सरकारी योजना Channel Join Now

गोळा फेक खेळाची संपूर्ण माहिती Gola Fek Game Information In Marathi

Gola Fek Game Information In Marathi ज्या शासकीय नोकऱ्यांमध्ये शारीरिक क्षमतेची आवश्यकता असते, तेथे निवड करण्याआधी विविध पैलूंद्वारे उमेदवाराची शारीरिक पातळी तपासली जाते. त्यामध्ये गोळा फेक याचा देखील समावेश होतो. मुख्यत्वे पोलीस भरतीमध्ये गोळा फेक चाचणी घेतली जाते.

Gola Fek Game Information In Marathi

गोळा फेक खेळाची संपूर्ण माहिती Gola Fek Game Information In Marathi

गोळा फेक हा एक वजनदार चेंडू शक्य तितक्या दूर फेकण्याचा प्रकार असून, ज्यावेळी १९९६ मध्ये आधुनिक ऑलम्पिक स्पर्धा सुरू झाल्या, तेव्हापासूनच पुरुष गोळा फेक स्पर्धा घेतल्या जाऊ लागल्या. त्यामध्ये १९४८ च्या सुमारास महिलांनी प्रवेश केला.

आजच्या भागामध्ये आपण गोळा फेक या खेळाविषयी माहिती बघणार आहोत…

नावगोळा फेक
उगमसोळाव्या शतकात
उगमावेळी स्वरूपदरबारामध्ये वजनदार हातोडा फेकणे
आजचे स्वरूपएक वजनदार गोल गोळा किंवा बॉल जास्तीत जास्त दूर फेकण्याचा प्रयत्न करणे
खेळाडूंची संख्याएकावेळी एक असे एकमेकांविरुद्ध कितीही
मैदानगोळा फेकण्यासाठी ७ फूट व्यासाचे वर्तुळ, आणि गोळा फेकण्यासाठी सभोवताली काही जागा

सर्वप्रथम आयर्लंड या देशांमध्ये गोळा फेक स्पर्धा खेळली गेली असावी असा उल्लेख आढळतो. ट्रॉयच्या वेढ्यामध्ये असताना सैनिकांनी गोळा फेक स्पर्धा आयोजित केल्याचे देखील संदर्भ सापडतात. सर्वात जुन्या रेकॉर्ड्समध्ये स्कॉटिश हायलँड प्रकारातील दगड अर्थात वजनी दगड फेकण्याच्या घटना दिसून येतात.

साधारणपणे १६ व्या शतकाच्या आसपास राजा हेन्री याच्या दरबारामध्ये वजनदार हातोडा फेकण्याच्या स्पर्धा आयोजित केल्या जात असत. त्यानंतर मध्ययुगामध्ये सैन्याने सर्वप्रथम तोफ गोळे फेकले होते, त्यानुसार त्यांना या खेळाची कल्पना आली असावी असे देखील मानले जाते.

आत्ताचा खेळातील गोळा हा तोफ गोळ्या सारखाच दिसतो. स्कॉटलंड या देशांमध्ये १९ व्या शतकाच्या सुरुवातीपासून हा खेळ खेळला जात आहे. या खेळामध्ये ब्रिटनमधील हौशी चॅम्पियनशिप स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, ते वर्ष होते १८६६.

गोळा फेका स्पर्धेमध्ये गोळे कसे फेकले जावेत:

या स्पर्धेत वरवर केवळ हातामध्ये गोळा घेऊन जास्तीत जास्त दूर फेकणे दिसत असले, तरी देखील यामागे खूप मोठे कसब लागते. अन्यथा हाताला इजा होण्यासारखे देखील प्रकार होऊ शकतात.

ज्या लोकांना गोळा फेकण्यामध्ये खरे ज्ञान असते तेच लोक सहजतेने दूरपर्यंत गोळा फेकू शकतात. खरे तर गोळा फेक करण्यासाठी ठोस असे कुठलेही ज्ञान नाही, मात्र ग्रीक या ठिकाणी झालेला ऑलिंपिक स्पर्धांमध्ये नोंदवण्यात आलेल्या निरीक्षणा नुसार काही मानके निश्चित करण्यात आलेली आहेत.

याकरिता गोळा हा हाताच्या तळव्यावर मागील बाजूस ठेवण्यात यावा, आणि हात खांद्याजवळ घेऊन जावा. आणि त्यानंतर दोनदा पुढे मागे होत हा गोळा पूर्ण ताकतीनिशी फेकावा.

गोळा फेकण्याचे काही सर्वसाधारण मुद्दे पुढे देत आहोत…

  • गोळा गोल मैदानातून फेकला जातो ज्याचा व्यास सात फुटापर्यंत असते.
  • गोळा फेकताना ३५ अंशाचा कोन करण्याचे सांगितले जाते.
  • गोळा फेकण्याचा जागेपासून २० मीटर अंतराच्या दोन तिरप्या रेषा आखल्या जातात, ज्या बाहेर गोळा गेल्यास बाद ठरवले जाते.
  • प्रत्येक खेळाडूला गोळा फेकण्याची सहा संधी दिल्या जातात.

गोळा फेक स्पर्धेमधील गोळ्याची मोजमापे:

गोळा फेक स्पर्धेमध्ये वापरण्यात येणाऱ्या गोळ्याचे स्पर्धा आणि खेळाडू यांच्या प्रकारानुसार एक निश्चित असे आकारमान आणि वजन असते, जेणेकरून स्पर्धेमध्ये कुठेही चुकीचे गुणदान केले जाऊ नये.

ज्यावेळी पुरुषांसाठी गोळा फेक च्या स्पर्धा आयोजित केला जातात, त्यावेळी वापरण्यात येणाऱ्या गोळ्याचे वजन सुमारे ७.२६ किलो पर्यंत असते, आणि त्याचा व्यास हा ११० ते १३० मिलिमीटर अर्थात ११ ते १३ सेंटीमीटर इतका असतो. त्याचप्रमाणे ज्यावेळी महिलांसाठीच्या गोळा फेका स्पर्धा आयोजित केला जातात त्या गोळ्याचे वजन पुरुषांपेक्षा कमी अर्थातच ४ किलो इतके असते. आणि वजन कमी असल्यामुळे आपोआपच त्याचा घेर देखील कमी असतो जो ९५ ते ११० मिलिमीटर अर्थात ९.५ ते ११ सेंटीमीटर इतके असते.

गोळा फेक करताना काय काय काळजी घेतली जावी:

गोळा फेक हा वजनदार वस्तूने खेळण्यात येणारा खेळ असल्यामुळे, त्यामध्ये काळजी घेणे फारच गरजेचे ठरते. अन्यथा शारीरिक इजा होण्याची शक्यता नकारता येत नाही.

गोळा फेक करताना गोळा चांगल्या पद्धतीने पकडला जावा, जेणेकरून तो पायावर पडणार नाही. तसेच हाताला झटका बसू नये म्हणून चेंडू खांद्याच्या अगदी जवळ तळव्यावर धरण्यात यावा.

गोळा फेकताना शरीर टी आकारात असावे, म्हणजेच ज्या हाताने गोळा फेकणार आहे त्याचे कोपर पाठीमागे आणि तळवा खांद्यावर तर दुसरा हात जमिनीला समांतर पसरावे, जेणेकरून जास्तीत जास्त लांब गोळा जाण्यास मदत मिळेल.

मित्रांनो, अनेक खेळाडू गोळा तर खूप लांब फेकतात, मात्र त्यांना गोळा फेकण्यासाठी आखण्यात आलेल्या दोन रेषांच्या मध्ये गोळा फेकण्यात अडचण येते. मात्र असे झाल्यास कितीही लांब गोळा गेला तरी देखील फाऊल मानले जाते, आणि खेळाडूला अपात्र ठरविले जाते.

गोळा फेकताना शक्य तेवढी सर्व ताकत लावण्यात यावी, मात्र या दरम्यान हाताला हिसका बसणार नाही याची देखील काळजी घ्यावी. अन्यथा खांद्याच्या किंवा कोपराच्या सांध्यातून हात निखळण्याची शक्यता असते.

गोळा फेकताना सात फूट व्यासाचा जो वर्तुळ असतो, त्यातून बाहेर पाय येऊ देऊ नये. असे केल्यास ती चूक समजून फाऊल देण्यात येते. आणि खेळाडूला बाद करण्यात येते.

गोळा फेक करताना लक्ष नेहमी ध्येयाकडे म्हणजेच, जिकडे चेंडू फेकायचा आहे तिकडे असले पाहिजे. जेणेकरून रेषांच्या बाहेर चेंडू जाणार नाही.

निष्कर्ष:

आजच्या भागामध्ये आपण गोळा फेक या खेळाविषयी माहिती पाहिलेली आहे. ज्यामध्ये तुम्हाला गोळा फेक खेळाचा इतिहास, फेकण्याची व पकडण्याची पद्धत, साधारण वजन, मैदानाचा व्यास, मैदानाविषयीची माहिती, घेतली जावी अशी काळजी याबद्दल माहिती मिळालेली असेल.

मुख्यत्वे गोळा फेक हा खेळ किंवा स्पर्धा, उमेदवाराची शारीरिक स्थिती तपासण्याकरिता महत्त्वाचा ठरतो. कुठल्याही सशस्त्र दलामध्ये भरती व्हायचे असेल तर गोळा फेक उत्तमरीत्या येणे आवश्यक असते. जसे की सैनिक भरती किंवा पोलीस भरती होय.

FAQ

गोळा फेक या खेळाचा प्रकार कोणता आहे?

गोळा फेक या खेळाचा प्रकार मैदानी खेळामध्ये मोडतो, जो सात फूट व्यासाच्या एका वर्तुळाकार ठिकाणी बाहेर खेळला जातो.

गोळा फेक या स्पर्धेमध्ये किती खेळाडूंची संख्या असते?

गोळा फेक हा खेळ सांघिक प्रकारातील नसल्यामुळे एकावेळी एकच खेळाडू हा खेळ खेळत असतो. मात्र असे कितीही एक खेळाडू एकमेकांविरुद्ध खेळू शकतात.

गोळा फेक स्पर्धा खेळण्यासाठी खेळाडूकडे कोणती कौशल्य असावी लागतात?

गोळा फेक स्पर्धा खेळण्यासाठी खेळाडू हा उत्तम बांध्याच्या असला पाहिजे, त्याची उंची देखील चांगली असावी. तसेच त्याच्या मनगट, दंड आणि खांद्यामध्ये पुरेशी ताकत आणि बळकटी असली पाहिजे.

गोळा फेक हा खेळ कोणत्या देशातून उगम पावला अशा नोंदी आढळतात?

गोळा फेक हा आयर्लंड या देशांमध्ये उगम पावल्याच्या नोंदी आढळून येतात.

गोळा फेक स्पर्धेतील गोळ्याचे वजन साधारणपणे किती असते?

गोळा फेक स्पर्धेतील गोळ्याचे वजन पुरुषांसाठी ७.२६ किलो तर महिलांसाठी ४.० किलो इतके असते.

आजच्या भागामध्ये आपण गोळा फेक या खेळाबद्दल आणि शारीरिक स्पर्धेबद्दल माहिती पाहिली. ही माहिती तुम्हाला आवडली असेलच. शिवाय ज्ञानवर्धक देखील ठरली असेल. तेव्हा झटपट कमेंट मध्ये तुमच्या प्रतिक्रिया येऊ द्या, आणि कुठल्याही सशस्त्र दलातील भरती देऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्र-मैत्रिणींना ही माहिती नक्की शेअर करा.

 धन्यवाद…

माझे नाव सृष्टी आहे आणि मी या ब्लॉग ची संस्थापक आहे. मला माहिती लिहायला खूप आवडतात, म्हणून मी या माझ्या ब्लॉग वर मराठी मध्ये माहिती लिहित असते.

Leave a Comment