Moon Information In Marathi आपल्या प्रत्येकाचा कॉमन मामा म्हणजे चंदा मामा होय. चंद्र हा पृथ्वीचा एकुलता एक उपग्रह आहे. पृथ्वीपासून ३ लाख ८४ हजार ४०० किलोमीटर इतक्या अंतरावर असणारा हा उपग्रह पृथ्वीचा सर्वात जवळचा खगोलीय घटक आहे. चंद्र हा कवी लोकांचा तर अगदी आवडीचा विषय. प्रत्येक गोष्टीला चंद्राची उपमा देत कवी कवितेला अधिकच रंगत आणत असतो. अशा या पृथ्वीच्या एकमेव नैसर्गिक उपग्रहाबद्दल अर्थात चंद्राबद्दल आजच्या भागामध्ये आपण माहिती घेणार आहोत…

चंद्राची संपूर्ण माहिती Moon Information In Marathi
नाव | चंद्र |
प्रकार | नैसर्गिक उपग्रह |
पृथ्वी व चंद्राचे अंतर | ३,८४,४०० किमी |
आकारमानानुसार क्रमांक | ग्रहांमध्ये चौथा |
क्रमानुसार क्रमांक | सुर्यापासूनच पाचवा |
आकार | अंडाकृती |
व्यास | ३४४७ किलोमीटर |
प्रदक्षिणा कालावधी | २७ दिवस, ७ तास, ४३ मिनिटे, ११ सेकंद, ६ मिलीसेकंद |
निर्मितीचे कारण | पृथ्वी व थ्रेआ या ग्रहांच्या धडकेतून |
ज्याप्रमाणे, सूर्य वायुमंडळाची प्रदक्षिणा करतो, पृथ्वी सूर्य मंडळाची प्रदक्षिणा करते, तसेच चंद्र देखील पृथ्वीची प्रदक्षिणा करत असतो. त्यासाठी त्याला सुमारे २७ दिवस ०७ तास ४३ मिनिटे ११ सेकंद व ०६ मिलि सेकंद इतका वेळ लागतो. ज्याला चंद्रमास असे म्हणून ओळखले जाते, आणि यानुसारच मराठी महिन्यांचे दिवस पाडलेले असतात.
चंद्र हा ग्रह असल्यामुळे तो स्वतः प्रकाश देत नाही, त्यामुळे दिवसा सूर्याच्या प्रकाशामध्ये चंद्र दिसून येत नाही. मात्र रात्री आपण चंद्राला बघू शकतो. काही वेळा चंद्र दिवसा देखील दिसतो, तर अमावस्येच्या वेळी चंद्र रात्री देखील दडी मारतो. असा हा तुमचा आमचा सर्वांचा मामा असणारा चंद्र खूप मनोरंजक आहे.
जसं आपल्या पृथ्वीवर गुरुत्वाकर्षण शक्ती आहे, तसेच चंद्राला देखील आपली गुरुत्वाकर्षण शक्ती आहे. मात्र चंद्रावरील गुरुत्वाकर्षण शक्ती ही केवळ पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या सहाव्या भागाइतकीच कमी आहे. त्यामुळे चंद्रावर चालताना माणूस अगदी उड्या मारल्यासारखा चालतो, त्यावरूनच मून वाक नावाचा एक डान्स प्रकार आपल्याकडे रुजू झालेला आहे.
आपल्याला माहितीच आहे की चंद्राची निर्मिती ही पृथ्वीच्या निर्मितीनंतर झालेली आहे, मात्र ती कशी झाली ते तुम्हाला माहित आहे का? तर चंद्राची निर्मिती ही पृथ्वी व थेआ या नावाचा एक उपग्रह एकमेकांना धडकून त्यातून झालेली आहे असे मानले जाते. आणि ही निर्मिती तब्बल आजपासून साडेचार दशलक्ष वर्षांपूर्वी झाली असे सांगण्यात येते.
पृथ्वीवरून दिसणारा चंद्राच्या भागांमध्ये प्रत्येक दिवशी थोडी थोडी वाढ आणि थोडी थोडी घट होत असते. याला चंद्राच्या कला असे म्हटले जाते. या भागामध्ये अमावस्या पासून पौर्णिमेपर्यंत चंद्र वाढत जातो, तर पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत पुन्हा कमी होत जातो. या दोन्ही गोष्टींच्या कालावधीमध्ये १४ दिवसांचे अंतर असते. आणि पंधराव्या दिवशी अमावस्या किंवा पौर्णिमा असते.
या कालावधीलाच पंधरवडा असे म्हटले जाते. त्यातील अमावसेकडे जाणाऱ्या आणि पौर्णिमेकडे जाणाऱ्या पंधरवड्याला वेगवेगळी नावे आहेत. अंधाराचा असणारा तो कृष्णपक्ष व उजेडाचा असणारा तो शुक्लपक्ष म्हणून या दोन पक्षांना ओळखले जाते.
आपल्याला पृथ्वीवरून चंद्र हा गोलाकार जरी दिसत असला तरी त्याचा खरा आकार हा थोडासा अंडाकृती असा आहे. आणि या चंद्राचा व्यास सुमारे ३३४७ किलोमीटर इतका प्रचंड आहे.
पृथ्वीवरून आपल्याला चंद्राचे कायमच कुतूहल वाटण्यात आलेले आहे. आणि याच कुतूहलापोटी माणसाला चंद्रावर जाण्याचे वेध लागले होते. त्यामुळे अनेक देशांनी चंद्रावर जाण्याचे प्रयत्न केले, त्यातील काही यशस्वी झाले तर काही अयशस्वी झाले.
अमेरिका व रशिया या दोन देशांनी चंद्राचा अभ्यास करता यावा यासाठी सुरुवातीच्या काळात चंद्रावर रोबोट पाठवले होते, त्यानंतर नील आर्मस्ट्रॉंग नावाचा मनुष्य चंद्रावर जाणारा पहिला मनुष्य ठरला. ती तारीख होती २१ जुलै १९६९. प्रथमतः चंद्रावर पाऊल ठेवून या व्यक्तीने एक विश्वविक्रम बनवला होता. यानंतर सुमारे १९७२ पर्यंत चंद्रावर अनेक शास्त्रज्ञांनी किंवा अंतराळवीरांनी भेटी दिल्या, मात्र अपोलो १७ नावाचे यान हे चंद्रावर उतरणारे शेवटचे यान ठरले.
अमावस्येच्या दिवशी चंद्र अदृश्य होण्याची काय कारणे आहेत:
आपल्याला हे माहिती आहे की पौर्णिमेला पूर्ण गोलाकार दिसणारा चंद्र अमावस्येच्या दिवशी थोडासा सुद्धा दिसत नाही, याचे कारण काय तर अमावस्येच्या दिवशी चंद्र पृथ्वी भोवती फेरी मारत मारत पृथ्वीच्या आणि सूर्याच्या विरुद्ध बाजूला जातो.
जेणेकरून चंद्रावर सूर्याचा प्रकाश पृथ्वीच्या सावलीमुळे पडू शकत नाही. परिणामी चंद्र हा तारा नसल्याने तो स्वतःचा उजेड पाडू शकत नसल्यामुळे, त्यावरून सूर्यकिरण परावर्तित होत नाहीत. व चंद्र आपल्याला अदृश्य झाल्या सारखा भासतो. त्यावेळी चंद्र कुठेही जात नाही, अवकाशातच असतो. मात्र प्रकाशाचा अभावामुळे तो आपल्याला दिसून येत नाही.
चंद्राविषयीची मनोरंजक तथ्य माहिती:
प्रत्येक ग्रहाला उपग्रह नाहीत, मात्र काही ग्रहांना एकापेक्षा अधिक उपग्रह देखील आहेत. तसेच आपल्या पृथ्वीला देखील चंद्र नावाचा एकमेव नैसर्गिक उपग्रह आहे.
चंद्र हा पृथ्वी सोबतच निर्माण झालेला नसून, पृथ्वीच्या निर्मितीनंतर तयार झालेला आहे. चंद्र हा पंधरा दिवसात मिळून आपल्या कला बदलत असतो, आणि या संपूर्ण कला त्याच्या एका महिन्यामध्ये पूर्ण होतात.
निष्कर्ष:
आज आपण चंद्र या उपग्रहा विषयी माहिती घेतली. चंद्र हा लहान पासून मोठ्यांपर्यंत सर्वांचा आवडतीचा आहे. चंद्र विषयी प्रत्येकाला अगदी लहानपणापासूनच आकर्षण राहिलेले आहे, कारण संध्याकाळी जेवण झाल्यानंतर निवांत बसले की हा चंद्रच आपल्याला सोबत देत असतो.
शेतामध्ये रात्री पाणी पाजणारे शेतकरी असो, की दिवसभर मजुरी करून जेवल्यानंतर निवांत आकाशाकडे बघत पडणारे मजूर असो, कंपनीमध्ये काम करणारे कामगार असो, की मोठे मोठे उद्योजक असो, प्रत्येक जण या चंद्रामुळे सुखावतच असतो. चंद्र हा आपल्या पृथ्वी मातेचा भाऊ म्हणून आपला मामा असे लहान मुलांच्या गोष्टींमध्ये बिंबवले जाते, ते आपण मोठे झाले तरी विसरत नाही. आणि चंद्राला चंदा मामा म्हणूनच ओळखतो.
हल्ली चंद्रावर अनेक देशांनी मोहिमा केले आहेत, त्यात अलीकडेच भारताचा देखील क्रमांक लागतो. ज्यामध्ये भारत संपूर्णतः यशस्वी झालेला आहे. अशा या चंद्राविषयी आपल्या सर्वांना कुतूहल तर आहेच, मात्र त्यासोबत आपुलकी जिव्हाळा आणि प्रेम देखील आहे.
FAQ
चंद्राची अन्य नावे काय आहेत?
चंद्राची अन्य नावे मृगांक, शशी, चंद्रमा, शशांक, सोम, इंदू, रोहिणीकांत, आणि रजनीनाथ इत्यादी आहेत.
चंद्र आणि पृथ्वी सोबतच तयार झाले आहेत का?
नाही, पृथ्वीच्या निर्मितीनंतर तब्बल ३० दशलक्ष वर्षे काळ उलटल्यानंतर चंद्राची निर्मिती झाली आहे.
चंद्र तारा आहे की ग्रह आहे?
चंद्र तारा किंवा ग्रह नसून तो पृथ्वीचा एकमेव उपग्रह आहे.
चंद्राची निर्मिती कोणत्या प्रक्रियेतून झालेली आहे?
चंद्राची निर्मिती पृथ्वी व थेआ या ग्रहांच्या धडकेतून झालेली आहे.
चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला व्यक्ती कोण होता?
चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला व्यक्ती नील आर्मस्ट्रॉंग हा होता.
आजच्या भागामध्ये आपण आपला सर्वांचा मामा असणारा चंद्र या विषयी माहिती पाहिली. या माहितीचा वापर करून तुम्ही शाळेसाठी निबंध लिहू शकाल. या माहिती विषयीची तुमच्या प्रतिक्रिया आम्हापर्यंत आठवणीने कळवा, आणि थोडासा वेळ काढून या माहितीला शेअर देखील नक्की करा.
धन्यवाद.