सरकारी योजना Channel Join Now

बार्ली धान्याची संपूर्ण माहिती Barley Information In Marathi

Barley Information In Marathi आपल्या इकडे गहू हे धान्य अतिशय मोठ्या प्रमाणावर खाल्ले जाते. मात्र गव्हासारखेच दिसणारे अजूनही एक धान्य आहे, ते तुम्हाला माहिती आहे का? त्याचे नाव बार्ली असे आहे. बार्ली हे बाकीच्या तृणधान्य वर्गीय पिकांइतके प्रसिद्ध नसले, तरी देखील इतरांपेक्षा त्यामध्ये पोषणमूल्य कितीतरी पटीने अधिक आहेत. मानवाचे आरोग्य अबाधित राखण्यामागे विविध प्रकारच्या मिलेट्सचे खूप मोठे कार्य आहे. बार्ली हे असे पीक आहे ज्याच्या अगदी शेंड्यापासून मुळापर्यंत सर्वच भागामध्ये औषधीय गुणधर्म आणि पोषण मूल्य आढळून येतात.

Barley Information In Marathi

बार्ली धान्याची संपूर्ण माहिती Barley Information In Marathi

पूर्वीच्या काळी बार्ली हे जनावरांना खाद्य म्हणून वापरले जात असे, मात्र त्याचे आरोग्यदायी फायदे लक्षात आल्यामुळे आता मानव देखील हे वापरू लागला आहे. बार्लीमुळे बुद्धी वाढते असे म्हटले जाते, पूर्वीच्या काळी ऋषीमुनी देखील बार्लीला आपल्या आहारामध्ये समाविष्ट करत असत.

बार्ली म्हणजे काय हे जर आपल्यासाठी नवीन असेल, किंवा माहीत असले तरी देखील त्याच्या फायद्याबद्दल तुम्हाला माहिती नसेल तर ह्या भागामध्ये तुम्हाला बार्ली विषयी इत्यंभूत माहिती मिळेल. त्यामुळे शेवटपर्यंत हा भाग वाचा. चला तर मग माहितीला सुरुवात करूया…

अगदी प्राचीन काळापासून ऋषीमुनी द्वारे ग्रहण केलेले अन्न म्हणजे बार्ली होय. हे कर्बोदकांचा उत्तम स्त्रोत असून, प्रथिने सुद्धा भरपूर प्रमाणात असतात. सोबतच यामध्ये लोह कॅल्शियम फॉस्फरस व मॅग्नेशियम यांसारखी खनिज द्रव्य देखील मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. सोबतिने विविध प्रकारचे विटामिन जसे की रायबोफ्लोविन, विटामिन सी, आणि थायमिन देखील असतात.

बार्लीला अगदी प्राचीन काळापासून ओळख मिळालेली आहे. संस्कृत मध्ये याला यव म्हणून ओळखले जाते. या पिकाच्या उत्पादकतेमध्ये रशिया या देशाचा प्रथम क्रमांक लागतो.

बार्ली चे विविध प्रकार:

बार्लीच्या धान्याच्या आकारानुसार त्याचे विविध प्रकार पडतात. ज्यामध्ये फ्लेक्स, काजळी, जव, पर्ल, आणि हुल्ड इत्यादी प्रकारांचा समावेश होतो. फ्लेक्स म्हणजे यामध्ये बार्लीच्या बियांना थोडेसे सपाट करून बनविले जाते. हे ओट सारखे असते.

 जव प्रकारातील बार्ली ही पीठ बनवण्यासाठी वापरतात. ज्यापासून गव्हासारख्या चपत्या बनवल्या जातात. याला ब्रेड बार्ली असे म्हणून देखील ओळखले जाते. बार्लीच्या धान्यावरील कव्हर अर्थात साल काढून काजळी प्रकारातील बार्ली बनविली जाते. हुंड बार्ली म्हणजे केवळ वरील बाजूने साफ केलेली बार्ली होय, याला होल बार्ली असे देखील म्हणतात. हे अतिशय आरोग्यदायी म्हणून ओळखले जाते.

सूप व सॅलड्स यामध्ये मुख्यत्वे करून वापरला जाणारा बार्लीचा प्रकार म्हणजे पर्ल बार्ली होय. दिसायला अतिशय सुंदर असणारी ही बार्ली अगदी मोत्यासारखी दिसते आणि रंगाने शुभ्र असते.

बार्ली मधील पोषक घटक:

आजकाल प्रत्येक खाण्यामध्ये काय आवश्यक घटक आहेत हे प्रत्येकाला बघणे गरजेचे ठरत आहे. कारण कोणाला कशाचे एलर्जी असेल हे सांगता येत नाही. बार्ली मध्ये विविध प्रकारचे पोषक घटक आढळून येतात. ज्यामध्ये थायमिन, नियासीन, रायबोविन, फॉस्फरस, पोटॅशियम, लोह, मॅग्नेशियम, फायबर, कॅल्शियम, प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स, विटामिन B6, फोलेट आणि जस्त इत्यादी घटक आढळून येतात.

बार्ली चे आरोग्यदायी फायदे:

बार्ली हे अतिशय उपयुक्त असे खाद्य आहे, यामध्ये मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार, यांविरुद्ध लढण्याची शक्ती आहे. ॲनिमियाच्या रुग्णांना बार्ली अतिशय फायदेशीर ठरते. एका संशोधनानुसार भारतीय महिलांमध्ये ॲनिमिया या आजाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे भारतामध्ये तर बार्ली खाणे खूपच गरजेचे आहे. ऍनिमिया म्हणजे लोहाची कमतरता असणे होय, ज्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होते.

बार्ली चे सेवन करून या समस्येवर मात करता येऊ शकते. तसेच मूत्राशयाच्या आजारांवर देखील बार्ली अतिशय उपयुक्त आहे. मूत्राशयाच्या जंतुसंसर्गाबाबत बार्ली खाणे सांगितले जाते. तसेच गर्भधारणेसंदर्भात आजारांविषयी सुद्धा बारली खाण्याचा सल्ला दिला जातो.

आज काल कर्करोग हा एक भयंकर आजार ठरत आहे, हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. कर्करोग हे सुरुवातीच्या काळामध्ये समजून येत नाही, मात्र ज्यावेळी कर्करोगाचे निदान होते त्यावेळी तो आटोक्यात आणणे खूप कठीण होऊन जाते. त्यामुळे कर्करोग होऊच नये म्हणून प्रयत्न करणे अतिशय फायदेशीर ठरते.

बार्ली खाल्ल्यामुळे कर्करोग होण्याचे प्रमाण खूप मोठ्या स्तरावर कमी होते. बार्ली मध्ये फ्लेव्होनोइड्स, फोलेट आणि पॉलिफेनॉल हे घटक असतात. त्यामुळे कर्करोग या आजाराला प्रतिबंध करणे सोयीचे होते. तसेच प्राथमिक स्तरातील कर्करोग बरा करण्याचे देखील कार्य बार्ली करत असते. यामध्ये बार्ली धान्याचे पाणी किंवा बार्लीच्या छोट्याशा झाडाचा रस वापरला जातो.

बार्ली हे हृदयरोगावर सुद्धा अतिशय महत्त्वाचे कार्य करते. हृदय हा मानवाचा सर्वात महत्त्वाचा अवयव आहे, मात्र आजकाल बदलत्या जीवनशैलीमुळे हृदय अतिशय कमकुवत होत चालले आहे. खाण्याच्या विविध सवयीमुळे हल्ली कोलेस्ट्रॉल आणि लिपोप्रोटीन मोठ्या प्रमाणावर वाढत चालले आहे. बार्ली मध्ये उपलब्ध असणारे अँटिऑक्सिडंट हे कोलेस्ट्रॉल ची पातळी नियंत्रणात तर ठेवताच शिवाय विविध विषारी पदार्थ शरीराबाहेर फेकून हृदयाला वाचवितात.

बार्ली ही पचन समस्या आणि बद्धकोष्ठता असणाऱ्या लोकांना देखील अतिशय उपयुक्त असते. ही अगदी थोड्या भोजनामध्ये देखील भरपूर शक्ती प्रदान करते, त्यामुळे ज्यांना भूक लागत नाही त्यांच्यासाठी बार्ली अतिशय उपयुक्त ठरते. तसेच बार्ली मध्ये असणारे फायबर्स बद्धकोष्ठतेच्या समस्येला दूर करण्यास मदत करतात. अन्न चांगले पचले तर बद्धकोष्टता होत नाही, आणि बार्ली अन्न पचवण्याबरोबरच बद्धकोष्ठता ही दूर करते. त्यामुळे पोटाच्या सर्व समस्या दूर केल्या जाऊ शकतात.

निष्कर्ष:

बार्ली हे एक तृणधान्य वर्गीय पीक असून त्यामध्ये अतिशय पोषक द्रव्य आढळून येतात. इतर तृणधान्य प्रमाणेच यामध्ये पिष्टमय पदार्थ म्हणजेच कर्बोदके देखील मोठ्या प्रमाणावर असतात. त्यामुळे बार्ली हे एनर्जी देणारे खाद्य म्हणून ओळखले जाते.

पूर्वीच्या काळी जनावरांना खाऊ घातले जाणारे हे खाद्य आजकाल धान्याच्या स्वरूपात मानव देखील खाऊ लागला आहे. हेल्थ कॉन्शियस लोक याचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात, तसेच वजन नियंत्रणात ठेवणे, डायट करणे, यामध्ये बार्लीचा वापर केला जातो.

FAQ

बार्ली हे धान्य कोणत्या देशांमध्ये पिकते?

बार्ली हे शक्यतो खडकाळ जमीन असणाऱ्या देशांमध्ये पिकते, ज्यामध्ये सर्वात जास्त मोठ्या प्रमाणावर रशियाचा नंबर लागतो. त्या पाठोपाठ फ्रान्स, जर्मनी, युक्रेन, ऑस्ट्रेलिया, स्पेन, कॅनडा, युनायटेड किंगडम, तुर्की, आणि अमेरिका या देशांचा समावेश होतो.

बार्ली या धान्याचे शास्त्रीय नाव काय आहे?

बार्ली या धान्याचे शास्त्रीय नाव हुरडीएम वल्गार असे आहे.

बार्ली हे कोणत्या प्रकारचे पिक आहे?

बार्ली हे एक तृणधान्य वर्गीय पीक असून, गहू तांदूळ व मका या तीन मुख्य तृणधान्ये वर्गीय पिकानंतर चौथ्या क्रमांकावर बार्ली येते.

बार्ली इतकी लोकप्रिय का होत आहे?

बार्ली हे विविध प्रकारचे जीवनसत्वे, फायबर्स, खनिजे इत्यादींनी समृद्ध असे अन्न आहे. ज्यामुळे कुठल्याही पथ्य सांगितलेल्या रुग्णांना हे दिले जाऊ शकते. म्हणून हल्ली ते प्रसिद्ध होत आहे.

भारतामध्ये बार्लीचे पीक कुठे कुठे घेतले जाते?

भारतामध्ये गंगेच्या प्रदेशात आणि कश्मीर खोऱ्यामध्ये असणाऱ्या उत्तर प्रदेश, बिहार, उत्तराखंड, पंजाब, राजस्थान, उडीसा, मध्य प्रदेश, व गुजरात या ठिकाणी बार्लीचे पीक घेतले जाते.

आजच्या भागामध्ये आपण बार्ली या तृणधान्य वर्गीय पिकाबद्दल माहिती पाहिली, ही माहिती आजही बऱ्याच लोकांना नाही, त्यामुळे ही माहिती शेअर करून लोकांमध्ये जनजागृती करा. तसेच आपल्याला ही माहिती कशी वाटली ते देखील कमेंट सेक्शन मध्ये लिहून कळवा. धन्यवाद…

माझे नाव सृष्टी आहे आणि मी या ब्लॉग ची संस्थापक आहे. मला माहिती लिहायला खूप आवडतात, म्हणून मी या माझ्या ब्लॉग वर मराठी मध्ये माहिती लिहित असते.

Leave a Comment