Oats Information In Marathi सकाळी सकाळी पोटभर नाश्ता मिळाला, की दिवसभर कसलीही काळजी राहत नाही. मात्र इतक्या सकाळी नाश्ता बनविणे प्रत्येकालाच सोयीचे होते असे नाही. नोकरदार वर्गातील आणि बॅचलर मुलांसाठी झटपट तयार होणारा, आणि आरोग्यासाठी उपयुक्त आणि पोटभर असणारा नाष्टा म्हणजे ओट्स होय. ओट्सचे हे पीठ जरासे जाडे भरडे असते. स्कॉटलंड या देशात उगम पावलेले हे ओट्स पूर्वापार स्कॉटिश अन्नाचा मुख्य घटक आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा ओट्स मानव तर खातातच मात्र प्राण्यांसाठी देखील हा अतिशय उपयुक्त समजला जातो.
ओट्सची संपूर्ण माहिती Oats Information In Marathi
कार्बोहाइड्रेट्स आणि प्रथिने यांनी भरपूर असलेल्या या ओट्समध्ये तुम्हाला ऊर्जा देण्याची पुरेपूर क्षमता आहे. त्यामुळे आजारी माणसांना देखील ओट्स खायला दिले जातात. रोज एक वाटी ओट्स खाणे तुम्हाला कुठल्याही आरोग्याच्या समस्या पासून कायमचे दूर ठेवू शकते. या एक कप ओट्स मध्ये सुमारे दहा ग्रॅम प्रथिने आणि भरपूर फायबर्स आढळून येतात.
आजच्या भागामध्ये आपण ओट्स या खाद्य धान्याबद्दल माहिती घेणार आहोत…
ओट्स म्हणजे काय:
ओट्स हे डाळ बनवू शकणारे पीक असून, ते मात्र poaceae या कुटुंबामधील आहे. मित्रांनो तुमच्या माहितीकरता सांगायचे तर poaceae कुळामधील सर्व पिके ही पिष्टमय धान्य प्रकारातील असतात, आणि त्यामध्ये कर्बोदकांचे प्रमाण सर्वाधिक असते. त्यामुळे स्पोर्ट्स मध्ये देखील कर्बोदकांचे प्रमाण मुबलक आढळून येते.
शास्त्रीय भाषेत ओट्स चे नाव Avena sativa असे असून, मुख्यत्वे ओट्स हे सकाळच्या नाष्ट्यामध्ये किंवा संध्याकाळच्या स्नॅक्स मध्ये खाल्ले जातात. याची स्कॉटलंड मधून व्यावसायिक स्तरावर लागवड सुरू करण्यात आली, मात्र आजकाल प्रत्येक देशामध्ये वापरले जात असल्यामुळे सर्वत्र याचे पीक घेतले जाते. मित्रांनो ओट्स खाल्ल्यामुळे असलेले आजार तर बरे होतातच, मात्र होऊ शकणारे आजार दूर राखण्यास देखील मदत होते.
ओट्स खरेदी करताना घ्यावयाची काळजी:
आजकाल आरोग्याविषयी जागरूक असणाऱ्या लोकांची संख्या वाढत चाललेली आहे. मात्र त्या तुलनेत ओट्सचे उत्पन्न म्हणावे असे नाही. त्यामुळे अनेक लोक ओट्स विकताना त्यामध्ये भेसळ करताना आढळून येतात. त्यामुळे आपण खरेदी करत असलेले ओट्स हे शुद्ध आहेत याची खात्री प्रत्येकाने केली पाहिजे.
अनेक लोक ओट्स मध्ये साखर, मीठ किंवा त्यासारखे दिसणारे इतर पदार्थ मिसळतात. त्यामुळे आपण खरेदी करताना नेहमी या गोष्टीची काळजी घेऊनच खरेदी केले पाहिजे.
ओट्स हे नेहमी थंड ठिकाणी आणि हवाबंद भांड्यामध्ये साठवण्यात यावेत. मात्र ज्या ठिकाणी अशा प्रकारे योग्य साठवणूक केलेली नसेल, तेथून ओट्स खरेदी करणे शक्यतो टाळावे.
आज-काल मॅगीप्रमाणे खाण्यास तयार असलेले ओट्स देखील बाजारात मिळतात. या ओट्स मध्ये भेसळ असण्याची शक्यता फारच कमी असते. त्यामुळे असे ओट्स घेणे फायदेशीर ठरते. तसेच, यामध्ये केवळ पाणी टाकून उकळवयाचे असल्यामुळे बनवण्यास देखील अत्यंत सोयीचे होऊन जाते.
ओट्स हे नेहमी थोड्या थोड्या प्रमाणात पाहिजे तेवढेच खरेदी करायला हवे. कारण ओट्स मध्ये असणाऱ्या फॅट च्या प्रमाणामुळे ओट्स लवकर खराब व्हायला सुरुवात होते.
ओट्स आणि आरोग्यदायी फायदे:
ओट्स हे आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर आहेत, हे आपण पहिले. मात्र ते कशा प्रमाणे आपल्याला उपयुक्त ठरते ते आपण बघूया…
ओट्स मध्ये अनेक प्रकारची खनिजे असतात, ज्यामध्ये झिंक, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, तसेच जीवनसत्त्व बी आणि इ इत्यादी घटक मोठ्या प्रमाणावर असतात. यामुळेच गर्भवती महिला, लहान बालके, आणि आजारी माणसे यांच्यासाठी ओट्स हे चौरस आहाराची भूमिका बजावतात. तसेच अनेक आजारांमध्ये लढण्याची शक्ती देखील प्रदान करतात.
कर्करोग हे आजकालच्या आयुष्यात अतिशय काळजीचे कारण बनलेले आहे. कर्करोग झाल्यावर आजारापेक्षा माणूस विचारानेच जास्त खचतो. मात्र रोजच्या आहारात ओट्सचा समावेश करणे, तुम्हाला कर्करोगापासून दूर ठेवू शकते. तसेच यामध्ये असलेले विविध फायटोकेमिकल्स कर्करोगाशी लढण्यास मदत देखील करतात. सोबतीने हेच फायटोकेमिकल्स स्त्रियांमधील इस्ट्रोजन पातळी नियंत्रण करण्यास देखील मदत करतात.
मधुमेही रुग्णांना जास्त गोड पदार्थ खायला मनाई असल्यामुळे त्या ऐवजी ओट्स चा शिरा करून देणे देखील फायदेशीर ठरते, कारण ओट्समध्ये रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्याचे गुणधर्म सापडलेले आहेत. ओट्स मध्ये कमीत कमी ग्लायसेमिक इंडेक्स असल्यामुळे रक्तातील साखर अर्थात ग्लुकोजची पातळी ते वाढू देत नाहीत. परिणामी मधुमेह रुग्णांसाठी पोटभर आहार घेण्यासाठी ओट्स अतिशय उपयुक्त ठरतात.
आज काल उच्च रक्तदाब हा अतिशय चिंतेचा विषय ठरत चालला आहे. अगदी लहान वयातील शाळकरी मुलांना, आणि कॉलेजवयीन मुलांना देखील उच्च रक्तदाबाचा सामना करावा लागतोय. मात्र नेहमी ओट्सचे सेवन करणे रक्तदाबाची औषधे बंद करण्याइतपत फायद्याचे ठरू शकतात.
काम करायचे म्हटले की तसे पोटभर जेवण असणे देखील गरजेचे ठरते. मात्र आजकालच्या धावपळीच्या युगात सकाळी जेवणे प्रत्येकाला शक्य होईलच असे नाही. आणि दुपारी देखील कामाच्या धावपळीत जेवणाच्या वेळेमध्ये बदल होतात. अशावेळी झटपट तयार होणारा आणि खाण्यासही कमी वेळ लागणारा ओट्स हा पदार्थ देवदूत म्हणूनच समोर येतो.
ओट्स मध्ये असणारे फायबर्स हळूहळू पचतात आणि शरीराला दीर्घकाळ ऊर्जा देत राहतात. त्यामुळे ज्या लोकांना कामामुळे सकाळी जेवण करणे शक्य होत नाही, किंवा दुपारच्या जेवणामध्ये सुद्धा अवमेळ होतो, त्यांच्यासाठी ओट्स चा आहार घेणे सुचविले जाते.
निष्कर्ष:
‘सर सलामत तो पगडी पचास’ हे वाक्य आपण नेहमी ऐकले असेल, म्हणजेच आपले आरोग्य अबाधित राहिले तर कुठलेही काम आपण अगदी सहजतेने करू शकतो. त्यामुळेच आपले आरोग्य जपणे हे सर्वात महत्त्वाचे ठरते. त्यासाठी योग्य आहार हा देखील खूप महत्त्वाचा असतो. योग्य आहाराने शरीराला हवे ते घटक मिळतात, आणि त्यामुळे जवळपास अर्ध्यापेक्षाही जास्त आजार नाहीसे होतात.
ओट्स हे सर्व गुणसंपन्न असे धान्य आहे. यामुळे शरीराला ऊर्जा देखील मिळते. शरीराला आवश्यक ते घटक देखील मिळतात. तसेच पोट देखील भरते. पचण्यास देखील हलके असते. आणि या सर्वांपेक्षा महत्त्वाचे म्हणजे हे ओट्स बनवायला देखील अतिशय सोपे आणि कमी वेळ खाऊ असतात.
त्यामुळे आजकाल ओट्स या धान्याला खूप मागणी वाढत चाललेली आहे. ओट्स हे दैनंदिन नाश्त्याचा एक अमुलाग्र भाग होत चाललेले असल्यामुळे, अगदी छोट्याशा दुकानात देखील आपल्याला हे सहजतेने उपलब्ध होतात.
FAQ
ओट्स या धान्याचा उगम कोणत्या देशामध्ये झाला?
ओट्स या धान्याचा उगम स्कॉटलंड या देशामध्ये झाला.
ओट्स हे कुठल्या प्रकारचे धान्य आहे?
ओट्स हे एक डाळवर्गीय प्रकारचे धान्य आहे, मात्र यामध्ये प्रथिने आणि कर्बोदकांचे प्रमाण अधिक आढळून येते.
कोणत्या आजारामध्ये ओट्स या धान्याचा सर्वाधिक फायदा होतो?
मधुमेह या आजारामध्ये ओट्स या धान्याचा सर्वाधिक फायदा होतो.
कर्करोगाच्या रुग्णांना ओट्स दिले जाऊ शकतात का?
नक्कीच, कर्करोगाच्या रुग्णांसाठी ओट्स नक्कीच लाभदायक ठरू शकतात.
पचनसंस्थेसाठी ओट्स चा फायदा होतो का?
ओट्स या धान्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स असल्यामुळे पचन संस्थेशी निगडित सर्व समस्यांसाठी ओट्स फायदेशीरच आहे.
आजच्या भागामध्ये आपण ओट्स या आरोग्यदायी खाद्य धान्य बद्दल माहिती घेतली. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट मध्ये अवश्य कळवा. तसेच इतरांना या माहितीबद्दल जागरूक करण्यासाठी त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्की शेअर करा.
धन्यवाद…