सरकारी योजना Channel Join Now

जेनेरिक औषधीची संपूर्ण माहिती Generic Medicine Information In Marathi

Generic Medicine Information In Marathi आजारपण हे कोणाला विचारून येत नाही. आपल्या आयुष्यात प्रत्येक जण कितीतरी वेळा आजारी पडत असतो. यावेळी आपण डॉक्टर कडे गेल्यानंतर डॉक्टर आपल्याला विविध औषधे लिहून देत असतो. मात्र काही वेळेला आपल्या बजेट पेक्षा या औषधांची किंमत फार जास्त होऊन जाते. अशावेळी आपल्याला योग्य उपचार घेण्याकरिता अडचण निर्माण होते, मात्र आजकाल जेनेरिक प्रकारची औषधे सुरू झालेली आहेत.

Generic Medicine Information In Marathi

जेनेरिक औषधीची संपूर्ण माहिती Generic Medicine Information In Marathi

ज्यांना ब्रँड नावाने न ओळखता केवळ त्यांच्या आत असलेल्या घटकाच्या नावाने ओळखले जाते. अशा औषधांना जेनेरिक औषधे म्हणून ओळखली जातात. ही औषधे किमतीने फारच स्वस्त असतात, मात्र त्यांच्यापासून मिळणाऱ्या फायद्यांमध्ये कुठेही कमी नसते. आज ही औषधे स्वस्त असल्यामुळे अनेक लोकांच्या मनामध्ये जेनेरिक औषधाबद्दल गैरसमज आहेत. मात्र अतिशय उत्कृष्ट गुणवत्तेचे असणारी औषधे तुम्हाला स्वस्त देखील मिळतात. आणि शरीरावर हवा तो प्रभाव देखील दाखवत असतात.

आजच्या भागामध्ये आपण या जनरिक स्वरूपाच्या औषधांबद्दल माहिती बघणार आहोत…

जेनेरिक औषधी म्हणजे काय:

इतर सामान्य औषधांप्रमाणेच घटक असणारे औषधे म्हणजे जेनेरिक औषधे होय. ज्या औषधांच्या पेटंट ची वैधता संपलेली असते, अशा औषधांची सर्वसामान्य स्तरावर निर्मिती करण्यासाठी परवानगी देण्यात येते. त्यामुळे या ब्रॅन्डेड औषधांची निर्मिती जेनेरिक स्वरूपात केली जाते. मात्र ज्यावेळी नवीन औषधी बाजारामध्ये येते अशा औषधांची जेनेरिक औषधे किमान २० वर्षे बनवता येत नाही, कारण पेटंट ची मर्यादा ही वीस वर्षांची असते.

जेनेरिक औषधे स्वस्त असण्याची कारणे:

मित्रांनो, आपल्याला जेनेरिक औषधे स्वस्त आहेत हे माहिती आहे. मात्र त्यामागे काय कारण आहे हे माहिती नाही. त्यामुळे अनेक लोकांचा असा गैरसमज होतो की सामान्य औषधांपेक्षा कमी दर्जाची औषधे म्हणजे जेनेरिक औषधे असतात, त्यामुळे ती स्वस्त असतात. मात्र असे काहीही नाही.

जेनेरिक औषधी विकसित करण्याकरिता कुठलाही खर्च करावा लागत नाही. आधी दुसऱ्या कंपनीने विकसित केलेली औषधे त्यांची पेटंटची वीस वर्षे संपल्यानंतर या कंपन्या द्वारे बनवण्यात येत असतात. त्यामुळे विकासनावर होणारा खर्च वाचवला जातो. हाच मुख्य फायदा जेनेरिक औषधे स्वस्त करण्यामागे असतो.

जेनेरिक औषधांना स्वस्त बनवणारा दुसरा एक घटक म्हणजे या औषधांच्या मार्केटिंग साठी किंवा विपणनासाठी कुठल्याही प्रकारचा खर्च करावा लागत नाही. ज्यावेळी बाजारात कुठलेही नवीन औषधे येते त्यावेळी डॉक्टर किंवा रुग्णांपर्यंत त्या औषधाची माहिती पोहोचावी, त्याकरिता विविध प्रकारच्या जाहिराती विपणन कौशल्य किंवा धोरण अवलंबली जातात. त्यामुळे या औषधांच्या निर्मितीपासून कंजूमर पर्यंत पोहोचण्यापर्यंत अनेक प्रकारचा खर्च होत असतो.

हा खर्च वाढण्यासाठी ब्रँड नेम औषधे महाग केली जातात. मात्र वीस वर्षानंतर ही औषधे तळागाळात पोहोचलेली असतात. त्यामुळे नव्याने या औषधांची जाहिरात करणे किंवा विपणन करणे गरजेचे नसते. अशा वेळी हा खर्च देखील मोठ्या प्रमाणावर वाचवला जातो.

तिसरे महत्त्वाचे कारण म्हणजे, ज्यावेळी अशी औषधे बनवली जातात त्यावेळी बाजारामध्ये याचा सातत्याने पुरवठा केला जातो. कच्चामाल देखील मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतो, त्यामुळे औषधांच्या निर्मितीमध्ये कुठलाही अडथळा येत नाही. आणि ज्यावेळी मार्केटमध्ये या औषधांची उपलब्धता मुबलक असते, त्यावेळी ही औषधे महाग होत नाहीत.

जेनेरिक औषधांचा प्रभाव:

मित्रांनो, जेनेरिक औषधांमध्ये असणाऱ्या घटकांचे प्रमाण व संख्या ही ब्रॅण्डेड औषधांसारखीच असते. त्यामुळे ज्याप्रमाणे ब्रॅण्डेड औषधे परिणाम दाखवतात, त्याचप्रमाणे जेनेरिक औषधे देखील प्रभावशाली किंवा परिणामी असतात. अगदी या औषधांचा डोस देखील सारखा असतो, त्यामुळे जेनेरिक औषधे व ब्रांडेड औषधे यांच्यामध्ये केवळ दिसायला काय तो फरक असतो. बाकी इतर सर्व घटक समानच असतात.

जैविक औषधे कोणती आहेत हे ओळखण्याची चिन्हे:

जेनेरिक औषधे ही तुम्हाला कुठल्याही ब्रँड नेम ने मिळण्याऐवजी त्यातील घटकांच्या नावाने मिळतात. त्याचबरोबर याची ब्रॅण्डिंग किंवा पॅकेजिंग देखील वेगळ्या पद्धतीने केलेली असते. या औषधांचा रंग हा मुख्य औषधांपेक्षा वेगळा असतो, व त्याची चव देखील काहीशी वेगळी लागू शकते. इत्यादी मूलभूत फरकांच्या आधारे तुम्ही ब्रँडेड औषधे व जेनेरिक औषधे ओळखू शकता.

निष्कर्ष:

मित्रांनो, औषधे घ्यायला गेले की आज भरमसाठ पैसे लागत असतात. औषधे ही पूर्वीसारखी स्वस्त राहिलेली नसून, प्रचंड महाग झालेली आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना उपचार मिळवण्यामध्ये फार त्रास भोगावा लागत आहे. यावर उपाय म्हणून सरकारने अनेक योजना अवलंब केलेला असून, त्यामध्ये जेनेरिक औषधी हे देखील एक उपाय आहे.

आजच्या भागामध्ये आपण या जेनरिक स्वरूपाच्या औषधांबद्दल माहिती घेतलेली आहे. त्यामध्ये जेनेरिक औषधी म्हणजे काय, नेहमीच्या असलेल्या औषधांमध्ये व जेनेरिक औषधांमध्ये काय फरक आहे, ही औषधे स्वस्त असण्यामागे काय कारण आहे, इतर प्रकारच्या ब्रँड नेम असणाऱ्या औषधाइतकी ही औषधे प्रभावी आहेत का?

त्याचबरोबर जेनेरिक औषधे कोणती आहेत, हे ओळखण्यासाठी काय खुणा आहेत, डॉक्टरांना सांगितल्यानंतर डॉक्टर जेनेरिक औषधे लिहून देऊ शकतात का, इत्यादी माहिती बघितलेली आहे. सोबतच काही नेहमी विचारले जाणारे प्रश्न बघितले आहे. त्यामुळे जेनेरिक औषधाबद्दल तुमच्या मनात असलेल्या शंका गैरसमज दूर होण्यास नक्कीच मदत मिळालेली असेल, अशी आशा आहे.

FAQ

जेनेरिक औषधे व ब्रँड नेम औषधे यामध्ये काय फरक असतो?

जेनेरिक औषधे व ब्रँड नेम औषधे यांच्यामध्ये सारखेच घटक असतात, मात्र औषधे कंपनीच्या विशिष्ट नावाने विकली जातात. तर जेनेरिक औषधे ही त्यातील घटकाच्या नावाने विकली जातात.

जेनेरिक औषधेही सर्वसाधारण औषधांपेक्षा स्वस्त असण्यामागे कोणते तीन मुख्य कारण सांगितले जातात?

जेनेरिक औषधी ही सर्वसाधारण औषधांपेक्षा स्वस्त असतात. त्यामागे मुख्य तीन कारणे सांगितले जातात. ज्यामध्ये या औषधांच्या विकासाकरिता कुठलेही शुल्क खर्च करावे लागत नाही. या औषधांच्या मार्केटिंग करिता पैसा खर्च करावा लागत नाही, आणि मोठ्या प्रमाणावर या औषधांचा पुरवठा केला जातो, इत्यादी घटक या औषधांना स्वस्त करण्यामागे असतात.

जेनेरिक औषधे सुरक्षित असतात का?

जेनेरिक औषधे ही नक्कीच सुरक्षित असतात. विपणनापूर्वी या प्रकारच्या औषधांची प्रभावी तथा आणि सुरक्षितता तपासून त्याला मान्यता दिली जाते. त्याचबरोबर अशा प्रकारच्या औषध उत्पादकांना गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस अंतर्गत विविध मार्गदर्शक तत्वांचे पालन करण्यासाठी बंधनकारक केले जाते. ज्यामुळे सामान्य औषधांसारखेच सारखीच जेनेरिक औषधी देखील सुरक्षित असतात.

जेनेरिक औषधे निर्मितीची पद्धत काय असते?

ज्यावेळी कुठल्याही औषधाची निर्मिती केली जाते, त्यावेळी सदर कंपनी त्या औषधाचे पेटंट आपल्या नावे करत असते. या पेटंटची मर्यादा वीस वर्षांची असते. अशी वीस वर्षांची मर्यादा पूर्ण केलेली व पेटंट मर्यादा संपलेली औषधे जेनेरिक पद्धतीने बनवली जातात. मात्र यावर कुठल्याही ब्रँड चे नाव टाकले जात नाही, तर त्यामध्ये असणाऱ्या घटकांचे नाव टाकले जाते.

जेनेरिक म्हणजे नेमके काय असते?

जेनेरिक औषधे ही सामान्य औषधांप्रमाणेच उपचार करण्यासाठी वापरली जातात. या औषधांमध्ये असणारे सामर्थ्य, त्याचा डोस, गुणवत्ता, पद्धत, हेतू हे प्रत्येक गोष्टी सारख्याच असतात. फक्त त्यामध्ये ब्रँड नाव टाकले जात नाही.

आजच्या भागामध्ये आपण जेनेरीक स्वरूपाच्या औषधांबद्दल संपूर्ण माहिती बघितलेली आहे. या माहितीच्या आधारे तुम्हाला पुढील वेळी दवाखान्यात गेल्यानंतर पैसे वाचवण्यास नक्कीच मदत मिळेल. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर त्याबद्दल आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य कळवा, आणि तुमच्या नेहमी आजारी पडणारे मित्र मैत्रिणींना ही माहिती शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील पैसे वाचवण्यामध्ये नक्की फायदा मिळेल.

माझे नाव सृष्टी आहे आणि मी या ब्लॉग ची संस्थापक आहे. मला माहिती लिहायला खूप आवडतात, म्हणून मी या माझ्या ब्लॉग वर मराठी मध्ये माहिती लिहित असते.

Leave a Comment