Vasant Rutu Information In Marathi वसंत ऋतू हा असा ऋतू आहे ज्याची चराचरातील सर्वच सजीव मग तो माणूस असो, वनस्पती असो, किंवा प्राणी असो, प्रत्येक जण अतिशय आतुरतेने वाट पाहत असतो. साधारणपणे उपऋतूंपैकी एक असणारा हा ऋतू फेब्रुवारी मार्च आणि एप्रिल या महिन्यांमध्ये येतो. आणि सर्वत्र चैतन्यमय वातावरणाची उधळण करत असतो.
वसंत ऋतूची संपूर्ण माहिती Vasant Rutu Information In Marathi
वसंत ऋतु हा मराठी दिनदर्शिका नुसार माघ या महिन्यातील शुक्लपंचमी या दिवसापासून सुरू होतो. मुख्यत्वे फाल्गुन व चैत्र हे महिने वसंत ऋतूचे महिने म्हणून ओळखले जातात. अर्थात हिंदू नववर्ष हे वसंत ऋतूमध्ये सुरू होत असते. हा ऋतू म्हणजे हिवाळा व उन्हाळा यांच्या काठावरील ऋतू आहे.
या ऋतूमध्ये सर्वांच्या आवडीचा आंबा मोहराला येतो. झाडाला नवनवी पालवी फुटते, तापमानामध्ये थोडीशी वाढ जाणवायला लागते. उत्तर भारतामध्ये तर मोहरीच्या फुलांनी सर्व रान अगदी पिवळे धमक दिसते. या ऋतूला सर्व ऋतूंचा राजा किंवा ऋतुराज म्हणून ओळखले जाते.
नाव | वसंत ऋतू |
उपाधी | ऋतुराज |
मराठी महिण्यानुसार कालावधी | फाल्गुन व चैत्र |
इंग्रजी महिण्यानुसार कालावधी | मार्च व एप्रिल |
सुरू होण्याच्या दिवस | माघ शुक्ल पंचमी पासून |
प्रत्येक देशानुसार तापमान बदलाचा दिवस हा वेगवेगळा असतो. त्यामुळे वसंत ऋतूचे आगमन वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या दिवशी असते. मात्र साधारणपणे कोकिळा पक्षाने गायला सुरुवात केली, आणि आंब्याचा सिझन चालू झाला की वसंत ऋतू आला असे म्हटले जाते.
असे म्हटले जाते की मराठी नववर्ष संपून नवीन वर्ष चालू झाले की वसंत ऋतुचे आगमन होते. या काळात झाडांना नवीन पालवी फुटते, आंब्याच्या झाडाला मोहर येतो, शेतामध्ये सगळीकडे प्रसन्नतेचे वातावरण पसरते.
वसंत ऋतु नुसार हवामानामध्ये बदल:
वसंत ऋतु पूर्वी येणारा ऋतू म्हणजे शिशिर ऋतू होय. मात्र जसजसे वातावरणातील तापमान वाढायला लागते, तसतसे वसंत ऋतुचे आगमन झाले असे म्हटले जाते. आणि हा थंडीतून उष्णतेत परिवर्तित होण्याचा कालावधी म्हणजे अतिशय अल्हाददायक आणि प्रसन्न वातावरण करणारे असते.
खास करून संध्याकाळच्या वेळी तर अतिशय आरामदायी आणि प्रसन्न वाटते. वसंत ऋतु ज्यावेळी येतो त्यावेळी निसर्गाला खऱ्या अर्थाने आनंद होत असतो. झाडे, गवते, विविध पिके, इत्यादींची थंडीच्या काळात खुंटलेली वाढ वसंत ऋतूमध्ये भरभर व्हायला लागते.
तसेच मानवांना देखील वसंत ऋतूमध्ये चांगली भूक लागते, आणि आरोग्य देखील सुदृढ झालेले असते. थंडीच्या काळात केलेल्या व्यायामामुळे शरीराला बळकटी आलेली असते, त्यामुळे सर्वजण अतिशय आनंदी होतात. संपूर्ण निसर्ग हिरवाईने नटतो, आणि अगदी टवटवीत दिसायला लागतो.
वसंत ऋतुच्या आगमनाचे फायदे:
वसंत ऋतुच्या आगमनाने सर्व चराचरातील प्राणीमात्रांना एक विलक्षण आनंद होत असतो. या ऋतूमध्ये सर्व सजीवांचे आरोग्य हे ताजेतवाने होते. वनस्पती देखील चांगल्या वाढीला लागतात. वातावरण अतिशय सुंदर व मनमोहक होते. अनेक प्रजातीची फुले या हंगामामध्ये फुलतात, ज्यामुळे निसर्गाचा देखावा अतिशय विलक्षण दिसतो.
या काळामध्ये मधमाशा आणि फुलपाखरे फुलातील रस शोषून त्यापासून मध तयार करण्याचे कार्य करतात, त्यामुळे सर्वत्र या फुलपाखरांचा थवा दिसतो. यांनी निसर्गाच्या सौंदर्यात अजूनच भर पडते. तसेच सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ऋतूमध्ये सर्वांचा आवडीचा असणारा आणि फळांचा राजा म्हणून ओळखले जाणारे फळ म्हणजे आंबा पिकतो.
लोकांना या आंब्याचा आस्वाद घ्यायला फार आवडते, त्यामुळे ते वसंत ऋतूची उत्कंठेने वाट बघत असतात. सोबतीने मंजुळ कोकिळेचे गाणे आपल्याला याच हंगामामध्ये किंवा ऋतूमध्ये ऐकायला मिळते.
वसंत ऋतु मध्ये दक्षिण दिशेकडून अतिशय शांत आणि मंद वारा वाहतो, जो काहीसा उबदार आणि अल्हाददायक असतो. त्यामुळे संध्याकाळच्या वेळी अतिशय प्रसन्न वाटते. सोबत हा वारा नुकत्याच फुललेल्या फुलांचा छान सुगंध देखील घेऊन येत असतो. या हंगामाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या काळात अनेक सण उत्सव आणि ग्रामदेवतेच्या यात्रा आयोजित केल्या जातात, त्यामुळे लहान मुलांपासून मोठ्या व्यक्तीपर्यंत सर्वांना खूप आनंद होतो.
हा हंगाम शेतकऱ्यांसाठी देखील अतिशय चांगला समजला जातो, कारण रब्बीची पिके काढून पुढील खरीप हंगामा करिता शेतांची मशागत सुरू केलेली असते. त्यामुळे शेतकरी लोक देखील अतिशय उत्साहात काम करत असतात.
वसंत ऋतु आणि त्याचे काही तोटे:
प्रत्येक गोष्टीला जशा दोन बाजू असतात तसे या वसंत ऋतुची देखील काही तोटे आहेत. फार काही तोटे नसले तरी देखील हिवाळा व उन्हाळा या दोन भिन्न ऋतूंमध्ये बदल होताना हा ऋतू येत असल्यामुळे अति संवेदनशील लोकांना आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. जसे की सर्दी, खोकला, गोवर, कांजण्या, इत्यादी संसर्गजन्य रोग देखील होऊ शकतात. तसेच काही साथीचे रोग देखील येऊ शकतात. मात्र योग्य ती खबरदारी घेतल्यास ते इतकेही घातक नाहीत.
निष्कर्ष:
जुन्या काळी अनेक दिग्गज शास्त्रकार होऊन गेले. त्यांनी अनेक भारतीय संकल्पनांना समजून घेऊन त्याचे वर्गीकरण यशस्वीरित्या केले. दिवसाचा वेगवेगळ्या तासांमध्ये वर्गीकरण करणे, किंवा वर्षाचे देखील वर्गीकरण करणे असो यामध्ये भारताचे फार मोठे योगदान ठरलेले आहे. असाच वर्षाचा एक वर्गीकरणाचा पाया म्हणजे ऋतूनुसार वर्गीकरण होय.
सर्वसाधारणपणे हिवाळा, उन्हाळा, पावसाळा असे ऋतूंचे वर्गीकरण करण्यात येत असले तरी देखील उपऋतूप्रमाणे देखील भारतामध्ये वर्षाचे वर्गीकरण करण्यात आलेली आहे. यामधील वसंत ऋतू हा सर्वांच्या आवडीचा आणि सर्वात जास्त चर्चेत असणारा ऋतू आहे, कारण या ऋतूमध्ये मराठी नववर्षाची सुरुवात म्हणजेच चैत्र गुढीपाडवा येत असतो.
तसेच यावेळी थंडीने गार झालेल्या वातावरणात थोडीशी उब पसरायला लागते. तसेच झाडांना पालवी फुटायला लागते. सर्वत्र प्रसन्न वातावरण निर्माण होते. यावेळेस अनेक ठिकाणी ग्रामदेवतांच्या यात्रा उत्सव सुरू होतात. त्यावेळी सर्वत्र आनंदाचे वातावरण पसरलेले असते.
संध्याकाळच्या वेळी वाऱ्याची मंद अशी झुळूक देखील येत असते, त्यामुळे वसंत ऋतु सर्वांनाच आवडतो. आजच्या भागामध्ये आपण सर्वांना आवडणाऱ्या वसंत ऋतूची माहिती घेतलेली आहे. मित्रांनो, तुम्हाला देखील हा वसंत ऋतू नक्कीच आवडत असेल, अशी अपेक्षा आहे.
FAQ
संस्कृत भाषेमध्ये आयुर्वेद ग्रंथात वसंत ऋतुला कोणत्या नावाने ओळखले जाते?
संस्कृत भाषेमध्ये आयुर्वेद ग्रंथात वसंत ऋतूला ऋतुचार्य या नावाने ओळखले जाते.
वसंत ऋतु कोणत्या महिन्यांमध्ये येतो?
मराठी दिनदर्शिका नुसार बघितले तर वसंत ऋतू हा फाल्गुन व चैत्र महिन्यामध्ये, तर इंग्रजी दिनदर्शिका नुसार बघितल्यास मार्च एप्रिल महिन्यामध्ये वसंत ऋतू येत असतो.
वसंत ऋतुच्या आधी येणाऱ्या ऋतूला काय नाव आहे?
वसंत ऋतुच्या आधी येणाऱ्या ऋतूला शिशिर ऋतू असे नाव आहे.
वसंत ऋतु मध्ये सर्वात महत्त्वाचा कोणता हिंदू धर्मीय सण येतो?
वसंत ऋतू मध्ये सर्वात महत्त्वाचा हिंदूधर्मीय सण म्हणजे मराठी नववर्ष अर्थात चैत्र गुढीपाडवा येतो.
वसंत ऋतू मध्ये आपल्या सुमधुर आवाजामध्ये कोणता पक्षी गायन करत असतो?
वसंत ऋतु मध्ये आपल्या सुमधुर आवाजामध्ये कोकिळा हा पक्षी गायन करत असतो.
आजच्या भागामध्ये आपण वसंत ऋतू बद्दल इत्यंभूत माहिती पाहिली. तुमच्या प्रतिक्रियांसह वसंत ऋतूमधील तुमच्या आठवणी आणि गमतीजमती, तसेच शालेय वयात असताना शाळेला लागणारी सुट्टी आणि वसंत ऋतू मध्ये संध्याकाळी आपल्या सर्व भावंडांसोबत फिरण्याचा आणि गप्पा मारण्याचा तुमचा अनुभव आमच्या सोबत नक्की शेअर करा. तसेच ही माहिती तुमच्या वसंत ऋतूमध्ये गमतीजमती करण्यात सोबती असलेल्या मित्र-मैत्रिणींना आणि भावंडांना नक्की शेअर करा.
धन्यवाद…