सरकारी योजना Channel Join Now

योगा व्यायामची संपूर्ण माहिती Yoga Exercise Information In Marathi

Yoga Exercise Information In Marathi मन, शरीर, आत्मा, आणि परिणामी विश्वाला जोडून ठेवणारे शास्त्र म्हणजे योग होय. या योगाला जवळपास ५००० वर्षांचा इतिहास लाभलेला आहे असे सांगितले जाते. प्राचीन भारतीय तत्त्वज्ञान हे मन व शरीराचा अभ्यास करण्यासाठीच ओळखले जाते.

Yoga Exercise Information In Marathi

योगा व्यायामची संपूर्ण माहिती Yoga Exercise Information In Marathi

योग हा शरीराच्या विविध प्रकारांमध्ये मुद्रा तयार करणे, श्वासोच्छ्वास नियंत्रित करणे, किंवा ध्यानधारणा करणे इत्यादींचा एक वेळ असून त्याद्वारे माणसाला एका शांततेची अनुभूती मिळते. असे असले तरी देखील योग हा एक शारीरिक व्यायाम प्रकार म्हणून अलीकडील काळामध्ये विकसित झालेला आहे.

ज्याद्वारे शरीरासह मनावर देखील नियंत्रण मिळवणे आणि एक चांगले आरोग्य संपादन करणे सहज शक्य होते. या युगाचा फायदा लक्षात घेऊन पाश्चात्य देशांमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर योग सराव केला जात आहे.

आजच्या भागामध्ये आपण योगाभ्यास या विषयावर थोडासा प्रकाश टाकणार आहोत, त्यामुळे तुम्ही या माहितीचा फायदा व्हावा म्हणून ही माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा…

नावयोग
प्रकारव्यायामप्रकार
उपयोगमनशांती आणि शारीरिक बळकटी
उद्देशमन व शरीरासह विश्व एकत्र आणणे

योग म्हणजे नेमके काय?

जगण्यासाठीचे उत्तम शास्त्र म्हणून या योगाला समजले जाते. म्हणून प्रत्येकाने दररोज न चुकता योगाभ्यास केला पाहिजे, ज्यामुळे आपल्या जीवनातील कुठलेही संकटे सहज दूर करण्याची शक्ती आपल्याकडे प्राप्त होईल.

योग हा एक संस्कृत शब्द असून तो युज या धातूपासून तयार झालेला आहे. ज्याचा अर्थ जोडणे किंवा एकत्रित येणे असा होतो. योगामुळे संपूर्ण जनमानसाला जोडण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्यामुळे त्याला योग असे नाव देण्यात आलेले आहे.

शारीरिक स्थितीमध्ये फायदेशीर ठरणारा हा योग आध्यात्मिक स्तरावर सुद्धा खूप मदतगार आहे. योगामुळे मानवाच्या मनातील सर्व नकारात्मक विचार दूर केले जातात, आणि एक नवचैतन्य संपूर्ण शरीरामध्ये संचारले जाते.

जीवनामधील ऐक्य साधने आणि प्रगतीच्या मार्गावर वाटचाल करणे यासाठी योगाभ्यास करणे खूप फायदेशीर आहे. त्यामुळे योगाला जीवनाचे अंतिम ध्येय म्हणून ओळखले जाते.

बरेच लोक योगाला केवळ एक शारीरिक व्यायाम प्रकार म्हणून ओळखतात, मात्र त्या बरोबरीनेच तो एक मनःशांतीचा उत्तम मार्ग देखील आहे. ज्यामुळे मानव अगदी आनंदित राहण्यास मदत होते.

दैनंदिन धावपळीमुळे आपले शरीर मानसिक व शारीरिक अशा दोन्ही स्तरावर खूप थकते, ज्यामध्ये मरगळ येते आणि माणसाला खूप निराश वाटते. मात्र योग केल्यामुळे लगेच फरक पडत नसला तरी देखील हळूहळू मानवाला प्रसन्न वाटायला लागते. आणि शारीरिक व्याधी देखील हळूहळू बऱ्या व्हायला लागतात.

त्यामुळे अनेक जण खूप कालावधीपासून सुद्धा योग करत आहेत, आणि अशा लोकांच्या तब्येतीवर कधीच विपरीत परिणाम झालेला दिसून येत नाही. ते अतिशय कमालीचे सुंदर आयुष्य जगतात, आणि त्यांच्या विचारांमध्ये देखील एक प्रकारची परिपक्वता दिसून येते.

योग करण्याचे आरोग्यदायी फायदे:

योग केल्यामुळे शरीरात अनेक फायदे होतात हे तर आपल्याला माहितीच आहे. मात्र ते कोणत्या प्रकारचे असतात ते आता आपण बघूया. योग हा श्वासावर नियंत्रण ठेवण्याचा प्रकार असल्यामुळे सर्वप्रथम दमा या आजारामध्ये योगासनांचा खूप मोठा फायदा होतो. त्याचबरोबर रक्तदाब, मधुमेह, संधिवात, पोटाचे आणि पचनाचे विकार इत्यादी गोष्टींवर योग करणे अतिशय फायदेशीर ठरते. आधुनिक उपचार पद्धतींमध्ये सुद्धा योग करण्याचा सल्ला डॉक्टर देत असतात.

सर्वात भीतीदायक आजार म्हणून ओळखला जाणारा आजार म्हणजे एच आय व्ही होय. यामध्ये रुग्णाची संपूर्ण रोगप्रतिकारक शक्ती हळूहळू नष्ट होत जाते. त्यामुळे कुठल्याही थोड्याशा आजाराने तो लगेच ग्रासला जातो. या सर्व गोष्टींमुळे त्याचे मानसिक स्तरावर देखील खच्चीकरण झालेले असते, आणि तो नेहमीच चिंताग्रस्त आढळून येतो.

योग केल्यामुळे रुग्णांचा तणाव कमी होण्यास मदत तर मिळतेच, शिवाय शारीरिक तंदुरुस्ती आणि रोगप्रतिकारक शक्तीमध्ये वृद्धी होण्यास सुद्धा मदत मिळते.

योग्य अभ्यास करण्याची काही साधारण नियम:

  • योग करण्यास सुरुवात करताना प्रथम योग करण्याचे योग्य पद्धती गुरूंच्या मदतीने शिकल्या पाहिजेत.
  • सूर्योदयाच्या वेळी अथवा सूर्यास्ताच्या वेळी योग करणे चांगले समजले जाते.
  • इतर व्यायाम प्रकारांपासून वेगळे म्हणजे अंघोळ केल्यानंतर योगासने करतात.
  • योगासने करण्याआधी किमान दोन तास काहीही न खाण्याचा सल्ला दिला जातो, ज्यामुळे पोटावर अतिरिक्त ताण पडत नाही.
  • योग करताना शरीर विविध प्रकारे वळविले जात असल्यामुळे सैल आणि सुती प्रकारातील कपडे घालण्याचा सल्ला दिला जातो.
  • योग करण्यापूर्वी कधीही वाईट विचार मनात आणू नयेत.
  • योग नेहमी प्रसन्न वातावरणात आणि शांत ठिकाणी करावा.
  • योगाभ्यासामध्ये चिकाटी असली पाहिजे, जेणेकरून कायम योग करणे शक्य होईल.
  • योग केल्यानंतर किमान अर्धा तास तरी काहीही खाऊ नये.
  • योगासनातील सर्व असणे संपल्यानंतर काही वेळासाठी प्राणायाम करणे गरजेचे असते.
  • तुम्हाला जर कुठला आजार किंवा आरोग्याच्या समस्या असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्याने योग करावा, आणि योग करताना काही समस्या किंवा वेदना जाणवल्यास योग करणे थांबून डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

निष्कर्ष:

आपल्याला हे लाख मोलाचे शरीर मिळालेले आहे, मात्र आजकालच्या धावपळीच्या युगामध्ये याच शरीराकडे लक्ष द्यायला कुणालाच वेळ नाही. याच शरीराच्या जीवावर मानव मोठमोठ्या प्रगती करीत आहे, किंवा अगणित पैसा मिळवत आहे. त्या शरीराकडेच लक्ष द्यायला वेळ नसेल तर मग मात्र कुठेतरी धोक्याची घंटा समजली पाहिजे. कारण आरोग्य असेल तर मानव कुठल्याही क्षेत्रामध्ये अजूनच प्रगती करू शकतो.

आजच्या धावपळीच्या आणि धकाधकीच्या वेळापत्रकातून वेळ काढून स्वतःच्या शरीरासाठी देणे थोडेसे दुरापास्त होत चालल्यामुळे, आजकाल योग प्रकार खूप प्रचलित झालेले आहेत. यामध्ये तुम्हाला अतिशय कमी कालावधीमध्ये आणि घरातून कुठेही बाहेर न जाता एक उत्तम शरीर कमविण्याची नामी संधी दडलेली आहे. त्यामुळे प्रत्येकाने व्यायाम तर करायलाच हवा मात्र या बरोबरीनेच योगाभ्यास करणे देखील गरजेचे ठरते. आजच्या भागामध्ये या योगा बद्दलची माहिती आपण बघितलेली आहे.

FAQ

योग म्हणजे नक्की काय?

शरीराच्या विविध मुद्रा करणे, व याअंतर्गत शरीराची चपळता आणि लवचिकता वाढण्याबरोबरच मनाला एक शांती देखील मिळण्याचे साधन म्हणजे योग होय.

योगासन करण्यासाठी किती वेळ लागतो?

योगासन करणारा व्यक्ती नवीन आहे की कसलेला यावर योगासनाचा कालावधी ठरत असतो. मात्र सुरुवात करणारी लोक कमीत कमी अर्धा तास तरी योग करतात, आणि ज्यांच्याकडे वेळ आहे आणि या योग्य प्रकारांमध्ये अगदी कसलेली आहेत अशी लोक तब्बल दोन तास सुद्धा योगा करत असतात.

योग करण्यामुळे खरोखरच शरीरासाठी फायदा होतो का?

योग केल्यामुळे शरीराच्या विविध क्रियांवर नियंत्रण मिळविले जाते, त्यामुळे मानवाच्या हृदय व रक्तवाहिन्यांचे आरोग्य चांगलेच सुधारते. तसेच शरीर देखील बळकट होण्यास मदत मिळते, त्यामुळे योगासनांचा फायदा हा नक्कीच होत असतो.

योग हा शब्द कसा तयार झाला असावा?

मित्रांनो, योग हा एक संस्कृत शब्द असून युज या मूळ धातूपासून तो तयार झालेला आहे. ज्याचा मराठी मध्ये अर्थ सामील होणे किंवा जोडणे किंवा एकत्र येणे असा होतो.

योग करण्यासाठी सर्वात उत्तम वेळ कोणती समजली जाते?

योग करण्यासाठी सूर्योदय व सूर्यास्ताची वेळ उत्तम समजली जाते.

आजच्या भागामध्ये आपण योग म्हणजे काय, आणि योगा करण्याचे फायदे आणि विविध प्रकार बघितलेले आहेत. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट मध्ये तर कळवा, शिवाय काही सूचना असतील तर ते देखील कमेंट मध्ये अवश्य लिहा. आणि इतर मित्र-मैत्रिणींना देखील आरोग्य सुधारण्यासाठी मदत मिळावी म्हणून ही माहिती शेअर करा.

धन्यवाद…

माझे नाव सृष्टी आहे आणि मी या ब्लॉग ची संस्थापक आहे. मला माहिती लिहायला खूप आवडतात, म्हणून मी या माझ्या ब्लॉग वर मराठी मध्ये माहिती लिहित असते.

Leave a Comment