सरकारी योजना Channel Join Now

कोथिंबीरची संपूर्ण माहिती Coriander Information In Marathi

Coriander Information In Marathi नमस्कार मित्रांनो, मित्रांनो कुठलीही भाजी असू द्यात कोथिंबिरी शिवाय पूर्ण होत नाही. अगदी सात्विक शाकाहारी जेवण असो, किंवा झणझणीत मांसाहारी जेवण असो, कोथिंबीर प्रत्येक जेवणाची चव वाढविण्याचे काम करत असते. ही कोथिंबीर केवळ चवदारच नसून, आरोग्याच्या दृष्टीने देखील खूपच उत्तम समजली जाते.

Coriander Information In Marathi

कोथिंबीरची संपूर्ण माहिती Coriander Information In Marathi

भारतीय खाद्य संस्कृतीमध्ये कोथिंबिरीला अनन्यसाधारण असे महत्त्व देण्यात आलेले आहे. तंतुमय पदार्थांचा एक उत्तम स्त्रोत म्हणून कोथिंबिरीकडे बघितले जाते. पारंपारिक उपचार पद्धतीमध्ये देखील कोथिंबिरीचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. या कोथिंबीरीच्या लागवडीकरिता धने वापरले जातात, या धन्याला देखील भाजीमध्ये वापरले जाते.

एक औषधी वनस्पती असणारी ही कोथिंबीर उंचीला सुमारे दीड फुटापर्यंत वाढू शकते. मात्र गावरान प्रजाती काहीशा कमी वाढतात. आयुर्वेदामध्ये तीन मुख्य फायदे देणारी वनस्पती म्हणून हिचा उल्लेख आढळून येतो. ज्यामध्ये भूक वाढवणे, पचन सुधारणे, आणि विविध संसर्गांना रोखणे यांचा समावेश होतो.

कोथिंबीर मधील विविध घटक शरीरासाठी आवश्यक असतात, त्याच्यामध्ये मधुमेह विरोधी गुणधर्म असण्याबरोबरच पाइल्स विरोधी एंटीऑक्सीडेंट देखील असतात. तसेच यामुळे क्षयरोग, उच्च रक्तदाब, यांच्यावर देखील उपचार केले जातात. मेंदूच्या पेशी योग्य रीतीने वाढण्यासाठी, आणि लघवीचे प्रमाण वाढवण्यासाठी कोथिंबीर सेवनाचा सल्ला दिला जातो.

आजच्या भागामध्ये आपण या कोथिंबिरी बद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत…

नावकोथिंबीर
प्रकारखाद्य आणि औषधी वनस्पती
साधारण उंची५० से मी पर्यंत
जीवनसत्त्वेजीवनसत्त्व अ, ब आणि क
कार्यजेवणात चव आणणे
इतर कार्यऔषधी गुणधर्म
रंगहिरवा
वैशिष्ट्यअप्रतिम स्वाद / वास

कोथिंबिरीचे औषधीय गुणधर्म:

मित्रांनो कोथिंबीरीची पाने अँटीऑक्सिडंट प्रकारचे असतात. ज्यामुळे शरीर साफ करण्यासाठी याचा वापर केला जातो. तसेच विविध गोष्टींची एलर्जी होणे, मूत्राशयामध्ये जळजळ जाणवणे, किंवा त्वचेवर देखील जळजळ होणे, अस्वस्थता वाटणे, इत्यादी आजारांमध्ये कोथिंबीर खूपच फायदेशीर ठरते.

तसेच शरीरातील ताकद वाढवणे हे देखील कोथिंबिरीचे कार्य आहे. या कोथिंबीरी मध्ये तुम्हाला विविध जीवनसत्वे, खनिजे, आणि फायबर मुबलक प्रमाणात आढळून येतात. यामुळे भुकेची समस्या देखील मिटवली जाऊ शकते.

कोथिंबीरीचे आरोग्यदायी फायदे:

मित्रांनो, तुम्हाला कुठलाही रोग नसेल मात्र तुम्हाला तुमचे आरोग्य चांगले राखायचे असेल तर त्यासाठी कोथिंबिरीचे नियमित सेवन करणे खूपच फायदेशीर ठरते. या कोथिंबीरीच्या सेवनामुळे पचनक्रिया सुधारली जाते, आणि चांगले पचन हे उत्तम आरोग्याचे लक्षण आहे. त्यामुळे आपोआपच सर्व आरोग्याला फायदा होतो.

तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास असेल, तर तीन चमचे धने घेऊन ते एक ग्लास पाण्यामध्ये टाकावे, आणि पाणी अर्धे होईपर्यंत उकळावे. त्यानंतर हे पाणी गाळून प्यावे. असे दिवसातून किमान दोनदा करावे, काहीच दिवसांमध्ये तुम्हाला बदल गोष्टीचा त्रास दूर झालेला दिसून येईल.

मित्रांनो, थायरॉईड चा त्रास असणाऱ्या रुग्णांसाठी देखील धन्याचे पाणी पिणे खूपच फायदेशीर ठरते. तसेच असे रुग्ण धण्याच्या बिया देखील चावून खाऊ शकतात. यामुळे थायरॉईड संबंधी हार्मोन्स नियंत्रणात राहतात.

कोथिंबीरीचे स्वरूप हे थंडगार असल्यामुळे, अनेक प्रकारच्या पोटाच्या समस्या जसे की पोटातील अल्सर, आतड्यांमधील जळजळ, यामध्ये कोथिंबीर वापरली जाते. तसेच शरीरावरील खाज, पित्ताच्या गाठी, जळजळ, यांसारख्या एलर्जी लक्षणांपासून देखील कोथिंबिरी वाचविते.

शरीराच्या भागावर एलर्जी जाणवत असेल, किंवा खाज जाणवत असेल, तेथे एक चमचा कोथिंबिरीला ठेचून तयार केलेली पेस्ट आणि एक चमचा शुद्ध मध यांना एकजीव करून मिश्रण बनवावे. आणि खाज येणाऱ्या अथवा एलर्जी झालेल्या ठिकाणी लावावे. दहा ते पंधरा मिनिटानंतर हा भाग स्वच्छ पाण्याने धुवावा, असे काही दिवस केल्याने तुम्हाला नक्कीच फायदा जाणवेल.

 याच बरोबरीने ज्या लोकांना नेहमी तोंड येणे, किंवा घसा सुजणे असे आजार असतील, त्यांनी धन्याचे उकळून गरम केलेले पाणी आणि एक चमचा मध घेतल्याने त्यांना आराम पडू शकतो.

कोथिंबीर सेवनाचे तोटे:

मित्रांनो, कोथिंबीरीचे अगणित फायदे असले, तरी देखील त्यापासून होणारे नुकसानाची माहिती घेणे देखील महत्त्वाचे ठरते.

मित्रांनो, कोथिंबीर किंवा धने हे प्रकाशाला खूपच संवेदनशील आहेत. त्यामुळे अति प्रमाणात धन्याचे सेवन केल्यामुळे काही लोकांना शरीरावर लालसरपणा जाणवू शकतो. तसेच काही लोकांना श्वास घेण्यात अडचण येणे, किंवा चक्कर येणे यांसारख्या समस्या देखील भेडसावू शकतात.

कोथिंबीर हे उच्च रक्तदाबाच्या रुग्णांमध्ये उपचार म्हणून वापरले जाते. मात्र ज्या रुग्णांना कमी रक्तदाबाचा त्रास असेल त्यांच्यासाठी कोथिंबिरीचे सेवन करणे धोकेदायक आहे. ज्यामुळे त्यांचा रक्तदाब आणखीनच कमी होऊ शकतो, आणि गुंतागुंत निर्माण होऊ शकते.

कोथिंबीरीच्या कच्चा बिया अर्थात कच्चे धने खाल्ल्यामुळे व्यक्तीला नशा झाल्यासारखे देखील वाटू शकते. कोवळ्या धन्याचे जास्त सेवन यकृतासाठी हानिकारक असते. एलर्जी मध्ये कोथिंबीर वापरली जात असली, तरी देखील काही लोकांना कोथिंबीर मुळेच एलर्जी झाल्याचे देखील निदर्शनास आलेली आहे.

निष्कर्ष:

मित्रांनो, कोथिंबीर आवडत नाही असे कोणी म्हटलं तर आपल्याला त्यावर विश्वास बसणार नाही. कोथिंबीर अनेक गोष्टींसाठी वापरली जाते, यामध्ये औषधी गुणधर्म आणि खाद्य या दोन मुख्य उपयोगांचा समावेश होतो. कोथंबीर पासून बनवण्यात आलेल्या वड्या महाराष्ट्र मध्ये खूपच चवीने खाल्ल्या जातात.

आजच्या भागामध्ये आपण या सर्वांच्या आवडीच्या कोथिंबीर बद्दल माहिती घेतलेली आहे. ज्यामध्ये तुम्हाला कोथिंबीरीचे औषधी गुणधर्म त्याचे आरोग्यासाठी होणारे फायदे, तसेच धन्याचे उपयोग, कोथिंबीर सेवना पासून होणारे तोटे, इत्यादी माहिती बघितली आहे. याशिवाय काही प्रश्न उत्तरे देखील बघितलेली आहेत.

मित्रांनो कोथिंबीर ही विस्तीर्ण स्वरूपाच्या आजारांसाठी फायदेशीर ठरत असते. जसे की पोटदुखीवर गुणकारी, संधीवातापासून आराम देणे, मासिक पाळी मधील वेदना कमी करणे, खाज रोखणे, मधुमही रुग्णांना दिलासा देणे, तसेच केसांची आरोग्य चांगले राखणे, यासह उच्च रक्तदाब मध्ये देखील कोथिंबीर वापरली जाते.

FAQ

कोथिंबीर या पालेभाजी मध्ये कोणकोणत्या प्रकारचे जीवनसत्व आढळून येते?

कोथिंबीर या पालेभाजी मध्ये जीवनसत्व अ, जीवनसत्व ब, आणि जीवनसत्व क आढळून येतात.

कोथिंबीर मध्ये आणखी कोणकोणते घटक उपलब्ध असतात?

कोथिंबीर या पालेभाजी मध्ये मॅंगनीज, पोटॅशियम, फॉस्फरस, कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह इत्यादी खनिजे असण्याबरोबरच मोठ्या प्रमाणात फायबर देखील असतात. याशिवाय यामध्ये केरोटीन देखील असते, जे केसांच्या आरोग्यासाठी उत्तम समजले जाते. सोबतच थायमीन, नियासीन, यांसारखे घटक देखील काही प्रमाणात आढळून येतात.

कोथिंबीर कोणकोणत्या देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरली जाते?

मित्रांनो, भारतासह मेक्सिको, स्पेन, आणि लॅटिन पाककृतीमध्ये या कोथिंबिरीचा, आणि वाळवून तयार केलेल्या धन्यांचा मोठ्या प्रमाणावर समावेश असतो.

कोथिंबिरी पासून काय काय बनवले जाते?

मित्रांनो, महाराष्ट्र मध्ये सर्वात प्रसिद्ध म्हणजे कोथिंबीर पासून बनवलेली वडी होय. यासोबतच कांदे, बटाटे, टोमॅटो, मिरची, यांसारख्या अनेक भाज्यांमध्ये या कोथिंबीरीचा सर्रास वापर केला जातो. अनेक ठिकाणी या कोथिंबीरीच्या काड्यांपासून सूप तयार केले जाते, जे चवीला अतिशय अप्रतिम असे असते.

कोथिंबीर कोण कोणत्या आरोग्याच्या समस्यांमध्ये वापरली जाते?

मित्रांनो, मुख्यत्वे पोटाच्या आजारांसाठी कोथिंबिरीचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. ज्यामध्ये आतड्यांमध्ये असलेल्या समस्या, पोट बिघडणे, मळमळ होणे, अतिसार किंवा जुलाब होणे, बद्धकोष्ठतेचा त्रास जाणवणे, वायुदोष होणे, चिडचिडा स्वभाव इत्यादी गोष्टींचा समावेश होतो. याशिवाय कोथिंबीर मुळे विविध जिवाणूंचे व पुरुषांचे शुक्राणू संख्या वाढवणे इत्यादी परिस्थितीवर देखील मात केली जाऊ शकते.

मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण कोथिंबीर या पालेभाजी तसेच औषधी वनस्पती बद्दल माहिती घेतली. यातील बरीचशी माहिती तुम्हाला असली तरी देखील आरोग्यदायी फायदे तुम्हाला वाचून नक्कीच नवीन माहिती मिळाली असेल. त्यामुळे, पटापट या माहितीला इतरांपर्यंत शेअर करा. आणि ही माहिती कशी वाटली त्याबाबत प्रतिक्रिया देखील द्या.

 धन्यवाद…

माझे नाव सृष्टी आहे आणि मी या ब्लॉग ची संस्थापक आहे. मला माहिती लिहायला खूप आवडतात, म्हणून मी या माझ्या ब्लॉग वर मराठी मध्ये माहिती लिहित असते.

Leave a Comment