थायलंड देशाची संपूर्ण माहिती Thailand Information In Marathi

Thailand Information In Marathi थायलंड हा देश दक्षिण पूर्व आशियातील एक स्वतंत्र देश आहे. या देशाची राजधानी बँकॉक आहे. थायलंड देशामध्ये अनेक भिन्न भौगोलिक प्रदेशांचा समावेश आहेत. या देशातून मेकांग नदी वाहते, थायलंड देशातील सर्वात मोठे शहर बँकॉक आहे. येथे मोठ्या प्रमाणात उद्योग व व्यापार केले जातात. या देशामध्ये न्याय व व्यवस्था करण्यासाठी राजेशाही व्यवस्था स्थापन करण्यात आली आहे. या देशाचे “फ्लेंग चात” हे राष्ट्रगीत आहे. सन 1932 मध्ये रक्तहीन क्रांतीनंतर ते एक घटनात्मक राजेशाही बनले, आणि या देशाचे अधिकृत नाव बदलून थायलंड ठेवण्यात आले. थायलंड देशाला ख्मेर साम्राज्यापासून 1238 मध्ये स्वतंत्र मिळाले आहे. तर चला मग पाहूया या देशाविषयी सविस्तर माहिती.

Thailand Information In Marathi

थायलंड देशाची संपूर्ण माहिती Thailand Information In Marathi

विस्तार व क्षेत्रफळ :

थायलंड देशाचे एकूण क्षेत्रफळ 5,13,000 किलोमीटर आहे. आणि क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनाने हा देश जगात 49 व्या क्रमांकावर येतो. तसेच या देशाच्या सीमेला लागून उत्तर दिशेला म्यानमार आणि लाओस बेट आहे. आणि पूर्व दिशेला लाओस आणि कंबोडिया बेटे आहेत. व दक्षिण दिशेला थायलंड आणि मलेशियाचे आखात आहे. आणि पश्चिम दिशेला अंदमान समुद्र आणि म्यानमारच्या टोक लाभलेले आहे. तसेच आग्नेयेला व्हिएतनाम व नैऋत्येस इंडोनेशिया  आणि भारतिय सागरी सीमा लाभलेल्या आहेत.

लोकसंख्या :

थायलंड देशाची लोकसंख्या 2010 च्या जनगणनेनुसार एकूण 6,59,98,436 ऐवढी आहे. तसेच खायला अँड हा देश लोकसंख्येच्या बाबतीत जगात 20 व्या क्रमांकावर येतो. त्याची राजधानी असलेले शहर बँक ऑफ हे सर्वात जास्त लोकसंख्येचे शहर आहे. येथे विविध जाती व धर्माचे लोक राहतात. येथे सर्वात जास्त बौद्ध धर्म समाज आहे त्यानंतर इस्लाम, हिंदू व काही प्रमाणात आदिवासी लोक आहेत.

भाषा :

थायलंड देशाची मुख्य भाषा थाई आहे, हे भाषा येथे जास्त प्रमाणत बोलली जाते. म्यानमार मधील शान आणि चीनच्या सीमेपर्यत हेनान आणि युनानच्या दक्षिणे कडील चाप मध्ये बोलल्या जाणार्‍या असंख्य लहान भाषा आहेत. थाई आणि इंग्रजी ह्या शिक्षण आणि सरकारची मुख्य भाषा आहे. ही भाषा देशाच्या व्यवहारात वापरली जाते, आणि देशभरात बोलली सुध्दा जाते.

मानक मध्य थाई लोकांच्या बोलीवर आधारित ही भाषा आहे, आणि ते थाई वर्णमालामध्ये लिहिलेले आहे. याचबरोबर या देशात आणखी मोन, ख्मेर, व्हिएत, म्लाब्री आणि ओरांग अस्ली यासारख्या अनेक ऑस्ट्रोएशियाटिक भाषेसह असंख्य आदिवासी भाषा देखील या देशात बोलल्या जातात.

चलन :

थायलंड देशाचे चलन थाई बात आहे. येथील स्थानिक लोक या चलनाचा वापर करतात आणि देशाचे आर्थिक व्यवहार या चलनावर चालतात. ये देशाचे चलन भारतीय चलनाच्या तुलनेत 1 थाई बात कॉइन म्हणजे 2.19 रुपये होतात. जे भारतीय चलनाच्या तुलनेत महाग आहे.

हवामान :

थायलंड देशाचे हवामान हे उष्कटिबंधीय व दमट आहे. येथील हवामान सतत बदलत राहते. थायलंडमध्ये तीन ऋतूंमध्ये विभाजन होते.   पहिला पाऊस किंवा नैऋत्य मोसमी हंगाम जो हिंद महासागरातून येणाऱ्या नैऋत्य वाऱ्यामुळे होत असतो, आणि आंतर उष्णकटिबंधीय अभिसरण क्षेत्र आणि उष्णकटिबंधीय चक्रीवादळांमुळे देखील पाऊस मोठ्या प्रमाणावर होतो.

ऑगस्ट आणि सप्टेंबर हा वर्षातील सर्वात आर्द्र कालावधी आहे. या देशात सरासरी वार्षिक पाऊस 1300 ते 1600 मि मी एवढा पडतो. तसेच हिवाळामध्ये अनेक भागात अती थंडी जाणवते. थायलंडमध्ये सौम्य तापमानासह कोरडे हवामान आहे. आणि उन्हाळा सरासरी तापमान 38॰ ते 42॰ पर्यत राहते. थायलंड हा जगातील 10 देशांपैकी एक आहे. ज्यांना हवामान बदलाचा सर्वाधिक फटका बसतो, येथील हवमान हे असुरक्षित हवामान आहे.

प्राणी व पक्षी :

थायलंड देशात 156 राष्ट्रीय उद्याने आहेत, व 58 वन्यजीव अभयारण्ये आणि 120 वन उद्यानांचा समावेश आहे. यामध्ये अनेक प्राणी व पक्षी पाहायला मिळतात.  आशियाई काळे अस्वल, मलायन सूर्य अस्वल, पांढरे हाताचे लार, पिलेटेड गिबन आणि बिंटुरॉन्ग तसेच हत्ती, वाघ, बिबट्या, रान मांजर, माकड, यासाखे अनेक प्रजाती येते आढळून येतात. याच बरोबर येथे वेगवेगळ्या प्रकचे पक्षी आढळून येतात. काही स्थानिक तर काही स्टलंतरित पक्षी आहेत.

इतिहास :

थायलंड देशात 13 व्या शतकाच्या सुरुवातीस ख्मेर साम्राज्य आणि पॅगनच्या साम्राज्याच्या ऱ्हासानंतर त्यांच्या जागी विविध राज्यांची भरभराट झाली.  यामध्ये ताई लोकांचे क्षेत्र सध्याच्या भारताच्या ईशान्य पासून ते सध्याच्या लाओसच्या उत्तरेपर्यत आणि मलय द्वीपकल्प पर्यत अस्तित्वात आले होते.

नंतर ताई लोक आधीच द्वारवती आणि लावो राज्याच्या मूळ भूमीत दक्षिणेकडील नाखोन सी थम्मरतपर्यत रहिवाशी झाले होते. यांच्यावर ख्मेर लोकांची हुकूमशाही होती. नंतर स्थानिक ताई शासक फो खुन बंग क्लांग हाओ यांनी ख्मेर विरुद्ध बंड करण्यासाठी लोकांना एकत्र केले. नंतर त्याने 1238 मध्ये सुखोथाई राज्याचा पहिला राजा म्हणून राज्याभिषेक केला. आणि कामाला सुरुवात केली.

नंतर 19 व्या शतकात 1932 मध्ये रक्तहीन क्रांती झाली. ज्यामध्ये प्रजाधिपोकला देशाची पहिली राज्यघटना देण्यास भाग पाडले गेले, आणि त्यात त्यांना यशही प्राप्त झाले. ज्यामुळे या देशातील शतकानुशतके सरंजामशाही आणि निरंकुश राजेशाही संपली होती. नंतर या देशात महामंदी आली.

यामुळे तांदुळाच्या किमतीत झपाट्याने घसरण चालू झाली, आणि सार्वजनिक खर्चात लक्षणीय घट यामुळे आलेल्या आर्थिक अडचणींचे एकत्रित परिणाम कुलीन लोकांमध्ये असंतोष निर्माण झाले.  नंतर 1933 मध्ये, एक प्रति क्रांतीवादी बंडखोरीला सुरूवात झाली. ज्याचे उद्दिष्ट निरंकुश राजेशाही पुनर्स्थापित करण्यासाठी होते.

ज्यामुळे देशातील परिस्थिती सुधारेल परंतु ही क्रांतीमध्ये ते अयशस्वी झाले. आशियातील पाश्चात्य साम्राज्यवादाच्या संपूर्ण कालखंडात सियाम हे परकीय शक्तींद्वारे वसाहतीकरण टाळण्यासाठी या प्रदेशातील एकमेव राष्ट्र राहिले, त्यामुळे अनेकदा असमान करारांमध्ये भूभाग व्यापार आणि कायदेशीर सवलती या दोन्ही गोष्टी सोडण्यास भाग पाडले गेले.

व्यवसाय व उद्योग :

थायलंड मध्ये जास्त प्रमाणत शेती व्यवसाय केला जातो. येथील लोक अनेक व्यवसाय करतात. पण शेती हा त्यांचा मुख्य व्यवसाय आहे. येथे प्रामुख्याने भात पीक घेतल्या जाते. त्यांनतर काही प्रमाणात भाजी पाले व्यवसाय केला जातो. याच बरोबर येतील लोक शेतीचे अवजार बनवणे, पिकाचे उत्पादन घेऊन त्याचे उद्योग करने, असे काम केले जातात. पशूपालन व्यवसाय व्यवसाय सुध्दा येथे केला जातो.

आज थायलंडमधील अनौपचारिक कामगार सामान्यतपणे तीन मुख्य गटांमध्ये विभागले गेले आहेत. उपकंत्राट, स्वयंरोजगार, गृह आधारित कामगार, सेवा कामगार हे आहेत. रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्यांसह, रस्त्यावर विक्रेते, मालिश करणारे, टॅक्सी चालक आणि घरगुती कामगार म्हणून, आणि कृषी कामगार, मनोरंजन, असे अनेक प्रकारचे उद्योग केले जातात.

खेळ :

थायलंड देशात फुटबॉल थाई समाजात सर्वाधिक लोकप्रिय खेळ मानला जातो. थायलंडच्या राष्ट्रीय फुटबॉल संघाने 6 वेळा एएफसी आशियाई चषक खेळला आहे. ज्यामध्ये ते कधीच जिंकले नाही. थाई बॉक्सिंग हा थायलंडचा एक लढाऊ खेळ आहे. जो विविध क्लिंचिंग तंत्रांसह स्टँड अप स्ट्रायकिंगचा वापर करतो.

हा या देशाचा राष्ट्रीय खेळ मानला जातो. सर्वात लोकप्रिय खेळांपैकी एक म्हणून व्हॉलीबॉल झपाट्याने वाढत आहे. याच बरोबर येथे अनेक खेळ खेळले जातात. फुटबॉल, हॉलीबॉल, रग्मी, बॉक्सिंग, रेसिंग, टेनिस, बास्केट बॉल, हे खेळ सुध्दा थायलंड मध्ये खेळेल जातात.

पर्यटक स्थळ :

थायलंडमधील बौद्ध मंदिर वत्स म्हणून ओळखली जातात. हे बौद्ध लोकांचे धार्मिक स्थळ आहे. हे पाहण्यासाठी व दर्शनासाठी लोक मोठ्या प्रमाणात जात असतात.

थायलंड देशात चियांग माई येथे लोई क्रार्थॉन्ग मोठा उत्सव होतो. यात खूप लोक सहभागी होता असतात. येथे लोक क्रॅथोंग तराफा तरंगवत असतात, हे एक लोकप्रिय स्थळ आहे.

येथे एक चर्च ख्रिचन समाजाचे धार्मिक स्थळ आहे. येथे लोक मोठ्या प्रमाणात प्रार्थना करण्यासाठी जात असतात.

ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांना शेअर करा.

हे निबंध सुद्धा अवश्य वाचा :-

माझे नाव सृष्टी आहे आणि मी या ब्लॉग ची संस्थापक आहे. मला माहिती लिहायला खूप आवडतात, म्हणून मी या माझ्या ब्लॉग वर मराठी मध्ये माहिती लिहित असते.

1 thought on “थायलंड देशाची संपूर्ण माहिती Thailand Information In Marathi”

Leave a Comment