Sant Savata Mali Information In Marathi बाराव्या शतकामध्ये होऊन गेलेले एक हिंदू संत म्हणजे संत सावता माळी होय. संत नामदेव यांच्या समकालीन असणारे एक विठ्ठल भक्त म्हणून त्यांची ओळख होती. देवू माळी हे संत सावतामाळी यांचे आजोबा होते. ते पोटापाण्यासाठी सोलापूर या जिल्ह्यामधील अरण या गावामध्ये स्थायिक झाले होते. या देवू माळी यांना परसू व डोंगरे नावाचे दोन मुले होती. त्यातील परसू हे सावता माळी यांचे वडील.
संत सावता माळी यांची संपूर्ण माहिती Sant Savata Mali Information In Marathi
डोंगरे यांचा लवकरच मृत्यू झाल्यामुळे परसू हे एकटेच राहिले, ज्यांनी नंदिताबाई यांच्याशी विवाह करून आपले संपूर्ण आयुष्य भागवत धर्माचा अनुयायी म्हणून अत्यंत गरिबीमध्ये काढले. संत सावता माळी यांचा जन्म १२५० यावर्षी झाला होता. लहानपणापासून ते एका अध्यात्मिक घरात वाढले होते, त्यामुळे त्यांनी सुद्धा आध्यात्मिक आणि धार्मिक असणाऱ्या घराण्यातील जनाबाई यांच्याशी लग्न केले. सावता माळी आपल्या गावामध्ये फुलांची शेती करताना दिवसभर विठोबाचे नामस्मरण करत असत…
नाव | सावतोबा |
ओळख | संत सावता माळी |
जन्म | इसवीसन १२५० |
आयुष्य | अवघे ४५ वर्ष |
आईचे नाव | नंगीताबाई माळी |
वडिलांचे नाव | परसु किंवा परसुबा माळी |
पत्नीचे नाव | जनाबाई माळी |
मुख्य व्यवसाय | फुलांची शेती |
निधन वर्ष | इसविसन १२९५ |
श्री संत सावता माळी यांच्या विषयी एक आख्यायिका सांगितली जाते, ती म्हणजे संत सावता माळी आपला शेती व्यवसाय सोडून विठ्ठलाचे दर्शनाला पंढरपूरला जाऊ शकत नसायचे. त्यामुळे ते आपल्याच शेतामध्ये विठ्ठलाचे नामस्मरण करत असत. एकदा असेच शेतीमध्ये काम करत असताना ते विठ्ठलाचे नामस्मरण करत होते.
त्याचवेळी त्यांच्या सासुरवाडीहून काही मंडळी त्यांना भेटण्यासाठी आली. त्यावेळी आपण पंढरपूरला जाऊ शकत नाही म्हणून खुद्द पांडुरंग आपल्या भेटीला आलेला आहे असे त्यांना वाटले, त्यामुळे त्यांनी अजूनच मोठ्याने विठ्ठलाचे नामस्मरण सुरू केले. मात्र त्यांच्या पत्नीला असे वाटले की माझ्या माहेरील माणसांकडे संत सावतामाळी दुर्लक्ष करत आहेत, त्यामुळे त्या रागावल्या. मात्र संत सावता माळी यांच्या अतिशय मधुर वाणीने आणि समजाविण्याच्या चांगल्या स्वरूपामुळे त्या लवकरच समजल्या.
केवळ अध्यात्मामध्येच व्यस्त न होता आपण आपल्या कर्तव्य आणि कर्माकडे सुद्धा लक्ष दिले पाहिजे, आणि सोबतच विठ्ठल भक्ती केली पाहिजे अशी प्रामाणिक शिकवण श्री संत सावता माळी यांनी दिली होती. ते वारकरी संप्रदायातील एक ज्येष्ठ व प्रसिद्ध संत म्हणून ओळखले जातात. ते भगवान विठ्ठलाला मानत असत. मात्र असे असले तरी देखील त्यांनी कधीही पंढरपूरची वारी केली नाही. त्यांना कर्मयोगी म्हणून देखील ओळखले जाते. कारण आपल्या कर्माशी एकनिष्ठ राहत विठ्ठल भक्ती करणारे ते संत होते.
अध्यात्म आणि कर्म अर्थात काम यांचा योग्य मेळ घालून सर्व प्रकारच्या जबाबदाऱ्या योग्य रीतीने पार पाडणारे हे संत सावतामाळी होते. त्यांनी कधीही धर्मामध्ये असलेल्या अंधश्रद्धेवर बोट ठेवले नाही, मात्र ते स्वतः विठ्ठलाच्या भक्तीमध्ये कधीच कमी पडत नसत.
अनेक लोक भगवंताला प्रसन्न करण्यासाठी महाग वस्त्र दान करणे, किंवा भोजनदान करणे, किंवा देवधर्म करत सर्वत्र फिरणे किंवा वाऱ्या करणे असे करतात. मात्र संत सावता माळी यांनी सांगितले की भगवंताला प्रसन्न करायचे असेल तर कुठलेही तुमचे व्रत, वैकल्य, योग, जप कामाला येत नाही तर तुम्ही तुमच्या कर्मामध्ये सर्वस्व पणाला लावले, आणि त्यातच विठ्ठल शोधला की भगवान नक्कीच प्रसन्न होतो. संत सावता माळी यांच्या अभंगवणीमध्ये नेहमी मधुरता असे, अन त्यासोबतच शांतता, दया, करुणा, वात्सल्य, आणि भक्ती इत्यादी गोष्टी ओतप्रोत भरलेल्या असत.
संत सावता माळी यांचे मूळ गाव मिरज येथील औस हे होते, मात्र त्यांच्या आजोबांनी काही आर्थिक कारणास्तव अरण या गावांमध्ये वास्तव्य केले, आणि हे कुटुंब तेथेच कायमचे स्थायिक झाले. संत सावता माळी फुलांचा व्यापार देखील करत असत, आणि त्यामुळेच त्यांना व्यापार करता करता विठ्ठल भक्ती करण्याचा व्यासंग लागला.
त्यांना चराचरातील सर्वच गोष्टींमध्ये विठ्ठल दिसत असे, संत सावता माळी यांनी भांड या गावांमधील जनाबाई यांच्याशी विवाह केला आणि या दांपत्याला विठ्ठल व नागाताई नावाची दोन गोंडस अपत्य झाली.
संत सावता माळी यांनी जवळपास २५ पेक्षाही अधिक अभंग संग्रह लिहिलेले आहेत. त्यांच्या कासिम गुरव या अभंग संग्रहाचे संकलन करण्यात आलेले आहे.
संत सावता माळी यांनी आपल्या अभंगामधून केवळ विठ्ठल भक्तीच दर्शविली नाही, तर लोकांनी आपले कर्म करता करता विठ्ठल भक्ती करावी जेणेकरून आपले काम देखील होईल आणि वेळ देखील सत्कारणी लागेल.
संत सावतामाळी हे एक असाधारण व्यक्तिमत्व होते. खरे तर प्रत्येक अध्यात्मिक संत हा आपला प्रपंच सोडून ईश्वर भक्ती मध्ये आपला संपूर्ण वेळ खर्ची घालत असतो. मात्र या सगळ्यांच्या व्यतिरिक्त संत सावतामाळी यांनी आपले कर्म आणि विठ्ठल भक्ती यामध्ये योग्य तो समतोल साधला, आणि ते आपल्या अभंग व कीर्तनांमधून सुद्धा लोकांना कर्माशी एकनिष्ठ राहण्याचा सल्ला देत असत. जेणेकरून अध्यात्मा बरोबरच माणसाला प्रगती करणे देखील शक्य होईल.
निष्कर्ष:
विठ्ठल भक्ती मध्ये किती तल्लीन व्हावे याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे संत सावता माळी होय. त्यांनी आपले दैनंदिन कामकाज करतानाच विठ्ठलाची भक्ती देखील मनोभावे केली. ते आपले शेतीचे दैनंदिन काम करत असताना दिवसभर विठू माऊली चे नामस्मरण करत असत, आणि त्यातून त्यांना एक अलौकिक आनंद मिळे.
साठी ते विठ्ठलाची भजने म्हणणे किंवा विठ्ठलाची स्तुती पर गाणी गाणे इत्यादी गोष्टी करत. त्यांना या नामस्मरणादरम्यान कधीही तहानभूक लागत नसे, इतके ते विठ्ठल भक्ती मध्ये लीन होऊन जात. त्यांच्या या विठ्ठल भक्तीचे अनेक किस्से आपल्याला विविध ठिकाणी ऐकायला किंवा वाचायला मिळतात.
या संत सावता माळी यांच्याकडून शिकण्यासारखे बरेच काही आहे, त्यातील एक महत्त्वाचा घटक म्हणजे देवाची भक्ती करताना आपण आपले काम सोडणे गरजेचे नाही. आपण आपले काम करतानाच अगदी मनापासून विठ्ठलाची भक्ती केली तर विठ्ठल देखील आपल्याला कुठेही काही देखील कमी पडू देत नाही.
FAQ
संत सावता माळी यांचा जन्म कोणत्या वर्षी झालेला होता?
संत सावता माळी यांचा जन्म इसवी सन १२५० या वर्षी झाला होता.
संत सावता माळी हे कोणत्या राज्यातील संत होते?
संत सावता माळी हे महाराष्ट्र या राज्यांमधील संत होते.
संत सावता माळी उदरनिर्वाहासाठी कशाचा व्यवसाय करत असत?
संत सावता माळी उदरनिर्वाहासाठी फुलांची शेती हा व्यवसाय करत असत.
संत सावता माळी यांना कशामध्ये विठ्ठल दिसत असे?
संत सावता माळी यांना फळे, फुले, पिके, भाजीपाला इत्यादी गोष्टींमध्ये विठ्ठल दिसत असे.
संत सावता माळी यांचे गाव कोणते होते?
संत सावता माळी यांचे गाव सोलापूर जिल्ह्यामध्ये असणारे अरण भांड हे होते.
आजच्या भागामध्ये आपण शेती व्यवसाय असणारे मात्र विठ्ठल भक्ती मध्ये अतिशय आनंद घेणारे एक संत अर्थात सावता माळी यांच्या विषयी माहिती बघितलेली आहे. या माहिती बाबत तुमच्या प्रतिक्रिया आणि सूचना आम्हाला कमेंट मध्ये अवश्य कळवा, आणि हा लेख तुमच्या इतरही आध्यात्मिक मित्र मैत्रिणींना अवश्य पाठवा.
धन्यवाद…