श्रीलंका देशाची संपूर्ण माहिती Srilanka Information In Marathi

Srilanka Information In Marathi श्रीलंका या देशांमध्ये एकूण नऊ राज्य असून 25 जिल्हे आहेत. या देशाची राजधानी श्रीजयवर्धनेपुरा कोट ही आहे. कोलंबो ही श्रीलंकेची पूर्वीची राजधानी होती व सध्या देशातील सर्वात मोठे शहर आहे. श्रीलंका हा असा पहिला देश आहे ज्याच्या पहिल्या पंतप्रधान महिला होत्या. श्रीमावो भंडारनायके श्रीलंकेच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या. श्रीलंकेचा ध्वज हा सर्वात जुना ध्वज मानला जात असून त्याला सिंह ध्वज असेही म्हटले जाते. या देशाचे चलन हे श्रीलंकी रुपया हे आहे. तर चला मग मित्रांनो आपण या देशाविषयी सविस्तर माहिती पाहूया

Srilanka Information In Marathi

श्रीलंका देशाची संपूर्ण माहिती Srilanka Information In Marathi

क्षेत्रफळ व विस्तार :

श्रीलंका या देशाचे क्षेत्रफळ हे 65,610 चौ. किमी. आहे तसेच बाराशे चार किलोमीटर लांबीचा किनारा या देशाला लाभलेला असून या देशाच्या उत्तर व पूर्व दिशेला बंगालचा उपसागर तर दक्षिण दिशेला हिंदी महासागर आणि पश्चिमेला मन्नारचे आखात व पालक सामुद्रधुनी यांनी हा देश वेगळा आहे. या देशाच्या चारही बाजूंनी पाणी आहे.

हवामान :

श्रीलंका देशाचे हवामानाचा विचार केला असल्यास, या देशातील समुद्रकिनारा जवळील व सखल भागातील हवामान वर्षभर उबदार व आदर राहते तर पर्वतीय भागातील हवामान शीत व आल्हादायक असते. सखल भागातील वार्षिक सरासरी तापमान 27°c ते 28° सेल्सिअस पर्यंत असते.

उंच पर्वतीय प्रदेशातील तापमान 16 अंश असते. या देशात पावसाचे प्रमाण हे भिन्न स्वरूपाचे आहे. येथे नैऋत्य मोसमी वारे व ईशान्य मोसमी वारे यांपासून पाऊस पडतो.

भाषा :

श्रीलंका या देशाची अधिकृत भाषा ही सिंहली आहे. ही भाषा बोलली जाणारी सर्वात मोठी लोकसंख्या येथे राहते. दुसऱ्या क्रमांकावर बोलली जाणारी श्रीलंकेतील भाषा ती म्हणजे तमिळ ही आहे.

खनिज :

श्रीलंका या देशामध्ये मौल्यवान खनिजांमध्ये मौल्यवान खडे सापडतात. त्यामध्ये माणिक, इंद्रनील मनी, ॲक्वामरीन, किसोबेरील यांचा तर निम मौल्यवान खड्यांमध्ये स्पिनेल, गार्नेट, पुष्कराज, झिर्कान, टूर्मलीन, चंद्रकांत या खड्यांचा समावेश होतो. त्याव्यतिरिक्त खनिज वाळू, चुनखडी, अभ्रक, मृद्खनिज तसेच पुळण प्रदेशातून रेतीचे उत्पादन घेतले जाते. येथे लोहखनिजाचे साठे खूप कमी प्रमाणात आहेत.

See also  दक्षिण आफ्रिका देशाची संपूर्ण माहिती South Africa Information In Marathi

इतिहास :

श्रीलंकेचा इतिहास खूप प्राचीन असून त्याचे मागील 3000 वर्षापासून लिखित पुरावे उपलब्ध आहेत. प्राचीन काळापासून भारत आणि श्रीलंकेचे धार्मिक, व्यापारी व राजकीय संबंध होते.

इ.स.पू. 250 पासूनच श्रीलंकेत बौद्ध धर्म व  संस्कृतीचा प्रचार होण्यास सुरुवात झाली.  मौर्य  सम्राट अशोकाने आपला पुत्र महेंद्र व पुत्री  संघमित्रा यांना बौद्ध धर्माच्या प्रसाराकरिता श्रीलंकेत पाठविले होते.  गौतम बुद्धांना ज्या बोधिवृक्षाखाली  ज्ञानप्राप्ती झाली, त्याची एक फांदी घेऊन ख्रिस्तपूर्व 245 मध्ये संघमित्रा या देशात आल्या आणि त्यांनी ती फांदी येथे रोवली.

हे जगातील सर्वात प्राचीन वृक्षारोपण समजले जाते. तसेच सम्राट अशोकाने पाठवलेले बौद्ध भिक्खू येथे आले होते व त्यांनी देखील येथे बौद्ध धर्माची सुरुवात केली. त्यांचे अस्तित्व अनुराधापूरच्या वायव्य भागात आजही आपल्याला जाणवते.

सोळाव्या शतकात युरोपीय राष्ट्रे श्रीलंकेतसुद्धा व्यापाराकरिता आली. या देशातून तेव्हा चहा, रबर, साखर, कॉफी, दालचिनी सहित आणखी काही मसाल्यांच्या पदार्थांचा निर्यातक देश बनला. प्रथम पोर्तुगीजांनी कोलंबोजवळ स्वतःचा गड निर्माण केला.
हळूहळू आजूबाजूच्या प्रदेशावर आपली सत्ता स्थापन केली.

श्रीलंकेतील निवास्यांनी पोर्तुगीजांपासून सुटकेसाठी डचांचे सहाय्य घेतले. मात्र 1620 मध्ये पोर्तुगिजांचा पाडाव करून डचांनी तेथील जनतेवर आधीपेक्षा जास्त कर लादला. 1660 पर्यंत इंग्रजांचे लक्ष श्रीलंकेवर गेले. त्यानंतर इंग्रजांनी डच प्रदेशांवर अधिकार गाजवण्यास सुरुवात केली. सन 1818 पर्यंत श्रीलंकेतील अंतिम राज्य असणाऱ्या कॅन्डीच्या राजाने आत्मसमर्पण केले.

शेती :

श्रीलंका हा कृषीप्रधान देश असून या देशात नारळ, रबर, चहा, कॉफी इत्यादी मुख्य पदार्थ घेतले जातात व निर्यात केली जाते. सखल भागात तांदूळ शेती केली जाते. त्या व्यतिरिक्त येथील श्रीलंकेत आंबा, केळी, पपई फणस, अननस यांच्या बागा असून लवंग, मिरी, दालचिनी इत्यादी मसाल्याच्या पदार्थांच्या शेती होते.

वनस्पती व प्राणी :

श्रीलंकेमध्ये शुष्क सकल प्रदेशात एबनी, कुंती, आयर्नवुड, साग, फणस हे महत्त्वपूर्ण झाडे आढळतात. तर ईशान्य कडील प्रदेशात मिश्र सदाहरित वनस्पती आहे.

See also  आइसलँड देशाची संपूर्ण माहिती Iceland Information In Marathi

तसेच या प्रदेशात 3000 पेक्षा अधिक जातींची फुलझाडे या देशातील जंगलात आढळतात. येथील ग्रामीण भागामध्ये तसेच रस्त्याच्या कडे सर्वत्र केळी, फणस, पपया, आंबे, नारळ, पोफडीची झाडे आपल्याला पाहायला मिळतात.

जंगलातील प्राणी जीवनाची संख्या खूप कमी झालेली दिसते परंतु आता येथील जंगलात हत्ती, डुक्कर, अस्वल, रानरेडा, अस्वल विविध प्रकारचे मृग, सांबर, विविध प्रकारची माकडे इ. प्राणी आढळून येतात.

येथील नद्या व जंगलातील तळ्यांमध्ये मगरी सुसरी आहेत. तसेच मोठमोठे घोरपडी सरडे जंगलात काही प्रमाणात कोब्रा, व्हायपर व अजगर पाहायला मिळतो.

वाहतूक व दळणवळण :

श्रीलंकेमध्ये वाहतुकीसाठी भू मार्ग, लोहमार्ग, वायु मार्ग व जलमार्ग यांचा विकास दिसून येतो. येथील खेड्यापर्यंत रस्ते काढण्यात आले आहेत. देशांमध्ये 74,828 किमी. लांबीचे रस्ते असून त्यापैकी 11, 462 किमी लांबीचे राष्ट्रीय महामार्ग आहेत.

येथील लोहमार्ग वाहतूक ही शासनाच्या अधिकारात आहे तसेच किनारी प्रदेशातील बंदरांशी जोडले गेलेले आहेत. कोलंबो येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत आशियातील प्रसिद्ध आधुनिक सागरी बंदर तसेच जगातील मोठ्या कृत्रिम बंदरांपैकी हे एक आहे.

संगीत व नृत्य :

श्रीलंका या देशाचा सांस्कृतिक वारसा खूप समृद्ध व जुना आहे. येथे तिसऱ्या शतकापासून परंपरागत कला केंद्र व बौद्ध व हिंदू धर्मातील कला नृत्य नाट्य प्रकारांशी निगडित आहेत. येथे सिंहलीपेक्षा तमिळ संगीत परंपरेचा प्रभाव अधिक दिसून येतो.

येथील तरुणांना व स्त्रियांना भारतीय शास्त्रीय नृत्य प्रकार खूप पसंत आहेत. श्रीलंकेत कोलम, डेव्हिल व कँडी हे तीन प्रमुख नृत्य-नाट्य प्रकार आहेत. येथील सर्वात महत्त्वाचा राष्ट्रीय नृत्य प्रकार कँडी हा असून तो ऐतिहासिक पौराणिक कथा व निसर्ग विज्ञान या विषयाशी निगडित आहे.

खेळ :

श्रीलंका या देशाचा राष्ट्रीय खेळ हा हॉलीबॉल आहे परंतु येथील सर्वात प्रिय खेळ क्रिकेट आहे. श्रीलंकेने क्रिकेटचा वर्ल्ड कप 1996 मध्ये जिंकलेला आहे.

कला :

श्रीलंकेतील प्राचीन चित्रकला वस्तू कला व शिल्पकला यांचे नमुने आपल्याला आजही पहावयास मिळतात. त्यामध्ये येथे भव्य बुद्धमूर्ती, कँडी सभोवतालची मंदिरे व मंदिरांवरील चित्रकलांचा समावेश होतो. धातुकाम, लाखकाम, काष्ठकाम व बुरूडकाम व हस्तिदंतावरील नक्षी हे इतर पारंपरिक कलाप्रकार येथे टिकून आहेत.

See also  नॉर्वे देशाची संपूर्ण माहिती Norway Information In Marathi

सण :

श्रीलंका या देशांमध्ये महत्त्वाची सण व उत्सव साजरी केले जातात. सिंहली आणि तामिळ नवीन वर्ष, वेसाक, पोसॉन महोत्सव, कटारागामा महोत्सव, वेल उत्सव, दीवाळी आहे.

पर्यटन स्थळ :

श्रीलंकेला अनेक निसर्ग सौंदर्याने नटलेले समुद्रकिनारी लाभलेले आहेत तसेच पार्कची समुद्रधुनी आहे. येथील ऐतिहासिक व प्राचीन अवशेषांची कलाकृती आपल्याला पाहायला मिळते.

मिन्नेरिया नॅशनल पार्क :

ज्यांना जंगलात फिरायला आवडते अशांसाठी हे नॅशनल पार्क अतिशय महत्त्वाचे आहे.
या पार्कमध्ये फिरण्यासाठी मी इथे ऑगस्ट हा काळ अनुकूल काळ असतो या काळात येथे हत्तींचे कळप फिरताना दिसतात. पार्कच्या मधोमध सरोवर असून तेथे अनेक प्राणी पक्षी पाणी पिण्यासाठी येतात. हे नयन दृश्य आपण पहावे व आपल्या कॅमेरात कैद करावे असे वाटते.

कँडी :

कँडी हे एक थंड हवेचे प्रसिद्ध ठिकाण असून ते लोकांची स्वप्न नगरी समजली जाते. कँडीकडे जाणारा रस्ता हा सुंदर अशा वनांनी व्यापलेला असून या मार्गावर प्रवास करताना एक वेगळाच अनुभव आपल्याला येतो. म्हणून हे श्रीलंकेतील सर्वात आवडते ठिकाण आहे. तसेच हे श्रीलंकेची सांस्कृतिक राजधानी म्हणूनही ओळखली जाते.

त्रिंकोमली :

हे शहर श्रीलंकेच्या उत्तर भागात वसलेला आहे आणि येथे वैशिष्ट्यपूर्ण निसर्ग रम्य वातावरण तसेच समुद्रकिनारी जगातील मोजक्या नैसर्गिक बंदरांपैकी हे एक मानला जातो. येथे स्वच्छ समुद्रकिनारे, व भव्य मंदिर हे पर्यटकांना आकर्षित करतात.

ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांना शेअर करा.

हे निबंध सुद्धा अवश्य वाचा :-

Leave a Comment