खोखो खेळाची संपूर्ण माहिती Kho kho Information In Marathi

Kho kho Information In Marathi नमस्कार मित्रांनो आज-काल आरोग्य जपणे व ते चांगल्या रीतीने सांभाळणे हे खूपच महत्त्वाचे झालेले आहेत. पूर्वीच्या काळात आज असणारी व्यायामाची साधनसामग्री अत्याधुनिक व्यायामाच्या मशिनी हे काहीच नव्हते. त्यावेळी लोक आपले आरोग्य हे खेळ खेळून सुदृढ ठेवत होते .खेळांमधून आपला बौद्धिक शारीरिक व मानसिक विकास होतो हे शास्त्रीय दृष्ट्या सिद्ध झालेलं आहे.

Kho kho Information In Marathi

खोखो खेळाची संपूर्ण माहिती Kho kho Information In Marathi

तर मंडळी आज अशाच एका पारंपारिक खेळाबद्दल आपण माहिती घेणार आहोत. हा खेळ भारताचा सर्वात लोकप्रिय व पारंपारिक खेळ असून हा खेळ पूर्वीपासूनच लोक आवडीने व उत्सुकतेने खेळतात. या खेळाची सुरुवात नेमकी कधीपासून झाली याचा उल्लेख कोठेही आढळून येत नाही. परंतु काही इतिहासकारांच्या मताप्रमाणे या खेळाची सुरुवात ही महाराष्ट्र राज्यातूनच झाली असल्याचे मानले जाते.

खो खो शब्दाची उत्पत्ती:

खोखो या शब्दाची उत्पत्ती मूळतः खो-खो हा शब्द “स्यु” या संस्कृत शब्दापासून उत्पन्न झालेला आहे. या शब्दाचा अर्थ होतो उठा आणि पळा आधी राजे राजवाड्यांच्या काळामध्ये हा खेळ रथावर खेळला जाण्याची प्रथा प्रचलित होती. त्यामुळे या खेळाला रथिडा असे देखील म्हटले जाते.

खोखो हा खेळ अतिशय सोपा बिन खर्चिक कुठलेही साधनसामग्री न लागणारा व भरपूर आनंद मिळवून देणारा खेळ आहे. हा खेळ खेळणाऱ्या खेळाडूंच्या अंगी ताकद, चपळता, सहनशील वृत्ती, व शारीरिक तंदुरुस्ती असे गुण असणे हे अत्यंत आवश्यक मानले जाते. खेळाडूला चकवा देणे पळायला लावणे व समोरच्या खेळाडूला पकडणे हे दृश्य खूप रोमांचक आणि उत्साह निर्माण करणारे असते. या खेळामुळे अनुशासन पाळणे , निष्ठा यांसारखे गुण प्रगल्भित होतात.

खेळाचे नियम-

खोखो हा खेळ पूर्वी खूपच साध्या पद्धतीने कुठलेही नियम न पाळता खेळला जात असे. परंतु पुण्यामधील डेक्कन जिमखाना या क्लब मध्ये या खेळाला खूप नावलौकिक मिळाले व प्रसिद्धी मिळाली. त्यामुळे या खेळाचे जे अनौपचारिक रूप होते ते औपचारिक रूपामध्ये बदलण्यात आले.

या खेळाची नियमावली ही अखिल भारतीय शारीरिक शिक्षण मंडळ 1935 साली स्थापन झालेल्या या संस्थेअंतर्गत बनवण्यात आली. त्याचबरोबर हुतुतू या खेळाची देखील नियमावली तयार करण्यात आली. तसेच या खेळांमध्ये काही नवीन संशोधन देखील करण्यात आले .पूर्वीच्या काळात जेव्हा या खेळाला कोणतेही नियम नव्हते तेव्हा साधारणपणे या खेळाचा पहिला नियम डेक्कन जिमखाना चे संस्थापक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी जाहीर केला.

त्या नियमांतर्गत मैदानामध्ये खेळल्या जाणाऱ्या या खेळांमध्ये सीमा निश्चिती करण्यात आली. 1919 रोजी खो खो खेळण्यासाठी 44 फूट लांबीची मध्यरेखा असावी व 17 फूट रुंदीचे क्षेत्र या खेळाकरिता निश्चित करण्यात आले. त्यापुढे जाऊन 1923 -24 सालामध्ये जेव्हा इंटर स्कूल स्पोर्ट्स ऑर्गनायझेशन ची पायाभरणी करण्यात आली त्या समारंभामध्ये खो खो या खेळाचे पहिले सादरीकरण करण्यात आले.

नियमावली मध्ये झालेले बदल –

जसजसं आधुनिक काळ पुढे जात गेला तसतसं या खेळामध्ये बदल होत गेले. सन 1914 रोजी जेव्हा हा खेळ खेळला जायचा तेव्हा प्रतिस्पर्ध्याला आऊट करण्याकरिता दहा गुण मिळत होते. त्यानंतर 1919 साली दहा गुणांचे रूपांतरण हे पाच गुणांमध्ये करण्यात आले व खेळाला आठ मिनिटांची मर्यादा देखील देण्यात आली. मैदानामध्ये देखील बदल करण्यात आले. मैदानाचा आकार हा आयताकृती बनवण्यात आला. दोन खांबांमध्ये अंतर हे कमी करून 27 फूट इतकेच करण्यात आले व पाच फूट अंतरावर डी झोन तयार करण्यात आला.

खो खो या खेळाची पहिली ऑल इंडिया खो खो चॅम्पियनशिप-

ऑल इंडिया खो खो फेडरेशन हे सन 1957 रोजी गठीत करण्यात आलेले होते. विजयवाडा येथे 1959 ते 60 या दरम्यान पहिली ऑल इंडिया खो खो चॅम्पियनशिप आयोजित करण्यात आली होती. ही खो-खो चॅम्पियनशिप केवळ पुरुष स्पर्धकांकरीताच आयोजित करण्यात आलेली होती. या स्पर्धेत केवळ पाच संघानी आपला सहभाग नोंदवला होता. ऑल इंडिया खो खो चॅम्पियनशिप मुंबई प्रांतांनी राजाभाऊ जेस्ट यांच्या नेतृत्वाखाली प्रथम जिंकली होती. 1960 ते 61 या दरम्यान पहिल्यांदा महिला चॅम्पियनशिप खो खो या खेळा संबंधी खेळवण्यात आली.

खो खो खेळा संबंधीचे पुरस्कार-

खो खो या खेळासंबंधी साल 1963 ते 64 या दरम्यान राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या पुरुष व महिला खेळाडूंना पुरस्कार प्रदान करण्यात आले. या पुरस्कारांना अनुक्रमे एकलव्य आणि झाशी लक्ष्मीबाई पुरस्कार अशी नावे देण्यात आली. हा पुरस्कार वितरण सोहळा इंदोर या शहरांमध्ये पार पाडला.

खो खो या खेळामध्ये महाराष्ट्राची कामगिरी-

साल १९७०-७१ रोजी महाराष्ट्र या राज्याने पहिली ज्युनिअर चॅम्पियनशिप स्पर्धा जिंकली ही पहिली ज्युनिअर चॅम्पियनशिप स्पर्धा हैदराबाद या शहरांमध्ये आयोजित करण्यात आलेली होती. महाराष्ट्राने अनुक्रमे पहिला व कर्नाटकने उपविजेत्याचे स्थान पटकावले. स्पर्धेत मुलांनी सहभाग नोंदवला होता व उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना “वीर अभिमन्यू” पुरस्काराने गौरविण्यात येणार होते .

मुलांप्रमाणेच 1974 -75 साली मुलींची देखील पहिली जुनिअर चॅम्पियनशिप स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती.साल १९८२ रोजी खो-खो या खेळाला ऑलिंपिक संघातील एक अविभाज्य भाग म्हणून सहभागी करण्यात आले. मागे पडणाऱ्या खेळाडू करिता नियम- खो खो या खेळाच्या एका संघामध्ये एकूण नऊ खेळाडू असतात त्यातील आठ खेळाडू हे एका रांगेत एकमेकांच्या विरुद्ध चेहरा करून बसलेले असतात.

यामधील एक खेळाडू हा विरुद्ध टीमच्या धावत असलेल्या खेळाडूला बाद करण्यासाठी मागे धावत असतो. पळत असताना एका रांगेत खाली बसलेल्या खेळाडूंना खो देऊन त्याची जागा रिकामी करून तेथे बसतो व तो खेळाडू पळायला लागतो. प्रत्येक संघामध्ये नऊ खेळाडू हे खेळत असतात व आठ खेळाडू हे राखीव ठेवलेले असतात.

या खेळामध्ये एका संघातील धावक खेळाडू हा कोणत्याही एका बाजूच्या खांबाला उभा असेल व आठ खेळाडू हे अशा रीतीने बसलेले असतील की दोन खेळाडूंचे तोंड हे एकमेकांच्या विरुद्ध बाजूला असेल.दोन पॉलच्या मध्ये केंद्र रेषा आखलेल्या असतात या केंद्र रेषा पार केल्या की नियम भंग होऊन दंड ठोठावला जातो.

खेळाडूला खो देत असताना खोचा स्पर्श व आवाज एकाच वेळेस होणे गरजेचे आहे. मागून पळत असणारा खेळाडू हा खांबाच्या मधून जाऊ शकत नाही तर दरवेळी त्याला खांब पार करूनच दुसऱ्या बाजूला जावे लागते.
जर धावत असणाऱ्या खेळाडूला स्पर्श केल्यानंतर तुम्ही खो देण्या अगोदरच आपली दिशा बदलली तर धावणारा खेळाडू हा बाद ठरत नाही .

धावत असलेल्या दुसऱ्या संघातील खेळाडूंसाठी काही नियम-

• धावक हे तीन तीन च्या समूहात असतात.
• धावणारा खेळाडू हा कोठेही जाऊ शकतो व कोणतीही रेषा त्याला पार करता येते.

खोखो खेळाविषयी काही महत्त्वपूर्ण तथ्य –

या खेळामुळे खेळाडूंमध्ये सांघिक भावना व एकात्मतेची भावना निर्माण होते यामुळे आत्मरक्षण आक्रमण प्रतिस्पर्ध्यावर होणारे आक्रमण हे गुण या खेळामुळे अंगीकारता येतात. काही इतिहासकारांच्या मते या खेळाचा उदय हा महाराष्ट्रात झाला असून तर काहींच्या मते या खेळाचा उदय हा बडोदा येथे झालेला आहे.

हा खेळ भारतातील गुजरात महाराष्ट्र व मध्य प्रदेश या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर खेळला जात असतो. या खेळासाठी कोणत्याही साधनसामग्रीची आवश्यकता भासत नाही फक्त या खेळामध्ये दोन बाजूला दोन खांब असतात बाकी कुठल्याही साहित्याची गरज पडत नाही.

या खेळासाठी 111 फूट लांब आणि 51 फूट रुंद मैदान आवश्यक असते. या खेळामध्ये दोन्ही संघांना सात मिनिटांचा वेळ देण्यात येतो त्या दिलेल्या वेळेमध्ये त्या संघाला आपला डाव पूर्ण करायचा असतो. या खेळामध्ये कोणतीही शारीरिक इजा होण्याची शक्यता नसते पुरुष व स्त्री दोन्ही खेळाडू हा खेळ अत्यंत साध्या व सोप्या पद्धतीने खेळू शकता.

खो खो खेळाचे परीक्षण करणारे व्यक्ती-

• या खेळामध्ये परीक्षण करण्यासाठी दोन अंपायर एक रेफ्री एक टाईम पेपर व एक स्कोरर इत्यादी लोक असतात.
• तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते नक्की कळवा.
धन्यवाद!!

माझे नाव सृष्टी आहे आणि मी या ब्लॉग ची संस्थापक आहे. मला माहिती लिहायला खूप आवडतात, म्हणून मी या माझ्या ब्लॉग वर मराठी मध्ये माहिती लिहित असते.

Leave a Comment