Badminton Game Information In Marathi नमस्कार मित्रांनो, मित्रांनो खेळ खेळणे प्रत्येकालाच आवडत असते. ज्यामध्ये बॅडमिंटन हा देखील एक आवडीचा खेळ म्हणून संपूर्ण जगभर मोठ्या प्रमाणावर खेळला जातो. या बॅडमिंटनला बॅटलडोर किंवा शटलकॉक इत्यादी नावांनी देखील ओळखले जाते.
बॅडमिंटन खेळाची संपूर्ण माहिती Badminton Game Information In Marathi
युरोप आणि अशिया या दोन खंडांमध्ये या खेळाचा उगम झाल्याचे सांगितले जाते, मात्र त्याला बॅडमिंटन हे नाव १९ व्या शतकात देण्यात आले. बॅडमिंटनमध्ये रॅकेट आणि शटल किंवा फुल ही दोन साहित्य वापरली जातात. आज बऱ्याच दिवसाच्या संघर्षानंतर बॅडमिंटन या खेळाने ऑलम्पिक स्पर्धांमध्ये स्थान मिळवलेले आहे.
भारतासह चीन, श्रीलंका, आणि विविध आशियाई देशांमध्ये देखील हा खेळ मोठ्या लोकप्रियतेने खेळला जातो. या खेळाने अनेकांना आपली वेगळी ओळख निर्माण करून दिलेली आहे. त्यामध्ये डॅन ली, सायमन सॅटॉसो, तौफिक हितायत, पी व्ही सिंधू, सायना नेहवाल, पी गोपीचंद या व इतरही प्रतिष्ठित खेळाडूंचा समावेश होतो. या खेळामध्ये शक्यतो तरुण खेळाडूच सहभागी होण्यास प्राधान्य देत असतात, त्यामुळे याला तरुणांचा खेळ म्हणून देखील ओळखले जाते.
मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण बॅडमिंटन या खेळाबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत…
नाव | बॅडमिंटन खेळ |
प्रकार | आत व बाहेर दोन्हीकडे खेळला जाऊ शकेल असा खेळ |
ऑलिम्पिक मध्ये समावेश | १९९२ या वर्षी |
साहित्य | रॅकेट व शटलकॉक |
प्रथम नामकरण | १९ वे शतक |
प्रथम आंतरराष्ट्रीय स्पर्धा | १९८१ या वर्षी |
संघनुसार प्रकार | एकेरी किंवा दुहेरी |
बॅडमिंटन या खेळाचा इतिहास:
मित्रांनो, बॅडमिंटन हा खेळ १९ व्या शतकामध्ये सुरू झाला असला, तरी देखील १८७० च्या आसपास या खेळामध्ये ब्रिटिश भारतामध्ये वास्तव्य करणाऱ्या ब्रिटिशांनी भविष्य बघितले होते. त्यामुळे त्यांनी या खेळाचा विकास करण्याचे ठरविले.
१८५० यावर्षी भारताच्या तंजावर येथे कोंबड्या ऐवजी चेंडूद्वारे हा खेळ खेळला गेला होता, जो लोकरी पासून बनवलेला होता. त्यानंतर १८७३ च्या दरम्यान जुनागड या ठिकाणी हा खेळ मोठ्या प्रमाणावर खेळला जाऊ लागला. आणि पुढे या खेळाचे काही नियम तयार करण्यात आले, जे १८७५ या वर्षा दरम्यान सर्वत्र प्रकाशित झाले होते.
रिटर्निंग ऑफिसर्स यांनी फॉक्सटोन या ठिकाणी पहिल्या बॅडमिंटन शिबिराचे आयोजन केले होते. या खेळांमध्ये त्यावेळी एका बाजूने चार व दुसऱ्या बाजूला चार असे एकूण आठ खेळाडू खेळत होते. मात्र यातील संभाव्य अडचणी लक्षात घेता हा खेळ एक बाजूने एक अथवा दोन असे एकूण दोन ते चार खेळाडून पर्यंत मर्यादित केला गेला.
बॅडमिंटन मधील या बदलामुळे खूप मोठा फरक दिसून आला, ज्यामुळे खेळामध्ये सुसूत्रता येण्यास मदत झाली. सुरुवातीला जेव्हा शटलकॉक बनवल्यात आले, तेव्हा ते रबरापासून बनवण्यात आले होते. आणि वजन मिळावे म्हणून त्यामध्ये काचेचा वापर करण्यात आला होता.
बॅडमिंटनमध्ये बऱ्याचदा विविध नियम बनवण्यात आले, मात्र आज इंग्लंड स्थित बॅडमिंटन असोसिएशन नी तयार केलेल्या नियमांद्वारेच या खेळाची खेळी सुरू केली जाते. हे नियम १३ फेब्रुवारी १८९३ या दिवशी डनबार, पोर्टमाऊथ येथे सुरू असणाऱ्या खेळादरम्यान तयार करण्यात आले होते.
बॅडमिंटन या खेळामध्ये सुसूत्रता यावी याकरिता इसवी सन १९३४ मध्ये जागतिक बॅडमिंटन महासंघाची स्थापना करण्यात आली होती. मात्र १९३६ यावर्षी दोनच वर्षात त्याचे नामकरण बॅडमिंटन जागतिक महासंघ असे करण्यात आले, आणि त्याच वर्षी भारताने या महासंघाचे सदस्यत्व स्वीकारले.
मित्रांनो, बॅडमिंटन या खेळाचा उगम तसेच बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन चा उगम देखील इंग्लंडमध्ये झालेला आहे. मात्र या खेळामध्ये चीन, दक्षिण कोरिया, डेनमार्क, मलेशिया, इंडोनेशिया व भारत यांसारख्या देशांनी मोठी कामगिरी केलेली आहे. व नावलौकिक देखील मिळवलेला आहे.
बॅडमिंटन खेळातील साहित्याबद्दल माहिती:
मित्रांनो, बॅडमिंटन खेळासाठी शटल कॉक व रॅकेट हे दोन साहित्य वापरले जाते. शटल कॉक हे कृत्रिम रबरापासून तयार केले जाते, ज्यामध्ये पिसे खोवलेली असतात, ज्यांची संख्या १६ इतकी असते. या कोंबड्याचा व्यास शेंड्याला ५८ ते ६८ मिलिमीटर तर बुडाजवळ २५ ते २७ मिलिमीटर इतका असतो. आणि लांबी ६२ ते ७० मिलिमीटर इतकी असते. या कोंबड्याचे वजन पावणे पाच ते साडेपाच ग्रॅम दरम्यान असते.
रॅकेट हे एका धातूपासून बनवलेले असते, त्याचा वापर कोंबडा मारण्याकरिता होतो. हे सुमारे ६८० मिलिमीटर लांब, आणि २३० मिलीमीटर रुंद असते. ज्याला एक हँडल व मारण्याकरिता धाग्यांची जाळी असते.
जास्तीत जास्त स्कोअर करण्याकरिता नियम:
मित्रानो, बॅडमिंटन हा खेळ गुणांवर किंवा स्कोअरवर अवलंबून असतो, या खेळामध्ये जास्तीत जास्त स्कोअर करण्याकरिता तीन पैकी किमान दोन सामने जिंकणे आवश्यक असते. प्रत्येक सामन्यावेळी खेळाडूंची बाजू बदलली जाते. खेळताना कधीही सर्विस लाईनला स्पर्श करू नये, नेहमी कोर्टाच्या जागेतच राहिले पाहिजे. खेळताना समोरच्याने उशिरा कोंबडा मारल्यास ही खेळातील रॅली पुढे ढकलण्यात येते, आणि त्याच स्कोर वर आधारित पुन्हा सामना सुरू केला जातो.
निष्कर्ष:
मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण जागतिक पातळीवर मोठ्या आनंदाने खेळला जाणारा खेळ अर्थात बॅडमिंटन याविषयी माहिती पाहिली. यामध्ये तुम्हाला बॅडमिंटन खेळाचा उगम, त्याचा संपूर्ण इतिहास, त्याविषयीची माहिती, तसेच काही अधिकृत संस्था, खेळाच्या साहित्याचे प्रकार व माहिती, हा खेळ खेळण्याचे सर्वसाधारण नियम आणि अटी, खेळताना गुण वाढवण्यासाठीच्या टिपा, इत्यादी गोष्टी वाचायला मिळाल्या.
मित्रांनो, बॅडमिंटन हा खेळ मनाला आनंद देण्याबरोबरच शरीराला चपळ आणि बळकट बनवण्याकडे देखील भर देत असतो. बॅडमिंटन हा खेळ खेळणाऱ्या खेळाडूंचा आपोआपच व्यायाम होत असल्यामुळे, त्यांचे शरीर अतिशय निरोगी व सुदृढ असते. तसेच त्यांच्या शरीराचा बांधा देखील खूपच सुडौल असा असतो.
FAQ
बॅडमिंटन या खेळाचा शोध कोणत्या देशामध्ये लागलेला आहे?
बॅडमिंटन हा खेळ सर्वप्रथम ब्रिटनमध्ये खेळण्यात आला होता, त्यावेळी त्याला बॅटलडोर किंवा शटलकॉक असे नाव होते. पुढे जाऊन डेन्मार्क, युरोप, आणि आशिया यांनी देखील या खेळामध्ये प्रचंड रस दाखविला. चीनमध्ये मात्र अलीकडील काळामध्ये हा खेळ खेळण्याची सुरुवात झाली आहे.
बॅडमिंटन हा खेळ कोणत्या वैशिष्ट्यांसाठी प्रसिद्ध आहे?
बॅडमिंटन हा खेळ फावल्या वेळेमध्ये खेळला जाणारा सर्वांच्या आवडीचा खेळ आहे. त्याला खेळण्यासाठी कुठलेही बंधने नाहीत. जसे की जागा, वेळ, ऋतू इत्यादी हा खेळ अगदी घरात उद्यानात परसबागेत इत्यादी ठिकाणी खेळला जाऊ शकतो. शिवाय हिवाळा असो की उन्हाळा बरेच लोक हा खेळ नेहमी खेळताना दिसतात.
बॅडमिंटन या खेळाचे नेमके स्वरूप कसे आहे?
बॅडमिंटन या खेळामध्ये प्रतिस्पर्धी खेळाडू एकमेकांच्या समोर उभे ठाकतात, ज्यांच्यामध्ये एक जाळी लावलेली असते. या जाळीवरून यशस्वीरित्या शटल रॅकेटच्या सहाय्याने मारावयाचे असते. मात्र असे करताना ते खाली पडू न देणे हा या खेळाचा मुख्य उद्देश असतो. ज्यानुसार यामध्ये गुणदान केले जाते.
बॅडमिंटन खेळताना दोनही खेळाडूंचे गुण जर सारखे असतील तर काय केले जाते?
बॅडमिंटनमध्ये दोन्ही खेळाडूंचे गुण सारखे असण्याची परिस्थिती निर्माण झाल्यास कोणत्याही एका खेळाडूला जास्त गुण मिळेपर्यंत हा खेळ पुढे खेळला जातो.
शटल कॉकला आणखी कोणत्या नावाने ओळखले जाते?
शटल कॉक ला फुल, शटल किंवा कोंबडा इत्यादी नावांनी देखील ओळखले जाते.
मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण शारीरिक क्षमतेचा कस लावणाऱ्या बॅडमिंटन या खेळाविषयी माहिती पाहिली. ही माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींना तर आठवणीने पाठवाच, शिवाय तुम्हाला या माहिती विषयी काय वाटते, या प्रतिक्रिया देखील आम्हापर्यंत अवश्य पोहोचवा.
धन्यवाद…