Laptop Information In Marathi दोन दशके मागे वळून बघितले तर आपल्या सर्वांच्या कुतूहलाचा विषय म्हणून संगणक अथवा लॅपटॉप समजला जात असे. आजकाल जवळपास सर्वांकडेच लॅपटॉप असल्यामुळे, त्याचे फारसे नावीन्य कोणालाच राहिलेले नाही. असे असूनही जुन्या पिढीतील लोक आणि सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तींना या लॅपटॉप बद्दल अजूनही फारशी माहिती नाही. त्यामुळे आजच्या भागामध्ये आपण या लॅपटॉप बद्दल माहिती बघणार आहोत.

लॅपटॉप विषयी संपूर्ण माहिती Laptop Information In Marathi
अगदी शालेय अभ्यासापासून ऑफिसच्या कामापर्यंत अनेक ठिकाणी या लॅपटॉपचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. तंत्रज्ञानाच्या प्रगतीनुसार संगणकाचे लॅपटॉप मध्ये रूपांतर झाले, आणि आपण या लॅपटॉपला कुठेही घेऊन फिरू लागलो. लॅपटॉप आल्यामुळे डेस्कटॉप संगणक, काहीसा मागे पडत चाललेला आहे. आणि त्याची जागा नवीन नवीन तंत्रज्ञानने युक्त अशा लॅपटॉप ने घेऊन माणसाचे जीवन आजकाल अतिशय सुसह्य झालेले आहे. आजच्या भागामध्ये आपण याच लॅपटॉप बद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत…
नाव | लॅपटॉप |
प्रकार | संगणक |
खासियत | कुठेही घेऊन जाता येणारा |
स्वरूप | क्लिपिंग प्रकारचा |
घटक | दोन फ्लॅप त्यातील एक स्क्रीन आणि दुसरा कीबोर्ड |
जनक | ऍलन के |
आपण आज ज्या युगामध्ये राहत आहोत, हे युग तंत्रज्ञानाचे युग आहे. आपल्या आसपास अगदी सर्व ठिकाणी आपल्याला यंत्र आढळून येतात. त्यामुळे मानवाचे काम हलके झाले असले, तरी देखील मानवाच्या रोजगारांमध्ये मोठ्या प्रमाणावर घट झालेली आहे. मात्र असे असले तरी देखील कामाचा वेग आणि दर्जा सुधारण्यास मदत झालेली आहे.
यामध्ये सर्वात मोठा वाटा संगणकाचा आहे. त्यातही संगणकाला लॅपटॉप प्रकारामध्ये बदलण्यात आल्यामुळे त्यापासून कार्य करणे अतिशय सोयीचे झाले आहे. अगदी कुठल्याही ठिकाणी आपण संगणक वापरू शकतो.
लॅपटॉप म्हणजे काय:
लॅपटॉप हा दुसरे तिसरे काही नसून, संगणकाचाच एक प्रकार आहे. जो केवळ आकाराने व वजनाने हलका केलेला आहे. मात्र संगणकाची सर्व कामे लॅपटॉप वर आपण करू शकतो. या लॅपटॉप ला नोटबुक कम्प्युटर या नावाने देखील ओळखले जाते. कारण वही सारखा हा आपण उघडझाप देखील करू शकतो.
साधारणपणे डेस्कटॉप संगणकामध्ये संगणकाचे विविध भाग सुट्टे असतात. ज्यांना वायरच्या साहाय्याने एकत्र जोडून संच तयार केला जातो. मात्र लॅपटॉप हा असा प्रकार आहे, ज्यामध्ये सर्व साधने एकत्रच तयार केलेली असतात. आणि अजून एक गोष्ट म्हणजे यामध्ये बॅटरी देखील असल्याने लाईट नसताना देखील या संगणकाचा आपण वापर करू शकतो.
संगणकाच्या लॅपटॉप या प्रकाराला शक्यतो खाजगी वापराकरता जास्त प्राधान्य दिले जाते. हा एकदा चार्ज केल्यानंतर साधारणपणे सहा ते सात तास सेवा देत असल्यामुळे, कामाच्या ठिकाणी देखील यांना वापराचे प्रमाण वाढलेले आहे. आज शालेय विद्यार्थ्यांपासून व्यावसायिक लोकांपर्यंत प्रत्येकाला लॅपटॉप फायदेशीर ठरत आहे.
लॅपटॉप चे प्रकार:
संगणकाचा एक प्रकार असलेला लॅपटॉप देखील वेगवेगळ्या प्रकारांमध्ये येत असतो. ज्यामध्ये नोटबुक लॅपटॉप, अल्ट्रा पोर्टेबल लॅपटॉप, क्रोम बुक लॅपटॉप, अल्ट्रा बुक लॅपटॉप, मॅक बुक लॅपटॉप, कन्वर्टेबल लॅपटॉप इत्यादी प्रकार पडत असतात.
लॅपटॉप वापराचे फायदे:
मानवाच्या आयुष्यामध्ये संगणक हा अतिशय फायदेशीर ठरला असला तरी देखील संगणकाच्या ऐवजी लॅपटॉप वापरणे अजूनच फायदेशीर ठरत असते.
लॅपटॉप चा वापर करणे अतिशय लवचिक असते. त्यामुळे हा लॅपटॉप आपण कुठेही सहजपणे वापरू शकतो. त्याच बरोबर प्रवासामध्ये देखील आपल्या कार्यांना कुठलेही प्रकारे विराम मिळत नाही. त्यामुळे प्रवास आनंददायी होण्याबरोबरच आपली कामे देखील वेळच्या वेळी पूर्ण होत असतात.
लॅपटॉप वापरण्याकरिता तुम्हाला कसल्याही प्रकारे एखाद्या विशिष्ट जागी जखडून बसावे लागत नाही. तुम्ही अगदी जेवताना, सोफ्यावर बसताना, बेडवर, पार्कमध्ये किंवा अगदी कॉफी शॉप मध्ये देखील या लॅपटॉपचा वापर करू शकता. त्यामुळे तुम्हाला काम करणे अतिशय आरामदायी वाटते.
लॅपटॉप च्या फायद्यांमधील सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणून चार्जिंग सुविधा ओळखली जाते. भारतामध्ये लोड शेडिंगचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर असते. ग्रामीण भागामध्ये तर वीज कित्येक तास नसते, अशा वेळेला विद्यार्थ्यांना अभ्यास करायचा असेल किंवा कुठल्याही नोकरदार वर्गाला त्याचे काम करायचे असेल तर खोळंबा होत असतो. मात्र लॅपटॉप असेल तर या समस्येवर मात केली जाऊ शकते. आणि एका चार्जमध्ये सुमारे सहा ते सात तासापर्यंत तुम्ही काम करू शकता.
कमी जागा लागत असल्यामुळे लॅपटॉप वापराकडे सर्वांचे प्राधान्य दिसून येते. सर्व प्रकार एकाच ठिकाणी मिळाल्यामुळे आणि त्यातही वजनाने अतिशय हलके असल्यामुळे, लॅपटॉप वापराचे प्रमाण आजकाल वाढलेले आहे.
डेस्कटॉप संगणक इतर डिवाइस सोबत जोडायचा असेल तर त्यासाठी वायर वापरावी लागते. मात्र वायफाय, ब्लूटूथ, इंटरनेट कनेक्शन इत्यादी पद्धतीने लॅपटॉप हा विना वायर अर्थात वायरलेस पद्धतीने एकमेकांशी जोडला जाऊ शकतो.
लॅपटॉप हा अधिक सुरक्षित व गोपनीय असतो, कारण तुम्ही सतत त्याला आपल्या सोबत ठेवत असल्यामुळे तुम्ही बाहेर असताना देखील आपल्या पाठीमागे या संगणकाचा वापर होत नाही याची तुम्ही सुनिश्चितता करू शकता.
लॅपटॉप चे फायदे असल्याबरोबरच काही तोटे देखील आहेत. त्यामध्ये अपग्रेड करण्यामध्ये समस्या, बॅटरी खराब होण्याची समस्या, उष्णता बाहेर पडण्यास अडचणी, स्क्रीनचा लहान आकार, चोरी होण्याचे धोके इत्यादी तोटे देखील आहेत.
निष्कर्ष:
प्रत्येक दिवशी नवीन नवीन तंत्रज्ञानाने जुन्या तंत्रज्ञानाला मागे टाकले जाते. सुरवातीच्या काळात ज्यावेळी संगणकाचा शोध लागला, तेव्हा या संगणकाविषयी प्रत्येकाला प्रचंड आकर्षण होते. सुरुवातीचा संगणक हा अगदी एका खोली इतका मोठा असल्यामुळे आणि त्याची किंमतही प्रचंड असल्यामुळे सर्वसामान्य लोकांना हा संगणक बघणे म्हणजे एक दिव्य स्वप्न होते.
मात्र दिवसेंदिवस या तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये झपाट्याने प्रगती झाली, आणि त्यामुळेच हळूहळू या संगणकाचा आकार कमी होत गेला. पुढे जाऊन एलन के यांना अशी कल्पना सुचली, की पोर्टेबल स्वरूपाचा संगणक बनवला जावा. आणि त्यानुसार त्यांनी अशा संगणकाची निर्मिती करायला सुरुवात केली.
पुढे हळूहळू या संगणकाचा आकार इतका छोटा झाला की तो एका पिशवीमध्ये सहज इकडून तिकडे घेऊन जाता येऊ लागला. आजच्या भागामध्ये आपण या लॅपटॉप बद्दल माहिती बघितली आहे. ज्यामध्ये लॅपटॉप म्हणजे काय, लॅपटॉपचा इतिहास कसा आहे, या लॅपटॉपचा उगम कुठे व कसा झाला, लॅपटॉप चे फायदे काय आहेत, इत्यादी माहिती बघितलेली आहे.
FAQ
लॅपटॉप हा कशाचा सुधारित प्रकार समजला जातो?
लॅपटॉप हा संगणकाचा सुधारित प्रकार समजला जातो, जो कुठेही घेऊन जाता येणे शक्य आहे.
लॅपटॉप चे वैशिष्ट्य काय असते?
लॅपटॉप हा विविध घटकांना एकत्रच सामावून घेणारा प्रकार असतो. यामध्ये कीबोर्ड, माऊस, सीपीयू, स्क्रीन, यांसारख्या गोष्टी वेगळ्या न असता एकत्रच असतात.
एखाद्या व्यक्तीला डेस्कटॉप सारखा माऊस हवा असेल तर तो लॅपटॉप वापरू शकतो का?
कुणाही व्यक्तीला डेस्कटॉप सारख्या माऊसची सवय असेल, तरीदेखील काहीही हरकत न होता तो लॅपटॉप वापरू शकतो. कारण कीबोर्ड अथवा माऊस लॅपटॉप ला सुद्धा जोडला जाऊ शकतो.
लॅपटॉप डेस्कटॉप पासून कसा वेगळा असतो?
डेस्कटॉप पेक्षा वेगळी वैशिष्ट्ये म्हणजे लॅपटॉप हा कुठेही घेऊन जाता येतो. वीज नसेल तेव्हा देखील चार्जिंग च्या साह्याने यावर काम केले जाऊ शकते. त्याचबरोबर हाताळायला देखील अगदी हलका आणि सोपा असतो.
लॅपटॉप हे एक संक्षिप्त रूप आहे, तर ते कशाचे आहे?
लॅपटॉप संक्षिप्त रूपाचा शब्द आहे. ज्याचा संपूर्ण अर्थ लाईट वेट अनालिटिकल प्लॅटफॉर्म टोटल ऑक्टोमाइज्ड पावर असा होतो.