Sanvidhan Information In Marathi कुठलीही छोटी-मोठी संस्था असू देत तिच्या कारभार चालण्यासाठी नियम हे असावेच लागतात. तर मग एवढा मोठा देश चालवण्यासाठी नियम निश्चितच असणार की नाही? मात्र हे देश चालवण्याचे नियम अतिशय काळजीपूर्वक बनविले जातात, ज्याला आपण संविधान म्हणून ओळखतो.
संविधानची संपूर्ण माहिती Sanvidhan Information In Marathi
ज्यावेळी भारताला स्वातंत्र्य मिळाले त्यादरम्यानच भारतासाठी एक संविधानसभा असावी आणि तिने भारताचे संविधान बनवावे अशी चर्चा सुरू होती, जिला तीन सदस्य कॅबिनेट मिशन ने पूर्णविराम मिळाला. आणि भारतासाठी एक सार्वभौम अशी संविधान सभा बनविण्यात आली. या संविधान सभेने अथक परिश्रम करून पावणेतीन ते तीन वर्षाच्या कालावधीत भारतासाठी संविधान तयार केले. आजच्या भागामध्ये आपण भारतीय संविधानाबद्दल माहिती बघणार आहोत…
नाव | संविधान |
बनवण्यासाठी सुरुवात | ९ डिसेंबर १९४६ |
संविधान स्वीकृती | २६ नोव्हेंबर १९४९ |
संविधान लागू | २६ जानेवारी १९५० |
संविधानावर स्वाक्षऱ्या | २८४ सदस्य |
स्वाक्षरी दिनांक | २४ जानेवारी १९५० |
संविधान बनवण्यासाठी लागलेला वेळ | २ वर्षे, ११ महिने, १८ दिवस |
संविधान लेखक | प्रेम बिहारी नारायण रायजादा, आणि वसंत कृष्ण वैद्य |
एकूण अधिवेशने: ११
दोन विभाग | कायदे निर्मिती आणि संविधान निर्मिती |
भागांची संख्या | २५ |
परिशिष्टांची संख्या | १२ |
कलमांची संख्या | ४६८+ |
संविधान म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर एक जाडजूड पुस्तक येतं, याचं कारण म्हणजे तब्बल पावणेचार किलो वजनाच्या या संविधानामध्ये संपूर्ण देशाचे चाल-चलनाचे कायदे समाविष्ट करून ठेवण्यात आलेले आहेत.
आपला देश जवळपास दीडशे वर्ष इंग्रजांच्या पारतंत्र्यात होता, हे आपण सर्वजण जाणतो. या काळात इंग्रजांनी विखुरलेल्या भारताला एकछत्री अमलाखाली आणले. आणि यासोबतच प्रशासकीय यंत्रणा देखील विविध स्तरावर निर्माण केली, यामुळे भारत एकसंध रहायला मदत मिळाली. आणि हे कारण भारतीय राजकारण्यांनी हेरले. ज्यावेळी भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या हालचाली सुरू झाल्या, त्यावेळी भारत हा एकसंध रहावा म्हणून तत्कालीन नेत्यांनी प्रयत्न सुरू केले.
त्यांनी भारताला एक नियमांमध्ये बांधण्याची योजना आखली, जेणेकरून हे नियम सर्वांना मान्य असतील आणि या नियमांच्या आधारे चालवलेले राज्य सर्वांचे हिताचे आणि कल्याणाचे तर असेलच, शिवाय यामुळे भारताच्या एकतेला अन एकात्मतेला तडा जाणार नाही. यासाठी तत्कालीन भारतीयांनी इंग्रज सरकारकडे संविधान सभेचे मागणी करण्यास सुरुवात केली. अनेक दिवस ही मागणी धुडकावल्यानंतर सर्वप्रथम १९४० ला इंग्रजांनी भारतीयांसाठी एक ऑगस्ट ऑफर नावाची योजना आणली.
त्या अंतर्गत इंग्रजांनी सांगितले की भारतीयांसाठी एक संविधान सभा बनवण्यात येईल, मात्र यामध्ये केवळ मुख्यतः भारतीय असतील, असे सांगण्यात आले. पूर्णतः भारतीयांनी बनलेली ही सभा नसल्यामुळे भारतीयांनी यावर बहिष्कार टाकला. पुढे दुसऱ्या महायुद्धामुळे इंग्रज सरकार भारतामध्ये राज्यकारभार चालवण्यास हळूहळू दुबळे ठरत चालले होते, त्यामुळे त्यांनी भारताला १९४२ मध्ये दुसरी ऑफर दिली.
त्यामध्ये सर स्टॅफर्ड क्रिप्स यांच्या अध्यक्षतेखाली भारतीयांना पूर्णतः भारतीयांनी बनलेली संविधान सभा देऊ केली, मात्र या बदल्यात दुसऱ्या जागतिक महायुद्धामध्ये भारताने इंग्लंडच्या बाजूने मदत करावी अशी अट ठेवण्यात आली. मात्र कुठल्याही अटी शर्तीने दिलेली संविधान सभा भारतीयांना मान्य नसल्याने ही ऑफर देखील भारतीयांनी धुडकावून लावली.
शेवटी १९४६ मध्ये ए. व्ही. अलेक्झांडर, सर स्टेफर्ड क्रिप्स आणि पॅथिक लॉरेन्स या तीन इंग्रज अधिकाऱ्यांनी भारताला कुठल्याही अटी शर्ती शिवाय संपूर्णतः भारतीयांनी बनलेली संविधान सभा देऊ केली, सोबतच संविधान सभेच्या निवडणुकीची योजना देखील सादर केली आणि भारतीयांनी ही योजना स्वीकारली.
या निवडणूक योजनेअंतर्गत संविधान सभेतील जागा या कमिशनरांच्या आणि गव्हर्नरच्या प्रांतांमध्ये आणि संस्थानिकांमध्ये वाटून देण्यात आल्या होत्या. यातील प्रांतांच्या जागांसाठी निवडणूक घेण्यात येणार होती ज्यास १९३५ च्या कायद्याने प्रांतामध्ये निवडून गेलेल्या लोकप्रतिनिधींना मतदान करायचे होते.
संविधान सभा ज्यावेळी तयार झाली त्यावेळेस तिच्यामध्ये तब्बल ३८९ सदस्य होते, मात्र ३ जून १९४६ रोजी भारताचे तत्कालीन इंग्रज अधिकारी माउंटबॅटन यांच्या माउंटबॅटन योजना अंतर्गत भारताची फाळणी करण्यात आली. आणि भारत व पाकिस्तान अशी दोन राष्ट्रे निर्माण करण्यात आली, ज्यामुळे संविधान सभेची सदस्य संख्या कमी होऊन ती २९९ इतकीच राहिली. या सदस्य संख्येमध्ये नेहमी मृत्यू, राजीनामा इत्यादी गोष्टींमुळे बदल होत राहिले, आणि शेवटी संविधान पूर्णत्वा वेळी २८४ सदस्य उरले.
संविधानाचे मूळ हस्तलिखित प्रेम बिहारी नारायण रायजादा यांनी लिहिले आहे, जे इंग्रजी भाषेतून आहे. आणि त्याची हिंदी प्रत वसंत कृष्ण वैद्य यांनी लिहिली आहे. २२ बाय १६ इंच आकाराच्या कागदावर या मूळ प्रती लिहिण्यात आलेल्या असून, त्यामध्ये व्योहर राम मनोहर सिन्हा यांनी आपल्या सुंदर हस्ताक्षरात प्रस्तावनेचा भाग लिहून त्यामध्ये विविध देवी देवतांचे चित्र काढत, सुंदर कलात्मक काम केलेले आहे. तसेच त्यांनी घटनेमध्ये इतरही पानांवर असेच सुंदर नक्षीकाम केलेले आहे.
ज्यावेळेस घटना लागू झाली तेव्हा घटनेमध्ये सुमारे २२ भाग ८ परिशिष्टे आणि ३९५ कलम होती, मात्र घटनेमध्ये वेळोवेळी दुरुस्त होत गेल्या, आणि आज ही संख्या २५ भाग १२ परिशिष्टे आणि ४६८ पेक्षा जास्त कलमे अशी झालेली आहे. मात्र नवीन जोडलेल्या कलमांना उपकलमांचा क्रमांक देण्यात आल्याने शेवटचे कलम नेहमीच ३९५ हेच राहणार आहे.
निष्कर्ष
संविधान म्हणजे प्रत्येक देशाचा कणा असतो. या संविधानाच्या आधारावरच देश आपली वाटचाल करत असतो, देशाने कोणती धोरणे अवलंबवावी, नागरिकांना कुठले हक्क द्यावेत, नागरिकांसाठी काय तरतुदी असाव्यात, या संदर्भातल्या सर्व तरतुदी संविधानामध्ये बघायला मिळतात.
थोडक्यात काय तर संविधान म्हणजे देश चालवण्यासाठी आणि नागरिकांचे कल्याण करण्यासाठी बनवण्यात आलेला एक अधिकृत दस्तऐवज असतो. काही देशांच्या घटना या लिखित तर काही देशांच्या घटना या अलिखीत असतात. भारताने आपली घटना लिखित स्वरूपात तयार केलेली आहे, जी संसदेच्या लायब्ररीमध्ये हेलियमने भरलेल्या डब्यामध्ये ठेवण्यात आलेली आहे. त्यास आपण भेट देऊन बघूही शकता.
जसजसं काळ पुढे सरकतो, तसतसे देशाच्या राजकारभारातील तत्त्वे देखील बदलत जातात. तसेच संविधानातील काही तरतुदी कालबाह्य देखील होत चालतात, यासाठी भारताने घटनादुरुस्तीची तरतूद आधीच करून ठेवली आहे. त्यामुळे आजपर्यंत तब्बल १०० पेक्षा जास्त वेळा भारतीय घटनेत योग्य वेळी दुरुस्ती करण्यात आलेली आहे. त्यामुळे नागरिकांच्या आणि देशाच्या कल्याणात भरत पडत चालली आहे.
FAQ
भारतीय संविधान कोणत्या प्रकारातील आहे?
भारतीय संविधान हे लिखित प्रकारातील आहे.
भारतीय संविधानात असणाऱ्या भागांमध्ये काही बदल करण्यात आला आहे का?
होय, भारतीय संविधानामध्ये वेळोवेळी घटनादुरुस्ती करून भागांच्या संख्येमध्ये फेरबदल करण्यात आला आहे. घटना लागू झाली तेव्हा असणाऱ्या २२ भागांचे सध्या २५ भाग झालेले आहेत.
संविधानावर सर्वात वर कोणाची सही आहे?
सही करण्याच्या क्रमानुसार सर्वप्रथम पंडित नेहरूंनी सही केलेली असली, तरी देखील कागदावर राजेंद्र प्रसादांची सही सर्वात वर आहे.
संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते?
संविधान सभेचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद हे होते.
संविधान सभेमध्ये इंग्रजांचा समावेश होता का?
इंग्रजांनी पूर्णतः भारतीयांनी बनलेली संविधान सभा असेल अशी मागणी मान्य केल्याने संविधानात केवळ भारतीयांचा समावेश होता.
आजच्या भागामध्ये आपण संविधान अर्थात भारताच्या राज्यघटने बद्दल सखोल माहिती पाहिली. ही माहिती शालेय विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांच्या फायद्याची ठरेल यात काही शंका नाही. या माहिती विषयीच्या आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवतानाच आपल्या जिवलगांना ही माहिती शेअर करण्यास देखील विसरू नका.
धन्यवाद…