Coconut Tree Information In Marathi हजारो वर्षांपासून मंगलप्रसंगी नारळ फोडण्याची प्रथा भारतामध्ये बघायला मिळते. नारळाला भाग्याचे फळ म्हणून समजले जाते. कुठल्याही गोष्टीची सुरुवात किंवा पूजा करायची असेल तर त्यापूर्वी नारळ फोडून ही सुरुवात केली जाते.
नारळ झाडाची संपूर्ण माहिती Coconut Tree Information In Marathi
जवळपास शंभर वर्षांचे आयुष्य असणारे हे नारळ उंचीला देखील खूप म्हणजे जवळपास २० ते ३० मीटर पर्यंत वाढते. मात्र आजकाल संकरित वाणांच्या नारळामुळे नारळाच्या झाडाची उंची कमी केलेली आहे. जी अगदी दहा ते पंधरा फुटांपर्यंत देखील आढळून येते.
नारळाचे खोड हे अतिशय मजबूत आणि सरळ असते, मात्र वाऱ्यांपासून झाडाचे रक्षण करण्यासाठी ते काही प्रमाणात लवचिक देखील असते. नारळाची जास्तीत जास्त झाडे ही समुद्रकिनाऱ्यावरच आढळतात. भारतामध्ये केरळ, तामिळनाडू, आणि आंध्र प्रदेश हे राज्य नारळाच्या उत्पादनात आघाडीवर आहेत. नारळाला संपूर्ण वर्षभर फळे येत असली, तरी देखील मार्च ते जुलै या दरम्यान या फळांची संख्या प्रचंड असते.
आजच्या भागामध्ये आपण या नारळाबद्दल माहिती घेणार आहोत…
नाव | नारळ |
इंग्रजी नाव | कोकोनट |
शास्त्रीय नाव | Coccus nucifera |
प्रकार | फळझाड |
वंश | कोकस |
ऑर्डर | अरेकेलस |
कुटुंब किंवा कुळ | अरेकासी (Arecaceae) |
श्रीफळ किंवा कल्पवृक्ष या नावाने ओळखले जाणारे झाड म्हणजे नारळाचे झाड होय. प्राचीन काळापासून हिंदू धर्मामध्ये नारळाला अतिशय महत्त्व दिले गेलेले आहे. नारळ या झाडाची निर्मिती विश्वमित्र कृषी यांनी केली होती, अशी आख्यायिका सांगितली जाते. त्यामुळेच भारतीय संस्कृतीमध्ये या नारळाला महत्त्वाचे स्थान दिले गेलेले आहे.
कुठलेही शुभकार्य असू दे, नारळ हा लागतोच. कसले उद्घाटन असो, भूमिपूजन असो, किंवा कुठल्याही नवीन गोष्टीची सुरुवात असो, अथवा नवीन वाहन घेतलेले असो, नारळ फोडणे हे प्रथम कार्य असते.
नारळ फोडण्यामागे अनेक संकल्पना सांगितल्या जातात. त्यातील एक संकल्पना म्हणजे नारळ फोडल्यामुळे मानवाचा अहंकार किंवा अभिमान तुटतो, आणि नारळा प्रमाणे मधुर बनतो, असे सांगितले जाते. तसेच नारळ हा दिसायला नरासारखा म्हणजेच शेंडी आणि दोन डोळे असलेला असतो, त्यामुळे नारळ फोडल्यामुळे नरबळी दिल्याची प्रचिती येते असे देखील सांगितले जाते.
नारळ हा बाहेरून कठीण आणि आतून मृदू आणि चवीला मधुर असतो, त्यामुळे माणसाने देखील या नारळाचा आदर्श घेत नारळाप्रमाणे बनावे असे सांगितले जाते. काही आख्यायिका नुसार नारळाला भगवान शिव यांचे प्रतीक मानले जाते, कारण नारळाला असणारे तीन छिद्रे भगवान शिव यांचे तीन डोळे आहेत, असे मानले जाते. आणि त्यावर असणारे धागे हे भगवान शिव यांचे केस आहेत, असे संबोधले जाते.
नारळाचे फळ खाण्यामागील फायदे:
- भारतीय संस्कृतीमध्ये जेवढे फळे आढळतात, त्यातील प्रत्येक फळाचा आरोग्यासाठी काही ना काही तरी फायदा हा होतच असतो. त्यामध्ये नारळ देखील पाठीमागे नाही.
- नारळामध्ये विटामिन बी आणि शरीरासाठी उपयुक्त असणारे अनेक खनिजे असतात. त्यामुळे थकवा आल्यावर नारळ अतिशय फायदेशीर ठरते.
- नारळामध्ये विविध जीवनसत्वे, कॅल्शियम, पोटॅशियम, आणि तंतुमय पदार्थ देखील आढळून येतात.
- नारळ या फळातून मिळणाऱ्या कॅलरीज या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आणि सहज पचण्यायोग्य असतात. त्यामुळे नारळ खाल्ल्यानंतर पोट जास्त गच्च न वाटता देखील योग्य ती एनर्जी शरीराला मिळते.
- नारळाचे पाणी हे शरीरामध्ये विविध खनिजांचे आणि ग्लुकोजचे वहन करण्यास मदत करते, त्यामुळे आजारी माणसाला नारळाचे पाणी दिल्यास तरतरी वाटते.
- नारळाचे पाणी हे अँटिबॅक्टेरियल गुणधर्माचे असते, त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत मिळते.
- नारळाचे पाणी रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करणे, हृदय विकाराचा झटका येण्याचे प्रमाण कमी करणे, आणि रक्तदाब नियंत्रित करणे यासाठी अतिशय फायदेशीर ठरते.
- दातांनी नारळ चावून खाणे यामुळे हाडे आणि दात मजबूत होतात, तसेच पचनसंस्था देखील निरोगी राहण्यास मदत मिळते.
नारळाची उत्पत्ती कशी झाली:
प्राचीन वेदांमध्ये नारळाचे वर्णन आढळून येते. ज्यामध्ये नारळाला कल्पवृक्ष म्हणून संबोधले गेलेले आहे. जोपर्यंत सहाव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत भारतातून हिंद महासागरापलीकडील इजिप्त मध्ये नारळ पोहोचले नव्हते, तोपर्यंत पाश्चात्य जगाला नारळ म्हणजे काय याबाबत काहीच कल्पना नव्हती.
ज्यावेळी मार्कोपोलो भारताच्या मोहिमांवर आला, त्यावेळी नारळाला त्यांनी फेरावनट हे नाव दिले. काही संदर्भानुसार विसाव्या शतकाच्या दरम्यान निकोबार बेटावर नारळाचा वापर करून आदान प्रदान म्हणजेच एक पेमेंट पद्धत म्हणून वापर केला जाई.
नारळ सेवनाचे औषधीय फायदे:
- नारळाचे खूप फायदे असले तरीदेखील औषधी फायदे देखील चमत्कारिक आहेत.
- आतड्यांमधील अल्सर किंवा जळजळ इत्यादी गोष्टींमध्ये नारळाचे पाणी पिणे फायदेशीर ठरते. तसेच रुग्णांना अतिसार, रक्त कमी होणे, वजन कमी होणे इत्यादी लक्षणे जाणवत असतील तर नारळ सेवन करणे फायदेशीर ठरते.
- नारळ हा क्रोहन रोगाच्या उपचारांमध्ये देखील वापरला जाऊ शकतो.
- गर्भवती महिलांनी दररोज थोडेसे नारळ खाल्ले तर होणारी मुले ही आकर्षक आणि निरोगी जन्मतात असे सांगितले जाते.
निष्कर्ष:
सर्व शुभप्रसंगी वापरले जाणारे फळ म्हणजे नारळ होय. हे नारळ नरबळीचे प्रतीक म्हणून वापरले जाते. कारण याला दोन डोळे आणि शेंडी देखील असते, त्यामुळे हत्या करण्यापासून देखील वाचविले जाते. नारळ हा आरोग्यासाठी सुद्धा खूप फायदेशीर असणारा फळ असून त्याचे तेल अतिशय पौष्टिक तसेच केसांच्या आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर असते.
कोवळ्या नारळाचे पाणी अर्थात शहाळ्याचे पाणी आजारी माणसांना दिले जाते, त्यामुळे शरीरातील निघून गेलेली शक्ती पुन्हा येण्यास मदत होते. आणि माणसाला थोडेसे ताजेतवाने वाटते. ओल्या नारळाचे खोबरे चवीला अतिशय उत्कृष्ट असते, तसेच शरीराला सुद्धा फायदेशीर ठरते.
नारळ हे असे फळ आहे ज्याचे कुठलेही भाग वाया जात नाही. नारळाच्या खोडापासून शोभिवंत वस्तू बनवल्या जाऊ शकतात, किंवा ज्वलनासाठी कामात येऊ शकते. तसेच नारळाच्या झावळ्या झोपडीसाठी भिंतींचे काम करतात. तसेच नारळाचे पाणी, खोबरे, तेल असे अनेक पद्धतीने वापर करून घेता येतो. अगदी नारळाच्या करवंट्या देखील ज्वलनाच्या कामात येतात. त्यामुळे नारळाचे झाडाचे कुठलेही भाग वाया जात नाही, हे म्हणणे सार्थ ठरते.
FAQ
नारळाचे पीक कोणकोणत्या देशांमध्ये घेतले जाते?
नारळाचे पीक हे ऑस्ट्रेलिया, पॅसिफिक समुद्रातील बेटे, इंडोनेशिया व कॅरेबियन बेटे इत्यादी देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर घेतली जाते.
नारळासाठी हवामान कसे असावे लागते?
नारळ या पिकासाठी उष्णकटिबंधीय हवामान पोषक मानले जाते. त्यासाठी सुमारे २५ अंश उत्तर ते २५ अंश दक्षिण या दोन अक्षांशा दरम्यानचे क्षेत्र उपयुक्त मानले जाते.
नारळाचे झाड इतर फळझाडांपासून कोणकोणत्या गोष्टींमध्ये वेगळे आहे?
नारळाचे झाड त्याची प्रदीर्घ उंची, जास्तीत जास्त आयुष्य, प्रत्येक गोष्ट उपयुक्त असणे इत्यादी गोष्टींमध्ये वेगळे आहे.
नारळाच्या झाडाला कोणत्या पदवीने ओळखले जाते?
नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष या पदवीने ओळखले जाते. कल्पवृक्ष म्हणजे मागेल ते सर्व देणारा वृक्ष होय.
नारळाच्या झाडापासून कोणकोणते उत्पादने बनवली जातात?
नारळाच्या झाडापासून कॅरेट, मॅट, झाडू, कार्पेट इत्यादी वस्तू; तसेच नारळ बर्फी, नारळ चटणी आणि तत्सम अनेक खाद्यपदार्थ देखील बनवले जातात.
आजच्या भागामध्ये आपण नारळ या झाडाविषयी माहिती पाहिली. यातील बरीचशी माहिती तुम्हाला असली तरी देखील काही नवीन गोष्टी तुम्हाला नक्कीच वाचायला मिळाल्या असतील. याबाबत तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये कळवा. तसेच ही माहिती इतरही मित्र-मैत्रिणींपर्यंत नक्की पोहोचवा.
धन्यवाद…