Manus Bolne Visarla Tar Marathi Nibandh माणूस बोलणे विसरला तर …..हा निबंध मला एका वाचकांनी लिहायला सांगितला , आणि त्यांच्या मदतीसाठी आज मी हा निबंध लिहित आहेत. हा निबंध तुम्हाला नक्कीच आवडेल.
माणूस बोलणे विसरला तर ….. मराठी निबंध Manus Bolne Visarla Tar Marathi Nibandh
माणूस बोलणे विसरला तर काय काय होईल ? याची कल्पना आपण करूच शकणार नाही. पण माणूस जर बोलणे विसरला तर खूप त्रास होणार.कुणाला काही सांगायचे असेल तर तो कसे सांगेल कारण त्याला बोलताच येत नाही. आपल्या मनातलं सगळं कुणाला सांगूच शकणार नाही. जर आपल्याला काही सांगायचे असेल तर आपल्यास एका कागदावर लिहून द्यावे लागणार.
आपण काही सांगताना जो संवाद होतो त्याची मज्जाच येणार नाही.आपल्या चेहऱ्यावर जो हावभाव असतो तो दिसणारच नाही. माणूस बोलणे विसरला तर सर्वांना आपले विचार मनातच ठेवावे लागेल. माणसाचा संवाद हा लेखी होणार !\
माणूस बोलणे विसरला तर,लोकांशी संवाद कसा होईल? पत्र,मोबाइलच्या मदतीने संदेश पाठवायला लागतील.हातांच्या खुणांनी संवाद साधावा लागेल. यामुळे लोकांमध्ये गैरसमज निर्माण होऊ शकतो. लोकामध्ये गैरसमज झाल्यामुळे भांडणे पण होऊ शकतात. कारण लिहिण्यापेक्षा तोंडी संवाद जास्त योग्य असतो.
रेल्वे स्थानक,विमानतळावर महत्वाच्या घोषणा होणार नाहीत.सगळ्या घोषणा लेखी स्वरूपात कराव्या लागतील.बाजार आणि इतर सार्वजनिक ठिकाणी लोक बोलायला विसरले तर व्यापार कसा होईल,बाजारात तर व्यवसाय करण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तोंडी संवाद.
शाळा,कॉलेजमध्ये अभ्यास कसा शिकवला जाईल,तेथे वकतृत्व स्पर्धा होणार नाहीत.रेडियो,टीव्हीच्या माध्यमाने बातम्या ऐकायला मिळणार नाहीत.भ्रमणध्वनी,दूरध्वनीवर कोणाशी बोलता येणार नाही.
माणूस बोलायला विसरला तर, सगळीकडे शांतता होईल.लोकांच्या मनातील विचार नीट व्यक्त होणार नाहीत.गप्प राहिल्यामुळे आपल्याला खूप कंटाळा येईल.संदेश पाठवून संवाद करता येऊ शकतो पण माणूस दिवसातून किती तास लिहत बसणार,त्यामुळे त्याच्या हाताची बोटे दुखतील.
आपण एकमेकांशी बोलतो तेव्हा ज्ञान वाढते, विविध गोष्टींची जाणीव होते.इतरांशी बोलल्यावर आपल्याला बरे वाटते.अशा वेळी,माणूस बोलणे विसरला तर, त्याला खूप समस्या होतील.
माणूस आणि प्राणी मध्ये फरक काय असतो ? माणसाला बुद्धी असते असे सर्वजण म्हणतात . मग प्राण्यांना नसते का ? त्यांना देखील असते . फरक एवढाच की माणसाला बोलता येते आणि प्राण्यांना नाही .
जर माणूस बोलणेच विसरला तर ? अनर्थच होईल . प्राण्यांमध्ये व आपल्यात फरकच नाही. सर्व गोष्टी अवघड जातील . आपले विचार दुसऱ्यांना सांगता येणार नाही . इशारा करून माणूस कितपत आपले विचार बोलू शकतो ? एकमेकांना समजणे अवघड जाईल व त्याच्या मुळे भांडण , दंगे पसरतील .
खरच ह्या मुळे माणसांची अधोगती होईल व माणूस जनावर बनेल . देव करो असे अजिबात न हो .
हे निबंध सुद्धा अवश्य वाचा :-
Essay On Makar Sankranti In Marathi
Global Warming Essay In Marathi
Importance Of Education Essay In Marathi