे या गोष्टी मागील मूळ कारण आहे.
बिबट्या प्राण्याची संपूर्ण माहिती Leopard Animal Information In Marathi
बिबट्या हा प्राणी आफ्रिका व आशिया खंडात आढळणारा प्राणी असून, तो पँथेरा या वंशामधील आहे. ज्यामध्ये वाघ, सिंह, चित्ता यांसारख्या प्राण्यांचा समावेश होतो. मात्र या सर्वांपेक्षा बिबट्या काही प्रमाणात लहान असतो. बिबट्या लहान दिसत असला तरी देखील अत्यंत हुशार आणि चपळ असतो.
तसेच शिकार करण्यासाठी त्याची एकाग्रता अतिशय वाखाणण्याजोगी असते. त्याच्या शिकार करण्याच्या पद्धती आणि हल्ला करण्याच्या शैलीमुळे ते एक हिस्त्र शिकारी प्राणी म्हणून ओळखले जातात. दिवसा लपून बसणारे हे प्राणी शक्यतो रात्रीच्या वेळी शिकार करण्यास प्राधान्य देतात. या बिबट्या प्राण्याचा पळण्याचा वेग साधारणपणे प्रती तास ५६ ते ६० किलोमीटर इतका असतो.
आजच्या भागामध्ये आपण बिबट्या या प्राण्याविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत…
नाव | बिबट्या |
इंग्रजी नाव | लेपर्ड |
शास्त्रीय नाव | पँथेरा पारड्स |
वंश | कणाधारी प्राणी |
प्रकार | मांसभक्षी प्राणी |
जात | सस्तन प्राणी |
कुळ किंवा कुटुंब | फेलिडे |
उपकुळ | पँथेरीने |
जिनस | पँथेरा |
बिबट्या आणि इतर मांजर वर्गीय प्राण्यांमधील फरक:
मांजर वर्गीय प्राण्यांमध्ये चित्ता, बिबट्या, वाघ आणि सिंह इत्यादी प्राण्यांचा समावेश होतो. यातील बिबट्या काही अंशी वेगळा असतो. बिबट्या या प्राण्याची त्वचा काहीशी जाडसर, मात्र मऊ केसांनी झाकलेली असते. ज्याचा रंग सोनेरी असतो, आणि त्यावर गडद काळे ठिपके असतात. बिबट्याच्या पोटाचा रंग बहुतेक वेळा पांढरा असतो. तसेच त्याची शेपटी मात्र शरीराच्या तुलनेत काहीशी लहान असते.
बिबट्याचे पाय देखील फारसे मोठे नसतात, जेणेकरून त्याला झाडावर चढणे देखील सहज शक्य होते. इतर प्राण्यांपेक्षा लहान असला तरीदेखील बिबट्याचे डोके मात्र मोठे असते.
बिबट्याची शारीरिक वैशिष्ट्ये:
- बिबट्याचे डोके रुंद अर्थात १०० ते १९६ सेमी पर्यंत असते. तसेच शरीराच्या तुलनेत छोटी अर्थात ७० ते ९५ सेंटीमीटर शेपटी असते.
- इतर प्राण्यांपासून वेगळी गोष्ट म्हणजे बिबट्याची मादी ही नरापेक्षा काहीशी लहान असते.
- बिबट्याचे वजन नरांमध्ये ३० किलो पासून ७० किलो पर्यंत, तर मादीमध्ये २८ किलो पासून ६० किलो पर्यंत असते.
- शरीरापेक्षा मोठे डोके हे बिबट्याचे एक शारीरिक वेगळेच वैशिष्ट्य आहे.
- बिबट्याचे पंजे हे अतिशय रुंद, पकड मजबूत असणारे, मात्र तेवढेच लवचिक देखील असतात. त्यामुळे ते आपली शिकार अतिशय घट्ट पकडून ठेवू शकतात. तसेच त्यांच्या नख्या शिकारी फाडण्यासाठी मदत करतात.
- बिबट्याच्या संपूर्ण अंगावर जणू काय पाकळ्या पसरल्यासारखे गडद रंगाचे ठिपके असतात, त्यामुळे बिबट्याला गुलदार असे नाव देखील आहे.
- बिबट्याचे संपूर्ण अंग म्हणजे डोके, पाठ, पोट, छाती, पाय, आणि चेहरा एका वैशिष्ट्यपूर्ण काळ्या ठिपक्यांनी व पट्ट्यांनी आच्छादलेले असते.
बिबट्याच्या वास्तव्याचे प्रदेश:
बिबट्याचे नैसर्गिक अधिवास विरळ होत चालल्यामुळे, बिबट्या दुर्मिळ प्राणी होत चालला आहे. त्यामुळे बिबट्याच्या अधिवास क्षेत्राला संवर्धन क्षेत्र म्हणून देखील घोषित केले गेलेले आहे. खंडांचा विचार केल्यास आफ्रिका, कंबोडिया, आशिया, अमेरिका इत्यादी सर्व ठिकाणी बिबट्या आढळून येतो.
मांजर वर्गीय इतर प्राण्यांपेक्षा बिबट्याला राहण्याकरता मोठी जागा लागत असते, कारण त्यांना एका जागी बसलेले आवडत नाही. मात्र असे असले तरी देखील बिबट्या कधीही वाघ राहणाऱ्या प्रदेशात जाणे टाळतो.
होंगकोंग, सिंगापूर, लिबिया, व कुवेत यांसारख्या देशांमध्ये आढळणाऱ्या बिबट्याच्या प्रजाती जवळपास नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.
बिबट्याचा आहार:
बिबट्या हे प्राणी शिकार करून आपले पोट भरत असल्यामुळे, त्यांना मांसाहारी आहार हवा असतो. ते ससा, माकड, हरिण, डुक्कर, यांच्यासोबत अनेक परजीवी सजीवांची शिकार करून खातात. मानवी वस्तीमध्ये आलेले बिबट्या प्राणी पाळीव कुत्र्यांचे मांस खातात. तसेच लहान प्राणी जसे की शेळ्या, मेंढ्या, बकरू इत्यादी प्राण्यांचे देखील मांस खातात.
भारतामधील बिबट्याच्या लोकसंख्येची स्थिती:
इतर मांजर वर्गीय प्राण्यांप्रमाणेच बिबट्याची लोकसंख्या देखील धोक्यात आलेली आहे. त्यामुळे त्याच्या संरक्षणाची गरज निर्माण झालेली आहे. प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो ऑफ इंडिया या संस्थेने २१ डिसेंबर २०१८ रोजी आपल्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या एका लेखांमध्ये बिबट्यांच्या संख्याची अहवाल देण्यात आलेला आहे.
ज्यानुसार मागील काही वर्षात बिबट्यांच्या संख्येमध्ये सुमारे ६० टक्क्यांनी वाढ झालेली आहे. जे एक चांगले लक्षण आहे. २०१४ मधील अहवालानुसार भारतात ७९१० बिबटे होते, मात्र आता त्यामध्ये १२८२ बिबट्यांची वाढ झालेली आहे. त्यांच्या संख्येत कर्नाटक, महाराष्ट्र, आणि मध्य प्रदेश हे राज्य आघाडीवर आहेत. महाराष्ट्रामध्ये बिबट्यांची संख्या १६९० इतकी आढळून येते.
निष्कर्ष:
आजच्या भागामध्ये आपण बिबट्या या हिस्त्र प्राण्याबद्दल माहिती पाहिली. या माहितीमध्ये तुम्हाला मांजरवर्गीय कुळातील इतर प्राणी आणि बिबट्या यांची तुलना, बिबट्याची शारीरिक क्षमता व वैशिष्ट्ये, त्याचे राहण्याचे प्रदेश, मुख्य आहार, त्यापासून संरक्षण करावयाच्या पद्धती, तसेच भारतामध्ये असणाऱ्या बिबट्यांची संख्या इत्यादी गोष्टीबद्दल इत्यंभूत माहिती मिळालेली असेलच.
पूर्वीच्या काळी जंगली प्राणी म्हणून ओळखला जाणारा हा बिबट्या आजकाल सर्रास शेतीवाडी मध्ये आढळून येतो. दररोजच्या वर्तमानपत्रात किमान एक तरी बातमी बिबट्याच्या हल्ल्याची ही असतेच, त्यामुळे बिबट्या व मानवी संघर्ष वाढलेला आहे. आणि यामागे जबाबदार देखील मानवच आहे.
कारण बिबट्याच्या नैसर्गिक अधिवासचा नाश केल्यामुळे ते आता मानवी वस्तीमध्ये अतिक्रमण करायला लागलेले आहेत. ही परिस्थिती अजून अशीच चालत राहिली, तर येत्या काही दिवसात पाळीव प्राण्यांप्रमाणे बिबटे सर्रास कुठेही आढळून येतील.
FAQ
बिबट्या या प्राण्याचा समावेश कोणत्या प्रकारच्या प्राण्यांमध्ये होतो?
बिबट्या या प्राण्याचा समावेश मांजर वर्गीय प्राण्यांमध्ये होतो. ज्यामध्ये वाघ, सिंह, आणि चित्ता यांसारख्या मोठ्या प्राण्यांचा समावेश आहे. आणि हा एक मांसाहारी प्रकारचा प्राणी आहे.
बिबट्या हा प्राणी मुख्यत्वे कोणत्या प्रदेशांमध्ये आढळून येतो?
बिबट्या हा प्राणी मुख्यत्वे आफ्रिकेचा ईशान्य भाग, आशियाचा मध्यभाग, तसेच भारत आणि चीन इत्यादी देश, सहारा वाळवंट, आणि आफ्रिका इत्यादी प्रदेशांमध्ये आढळून येतो. मात्र आफ्रिका वगळता इतर खंडामध्ये त्याची लोकसंख्या धोक्याच्या पातळीत पोहोचलेली आहे.
बिबट्या या प्राण्याबद्दल काय वैशिष्ट्ये सांगता येतील?
बिबट्या हा मांजर वर्गीय गटातील सर्वात वेगवान प्राणी असून, तो तब्बल ५८ किलोमीटर प्रति तास या वेगाने धावू शकतो. तसेच त्याची एक उडी ही तब्बल सहा मीटर पर्यंत असू शकते. हा बिबट्या बहुतेक वेळा एकटाच आढळून येतो. कारण त्यांना एकाकी रहायला आवडते.
भारतातील बिबट्यांच्या लोकसंख्येची स्थिती काय आहे?
अधिकृत अहवालानुसार भारतामध्ये बिबट्यांच्या संख्येमध्ये तब्बल ६० टक्के इतकी वाढ झालेली असून, २०१४ मध्ये असणाऱ्या ७९१० बिबट्यांमध्ये १२८२ बिबट्यांची भर पडलेली आहे.
बिबट्याचा मुख्य आहार कोणता समजला जातो?
बिबट्या हा शिकारी प्राणी असल्यामुळे, मांस हे त्याचे मुख्य आहार समजले जाते. तो इतर शाकाहारी प्राण्यांची शिकार करून खातो, ज्यामध्ये ससा, हरीण, डुक्कर, किंवा माकड यांसारख्या प्राण्यांचा समावेश होतो.
आजच्या भागामध्ये आपण बिबट्या या हिस्त्र प्राण्याविषयी माहिती पाहिलेली आहे. ही माहिती तुम्हाला आवडली ना?, अहो तर मग तशी प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये अवश्य कळवा. आणि तुमच्या इतरही मित्र-मैत्रिणींना हा ज्ञानमय लेख अवश्य शेअर करा.
धन्यवाद…