Saudi Arabia Information In Marathi सौदी अरेबिया या देशाची पूर्ण नाव किंग्डम ऑफ सौदी अरेबिया असे असून हा एक आशिया खंडाच्या नैऋत्य टोकावरील म्हणजेच अरबस्थान द्वीपकल्पातील राजसत्ता देश आहे. हा जगातील 14 वा सर्वात मोठा देश मानला जातो. तसेच ‘महाराज फहद’ हे आंतरराष्ट्रीय विमानतळ क्षेत्रफळानुसार जगातील सर्वात मोठे विमानतळ आहे. या प्रांताला बहरीन देशाशी जोडणारा किंगफहद कॉजवे हा 1986 मध्ये पूर्ण झाला. या देशाचे चलन सौदी रियाल आहे. तर चला मग या देशा विषयी सविस्तर माहिती पाहूया.

सौदी अरेबिया देशाची संपूर्ण माहिती Saudi Arabia Information In Marathi
क्षेत्रफळ व विस्तार :
सौदी अरेबिया या देशाचे क्षेत्रफळ 21,49,690 चौरस किलोमीटर असून या देशाच्या उत्तरेला जॉर्डन, इराक, कुवेत तर पूर्वेस इराणचे आखात, संयुक्त अरब अमिराती, कॉटार ओमान हे देश असून आदरणीय दिशेस ओमान चा काही भाग दक्षिणेस व नैऋत्यला येमेन, पश्चिम दिशेला तांबडा समुद्र व अकाबाचे आखात आहे. या देशाची संयुक्त अरब अमिराती व मान या देशांशी असणारी सीमा अजून निश्चित नाही.
हवामान :
सौदी अरेबिया या देशातील हवामान हे अति उष्ण व कोरड्या प्रकारचे असते येथे धुळीची वाळूची वादळे नेहमीच येत असतात. मे पासून ते सप्टेंबर हा कालावधी अत्यंत उष्णतेचा असून या दिवसांमध्ये त्यांचे तापमान 380 से. पेक्षा जास्त असते तर काही ठिकाणी 540 से. पर्यंत असते.
या देशातील किनारी भागातील तापमान तुलनेने कमी असून हवेमध्ये दमटपणा जास्त असतो. तसेच ऑक्टोबर ते एप्रिल पर्यंत चे तापमान हे मध्यम प्रकारचे असून संध्याकाळी 160 से. ते 210 से. च्या दरम्यान खाली उतरते.
जानेवारी महिन्यातील तापमान हे 14.40 से. म्हणजे उन्हाळ्याच्या बाबतीत हिवाळा हा समाधान कारक असतो. येथे नोव्हेंबर ते मे या दरम्यान पाऊस पडतो तसेच वार्षिक सरासरी पर्जन्यमान ही 9 सेंमी असते. अशीर या पर्वतीय भागात 25 सेंमी ते 50 सेंमी मान्सूनचा पाऊस पडतो.
वनस्पती व प्राणी :
सौदी अरेबिया या देशांमध्ये उत्तर आफ्रिकेतील वाळवंटी भागात आढळणाऱ्या वनस्पती प्रमाणे वनस्पती जीवन असून तेथे मोठे वृक्ष दिसत नाही. लहान लहान झुडपे बहुतांश येथे दिसून येतात. तसेच या भागात खजुराची झाडे आढळून येतात.
वेगवेगळ्या प्रकारची जंगले फुलांची झाडे वाळवंटी प्रदेशात दिसतात.
प्राण्यांमध्ये येथे घोडा, शेळ्या-मेंढ्या, गाढवे, लांडगा, कोल्हा, तरस, ससा, हरिण, उंट, चित्ता, मुंगुस इत्यादी प्राणी आढळतात. तर पक्षांमध्ये घुबड, गिधाडे, माळढोक, फ्लेमिंगो, पानकोळी, बगळा, कबूतर, ससाणा, गरुड इत्यादी पक्षी तसेच उष्ण कटिबंधीय प्रदेशातील विविध प्रकारचे साप येथे आढळतात.
सौदी अरेबियाचा इतिहास :
सौदी अरेबिया या देशांमध्ये हजारो वर्षांपूर्वी अनेक भटक्या टोळ्या अस्तित्वात होत्या. त्यानंतर काही प्रमाणात शहरात व वाळवंटातील मरूद्यानांलगत व व्यापारी मार्ग मार्गावर वसल्या. इ.वी.स.पू. सातशे मध्ये सभा लोक सध्याच्या नैऋत्य सौदी अरेबियात व येमेनच्या पश्चिम भागात राहत होते. तेव्हा हे लोक मसाल्याचे पदार्थांचा व्यापार करत होते. त्यामध्ये धूप, सुगंधी द्रव्य यांचाही समावेश होता या व्यापारामुळे समृद्ध बनले.
इसवी सन 571 मध्ये इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर यांचा जन्म मक्का येथील कुरैश या अरब टोळीतील एका प्रतिष्ठित कुटुंबात झाला होता.
तेव्हा मक्का हे व्यापार व दळणवळणाचे केंद्र होते. मोहम्मद पैगंबर हे एकेश्वरवादी असल्यामुळे त्यांच्या आध्यात्मिक भूमिकेचा मक्केत विरोध झाल्यामुळे त्यांनी इ.स. 622 मध्ये मदीनेस स्थानांतरण केले. व नंतर त्यांच्या अनुयायांनी 630 मध्ये मक्का आपल्या ताब्यात घेऊन तेथील लोकांना इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडले होते. 632 मध्ये मुहम्मदच्या मृत्यूपर्यंत, जवळजवळ संपूर्ण अरबी द्वीपकल्पाने मुहम्मदचा संदेश स्वीकारला होता. या लोकांना मुस्लिम म्हटले जाऊ लागले.
मुहम्मदच्या मृत्यूनंतर अरबांची राजकीय शक्ती खूप वाढली. 700 पर्यंत इस्लामने इराण, इराक, इजिप्त आणि मध्य पूर्व मध्ये सामरिक विजय स्थापित केले होते. अरब लोकही या भागात तुरळकपणे स्थायिक झाले. इस्लामची राजकीय सत्ता खिलाफतच्या हातात राहिली. सुरुवातीला, दमास्कस हे इस्लामचे केंद्र होते आणि नंतर मक्का येथे आठव्या शतकाच्या मध्यापर्यंत बगदाद इस्लामची राजकीय राजधानी बनले.
इस्लामचे राजकीय वारस अरब राहिले, परंतु इतर अनेक जातींचे लोकही त्यात हळूहळू समाविष्ट होऊ लागले व सोळाव्या शतकात, उस्मानांनी मक्का ताब्यात घेतला आणि इस्लामची राजकीय सत्ता तुर्कांकडे गेली आणि 1922 पर्यंत त्यांच्या हातात राहिली.
शेती व्यवसाय :
सौदी अरेबियातील एक टक्के जमीन केवळ शेती उद्योगासाठी उपयुक्त असून येथील वाळवंटातही शेतीयोग्य जमीन तयार करण्याचे शासनाचे उपक्रम चालू आहे.
येथे गहू उत्पादन दुग्ध उत्पादन व उत्पन्न वाढीसाठी सुद्धा विशेष प्रयत्न केले जातात. येथील कष्टकरी लोकांमध्ये 4.8 % लोक शेती व्यवसाय करतात. या देशांत गहू, टोमॅटो, बटाटे, खजूर, बार्ली, द्राक्षे व कांदे यांचे पीक घेतले जाते.
खनिज संपत्ती :
सौदी अरेबिया हा देश खनिज तेल साठ्यासाठी जगात पहिल्या क्रमांकावर आहे जगातील एकूण खनिज तेल साठ्यापैकी येथे एक चतुर्थांश साठे उपलब्ध आहे. तेलाचे साठे हे देशाच्या पूर्व भागात रब-अल-खली वाळवंटी प्रदेशात तसेच इराणचे आखात याठिकाणी सापडतात. याव्यतिरिक्त देशामध्ये फॉस्पेट, बॉक्साईट, लोखंड, चांदी, युरेनियम, सोने, झिंग, पोटॅशियम, निकेल, टंगस्टन इत्यादीचे साठे मोठ्या प्रमाणात सापडतात.
वाहतूक व दळणवळण :
या देशात वाहतुकीसाठी या प्राण्याचा जास्तीत जास्त वापर केला जातो तसेच या देशात 2,21,372 किलोमीटर लांबीचे रस्ते असून त्यामध्ये 13,596 किलोमीटर लांबीचे प्रमुख रस्ते आहेत. या देशात स्त्रियांना वाहन चालवण्याची परवानगी नाही.
या देशामध्ये 1,435 किलोमीटर लांबीचे लोहमार्ग आहे. देशामध्ये सागरी तसेच नद्यांमधून व्यापार करण्यासाठी बंदरे उभारण्यात आलेली आहेत तेथील यांबू, जेद्दा, जिन, जीझॅन व आखातावरील दमाम व अल् जुबेल ही प्रमुख बंदरे आहेत. तसेच येथे अनेक लहान बंदरे देखील आहेत. सौदी अरेबिया या राष्ट्रीय हवाई कंपनीमार्फत देशांतर्गत व देशाबाहेर विमान वाहतूक केली जाते. देशांतर्गत वाहतूकीसाठी 22 विमानतळ आहेत.
लोकजीवन व भाषा :
सौदी अरेबिया या देशातील बहुसंख्या लोकांची भाषा अरबी असून येथे इंग्रजी ही दुय्यम भाषा म्हणून उपयोगात आणली जाते.
सौदी अरेबियातील लोक हे सेमिटिक वंशाचे म्हणून ओळखले जातात. येथील लोकांचे राहण्याचे निवासस्थान ही बहुदा घरे दगडाची व धाब्याची असतात.
येथील अरबी पुरूष पायाच्या घोट्यापर्यंत ढगळ किंवा तंग पैजामा घालतात. आमच्या घोड्याचा व लांब बाईचा झगा घालतात. डोक्याभोवती कापड गुंडाळतात. त्याला गुत्रा असे म्हणतात. स्त्रियाच्या पोषाखामध्ये लांब पायघोळ सदरा, सलवार, आखुड कंचुकी वापरतात हा पोशाख अंगासरशी बसणारा किंवा लांबलचक व सैलही असतो.
यांच्या जेवणामध्ये दुग्धजन्य पदार्थ, बोकडाचे मांस भात, खजूर इत्यादी पदार्थ प्रामुख्याने असतात. तर शहरी भागात विविध भाज्या व फळ भाज्यांचा आहारात समावेश असतो. येथील लोक चहा-कॉफी आवडीने पितात परंतु इस्लामांच्या तत्त्वाप्रमाणे डुकराचे मास व मद्य सेवनात येथे प्रतिबंध आहेत.
खेळ :
या देशात बास्केटबॉल, टेनिस, हॉलीबॉल व फुटबॉल हे त्यांचे आवडते खेळ आहेत. त्या व्यतिरिक्त देशा घोड्याच्या शर्यती, उंटाच्या शर्यती हे सुद्धा लोकप्रिय आहेत.
पर्यटन स्थळ :
येथील अनेक सौंदर्य व वाळवंट प्रदेश येथील भागांचे सौंदर्य वाढवते. तर चला पाहूया येथील पर्यटन स्थळ.
मैदान सालेह :
पेट्रा आणि मका या दरम्यान असलेला हा मैदान सालेह प्रदेश म्हणून ओळखला जातो. हे नाबतेनचे दुसरे शहर होते सौदी अरेबियामध्ये हे अल-हिजर आणि हेग्रा म्हणून देखील ओळखले जाते.
उमलुज :
उमलुज हे सौदी अरेबियाचा मालदीव म्हणून ओळखले जाते. ही राज्यात म्हणून ओळखले जाते. हे सौदी अरेबियाच्या वायव्येकडील यानबूच्या उत्तरेस 1 कि.मी. लाल समुद्राच्या अगदी पुढे आहे.
एज ऑफ द वर्ल्ड, रियाध :
येथे नैसर्गिक लोकप्रियता आहे. जेबेल फिऱ्हेन या आश्चर्याचे अरबी नाव आहे. येथील नैसर्गिक आश्चर्य केवळ काही वर्षातच लोकप्रिय झाले. येथे तीनशे मीटर उंच उंच कड्यातले काही आश्चर्यकारक दृश्य आहे.
ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांना शेअर करा.
हे निबंध सुद्धा अवश्य वाचा :-
- Essay On Makar Sankranti In Marathi
- Rainy Season Essay In Marathi
- Global Warming Essay In Marathi
- Importance Of Education Essay In Marathi
- Essay On Abdul Kalam In Marathi
- Essay On Holi In Marathi
- Essay On Navratri in Marathi
- Essay On Mahashivratri In Marathi
FAQ
सौदी अरेबिया कोणता देश आहे?
सौदी अरेबिया हे मध्य पूर्वेतील सर्वात मोठे अरब देश आहे. याच्या उत्तरेला आणि ईशान्येला जॉर्डन आणि इराक, पूर्वेला कुवेत, कतार, बहरीन आणि संयुक्त अरब अमिराती, आग्नेयेला ओमान आणि दक्षिणेला येमेन आहे.
सौदी अरेबिया या देशाचे चलन काय आहे?
या देशाचे चलन सौदी रियाल आहे.
सौदी अरेबिया कशासाठी प्रसिद्ध आहे?
सौदी अरेबिया तेलासाठी प्रसिद्ध आहे
सौदी अरेबियाची संस्कृती काय आहे?
सौदी परंपरांचे मूळ इस्लामिक शिकवणी आणि अरब रीतिरिवाजांमध्ये आहे, ज्याबद्दल सौदी लोक लहान वयातच त्यांच्या कुटुंबियांकडून आणि शाळांमध्ये शिकतात.
सौदी अरेबियातील कौटुंबिक जीवन काय आहे?
सौदी अरेबियातील कुटुंबे सामान्यतः पितृवंशीय आणि पितृस्थानी असतात, याचा अर्थ वधू लग्नाच्या वेळी त्यांच्या पतीच्या घरी जाते आणि कौटुंबिक वंश वडिलांद्वारे चालते.