सरकारी योजना Channel Join Now

पाण्याची संपूर्ण माहिती Water Information In Marathi

Water Information In Marathi ‘जल है तो कल है’, ‘पाणी आडवा पाणी जिरवा’, ‘पाण्याची बचत करा’ यांसारख्या घोषणा अथवा वाक्य आपण कायम ऐकतो ते पाण्याचे महत्व समजल्यामुळेच. मित्रांनो, आपल शरीर सुमारे ७० टक्के पाण्यानेच बनलेले असते. पाणी हे बहुगुणी पदार्थ म्हणून ओळखले जाते. जे अगदी इंधनाचे देखील कार्य करू शकते. त्यामुळे पाण्याला नेहमी जीवन म्हणून ओळखले जाते.

Water Information In Marathi

पाण्याची संपूर्ण माहिती Water Information In Marathi

आजच्या भागामध्ये आपण पाण्याबद्दल माहिती घेणार आहोत…

नावपाणी
रासायनिक रचनाH2O
मूळ घटकहायड्रोजन आणि ऑक्सिजन
इतर घटकखनिज द्रव्ये, क्षार, उपयुक्त जिवाणू, जीवनसत्वे
स्थितीसामान्य तापमानाला द्रवरूप
गोठण बिंदू०°से
उकळण बिंदू१००°से
स्थायु स्थितीबर्फ
वायू स्थिती पाण्याची वाफ

पाण्याची रचना:

अगदी लहानपणापासून पाणी हे आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनलेले आहे. शालेय जीवनामध्ये आपण पाण्याबद्दल शिक्षण देखील घेतलेले आहे. त्यानुसार पाणी हे हायड्रोजनचे दोन अणू आणि ऑक्सिजनचे एक अणू मिळून बनलेले असते.

ज्याला रासायनिक सूत्र मध्ये H2O म्हणून देखील ओळखले जाते. पाणी हे सर्वसाधारण तापमानाला द्रव स्वरूपात असते, मात्र त्याच्या उत्कलन बिंदू आणि गोठणबिंदू यांच्यामध्ये जास्त अंतर नसल्यामुळे आपण रोजच्या जीवनामध्ये या तीनही अवस्था बघू शकतो.

पृथ्वीचा जवळपास ७० टक्के भाग पाण्याने व्यापला असला, तरी देखील या ७० टक्के पैकी ९७ टक्के पाणी खारे आहे, म्हणजे पिण्यायोग्य नाही. जे महासागर आणि समुद्र यांच्या स्वरूपात आहे. उर्वरित तीन टक्के पाणी गोड असले तरी देखील ते शुद्ध किंवा पिण्यायोग्य आहेच असे नाही. त्यामुळे उपलब्ध पाण्यापैकी किती पाणी आपण पिऊ शकतो याचा तुम्ही अंदाज लावू शकता.

पाणी हा हायड्रोजन व ऑक्सिजन यांपासून बनलेला एक रासायनिक पदार्थ असून, त्याला कुठलाही चव, गंध, किंवा रंग नाही, त्यामुळे ज्या पदार्थांमध्ये मिसळला जातो त्या पदार्थांची चव, गंध किंवा रंग त्याला प्राप्त होत असतो. पाणी १०० डिग्री सेल्सियस तापमानाला उकळते, आणि पाण्याची वाफ होते. तर ० डिग्री सेल्सिअस ला पाण्याचा बर्फ होतो, आणि पाणी गोठले असे म्हटले जाते.

पाण्याला युनिव्हर्सल सोलव्हंट म्हणजेच वैश्विक द्रावक म्हणून ओळखले जाते. कारण पृथ्वीवरील बहुतांश बरेचसे पदार्थ पाण्यामध्ये सहज विरघळले जातात. जे पदार्थ पाण्यामध्ये विरघळू शकतात, त्यांना हायड्रोफिलिक म्हणून ओळखले जाते. असे असले तरी देखील काही पदार्थ पाण्यामध्ये विरघळत नाहीत. जसे की चरबी, तूप, तेल इत्यादी.

मानवाच्या आयुष्यामधील पाण्याचे महत्व:

पाणी हे मानवाच्या आयुष्यामध्ये इतके महत्त्वाचे आहे, की अगदी काही तास विनापाण्याचा माणूस राहू शकत नाही. मानवाबरोबरच पृथ्वीवरील सर्वच सजीवांना जगण्याकरिता पाणी हे आवश्यक असतेच, मग ते लहानसा कीटक असो की महाकाय हत्ती असो, बांधावर उगवणारे छोटेसे गवत असो की वडपिंपळासारखे महाकाय वृक्ष असो. प्रत्येक जण पाण्याशिवाय जगूच शकत नाही.

सकाळी उठल्यावर ब्रश करण्यापासून रात्री झोपताना चेहरा धुण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी मानवाला पाणी हवे असते. पाण्याचे काही महत्त्वाचे वापर बघायचे झाल्यास त्यामध्ये स्वयंपाक, पाणी पिणे, आंघोळ करणे, कपडे धुणे, वस्तू धुणे, घर साफसफाई इत्यादींचा समावेश होतो.

मानवी शरीराला पिण्यापासून पाणी मिळत असले, तरी देखील जेवणातून आणि फळांमधून देखील पाणी मिळत असते. त्यामुळे फळे खाण्याचा देखील सल्ला दिला जातो. महासागरांच्या कडेला राहणारे लोक पाण्याचा वापर करून मासेमारी करतात, ज्यामुळे त्यांना आर्थिक फायदा देखील होतो. त्यामुळे पाणी हे मानवाला प्रत्येकच पायरीवर फायदेशीर ठरत असते.

जीवन म्हणून पाण्याचे महत्व:

जगण्यासाठी पाणी आवश्यक असते, म्हणून पाण्याला जीवन म्हटले जाते. पाणी हा सर्व सजीव सृष्टीचा अस्तित्वाचा मूळ गाभा आहे  एक वेळ मनुष्य अन्नाशिवाय आठ दिवस राहू शकेल, मात्र पाणी न पिता राहणे कठीण आहे. आपले शरीर ७०% पाण्याने बनले आहे, हे आपण बघितले. जर आपल्याला पाणीच मिळाले नाही तर उर्वरित ३० टक्के घटकांवर माणूस जिवंत राहणे शक्यच नाही.

पाण्याचे महत्व सर्वांना माहीत असले तरी देखील माणूस स्वतःच्या फायद्या करता प्रत्येक ठिकाणी प्रदूषण करण्याची सवय सोडत नाही. यामध्ये जलप्रदूषणाचा देखील समावेश होतो. मानव स्वतःला स्वच्छ करण्यासाठी अथवा त्याची जनावरे, वस्तू धुण्यासाठी नदीतील सर्व पाण्याचा प्रवाहाला खराब करत असतो.

तसेच धुणे धुतल्यामुळे देखील पाणी दूषित होते, जे पिण्यास चांगले नसते. काही ठिकाणी तर घरातील सांडपाणी आणि कारखान्यातील प्रदूषित पाणी सरळ नदीमध्ये सोडले जाते, यापेक्षा वाईट ते काय आहे.

आधीच पृथ्वीवर गोडे पाण्याचे प्रमाण तीन टक्के आहे, त्यातही काही पाणी दूषित तर काही जमिनीखाली आहे. त्यामुळे अगदी थोडेसेच पाणी मानवाला पिण्यायोग्य आहे. त्यातही तुम्ही दूषित केले तर एक वेळ अशी येईल की मानवाला पिण्यासाठी पाणी उरणार नाही, आणि संपूर्ण सजीव सृष्टीचा नाश झाल्याशिवाय राहणार नाही.

पृथ्वीवरील पाणी नष्ट झाले तर आपण कल्पनाही करू शकणार नाही इतक्या मोठ्या प्रमाणावर निसर्गाचे हानी होईल. संपूर्ण वृक्षसंपत्ती नाश पावेल, सजीवांना पिण्यासाठी पाणी नसल्यामुळे त्यांचा देखील नाश होईल, जलचर प्राण्यांना घर नसल्यामुळे ते देखील घरहीन होतील आणि अगदी थोड्याशा कालावधीतच संपूर्ण पृथ्वी अगदी भकास होऊन जाईल. त्यामुळे प्रत्येकाने पाण्याचा जपून आणि चांगला वापर करणे अभिप्रेत आहे.

निष्कर्ष:

पाणी हे जीवन आहे हे आपल्याला माहितीच आहे. मात्र असे असले तरी देखील ज्या क्षेत्रामध्ये जास्त पाणी आढळते तिथे लोक इतरांचा विचार न करता पाण्याचा फार मोठ्या प्रमाणावर वापर करतात. मात्र त्याच वेळी किती तरी ठिकाणी लोकांना काही मैल चालत जाऊन पिण्यासाठी पाणी आणावे लागते. राजस्थान सारख्या ठिकाणी तर वन वन भटकावे लागते. त्यामुळे पाणी वाचविणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.

सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत मानवाला प्रत्येक कार्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. निसर्गातील बऱ्याचशा गोष्टी अधिक प्रमाणावर पाण्यानेच बनलेल्या आहेत. त्यामुळे पाणी नष्ट झाल्यास क्षणाचाही विलंब न होता संपूर्ण सजीव जीवन बरखास्त होईल. त्यामुळे आज आपण पाण्याचे महत्त्व ओळखून योग्य रीतीने पाण्याचा वापर केला पाहिजे, आणि पुढील पिढीसाठी पाणी जपून वापरले पाहिजे.

FAQ

पाण्याचा रसायनिक फॉर्मुला किंवा सूत्र काय आहे?

पाण्याचा रासायनिक फॉर्मुला अर्थात सूत्र H2O असे आहे.

पाण्याला अजून कोणत्या नावाने ओळखले जाते?

पाण्याला जल, निर, अंबु, जीवन, तोय इत्यादी नावांनी देखील ओळखले जाते.

पाण्याला रंग असतो का?, असेल तर कोणता?

पाण्याला कुठलाही रंग नसतो, मात्र पाणी ज्या पदार्थांमध्ये मिसळले जाते त्या पदार्थांचा रंग पाणी स्वतःला धारण करत असते.

पहिले कृत्रिम पाणी बनविण्याचा शोध कोणी लावला?

हेनरी स्कॅव्हेंडीस या रसायनशास्त्रज्ञाने हायड्रोजन व ऑक्सिजन ला एकत्र करून कृत्रिम पाण्याचा शोध लावला होता.

पिण्यायोग्य पाण्याचे विविध स्त्रोत कोणकोणते आहेत?

पिण्यायोग्य पाण्याच्या स्त्रोतांमध्ये धरण, विहीर, नदी, तलाव, हिमनदी, आणि खडकातील झरे इत्यादींचा समावेश होतो.

आजच्या भागामध्ये आपण पाणी या आपल्या रोजच्या वापरातील घटक पदार्थाबद्दल माहिती पाहिली. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला तुम्ही कळवालच, मात्र पाण्याची उधळपट्टी करणाऱ्या आपल्या मित्र-मैत्रिणींना ही माहिती जरूर वाचण्यासाठी पाठवा. जेणेकरून त्यांनी पाणी वाचविले तर त्याचे श्रेय तुम्हालाच मिळेल.

धन्यवाद…

माझे नाव सृष्टी आहे आणि मी या ब्लॉग ची संस्थापक आहे. मला माहिती लिहायला खूप आवडतात, म्हणून मी या माझ्या ब्लॉग वर मराठी मध्ये माहिती लिहित असते.

Leave a Comment