Telecalling Information In Marathi आज आपण नोकरी शोधायला गेलो की बऱ्याचदा आपल्याला टेलीकॉलिंग स्वरूपाचे जॉब दिसून येतात. यावरून हे टेलीकॉलिंग म्हणजे काय हा प्रश्न तुम्हालाही पडत असेल. मित्रांनो अनेक लोकांनी मिळून एकत्रितरित्या मोठ्या प्रमाणावरील लोकांना व्यवसायाकरिता फोन करणे म्हणजे टेली कॉलिंग होय. आणि या प्रकारचे काम करणारा व्यक्ती म्हणजे टेलीकॉलर होय.
टेलिकॉलिंगची संपूर्ण माहिती Telecalling Information In Marathi
आज विविध व्यवसाय ऑनलाइन होत चालले असल्यामुळे, या टेलीकॉलरचे भविष्य देखील सुधारत चालले आहे. व्यवसाय मालक आपल्या व्यवसायाची जाहिरात करण्याकरिता अथवा अनेक लोकांपर्यंत पोहोचवण्याकरिता या टेलीकॉलिंगची सहाय्यता घेतात. ज्यामध्ये टेलीकॉलर विविध लोकांना फोन करून ही माहिती देत असतो.
आजच्या भागामध्ये आपण या टेली कॉलिंग विषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत…
नाव | टेलिकॉलिंग |
प्रकार | नोकरीचा प्रकार |
उपप्रकार | विपणन अथवा मार्केटिंग क्षेत्रातील नोकरी |
कार्य | संभाव्य ग्राहकांना फोन करणे |
प्रमाण | मोठ्या प्रमाणावर एकत्र काम |
स्वरूप | घरबसल्या वर्क फ्रॉम होम, किंवा कार्यालयामध्ये सुद्धा |
टेली कॉलिंग म्हणजे नेमके काय असते?:
ग्रुपमध्ये मिळून एका समान विषयावर ग्राहकांना फोन करणे, व त्या व्यवसायाशी ग्राहकांचे संबंध टिकून ठेवणे, त्याचबरोबरीने वर्तमान ग्राहकांच्या काही समस्या असतील तर त्या फोनवरूनच सोडवणे, याला टेली कॉलिंग असे म्हटले जाते.
विविध व्यवसाय, संस्था, सेवा पुरवठादार, उत्पादन कंपन्या यांच्याद्वारे या कामाकरिता लोकांची निवड केली जाते. ज्या वेगाने अर्थव्यवस्था मध्ये वाढ होत आहे, त्या पटीने विविध कंपन्यांच्या नफ्यामध्ये देखील वाढ होत आहे. आणि परिणामी अजून नफा कमविण्यासाठी विविध कंपन्या आणि व्यवसायाकडून टेली कॉलर या पदासाठी नवीन नियुक्ती करण्यात येत आहेत.
मात्र एक विशिष्ट उत्पादन क्षमता आणि विक्री क्षमता गाठली की कंपनी शक्यतो अशा कामगारांना काढून टाकण्याचे धोरण अवलंबते, त्यामुळे ज्या पटीने हा रोजगार वाढतो त्यापटीने तो नष्ट देखील होत आहे.
असे असले तरी देखील आजच्या काळामध्ये अनेक युवक युवती घरबसल्या या प्रकारचे काम करत आहेत, ज्यामधून ते चांगला पैसा देखील मिळवत आहेत. विशेष म्हणजे त्यांना हे काम करण्यासाठी ऑफिसला जावे लागेलच असे काही नसते. अगदी घरबसल्या देखील हा व्यवसाय केला जाऊ शकतो. आज अनेक बेरोजगार लोक हे टेलीकॉलिंग क्षेत्राकडे वळताना दिसत आहेत, जेणेकरून बेरोजगारीत लोकांना रोजगार मिळतो, आणि व्यवसायिक लोकांना त्यांचे इच्छित उत्पन्न प्राप्त होते.
खरे तर टेलीकॉलिंग हे एक लीड जनरेट करण्याचे माध्यम किंवा विक्रीसाठी संभाव्य बाजारपेठ तयार करण्याचे साधन आहे, मात्र आपल्या व्यवसायाला आणखी उत्तम बनवण्यासाठी कंपन्या ग्राहकांचे प्रश्न देखील या टेली कॉलिंग च्या माध्यमातून सोडवत असतात.
टेली कॉलर च्या नोकरीमध्ये काय काम करावे लागते:
टेली कॉलिंग म्हणजे काय हे तर तुम्हाला समजले, मग या प्रकारचे कॉलिंग करण्यासाठी सर्वप्रथम कंपनी आपल्या संभाव्य ग्राहकांची यादी मिळवते. जानुसार हे टेली कॉलर विविध ग्राहकांना कॉल करत असतात. कॉल केल्यानंतर ग्राहकाला कंपनीच्या सेवा किंवा वस्तूंबद्दल संपूर्ण माहिती दिली जाते. आणि ग्राहकांचे काही प्रश्न किंवा शंका असतील तर त्या देखील सोडवतात. त्यानंतर ग्राहक ही वस्तू घेण्याबाबत विचार करतात.
ज्या ग्राहकांनी वस्तू घेण्याचे सांगितले असेल, किंवा त्यांच्या अनुभवानुसार जे ग्राहक वस्तू घेऊ शकतील अशा लोकांची वेगळी यादी काढली जाते. आणि या लोकांना त्या वस्तू किंवा सेवा बद्दल पुन्हा पुन्हा माहिती पाठवली जाते. यासाठी एसएमएस, व्हाट्सअप संदेश किंवा पुन्हा कॉल या पद्धती अवलंबल्या जातात. जर टेली कॉलर कडून कंपनीसाठी चांगली विक्री मिळाली तर टेलीकॉलरला इन्सेंटिव्ह देखील दिला जातो.
टेलीकॉलर नोकरी बद्दल वर्णन:
आजच्या जागतिकीकरणाच्या स्पर्धेमध्ये प्रत्येकाला आपली कंपनी अथवा व्यवसाय पुढे घेऊन जायचं आहे. त्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करत आहे. मात्र बाजारामध्ये इतक्या प्रकारच्या कंपन्या वस्तूंचे उत्पादन करत आहेत, की कोणत्या वस्तू खरेदी करावे हे ग्राहकांना समजत नाही.
त्यासाठी आपल्या कंपनीचे उत्पादन कसे श्रेष्ठ आहे हे ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कंपन्या टेली कॉलिंग या प्रकाराचा अवलंब करतात. आणि त्यातून संभाव्य ग्राहकांना तयार करतात. व आपल्या विक्री मध्ये वाढ निर्माण करतात.
निष्कर्ष:
आजच्या भागामध्ये आपण टेली कॉलिंग या जॉब प्रकाराविषयी माहिती घेतली. ज्यामध्ये तुम्हाला टेली कॉलिंग म्हणजे काय हे समजले असेल. सोबतच टेलीकॉलर काय काम करतो, ती नोकरी कशा प्रकारची असते, नोकरी करण्याचे संभाव्य फायदे तोटे इत्यादी गोष्टींबद्दल देखील माहिती घेतली.
आजकाल अनेकांना जॉबची गरज असते, त्यामुळे विविध ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर जॉब शोधण्याचे कार्य सुरू केले जाते. यामध्ये अनेक वेळा आपल्याला टेलीकॉलर या प्रकारचा जॉब दिसून येतो, त्यामुळे प्रत्येकाला याबाबत कुतूहल निर्माण होते. ज्या लोकांना याबाबत माहिती आहे, त्यांना काही वाटत नसले तरी देखील नवीन लोक हे टेलीकॉलर काय आहे याचा विचार करत असतात.
आज आपण या टेलीकॉलर बद्दल माहिती घेतलेली आहे, मात्र टेली कॉलिंग या क्षेत्रामध्ये काही प्रमाणावर फसवणूक देखील होत असते, त्यामुळे अशा प्रकारचा जॉब मिळविताना सर्वप्रथम चौकशी करून मगच निर्णय घ्यावा. मात्र आजच्या जागतिकीकरणामध्ये हे टेलीकॉलरचे जॉब देखील चांगला पैसा मिळवून देऊ शकतात. मात्र योग्य त्या संस्थेमध्ये आपण नोकरी मिळवायला हवी.
FAQ
टेली कॉलर म्हणजे नेमके काय आहे?
टेली कॉलर ही एक प्रकारची नोकरी असून, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अनेक लोक ग्राहकांना फोन करून व्यवसायाची माहिती देणे किंवा ग्राहकांच्या समस्या सोडविण्याचे काम करत असतात.
टेली कॉलिंग मध्ये बोलताना काय खबरदारी घ्यायला हवी?
टेली कॉलिंग मध्ये बोलताना नेहमी समोरच्या ग्राहकाशी मैत्रीपूर्ण संवाद साधावा. तसेच तुमचे बोलणे प्रसन्न असले पाहिजे, कधीही चिंताग्रस्त होऊन बोलू नये. बोलताना तुमचा उच्चार देखील स्पष्ट असायला हवा, आणि फोन उचलल्यानंतर शिष्टाचाराने बोलावे. तसेच ग्राहकांशी कुठल्याही बाबीवर वाद घालू नये.
टेली कॉलरचा जॉब मिळवण्यासाठी कोणकोणती कौशल्य असणे गरजेचे असते?
टेली कॉलिंग नोकरीचे स्वरूप बघता यामध्ये चिकाटी असणे फार गरजेचे असते. तसेच बोलताना संयम असावा. संवाद साधण्याचे कौशल्य आणि आवाजामध्ये माधुरी असावी, तसेच समोरच्याला बोलू द्यावे.
टेली कॉलरचे मुख्य काम काय असते?
मित्रांनो टेली कॉलर हे मार्केटिंग क्षेत्रामधील व्यक्ती असतात, त्यामुळे त्यांचा ग्राहकांशी संबंध येतो. ते व्यवसायाचे सद्यस्थितीतील ग्राहक आणि भविष्यातील संभाव्य ग्राहक यांच्याशी संभाषण करून, त्यांना आपल्या वस्तू किंवा सेवा याबद्दल माहिती देत असतात. तसेच त्यांच्या काही समस्या असतील तर त्या देखील सोडवण्याचे कार्य करत असतात.
टेली कॉलरचे जॉब मिळवण्यासाठी पात्रता काय असायला हवी?
टेली कॉलिंग हे बोलण्याचे काम असल्यामुळे तेथे सर्वप्रथम तुमच्या आवाजाबद्दल विचार केला जातो. तुम्ही शैक्षणिक दृष्ट्या दहावी किंवा बारावी पास असाल, तरी देखील हा जॉब मिळवू शकता. मात्र तुमच्याकडे उत्तम संभाषण कौशल्य असणे फार गरजेचे ठरते. आणि ज्या क्षेत्रातील व्यवसायासाठी तुम्ही हे काम करणार असाल, त्याबद्दल किमान जुजबी माहिती तरी असणे गरजेचे असते.
आजच्या भागामध्ये आपण टेली कॉलर या जॉब प्रकाराविषयी माहिती घेतलेली असून, ही माहिती तुम्हाला नक्कीच काहीतरी नवीन गोष्टी घेऊन आलेली असेल. त्यामुळे तुम्हाला नवीन काय वाचायला मिळाले किंवा यातील तुम्हाला काय आवडले याबाबत तुमच्या प्रतिक्रिया आम्हा पर्यंत कमेंट मध्ये नक्की पोहोचवा, आणि नोकरीची गरज असणाऱ्या तुमच्या मित्र-मैत्रिणींना ही माहिती वाचण्यासाठी नक्की शेअर करा.
धन्यवाद…