संयुक्त अरब अमिराती देशाची संपूर्ण माहिती United Arab Emirates Information in Marathi

United Arab Emirates Information in Marathi संयुक्त अरब अमिराती हा मध्यपूर्वेतील एक देश असून संयुक्त अरब अमिराती सात अमिराती एकत्र येऊन तयार झाला आहे. या सात अमिराती  अबू धाबी, दुबई, शारजा, अजमान, उम अल-कुवैन, रस अल-खैमा व फुजैरा ह्या आहेत. या देशाची राजधानी हे अबू धाबी आहे. तसेच या देशाचे चलन सौदी रियाल हे आहे. या देशाचा जगात क्षेत्रफळाच्या दृष्टीने 13 वा क्रमांक लागतो. तर चला मग या देशाविषयी सविस्तर माहिती पाहूया.

United Arab Emirates Information in Marathi

संयुक्त अरब अमिराती देशाची संपूर्ण माहिती United Arab Emirates Information in Marathi

क्षेत्रफळ व विस्तार :

संयुक्त अरब अमिराती या देशाचे क्षेत्रफळ हे सात अमिरातील मिळून बनलेल्या आहे. या संघराज्यात नैऋत्य कडून ईशान्यकडे क्रमाने क्षेत्रफळाचा विचार केला असता, अबुधाबी याचे क्षेत्रफळ 67,340 चौरस किमी. तर शारजा 2,590 चौरस किमी. दुबई 3,885 चौरस किमी., अजमान 259 चौरस किमी., उम अल काईवाईन वाईन 7,77 चौरस किमी., रास अल्खाइमा 1,683 चौरस किमी.व अल् फुजाइरा 1,166 चौरस किमी. आहे.

या देशाच्या उत्तरेला इराणचे आखात तर पूर्व ईशान्य दिशेला ओमान हा देश आहे व ओमानचे आखात असून दक्षिण व पश्चिम दिशेला सौदी अरेबिया तर वायव्य दिशेला कॉटार हा देश आहे. इराण व ओमानच्या आखातांमुळे या अमिराती इराणपासून अलग झाला आहे. 1971 पूर्वी हा अमिराती म्हणजे ब्रिटिश सुरक्षित राज्य होती. तसेच त्यांची नावं ट्रूशल स्टेट्स, ट्रूशल ओमान, ट्रूशल कोस्ट ही होती.

हवामान :

या देशाच्या समुद्रकिनारी भागातील हवामान हे उष्ण व आद्र असून तेथे आद्रतेचे प्रमाण जास्त दिसून येते. तसेच दक्षिणेकडील वाळवंटी प्रदेशातील हवामान उष्ण व कोरडे आढळते. तसेच येथील उन्हाळे अत्यंत उष्ण असतात. या देशामध्ये मे पासून ऑक्टोबर महिन्यापर्यंत उन्हाळा तर नोव्हेंबर ते एप्रिल पर्यंत हिवाळा असतो.

येथील हिवाळे थंड व अल्हाददायक असतात तर येथील उन्हाळ्यातील सरासरी तापमान हे 32°c तर काही ठिकाणी 49°c पर्यंतही वाढते. त्यामानाने हिवाळ्यातील तापमान हे 10 °c पेक्षा खाली जाते. या देशात पावसाचे प्रमाण फार कमी व अनियमितता दिसून येते. नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थोडाफार पूर्वेकडील डोंगराळ भागात पाऊस त्याचे प्रमाण दिसते. त्या व्यतिरिक्त इतर भागात खूपच कमी पाऊस पडतो.

इतिहास :

या देशाचा इतिहास हा प्राचीन इतिहास गणला जातो. येथे प्राचीन काळापासून मानवी वस्ती असाव्यात तसेच भटक्या अरब टोळ्यांनी येथे हळूहळू प्रदेशाचा ताबा मिळवला असावा. सातव्या शतकात येथील लोकांनी इस्लाम धर्म यांचा स्वीकार केला व आशिया व युरोप या दरम्यान प्राचीन काळातील व्यापारी मार्गावर हा प्रदेश असल्यामुळे युरोपियन लोकांनी या प्रदेशात व्यापारी स्थळ उभारली.

सोळाव्या शतकाच्या सुरुवातीला पोर्तुगीज लोकांनी इराणच्या आखातात प्रवेश केला ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी त्यानंतर 100 वर्षांनी येथे आली. 17 व्या शतकात या प्रदेशाच्या विकासास अरब राज्यांनी सुरुवात केली त्यापैकी रास अल् खाइमा व शारजा या राज्यांनी इतर आखाती राज्यांबरोबर अनेक लढाया केल्या. मात्र ते इतरांपेक्षा वरचट होते कारण त्यांना नाविक सामर्थ्य, मोती व अन्य व्यापारावरील वर्चस्व त्यांचेच होते. थोडा वेळ सतराव्या शतकात अनेक वेळा लढाया झाल्या.

19व्या शतकाच्या सुरुवातीला ब्रिटिशांची इराणच्या आखातात येणारी व्यापारी जहाजे यांच्याकडून लुटली जात होती. ही चाचीगिरी प्रामुख्याने खाईमा राज्याच्या खाडी प्रदेशातून तसेच लगतच्या इतर राज्याकडूनही केली जात होती. यामुळेच ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने कडक कारवाई करण्यात सुरुवात केली.

त्यानंतर 1809 मध्ये मुंबईहून खाईमाच्या विरोधात एक लष्करी तुकडी पाठवण्यात आली होती. 1819 मध्ये दुसऱ्या मोहिमेत खाईमा शहर नष्ट करून 1820 मध्ये ब्रिटिशांनी या प्रदेशावरील सर्व राजवटींवर तात्पुरता युद्धबंदीची सक्ती केली. व ब्रिटिश शासन तसेच अमिराती यांच्यात युद्धबंदीचा करार झाला या युद्धबंदीच्या करारात अंमलबजावणीची जबाबदारी ही ब्रिटिशांवर होती. अशाप्रकारे एकेकाळाचा हा चाचांचा किनारा ट्रूशल किनारा म्हणून ओळखला जाऊ लागला त्यानंतर येथे ट्रूशल राज्य बनले.

वनस्पती व प्राणी :

या देशांमध्ये लागवड केलेल्या वनस्पतींपैकी नैसर्गिक वनस्पतीचे प्रमाण खूपच कमी दिसून येते. या देशात बऱ्याच वनस्पती हा लहान झुळपांच्या स्वरूपात आढळतात पशुपालनासाठी ह्या उपयुक्त असून हिवाळी पावसानंतर या वाळवंटी प्रदेशात काही फुलझाडे आपल्याला दिसून येतात.

अबू धाबीच्या प्रदेशांमध्ये मात्र आता मोठ्या प्रमाणात कच्छ वनस्पतींची लागवड करण्यात आलेली आहे. त्या व्यतिरिक्त मरुदयानांच्या भागात खारीक, खजूर, अल्फा अल्फा व काही फळझाडे ही आपल्याला आढळून येतील.

येथील जंगले विरळ स्वरूपाचे असल्यामुळे जंगलामध्ये खूपच कमी प्राणी व पक्षी आढळून येतात त्या प्राणी पक्षांमध्ये खोकड, कोल्हा, बिडाल, रानमांजर, लांडगा अशा प्रकारचे 250 जातींचे इतर प्राणी आढळून येतात. तर पक्षांमध्ये गरुड ससाणा तिसा हे काही पक्षी आढळतात. तर समुद्रकिनारी भागात कुररी, कुरव, ट्यूना, गूपर, मॅकरेल व शार्क, व्हेल हे जलचर प्राणी आढळतात.

लोकसंख्या व भाषा :

संयुक्त अरब अमिराती या देशाची 2010 च्या जनगणनेनुसार लोकसंख्या ही 4,975,593 एवढी आहे. येथे प्राथमिक शिक्षण हे फ्री मध्ये दिले जाते परंतु शिक्षण घेणे सक्तीचे नाही. या देशाचे अधिकृत भाषा ही अरबी असून येथे त्या व्यतिरिक्त इंग्रजी हिंदी उर्दू आणि बंगाली भाषा देखील बोलल्या जातात.

लोक व समाजजीवन :

संयुक्त अरब अमिराती देशामध्ये पुरुषांपेक्षा स्त्रियांची संख्या खूपच कमी आहे. येथील पुरुषांची 49% संख्या असून त्यामध्ये दहा टक्के लोक भटक्या जमातीचे आहेत. या देशातील 85 टक्के लोक हे अबू धाबी व दुबई या सर्वात मोठ्या शहरात राहतात. अमिरातींमधील बहुतांश लोक हे मूळ रहिवाशी असून सुन्नी मुस्लिम व अरब आहेत.

काही कृष्णवर्णीय आफ्रिकन यांचे वंशज आहेत. तर बरेच अरब मध्यपूर्व देशातून येथे स्थलांतरण करून आलेले आहेत. 1960 च्या शतकापासून भारत इराण पाकिस्तान व शेजारील अरब राष्ट्रीय या देशातून हजारो लोक येथे आले आहे.

येथील लोकांचे राहणीमानामध्ये आधुनिक पद्धतीचे घरे किंवा सदीनिका आहेत, त्यामध्ये हे राहतात. लोकसंख्येच्या 90 टक्के लोक मोठे मोठे शहरात राहतात तर ग्रामीण भागातील लोक परंपरागत कुडाच्या झोपड्या बांधून राहतात.

त्यांच्या आहारामध्ये कडधान्य, भात, मासे व अन्य मासाहारांचे प्रमाण नियमित असते. येथे वाटाण्याची पदार्थ लोकप्रिय असून खारी खजूर तीळ मध साखर यांचाही उपयोग गोड पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. चहा व कॉफी ही त्यांची रोजची पेय आहेत.

खेळ :

या देशातील प्रिय खेळांमध्ये उंटाच्या व घोड्यांच्या शर्यती हे खेळ खूप लोकप्रिय आहेत. येथे या खेळांवर सट्टाबाजी लावण्यास बंदी आहे वाळूवरून स्कीईंग हा खेळ येथे महत्त्वपूर्ण आहे तसेच या खेळाव्यतिरिक्त येथे टेनिस हॉलीबॉल सोकर क्रिकेट रग्बी हे खेळही आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळ असून या देशात लोकप्रिय आहेत.

पर्यटन स्थळ :

या देशामध्ये पाहण्यासारखे बरेच ठिकाण आपल्याला दिसून येतील. कारण बऱ्याच ठिकाणी समुद्रकिनारा लाभलेला आहे. येथे वाळवंट प्रदेश देखील आहे. या देशात पर्यटनाचा व्यवसायाचा विकास करण्यात येत आहे. तसेच येथे संग्रहालय मरूदयाने, मत्स्यालय प्राणी संग्रहालय हे प्रमुख पर्यटकांची आकर्षण स्थळ आहेत.

या देशातील समृद्ध शहरांमध्ये अबू धाबी, दुबई, शारजा, रास अल खाईमा, हे आहेत.
हे शहर पाहण्यासारखे आहेत तसेच येथे संग्रहालय प्रसिद्ध असून पर्यटक दरवर्षी मोठ्या संख्येने भेट देत असतात. तुम्हालाही या देशांमध्ये पर्यटक म्हणून जायचे असेल तर तुम्ही जाऊ शकता परंतु त्यासाठी तुम्हाला तेथील सरकारची परमिशन घ्यावी लागेल.

ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.

हे निबंध सुद्धा अवश्य वाचा :-

माझे नाव सृष्टी आहे आणि मी या ब्लॉग ची संस्थापक आहे. मला माहिती लिहायला खूप आवडतात, म्हणून मी या माझ्या ब्लॉग वर मराठी मध्ये माहिती लिहित असते.

Leave a Comment