स्विझरलँड हा देश युरोपमधील भूपरिवेष्टित देश आहे. स्विझरलँड हा देश 26 राज्यांनी मिळून बनलेला असा संघराज्य प्रजासत्ताक देश आहे. या देशामध्ये सरकारप्रमुख किंवा राष्ट्रप्रमुख केवळ एक व्यक्ती नसून 7 सदस्य असलेली एक संघीय समिती देशाचा कार्यभार एकत्रितपणे चालवते. ह्या प्रकारचे सरकार असलेला स्वित्झर्लंड हा जगातील एकमेव देश आहे. स्वित्झर्लंडची राजधानी बर्न येथील जिनिव्हा, झ्युरिक, बासल व लोझान ही शहरे मोठी शहरे आहेत. या देशाचे चलन स्विस फ्रँक हे आहे.
स्विझर्लंड देशाची संपूर्ण माहिती Switzerland Information in Marathi
क्षेत्रफळ व विस्तार :
स्विझर्लंड चे क्षेत्रफळ 41 293 चौरस किमी असून या देशाचा विस्तार 45° 49′ ते 47° 47′ उत्तर अक्षांश व 5° 57′ ते 10° 29′ पूर्व रेखांश यादरम्यान आहे. या देशाच्या पश्चिम दिशेला फ्रान्स उत्तर दिशेला जर्मनी तर पूर्व दिशेला ऑस्ट्रेलिया व लिख्टेनश्टाइन, दक्षिणेस इटली हे देश आहेत.
भूरचना :
स्वित्झर्लंड युरोप खंडाच्या मध्य पश्चिम भागात स्थित असून त्याच्या भोवताली जर्मनी, फ्रान्स, इटली, ऑस्ट्रिया व लिश्टनस्टाइन हे देश आहेत. स्वित्झर्लंडचा दक्षिण व आग्नेय भाग आल्प्स पर्वताने व्यापला आहे.
ऱ्हाइन व ऱ्होन ह्या युरोपामधील दोन प्रमुख नद्यांचा उगम स्वित्झर्लंडमध्ये होतो. जिनिव्हा हे मोठे सरोवर देशाच्या नैऋत्य भागात फ्रान्सच्या सीमेवर तर बोडनसे हे सरोवर ईशान्य भागात जर्मनी व ऑस्ट्रिया देशांच्या सीमेजवळ स्थित आहेत.
हवामान :
स्विझरलँडच्या हवामानात आपल्याला प्रदेशानुसार भिन्नता पाहायला मिळते. येथील हिवाळे खूप थंड व उन्हाळी सौम्य व उबदार असतात. काही ठिकाणी वरील हवामान हिवाळ्यामध्ये गोठणबिंदूच्या खाली जाते तर उन्हाळ्यातील तापमान 21°c पेक्षा जास्त असते. येथील अल्प्स पर्वताचे उंच शिखरे बर्फाच्छादित असतात.
तसेच मध्यवर्ती पठारी भागात वार्षिक सरासरी 100 ते 114 cm पाऊस पडतो. तर पर्वतीय भागात 250 cm पेक्षा जास्त पाऊस पडतो. बऱ्याच वेळा स्विझरलँड मध्ये उष्ण कोरडे दक्षिणे वारे वाहतात त्या वाऱ्यांना फॉन असे म्हणतात.
इतिहास :
स्विझर्लंडचा इतिहास बराच प्राचीन इतिहास आहे येथील मूळ रहिवाशी लोक हे केल्टिक जमातींपैकी हेल्वेटिक वंशाचे होते. इ.स.पू. 58 मध्ये ज्युलीयस सीझरचा त्यांच्यावर ताबा होता.
हेल्वेटिया हा रोमन साम्राज्यातील समृद्ध प्रांत समजला जात होता. इ.स.वी. 250 मध्ये जर्मनिक वंशातील ॲलिमॅनी तोडीने आणि 433 मध्ये बर्गडीयनांनी त्यावर आपला ताबा बसविला.
इ.स.वी. 498 मध्ये ॲलिमॅनींचा आणि पुढे बर्गंडियनांचा पराभव फ्रँकांनी केला होता. या टोळ्या फ्रँकांना विरोध करू लागल्यावर फ्रँकांनी या देशाचा समावेश फ्रॅंक या राज्यात करून झुरिक व लोझॅन ही शहरे स्थापन केली व तेथे ख्रिस्ती धर्माचा प्रचार सुरू केला.
फ्रॅंक सत्तेचा ऱ्हास झाल्यानंतर स्विझर्लंड पवित्र रोमन साम्राज्याच्या व तेराव्या शतकात हॅप्सबर्ग या राजवडींच्या ताब्यात आले. हॅप्सबर्ग
यांची नियम कडक असल्यामुळे या धोरणांविरुद्ध येथील कॅटननी उठाव केला व उरी, श्वीझ, अंटर वॉल्डन या कँटननी ऑगस्ट 1291 मध्ये अंतर्गत संघ स्थापन केला.
हॅप्सबर्ग या राजवटीने तिन्ही कँटनवर स्वारी केली परंतु यांना यामध्ये यश प्राप्त झाले नाही त्यानंतर 38 वर्षात या कॅटनच्या संघात झुरिक, झूग, लूसर्न, ग्लारस, आणि बर्न ही पाचकँटन समाविष्ट झाली. या कँटनमधील श्वीझ या मोठ्या कँटनच्या नावावरून या देशास स्वित्झर्लंड असे नाव पडले.
शेती :
या देशात शेती योग्य जमीन खूपच कमी असल्यामुळे येथील शेतीचा आकार खूपच कमी आहे. त्यामुळे या देशांमध्ये शेतीवर असणारे उद्योगही केला जातो. त्यामध्ये दूध उत्पादन गुरे पाडणे हा शेती व्यवसाय केला जातो. दुधाचा जास्तीत जास्त वापर चीज निर्मितीसाठी केला जातो. येथील चीज स्विस चीज म्हणून प्रसिद्ध आहे.
उद्योगधंदे :
या देशात शेती व खनिज उत्पादन कमी प्रमाणात आहे त्यामुळे आयात करावी लागते. या देशातील उद्योगधंद्यांमध्ये मोटारी, विज संयंत्रे, घड्याळ, विशिष्ट वस्तू निर्माण करणे, उत्पादित वस्तूंची जगभर विक्री करणे कारखान्याची उभारणी करणे इत्यादी व्यवसाय चालतात. त्या व्यतिरिक्त या देशात रसायनिक व औषध निर्मितीचे अनेक उद्योग कंपन्या आहेत.
प्राणी व वनस्पती :
या देशामध्ये हवामानामध्ये विविधता आढळते त्यामुळे याचा परिणाम येथील वनस्पती व इतर वन्य जीवावर होतो. या देशाच्या पश्चिम भागात वृंदपर्णी वनस्पती, बीच, ओक, तर पूर्व भागात हॉर्न, बिन, लार्च व उत्तर उपअल्पाइन भागात स्प्रूस, फर, पाइन आणि दक्षिणेकडे चेस्टनट ह्या वनस्पती आढळतात. या प्रदेशामध्ये प्राण्यांपैकी अस्वल, हरीण, कोल्हा ससा, आयबेक्स, काळवीट, लांडगा, मार्मोट इ. प्राणी आढळतात. त्या व्यतिरिक्त या जंगलात विविध प्रकारचे पक्षी आढळतात.
वाहतूक व दळणवळण :
स्विझरलँड मध्ये रस्ते वाहतूक रेल्वे वाहतूक जलवाहतूक व विमान वाहतूक सेवा उपलब्ध आहे. येथे 71,454 कीमी. लांबीचे रस्ते असून 1,789 किमी. लांबीचे महामार्ग होते. सेंट गॉथर्ड खिंडीतील 17 किमी. लांबीचा बोगदा दळणवळणात महत्त्वाचा आहे. देशात बर्न, बाझेल, जिनीव्हा, लूगानो, सायन, सेंट गॅलन, झुरिक येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत. र्हाईन या नदीतून बाझेल ते उत्तर समुद्रापर्यंत जलवाहतूक चालते.
समाज जीवन :
या देशातील 2010 च्या जनगणने प्रमाणे लोकसंख्या ही 78,70,134 एवढी होती. या देशात राहणारे लोक हे विविध प्रदेशातून येत असल्यामुळे येथील भाषेत विविधता आढळते हेच स्विझरलँडचे वैशिष्ट्य आहे.
या देशात फ्रेंच, जर्मन, इटालियन, रोमन या भाषा प्रमुख मानल्या जातात. त्या व्यतिरिक्त येथे अनेक बोलीभाषा सुद्धा आहेत. येथील जास्तीत जास्त लोक शहरी भागात राहतात व लोकांचे राहणीमान येथील उच्च प्रतीचे आहे तसेच घरी आधुनिक सुख सोयींनी परिपूर्ण असून स्वच्छ व नीटनेटके असतात.
खाद्यपदार्थांमध्ये चीज चा वापर करून त्यापासून रॉस्टी, फाँडू व रॅक्लेट हे आवडते खाद्यपदार्थ बनवले जातात. येथील लोकांच्या आहारात दुग्धजन्य पदार्थ, सॉसची अनेक प्रकार, डुकरांचे मांस, गोमास व मासे यांचा समावेश असतो. जेवण झाल्यानंतर मुखशुद्ध करण्यासाठी चॉकलेट वस्तीचा वापर करतात.
येथील लोकांची आवडती पेय बियर, चहा, कॉफी, हॉट चॉकलेट ही आहेत या देशांमध्ये नोकरी सर्व सेवांमध्ये पुरुषांपेक्षा स्त्रियांना कमी वेतन देण्यात येते व आर्थिक मंदीच्या काळात स्त्रियांना प्रथमतः सेवेतून कमी केल्या जाते. येथील कुटुंब ही लहान असून येथे विवाह न करता एकत्र राहण्याचे प्रमाण वाढत आहे. विवाहाच्या सरासरी वयात वाढ होत असून मुलांच्या संगोपनाची जबाबदारी स्त्रियांकडे असते.
पर्यटन स्थळ :
स्विझर्लंड हा देश सुंदर व सौंदर्यसृष्टीने नटलेला आहे जणू हे स्वप्नातील स्वर्गच आहे. स्विझर्लंड ला जाणे हे अनेकांचे स्वप्न असते परंतु ते सर्वांना शक्य होत नाही. येथे पर्यटन स्थळ पाहण्यासारखे आहे तर चला मग जाणून घेऊया कोणकोणती पर्यटन स्थळ आहेत.
जंगफ्रोज :
हे शहर समुद्रसपाटीपासून 3,454 मीटर आहे. तसेच ही युरोपातील सर्वात उंच पर्वतरांग आहे तसेच येथे सर्वात उंच रेल्वे स्टेशन इंटरलेकन स्टेशनहून येथे येण्यासाठी ट्रेन मिळतात.
इंटरलेकन ओस्ट :
इंटरलेकन पोस्ट हे फिल्म सिटी चे आवडते स्थळ असून येथे अनेक सिनेमांचे सीन येथे घेतले जातात. येथे फिरण्यासारखे व अनुभव घेण्यासारखे स्थळ म्हणून सूर्योदयाच्या वेळेस येथील डोंगरावर फिरण्याचा आनंद वेगळाच असतो. येथील पर्वतावरून निसर्ग सौंदर्याचे अप्रतिम असे दृश्य दिसते.
शिल्थॉर्न हिमशिखर :
शिल्थॉर्न हिमशिखरांचा रस्ताही इंटरलेकन ओस्ट येथूनच जातो. हे जगातील सुंदर हिम शिखरात गणले जाते.
टिटलिस पर्वतरांग :
टीटलीस हिमशिखरांची पर्वतरांग ही स्विझरलँड मधील अतिशय डोळ्याचे पारणे फिटण्यासारखे स्थळ आहे. येथे सुखद अनुभव तुम्ही घेऊ शकता तसेच जर्मनीच्या ब्लॅक फॉरेस्ट ची दृश्य डोळ्यांनी पाहू शकता.
ग्रोटो हिमशिखर :
या हिमशिखरात बर्फात बनलेल्या सुंदर गुफा आहेत. तसेच या गुफांच्या बर्फाच्या भिंतीवर साडेआठ हजार दिवे प्रकाश उधळतील असं दृश्य आपल्याला पाहायला मिळतं. येथे हॉल ऑफ फेम सुद्धा आहे.
ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.