Smriti Mandhana Information In Marathi अगदी फार पूर्वीपासून आपण टीव्हीवर क्रिकेट बघत आलेलो आहोत. आणि त्यामध्ये आपल्याला केवळ पुरुष क्रिकेटपटू खेळाडू बघण्याची सवय लागलेली आहे. मात्र आजच्या काळामध्ये या क्षेत्रामध्ये स्त्रियांनी देखील पदार्पण केलेले असून, संपूर्ण भारताची नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाणारी स्मृती मंधना हिने या क्षेत्राला फार मोठे योगदान दिलेले असून, महिला क्रिकेट स्पर्धांना प्रसिद्ध करण्यामागे स्मृती मंधना या भारतीय महिला क्रिकेटपटूचा खूपच मोलाचा वाटा आहे.
स्मृती मंधना यांची संपूर्ण माहिती Smriti Mandhana Information In Marathi
भारताचा एक उत्कृष्ट असा महिला क्रिकेट संघ असून, त्यामध्ये स्मृती मंधना ही प्रमुख खेळाडू म्हणून ओळखले जात असते. सुरुवातीपासूनच अतिशय उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या या स्मृती मंदाना हिला अगदी आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील भारतीय संघाचे नेतृत्व प्रदान करण्यात आलेले असून, भारतीय संघाच्या क्रिकेट विश्वामध्ये एक उल्लेखनीय नाव म्हणून या स्मृती मंधना यांचे नाव घेतले जात असते.
स्मृती मंधना या अलीकडील काळामध्ये खूपच प्रसिद्ध झालेल्या भारतीय महिला खेळाडू असून, त्यांच्या खेळाच्या स्पर्धा बघण्याकरिता अनेक लोक प्रचंड मोठ्या प्रमाणावर गर्दी करत असतात. अनेक वृत्तपत्र त्यांच्या बातमीच्या जीवावर प्रचंड खप मिळवत असून, क्रिकेट क्षेत्राला मिळालेली एक उत्तम देणगी म्हणून या स्मृती मंधना यांना ओळखले जाते.
खेळताना डाव्या हाताने खेळणाऱ्या या खेळाडूचा प्रत्येक भारतीयाला प्रचंड अभिमान असून, त्यांना नॅशनल क्रश या नावाने देखील ओळखले जात असते. आजच्या भागामध्ये आपण या स्मृती मंधना यांच्या बद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत…
नाव | स्मृती मंधना |
संपूर्ण नाव | स्मृति श्रीनिवास मंधना |
जन्म दिनांक | १८ जुलै १९९६ |
जन्म स्थळ | मुंबई, महाराष्ट्र |
सध्याचे वय | २८ वर्ष |
आईचे नाव | स्मिता मंधना |
वडिलांचे नाव | श्रीनिवास मंदाना |
कार्यक्षेत्र | क्रिकेट |
मानसन्मान | अर्जुन पुरस्कार |
महाराष्ट्रातील मुंबई मध्ये दिनांक १८ जुलै १९९६ या दिवशी एका मारवाडी समाजामध्ये स्मृती मंधना यांचा जन्म झाला होता. त्यांच्या आईचे नाव स्मिता तर वडिलांचे नाव श्रीनिवास असे आहे. त्यांना श्रवण नावाचा एक बंधू देखील असून, सद्यस्थितीमध्ये स्मृति या २८ वर्षे वयाच्या आहेत.
स्मृती मंधना यांचे प्रारंभिक जीवन:
स्मृति यांचा जन्म मुंबई या ठिकाणी झाला असला, तरी देखील त्यांच्या वयाच्या दुसऱ्या वर्षी त्यांचे संपूर्ण कुटुंब सांगलीमध्ये स्थायिक झाले. सांगली मधील माधवनगर येथे वास्तव्यास असताना त्यांनी आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. लहानपणापासूनच त्यांना क्रिकेट खेळामध्ये प्रचंड आवड होती. आणि या आवडीचे कारण म्हणजे त्यांचे बंधू आणि वडील नेहमी क्रिकेट बघत असत. व त्यांना देखील या क्रिकेट क्षेत्रामध्ये प्रचंड आवड होती.
आपोआपच लहानपणापासून क्रिकेट बघून त्यांना देखील या खेळामध्ये रुची निर्माण झाली. त्याचबरोबर त्यांचे वडील देखील जिल्हास्तरीय क्रिकेट खेळलेले असून, त्यांच्या भावाने देखील राष्ट्रीय पातळीवरील खेळांमध्ये अंडर सिक्सटीन या गटामध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले होते. त्यांच्या प्रत्येक निर्णयामध्ये त्यांच्या आईने त्यांना खूपच पाठिंबा दर्शवल्यामुळे त्यांनी या खेळामध्ये आपले उत्कृष्ट करिअर करण्याचे ठरविले होते.
देशांतर्गत क्रिकेटमध्ये पदार्पण:
लहानपणापासूनच क्रिकेटची आवड असली तरी देखील वयाच्या नवव्या वर्षी पर्यंत त्या क्रिकेट खेळल्या नव्हत्या, किंवा अगदी क्रिकेटची बॅट देखील त्यांनी हातात घेतली नव्हती. मात्र पुढे जाऊन त्यांनी या खेळामध्ये रुची दाखवत सराव करण्यास सुरुवात केली होती.
वयाच्या पंधराव्या वर्षी त्यांची निवड करण्यात आली, हेच यश त्यांना फार महत्वाचे वाटले, मात्र पुढे त्यांना नेहमीच यश मिळत गेल्यामुळे त्यांच्या या उत्कृष्ट खेळीने त्यांना कधीही मागे वळून बघायला लावले नाही. महाराष्ट्रातील एकोणवीस वर्षे वयोगटाच्या खालील संघामध्ये त्यांना खेळण्याची संधी देण्यात आली, आणि हीच संधी त्यांना आयुष्य बदलणारी ठरली.
या खेळामध्ये त्यांनी फारच उत्कृष्ट कामगिरी केली, आणि संपूर्ण महाराष्ट्र आणि भारत देशामध्ये त्यांचे प्रचंड कौतुक करण्यात आले. आणि सर्वत्र त्यांचा नावलौकिक वाढला. २०१३ मध्ये महाराष्ट्र आणि गुजरात या दोन संघांच्या विरोधात सामना झाला होता. या स्पर्धेमध्ये त्यांनी अवघ्या १५४ बॉल मध्ये २२४ धावा करून एक विक्रम नोंदवला होता. त्यामुळे सर्वत्र त्यांचे गुणगौरव करण्यात येऊ लागले, आणि यामुळेच त्यांना आंतरराष्ट्रीय पाळीतळीवर देखील खेळण्याची संधी देण्यात आली.
राष्ट्रीय पातळीवरील केलेल्या खेळापेक्षाही त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर खूप मोठे कार्य केलेले असून’ त्यांनी आपला सर्वात पहिला आंतरराष्ट्रीय सामना २०१४ या वर्षी इंग्लंडच्या संघाविरुद्ध वरमसले पार्क या ठिकाणी खेळला होता. आणि या ठिकाणी त्यांनी ७३ धावा करत, भारतीय संघासाठी विजय मिळवून दिला होता. त्याचप्रकारे त्यांनी एकदिवसीय सामन्यांमध्ये २०१३ यावर्षी प्रवेश केलेला असून, त्यातील पहिला सामना त्यांनी बांगलादेश या देशाविरुद्ध खेळला होता.
निष्कर्ष:
अगदी एक किंवा दोन दशक हे मागे वळून बघितले तरी देखील स्त्रिया या म्हणाव्या तितक्या पुढारलेल्या नव्हत्या. अनेक क्षेत्रांमध्ये स्त्रिया असू शकतात, ही गोष्टच अनेकांना हास्यास्पद वाटत असे. अगदी वाहन चालवण्यामध्ये देखील तेव्हापर्यंत महिला इतक्या पुढारलेल्या नव्हत्या. त्यामुळे एखादी महिला क्रिकेट खेळू शकेल, हे ऐकल्यानंतर अनेक जण प्रचंड वेगळ्याच नजरेने बघत असत.
मात्र या सर्वांच्या नजरा क्षणार्धात खाली करणाऱ्या स्मृती मंधना यांनी भारतीय क्रिकेट क्षेत्रामध्ये फार मोठा इतिहास रचलेला असून, भारतीय महिला क्रिकेट संघाकडून खेळत त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील प्रचंड मोठी कामगिरी केलेली आहे. महाराष्ट्रातील मुंबई या ठिकाणी जन्मलेल्या या स्मृति मंधना यांना लहानपणापासूनच क्रिकेटची प्रचंड आवड होती. लहानपणी इतर मुलांना कार्टून बघणे आवडत असले, तरी देखील त्या कित्येक तास सलग क्रिकेटच्या मॅच बघत असत.
त्यामुळे आपण देखील या क्रिकेटपटूंप्रमाणे क्रिकेट खेळावे, अशी सुप्त इच्छा त्यांच्या मनामध्ये जागृत होत असे. त्यांचे वडील अतिशय खुल्या विचाराचे असल्यामुळे त्यांनी स्मृती मंधना यांना क्रिकेट खेळण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्याच बरोबर त्यांना आवश्यक असणाऱ्या सर्व साहित्याची देखील पुरवणी केली, त्यामुळे या स्मृती मंदाना यांनी क्रिकेट क्षेत्रामध्ये प्रचंड नाव मिळवले. आणि सुरुवातीला स्थानिक पातळीवर क्रिकेट स्तरांमधून पदार्पण करत, त्यांनी अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील आपली छाप सोडलेली आहे.
आजच्या भागामध्ये आपण स्मृती मंधना या भारतीय महिला क्रिकेट पटू बद्दल संपूर्ण माहिती बघितलेली आहे. त्या अंतर्गत त्यांचे जीवन चरित्र, जन्म, प्रारंभिक आयुष्य, आणि क्रिकेट क्षेत्रामध्ये दिलेले योगदान, इत्यादी बाबतीत माहिती घेतलेली असून, त्यांनी मिळवलेले काही प्रमुख पुरस्कार देखील जाणून घेतलेले आहेत. त्याचबरोबर त्यांच्या खाजगी आयुष्याबद्दल देखील काही तथ्य माहिती जाणून घेतलेली आहे.
FAQ
स्मृती मंधना या भारतीय महिला क्रिकेटपटू खेळाडूचे संपूर्ण नाव काय आहे?
स्मृती मंधना या भारतीय महिला क्रिकेटपटू खेळाडूचे संपूर्ण नाव स्मृति श्रीनिवास मंधना असे आहे.
स्मृती मंधना या भारतीय क्रिकेटपटू खेळाडूचा जन्म कोणत्या दिवशी व कोणत्या ठिकाणी झाला होता?
स्मृती मंधना या भारतीय क्रिकेटपटू खेळाडूचा जन्म दिनांक १८ जुलै १९९६ या दिवशी महाराष्ट्रातील मुंबई या ठिकाणी झाला होता.
स्मृती मंधना यांच्या आईचे व वडिलांचे नाव काय आहे?
स्मृति मंदाना यांच्या आईचे नाव स्मिता मंधना, तर वडिलांचे नाव श्रीनिवास मंधना असे आहे.
स्मृति मंदाना यांचे सद्यस्थिती मधील वय किती आहे?
स्मृती मंधना यांचे सद्यस्थितीतील वय २८ वर्षे पूर्ण इतके आहे.
स्मृती मंधना या कोणत्या समाजाच्या आहेत व त्यांना किती भावंड आहेत?
स्मृती मंधना या भारतीय मारवाडी समाजाच्या असून, त्यांना एक भाऊ देखील आहे.