Umaji Naik Information In Marathi स्वातंत्र्य सैनिकांच्या प्रेरणादायी कथा वाचल्या की आपल्या प्रत्येकालाच अतिशय अभिमान वाटत असतो, व आपला उर भरून येत असतो. प्रत्येक स्वतंत्र सैनिकांनी काहीतरी प्रचंड मोठे कार्य केलेले असून, त्यांच्या या कार्यामुळे आजच्या पिढीतील तरुणांना प्रोत्साहन मिळण्यास देखील मदत मिळत असते.

उमाजी नाईक यांची संपूर्ण माहिती Umaji Naik Information In Marathi
महाराष्ट्र मधून देखील अनेक क्रांतिकारक होऊन गेले, ज्यांनी स्वातंत्र्यलढ्यासाठी आपल्या प्राणाचा देखील विचार न करता स्वातंत्र्य कार्यामध्ये स्वतःला झोकून दिले आणि स्वातंत्र्य मिळवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. या कार्यामध्ये अनेक लोक शहीद झाले, तर काहींनी अखेरपर्यंत या इंग्रज राजवटीविरोधी लढा दिला. या सर्व स्वातंत्र्य सैनिकांमुळेच आज आपण स्वातंत्र्याचे जगणे जगत आहोत. त्यामुळे या सर्व स्वातंत्र्य सैनिकांबद्दल प्रत्येक भारतीयांना प्रचंड आदर आहे.
आजच्या भागामध्ये आपण अशाच एका नवतरुण स्वातंत्र्यसैनिकाविषयी अर्थात उमाजी नाईक यांच्या विषयी माहिती बघणार आहोत. १९ व्या शतकाच्या सुरुवातीला इंग्रजांना सळो की पळो करून सोडत १८५७ च्या उठावाच्या देखील आधी उठाव करणारे उमाजी नाईक इतिहासात रामोशी उठावासाठी प्रसिद्ध आहेत. आजच्या भागामध्ये आपण या आद्य क्रांतिकारक समजल्या जाणाऱ्या उमाजी नाईक यांच्या विषयी इत्यंभूत माहिती बघून त्यांच्या जीवनचरित्राविषयी माहिती घेणार आहोत.…
नाव | उमाजी नाईक |
जन्म दिनांक | ७ सप्टेंबर १७९१ |
जन्मस्थळ | भिवंडी, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे |
ओळख | रामोशी उठाव |
कौटुंबिक पार्श्वभूमी | छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुरंदर किल्ल्यावर वतनदारी |
वडील | दादाजी खोमणे |
मृत्यू दिनांक | ३ फेब्रुवारी १८३४ |
दिनांक ७ सप्टेंबर १७९१ या दिवशी पुण्याच्या भिवंडी या ठिकाणी उमाजी नाईक यांचा जन्म झाला होता. पुरंदर या किल्ल्याची वतनदारी त्यांच्या वडिलांकडे असल्यामुळे, त्यांचे वास्तव्य याच परिसरामध्ये होते. त्यांच्या वडिलांचे नाव दादाजी खोमणे असे होते. ते युद्ध कलेमध्ये अतिशय निपुण होते, त्यामुळे उमाचे नाईक यांनी देखील त्यांच्या वडिलांकडून युद्ध कलेचे शिक्षण घेतले.
ज्यामध्ये भालाफेक, गोफन चालविणे, बाण चालविणे, दांडपट्टा चालविणे किंवा कमठा मारणे यासह तलवारबाजीचे प्रशिक्षण देखील त्यांनी आपल्या वडिलांकडून प्राप्त करून घेतले होते. मात्र उमाजी नाईक यांच्या वयाच्या अवघ्या अकराव्या वर्षी त्यांच्या वडिलांचे निधन झाले. पुढे पुरंदर किल्ल्याची वजनदारी वंशपरंपरेने उमाजी नाईक यांच्या हाती आली.
पुढे या किल्ल्यावरून रामोशी समाज आणि दुसरा बाजीराव पेशवा यांच्यामध्ये युद्ध झाले, मात्र या युद्धामध्ये पेशव्यांना हा किल्ला जिंकून घेता याला नाही. मात्र यामुळे संतप्त झालेल्या पेशव्यांनी रामोशींच्या हातातून या किल्ल्यावरील सर्व हक्क काढून घेऊन या किल्ल्याची सर्व जबाबदारी आपल्या मर्जीतील लोकांकडे सोपविली.
त्यामुळे या रामोशी समाजाच्या हातामध्ये काहीही काम उरले नाही, आणि इथूनच संघर्षाला सुरुवात करत उमाजी नाईक यांनी सर्व रामोशी बांधवांना संघटित केले आणि इंग्रज अधिकाऱ्यांनी विरोधी कारवाई सुरू केली. या कार्यामध्ये त्यांचा भाऊ अमृता यांनी देखील फार मोलाची मदत केली, व १८२४ या वर्षी भांबुर्डेयाची इंग्रजी संपत्ती लुटून इंग्रजांविरुद्ध मोहिमा सुरू केल्या.
इंग्रज आणि उमाजी नाईक:
उमाजी नाईक यांनी एकदा कुठलेही काम हाती घेतले की ते संपूर्ण केल्याशिवाय ते मागे हटत नसत. इंग्रजांना देशातून घालवून लावण्याचे कार्य सुरू केल्यामुळे ते नेहमीच इंग्रजांच्या विरुद्ध विविध मोहिमा आखात असत. त्यामुळे इंग्रज फार कंटाळले होते. उमाजी नाईक यांच्या विरोधात असणाऱ्या विविध तक्रारी इंग्रजांकडे वाढत चालल्या होत्या. आणि या सर्व गोष्टींना कंटाळून शेवटी इंग्रज अधिकाऱ्याने २८ ऑक्टोबर १८२६ या दिवशी उमाजी नाईक यांच्या विरोधामध्ये एक जाहीरनामा प्रसिद्ध केला.
ज्यामध्ये असे नमूद केले होते की उमाजी नाईक व त्यांना मदत करणाऱ्या लोकांना पकडून दिले तर एक हजार रुपयांचे बक्षीस दिले जाईल. मात्र कोणी उमाजी नाईक यांना साथ दिली तर त्यांना मात्र ठार करण्यात येईल. या जाहीरनाम्याला न घाबरता उमाजी नाईक यांनी आपले स्वातंत्र्यसैनिकाचे कार्य सुरूच ठेवले होते.
मात्र कोणीही उमाजी नाईक यांना पकडून दिले नाही. आता मात्र इंग्रज फारच संतापले होते. त्यांनी ८ ऑगस्ट १८२७ या दिवशी पुन्हा एकदा जाहीरनामा काढला आणि त्यामध्ये उमाजी नाईक या एकट्याच व्यक्तीला पकडून दिले तरी देखील बाराशे रुपये बक्षीस देण्यात येईल असे सांगितले. मात्र उमाजी नाईक यांना पकडणे कोणालाही शक्य झाले नाही.
आता मात्र इंग्रजांनी उमाजी नाईक यांच्यावर असणारे बक्षीस वाढवून ते तब्बल पाच हजार रुपये इतके केले, मात्र तरी देखील उमाजी नाईक यांना पकडणे शक्य झाले नाही. त्यानंतर इंग्रजांच्या असे लक्षात आले की भारतीय नागरिकांपैकी कोणीही उमाजी नाईक यांना पकडून देणार नाही, त्यामुळे त्यांनी अलेक्झांडर मेकिंटॉस या इंग्रज अधिकाऱ्यांना नियुक्त केले. मात्र त्याला देखील उमाजी नाईक यांना पकडणे शक्य झाले नाही.
शेवटी ८ ऑगस्ट १८४१ या दिवशी इंग्रजांनी उमाजी नाईक यांच्यावरील बक्षीस वाढवून ते दहा हजार रुपये अधिक ४०० बीघा जमीन इतके केले. या प्रलोभनाला बळी पडत काळू व नाना या त्यांच्या सहकाऱ्यांनी उमाजी नाईक यांना इंग्रज अधिकाऱ्यांकडे पकडून दिले, व त्यानंतर त्यांना पुण्यामध्ये ३ फेब्रुवारी १८३४ या दिवशी फाशी देण्यात आले. असे हे धडाडीचे स्वातंत्र्यसैनिक प्रत्येकाच्या च मनावर राज्य करत आहेत.
निष्कर्ष:
आज आपल्याला काहीही बोलायचे असेल, कुठेही जायचे असेल किंवा कोणताही व्यवसाय करायचा असेल तर त्यासाठी स्वातंत्र्य मिळालेले आहे. मात्र १९४७ पूर्वी या गोष्टी फारच कठीण होत्या. अगदी कोणता व्यवसाय करायचा हे देखील इंग्रज ठरवत असत. याचे एक उत्तम उदाहरण म्हणून इंग्रजांनी शेतकऱ्यांवर निळ पिकवण्याची केलेली सक्ती सांगता येईल.
येथील जनतेला स्वतःचे असे काहीच अस्तित्व राहिले नव्हते, मात्र इंग्रज अधिकारी येथील जनतेची पिळवणूक करून येथील संपत्ती मोठ्या प्रमाणावर इंग्लंडमध्ये घेऊन चालले होते. या इंग्रजांना वेळीच थांबवले नाही, तर भारत लवकरच नामशेष होईल ही गोष्ट तत्कालीन लोकांनी हेरली होती.
आणि त्यामुळेच अनेक उठवांच्या माध्यमातून इंग्रजांना सळो की पळो करून सोडले होते. सगळ्यात प्रथम सशस्त्र उठाव करण्यासाठी उमाजी नाईक यांना ओळखले जाते, त्यामुळे त्यांना आद्य क्रांतिकारक असे देखील म्हटले जाते. सर्वात प्रथम रामोशी समाजाचा उठाव घडवून आणून इंग्रज अधिकाऱ्यांना अद्दल घडवणाऱ्या या उमाजी नाईक यांच्या विषयी आजच्या भागामध्ये आपण संपूर्ण माहिती बघितलेली आहे.
यामध्ये त्यांचे जीवन चरित्र, प्रारंभिक आयुष्य, व जन्म याच बरोबर त्यांच्या संपूर्ण आयुष्याबद्दल माहिती घेतलेली आहे, व त्यांनी केलेल्या विविध उठावांची देखील माहिती घेतलेली आहे.
FAQ
उमाजी नाईक यांना कोणत्या पदवीने ओळखले जाते?
उमाजी नाईक यांना नरवीर या पदवीने ओळखले जाते. त्याचप्रमाणे त्यांना आद्य क्रांतिकारक या नावाने देखील ओळखले जाते.
आद्य क्रांतिकारक नरवीर उमाजी नाईक यांचा जन्म कोणत्या दिवशी झाला होता?
आद्य क्रांतिकारक नरवीर उमाजी नाईक यांचा जन्म दिनांक ७ सप्टेंबर १७९१ या दिवशी झाला होता.
उमाजी नाईक यांचे जन्मस्थान कोणत्या ठिकाणाला समजले जाते?
उमाजी नाईक यांचे जन्मस्थान पुण्याच्या पुरंदर तालुक्यामध्ये असणाऱ्या भिवंडी या गावाला समजले जाते.
नरवीर उमाजी नाईक यांना कोणत्या कार्यासाठी सर्वात जास्त ओळखले जाते?
नरवीर उमाजी नाईक यांना त्यांनी केलेल्या रामोशी उठावाबद्दल सर्वात जास्त ओळखले जाते.
उमाजी नाईक यांच्या वडिलांबद्दल काय सांगता येईल?
छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारामध्ये नरवीर उमाजी नाईक यांचे वडील पुरंदर किल्ल्याच्या वतनदारीवर होते. मात्र त्यांच्या मृत्यू झाल्यानंतर वयाच्या अकराव्या वर्षी उमाजी नाईक यांच्याकडे पुरंदर किल्ल्याची वतनदारी आली होती.
धन्यवाद…!