सरकारी योजना Channel Join Now

आगची संपूर्ण माहिती Fire Information In Marathi

Fire Information In Marathi आग म्हटलं की सर्वप्रथम आपल्याला धडकी भरते. चांगल्या कामासाठी आगीचा वापर केला तर ती आपल्याला स्वादिष्ट असे अन्न देऊ शकते. मात्र या आगेने रौद्ररूप धारण केल्यास, क्षणार्धात होत्याचे नव्हते करण्याची ताकद देखील या आगीमध्ये आहे.

Fire Information In Marathi

आगची संपूर्ण माहिती Fire Information In Marathi

आग लागल्याबरोबरच ती आटोक्यात आणली तर ठीक आहे, अन्यथा जीवित हानी आणि वित्तहानी किती होईल याचे काहीही गणित मांडता येऊ शकत नाही. त्यामुळे आगीचा संभाव्य धोका लक्षात घेऊन अनेक ठिकाणी तशा सोयी केलेल्या असतात. आजकाल सर्व दवाखाने, शाळा, महाविद्यालय, मॉल्स येथे स्वतःच्या अग्निशमन यंत्रणा तयार असतात. शिवाय अग्निशमन दल देखील या घटनांमध्ये पोहोचून संभाव्य हानी कमी करण्याचा प्रयत्न करत असते. यासाठी त्यांच्याकडून विविध अग्निशमन उपकरणांचा वापर केला जातो.

आजच्या भागामध्ये आपण आगी बद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत…

आग म्हणजे काय:

इंधन व ऑक्सीजन यांना उष्णतेचा पुरवठा झाल्यानंतर तयार होणाऱ्या ज्वालेला आग असे म्हटले जाते. मात्र हा पुरवठा एकाच ठिकाणी असावा लागतो. म्हणजेच एकाच ठिकाणी इंधन ऑक्सिजन व उष्णता एकत्र यायला हवे. गणितीय उदाहरणांमध्ये सांगायचे झाल्यास ऑक्सिजन + इंधन + उष्णता =  आग होय.

आगीचे विविध प्रकार:

मित्रांनो, आपल्याला साधारणपणे आग म्हणजे उष्णता इतकेच माहिती आहे. मात्र अग्निशमन अधिकाऱ्यांना या आगीचे विविध प्रकार देखील माहिती असतात. तो त्यांच्या अभ्यासक्रमाचा एक भाग असतो. त्यानुसार आगीचे चार प्रकार पडत असतात. ज्यांना श्रेणीनुसार विभागलेले असते, आणि हे विविध प्रकार आगीसाठी पुरवले गेलेले इंधन कोणाच्या स्वरूपातील आहे यावर पडत असतात.

अ श्रेणी आग किंवा ए क्लास फायर मध्ये इंधनाच्या स्वरूपामध्ये कागद, लाकूड, कापड, किंवा चपला म्हणजेच रबर इत्यादी इंधनांचा समावेश असतो. या प्रकारच्या आगीला नियंत्रणात आणणे तुलनेने सोपे असते.

ब श्रेणी आगीमध्ये इंधन म्हणून मिनरल ऑइल उपयोगात आणले जातात. ज्यामध्ये डिझेल, पेट्रोल, रॉकेल, गॅसोलीन, यांसारख्या द्रवइंधनांचा समावेश होतो. या प्रकाराच्या आगीमध्ये जीवित हानी किंवा वित्तहानी फार मोठ्या प्रमाणावर होत असते, यालाच बी क्लास फायर असे देखील म्हटले जाते.

तिसरा प्रकार म्हणजे क श्रेणी आग होय. यामध्ये वायुरूप इंधनांचा समावेश असतो. जसे की एल पी जी, सी एन जी इत्यादी. या प्रकाराच्या आगी विझवण्यासाठी अतिशय कठीण असतात, कारण द्रवरूप आणि घनरूप इंधन लवकर दूर केले जाऊ शकते. मात्र वायुरूप इंधनाला दूर करणे शक्य नसते. तसेच त्याचा अजून किती साठा शिल्लक आहे याची देखील कल्पना करता येणे अशक्य असते. त्यामुळे ही आग अजूनच जास्त धोकेदायक ठरते. यालाच क्लास सी फायर म्हणून ओळखले जाते.

आणि सर्वात शेवटचा प्रकार म्हणून ड श्रेणीच्या आगीला ओळखले जाते. हा प्रकार विद्युत उपकरणांमुळे किंवा शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीमुळे निर्माण होते. ही आग लवकर नियंत्रणात आणली जाऊ शकते, मात्र लवकर लक्षात येणे गरजेचे असते. शिवाय काही उपचारात्मक पद्धतीने ही आग टाळली जाऊ शकते. यालाच क्लास डी फायर हा शब्द आहे.

अग्निशमन यंत्र म्हणजे काय?

मित्रांनो, आगीला अग्नी तर विझवण्याच्या कार्याला शमन असे म्हटले जाते. यावरून अग्निशमन हा शब्द रूढ झालेला आहे. विविध प्रकारच्या आगी आटोक्यात आणण्याकरिता वापरण्यात येणाऱ्या यंत्रांना अग्निशामक यंत्र म्हणून ओळखले जाते. आग कोणत्या प्रकारातील आहे त्यानुसार या अग्निशमनियंत्राच्या वापरामध्ये बदल होत असतो.

कारण काही ठिकाणी लागलेल्या आगी चुकीच्या अग्निशमन यंत्राच्या वापरामुळे अजूनच फैलू  शकतात. जसे द्रवरूप इंधनांना लागलेल्या आगी या वाळूच्या साह्याने विझविल्या जाव्यात. तसेच मानवाला लागलेली आग ही पाणी टाकण्याऐवजी ब्लॅंकेट सारख्या साधनांनी झाकून विझवली पाहिजे. जेणेकरून शरीराला कमीत कमी अपाय होईल.

निष्कर्ष:

मित्रांनो, आग ज्या प्रमाणात चांगली आहे, त्यापेक्षा कितीतरी पटीने ती हानिकारक देखील आहे. योग्य रीतीने आगीचा वापर केल्यास आपल्याला फायदा मिळू शकतो. मात्र मागीचा गैरवापर केल्यास खूप मोठे नुकसान संपूर्ण सृष्टीला भोगावे लागते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे वनवा होय. ज्यावेळी जंगलामध्ये काही कारणास्तव आग लागते, त्याला वनवा म्हटले जाते. या वनव्यामुळे जंगलचे जंगल नष्ट होत असतात. मध्यंतरी ॲमेझॉन जंगलामध्ये लागलेली आग कित्येक दिवस आटोक्यात येत नव्हती.

आजच्या भागामध्ये आपण आग या विषयावर माहिती घेतलेली आहे. ज्यामध्ये तुम्हाला आगे विषयी बरेच काही वाचायला मिळाले असेल. जसे की आग म्हणजे काय, आगीचे कोणकोणते प्रकार असतात, आगीला कोणकोणत्या श्रेणीमध्ये विभागले जाऊ शकते, तसेच अग्निशमनियंत्रणा म्हणजे काय असते, अग्निशमन उपकरणे कोणकोणती आहेत, आग लागू नये म्हणून काय काळजी घ्यावी, आणि आग लागण्याचे विविध कारणे, याविषयी देखील माहिती घेतलेली आहे. सोबतच काही प्रश्न उत्तरे देखील वाचलेली आहेत.

FAQ

आग म्हणजे काय?

उष्णता निर्माण करणाऱ्या ज्वालेला आग म्हणून संबोधले जाते. ज्यामध्ये जळण्यासाठी काहीतरी माध्यम असावे लागते. ज्याला इंधन असे म्हटले जाते.

आगीचे किती प्रकार पडतात?

आगीचे मुख्यत्वे चार प्रकार पडतात, जे इंधन कोणत्या प्रकारचे आहे यावरून ठरवले जातात. जसे की श्रेणी अ आग, श्रेणी ब आग, श्रेणी क आग, श्रेणी ड आग इत्यादी.

आगीचा रंग कोणता असतो?

मित्रांनो, आगीला केवळ एकच रंग नसल्यामुळे त्याचा रंग सांगणे कठीण आहे. मात्र ज्या ठिकाणी इंधन जळत असते तेथे शक्यतो लालसर रंगाची आग असते. तसेच कडेला आणि मध्यभागी आगीचा रंग निळसर असतो. जो वर जाता जाता पांढरा होत असतो. शेवटी आग जेथे संपते तिथून वर काळ्या रंगाचे धुराचे लोट तयार होतात. जे वर जाताना पांढरसर दिसून येतात. तसेच काही प्रमाणात आगीमध्ये नारंगी पिवळा आणि लाल या रंगाचे देखील मिश्रण असते.

आग लागण्याची काही महत्त्वाची कारणे कोणती आहेत?

मित्रांनो, आपल्याकडे आगीच्या घटनांमध्ये सर्वात महत्त्वाचे कारण म्हणून स्वयंपाक घराला ओळखले जाते. तसेच विद्युत घटकांमुळे लागणाऱ्या आगीचा क्रम हा दुसरा असतो. त्याचप्रमाणे कमी तीव्रतेमध्ये असली तरी देखील धुम्रपानामुळे लागणारी आग देखील महत्त्वाच्या कारणांमध्ये येते. या प्रकारची आग शक्यतो रस्त्याच्या कडेला असणाऱ्या झाडांमध्ये लागत असते.

आगीचे काय फायदे आहेत?

मित्रांनो योग्य रीतीने वापरल्यास आग खूप फायदेशीर असते. या आगे मुळे मानवाला स्वादिष्ट भोजन मिळण्याबरोबरच अनेक प्रकारच्या उद्योग व्यवसायांमध्ये देखील वापर होतो. कारखाने, वीजनिर्मिती, या ठिकाणी देखील आगीला फार महत्त्व आहे. अगदी प्राचीन काळामध्ये देखील दगडी अवजारे बनवण्याकरिता मानव आधी आगीमध्ये दगड भाजत असे. तसेच हल्लीच्या काळी मातीचे भांडे भक्कम करण्याकरिता देखील आगीचा वापर केला जातो.

आजच्या भागामध्ये आपण आग या विषयावर माहिती घेतलेली आहे. आग या घटकाशी आपला लहानपणापासूनच संबंध आलेला आहे. लहानपणी आपण फटाके उडवण्यासाठी आगीचा वापर करत असू, त्यावेळी तुम्हाला आनंद होत असेल. मात्र जसजसे मोठे झालो तसतसे या आगीचे धोके लक्षात येऊ लागल्यामुळे तुम्ही आगीचा वापर काळजीपूर्वक करत असाल.

मात्र तरीही तुमच्याकडे आगे विषयी काही अनुभव असतील, किंवा घटना सांगायच्या असतील तर त्या कमेंट मध्ये अवश्य सांगू शकता. तसेच आपल्या इतरही मित्र-मैत्रिणींना आगे विषयी ही माहिती वाचायला मिळावी याकरता त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा.

धन्यवाद…

माझे नाव सृष्टी आहे आणि मी या ब्लॉग ची संस्थापक आहे. मला माहिती लिहायला खूप आवडतात, म्हणून मी या माझ्या ब्लॉग वर मराठी मध्ये माहिती लिहित असते.

Leave a Comment