Stenography Course Information In Marathi काही करिअर हे फार दुर्लक्षित असतात. मात्र जो कोणी हे करियर निवडतो त्यांचा खूपच फायदा होतो. कारण त्यामध्ये स्पर्धा देखील कमी असते. मित्रांनो स्टेनोग्राफर म्हणजे थोडक्यात टाईपराईटर चा एक प्रकार आहे. आजच्या भागामध्ये आपण या स्टेनो कोर्स बद्दल पूर्ण माहिती घेणार आहोत. त्यामध्ये स्टेनोग्राफर म्हणजे काय असते, हा कोर्स कसा करावा इत्यादी गोष्टी जाणून घेण्याबरोबरच त्याची व्याख्या इत्यादी बाबत देखील माहिती घेणार आहोत. तसेच स्टेनोग्राफर चे कार्य देखील बघणार आहोत…

स्टेनोग्राफी कोर्सची संपूर्ण माहिती Stenography Course Information In Marathi
नाव | स्टेनो |
प्रकार | कोर्स |
करियर संधी | शाळा, महाविद्यालय, न्यायालय, विविध खाजगी किंवा सरकारी संस्था, आणि कार्यालय |
अभ्यासक्रम | एक वर्षीय ते बहुवर्षीय विविध प्रकारचे अभ्यासक्रम |
साधारण फी | पाच हजार ते पंधरा हजार |
वयाची अट किंवा मर्यादा | किमान १८ वर्षे आणि कमाल २५ वर्षे |
स्टेनोग्राफर म्हणजे काय:
स्टेनोग्राफर बनवण्यापूर्वी स्टेनोग्राफर म्हणजे नेमके काय हे माहिती असणे आवश्यक असते. मित्रांनो शब्द कोड मध्ये वापरून किंवा संक्षिप्त शब्दांमध्ये लिहून एखादा संक्षेप लिहिणे म्हणजे स्टेनोग्राफी होय. यालाच लघुलेखन असे देखील म्हटले जाते. यांना एका अद्वितीय कोडींग कौशल्यांनी प्रशिक्षित व्हावे लागते, जेणेकरून टाईप मशीनच्या वापराने अतिशय कमी शब्दांमध्ये मोठ्या गोष्टींचा सार लिहिला जाऊ शकेल.
स्टेनोग्राफरकडे टायपिंग कौशल्य असण्याबरोबरच त्यांना भाषेवर प्रभुत्व असणे गरजेचे असते, कारण एखाद्या मोठ्या मथळ्याचा अथवा भाषणाचा अगदी संक्षिप्त रूपात वर्णन लिहायचे असते. मात्र त्यामध्ये कोणत्याही महत्त्वाच्या घटकाचा विसर पडता कामा नये.
स्टेनोग्राफरचे करिअर वाढत चालले असून अनेक ठिकाणांमध्ये स्टेनोग्राफरला मोठी मागणी आहे. सरकारी पदांमध्ये देखील स्टेनोग्राफर हे पद भरले जाते, यासाठी स्टाफ सिलेक्शन कमिशन या संस्थेचा वापर केला जातो. स्टेनोग्राफरला अनेक रोजगाराचे पर्याय उपलब्ध आहेत. त्यामध्ये मुख्यत्वे न्यायालयांचा समावेश होतो. तसेच त्यांना सरकारी कार्यालयांमध्ये देखील नोकरी मिळत असते.
स्टेनोग्राफी मध्ये करिअर कसे करावे:
आपल्याला स्टेनोग्राफी म्हणजे काय हे माहिती नसल्यास तुम्ही पुढील रूपाने यामध्ये प्रवेश करू शकता. त्यासाठी सर्वप्रथम तुम्ही किमान ५५ टक्के गुणांनी तुमची बारावीची परीक्षा उत्तीर्ण व्हायला हवी. त्यानंतर सर्वप्रथम तुम्ही टायपिंगची परीक्षा देऊन जास्तीत जास्त टायपिंग वेग धारण करायला हवा.
त्यानंतर तुम्ही स्टेनो परीक्षा उत्तीर्ण होणे गरजेचे असते, ज्यांच्यासाठी स्टाफ सिलेक्शन कमिशन ची नेमणूक केली जाते. या एस एस सी द्वारे स्टेनोग्राफर पदासाठी दोन परीक्षा घेतल्या जातात. या दोन्ही परीक्षा उत्तीर्ण झाली, तर तुम्हाला स्टेनोग्राफर म्हणून पद दिले जाते आणि सरकारी नोकरीमध्ये सामील करून घेतले जाते.
स्टेनोग्राफर होण्यासाठी काय पात्रता आवश्यक असते:
आजकाल कुठल्याही कोर्ससाठी किमान पात्रता हा निकष लागू होतोच. स्टेनोग्राफर होण्यासाठी शैक्षणिक पात्रतेमध्ये किमान बारावीचे परीक्षा ५५ गुणांनी पास होणे गरजेचे असते. मात्र जर एखाद्या विद्यार्थ्यांनी पदवीचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर स्टेनो मध्ये करिअर करायचे ठरवल्यास त्यासाठी त्याला नेहमीच फायदा होतो. शैक्षणिक पात्रतेबरोबरच वयाची देखील पात्रता ठेवण्यात आलेली आहे. त्यासाठी तुमचे वय किमान १८ वर्षे पूर्ण असणे बंधनकारक असते. मात्र ते २५ वर्षांपेक्षा अधिक असता कामा नये.
स्टेनोग्राफी करिअर साठी सर्वोत्तम संस्था:
स्टेनोग्राफीसाठी कुठली संस्था निवडावी असे अनेक विद्यार्थ्यांना प्रश्न पडत असतात. भारतातील सर्वात उत्तम समजले जाणाऱ्या संस्था म्हणजे ‘हिंदी संगणक प्रशिक्षण केंद्र, हिंदी भवन, विष्णू दिगंबर मार्ग, आय टी ओ च्या समोर’; तर दुसरी संस्था म्हणजे ‘गांधीभवन, ३२ स्कूल रोड, दिल्ली विद्यापीठाचा उत्तर परिसर, दिल्ली’ या आहेत.
स्टेनो कोर्स साठी चाचणी परीक्षा:
स्टेनोग्राफर होण्यासाठी एक कौशल्य चाचणी द्यावी लागते, यामध्ये स्टेनोग्राफरच्या कौशल्यांची परीक्षा घेतली जाते. उमेदवार कशा रीतीने श्रुतलेखन प्रतिलेखन किंवा टायपिंग करत आहे याचे मूल्यमापन केले जाते. त्याचबरोबर उमेदवाराला इंग्रजी अथवा हिंदी भाषेमध्ये एका मिनिटांमध्ये किमान १०० शब्द टाईप करता यायला हवे. तसेच लिप्यांतर करताना डी ग्रेड स्टेनोग्राफर करिता हिंदी भाषेत ६५ मिनिटे, तर इंग्रजी भाषेचे ५० मिनिटे; आणि सी ग्रेड करिता हिंदी भाषेमध्ये ५५ मिनिटे तर इंग्रजी भाषेमध्ये ४० मिनिटे दिले जातात.
याच बरोबरीने उमेदवाराला संगणक आधारित किंवा लिखित चाचणी देखील द्यावी लागते. त्यामध्ये उमेदवाराचे सामान्य ज्ञान तपासले जाते, तसेच इंग्रजीचे व्याकरण, हिंदी चे व्याकरण, उमेदवाराची तर्कमर्यादा, आणि गणितीय पातळी तपासण्याकरिता ही चाचणी घेतली जाते. या चाचणीमध्ये यशस्वी होण्यासाठी विद्यार्थी विविध प्रकारच्या सराव परीक्षा देखील देऊ शकतात. जेणेकरून योग्य रीतीने परीक्षा उत्तीर्ण होण्यास मदत मिळेल.
स्टेनोग्राफर कोर्स करण्याकरिता फी:
कुठलाही कोर्स करायचा असेल तर फी ही लागते. त्याचप्रमाणे स्टेनोग्राफर साठी सुद्धा फी आवश्यक असते. जी कमीत कमी पाच हजार रुपये तर जास्तीत जास्त पंधरा हजार रुपयांपर्यंत असते. मात्र या फी मध्ये स्थळ व काळानुरूप बदल होत असतात.
निष्कर्ष:
बारावीपर्यंत अगदी निश्चित असणारे विद्यार्थी बारावीनंतर मात्र करिअर बाबतीत सिरीयस होतात. कारण त्यावेळी आपण कुठल्या क्षेत्रात जावे हे निवडण्याचा वेळ आलेला असतो. ज्यांनी आधीपासूनच आपल्या करिअरची दिशा ठरवून ठेवली असते, त्यांच्यासाठी या करिअर निवडीची प्रक्रिया फारशी अवघड नसली, तरी देखील सर्वसामान्य विद्यार्थ्यांकरिता कोणते करिअर निवडावे याकरिता फारच गोंधळ दिसतो.
त्यासाठी अनेक दुर्लक्षित करिअर मागे टाकून केवळ प्रचलित करिअर कडे जाण्याचा अनेकांचा कल असतो. परिणामी प्रचंड स्पर्धेमुळे भविष्यातील अडचणी निर्माण होतात. आज आपण स्टेनोग्राफर या कोर्स बद्दल माहिती बघितली, यामध्ये तुम्हाला अनेक गोष्टी वाचायला मिळाल्या.
स्टेनो कोर्स म्हणजे काय, स्टेनोग्राफर बनवण्यासाठी काय करावे, त्याची पात्रता काय असते? अभ्यासक्रम कसा असतो, तसेच काही चाचण्या असतात का?, फी स्ट्रक्चर कसे असते, किती वय लागते, इत्यादी गोष्टी जाणून घेतलेल्या आहेत.
FAQ
स्टेनोग्राफरची नोकरी उत्तम आहे का?
नक्कीच, मित्रांनो स्टेनोग्राफर यांना अनेक सार्वजनिक तसेच खाजगी क्षेत्रामध्ये देखील नोकरीला प्रचंड वाव आहे. तसेच जोपर्यंत सरकारी कार्यालयांमध्ये जागा निघत राहतील तोपर्यंत स्टेनोग्राफर ही नोकरी खूप मागणी मध्ये असेल.
इयत्ता बारावी नंतर स्टेनोग्राफी हा कोर्स करता येईल का?
नक्कीच, ज्या विद्यार्थ्यांना बारावी मध्ये किमान ५५% गुण मिळालेले आहेत, आणि त्यांनी आपली बारावी एखाद्या मान्यता प्राप्त संस्थेतून केली आहे, असे सर्व विद्यार्थी स्टेनोग्राफर कोर्ससाठी पात्र ठरतात. तसेच उमेदवाराला कोणत्याही एका भाषेमध्ये प्रभुत्व असणे गरजेचे असते.
स्टेनोग्राफर कोर्स नेमके काय आहे?
स्टेनोग्राफर हा एक वर्षाचा कोर्स असून, ज्यामध्ये तुम्हाला स्टेनो टाईप मशीनमध्ये अथवा शॉर्टहँड टाईप राईटर मशीन मध्ये करावे लागते.
स्टेनोग्राफर चे विविध प्रकार कशा नुसार पडत असतात?
स्टेनोग्राफरचे विविध प्रकार पडतात, मात्र ते केवळ त्यांच्या प्रभुत्व असलेल्या भाषेवर आधारित. बाकी सर्व काही सारखेच असते.
स्टेनोग्राफर कोर्स करण्याकरिता वयाची मर्यादा किती आहे?
स्टेनोग्राफर कोर्स ला प्रवेश मिळवण्याकरिता किमान १८ वर्षे तर कमाल २५ वर्षे वय असणे गरजेचे असते.
आजच्या भागामध्ये आपण स्टेनोग्राफर या कोर्स बद्दल माहिती घेतलेली आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली, तसेच तुमच्या करिअर निवडीसाठी या माहितीचा कसा फायदा झाला ते आम्हाला कमेंट मध्ये कळवा. शिवाय तुमच्या माहितीतील अशा विद्यार्थ्यांना ही माहिती पाठवा की ज्यांना करिअर निवडीमध्ये मार्गदर्शनाची गरज आहे. जेणेकरून त्यांचा देखील फायदा होण्यास मदत होईल.
धन्यवाद…