Sambhaji Bhide Information In Marathi संभाजी भिडे हे नाव आपल्यापैकी बऱ्याचशा जणांना माहितीच असेल, कारण संभाजी भिडे हे आपल्या वक्तव्यासाठी नेहमीच चर्चेत असतात. सांगलीचे राहणारे असणारे हे संभाजी भिडे महाराष्ट्र मधील एक पुरोगामी आणि हिंदुत्ववादी विचारसरणीचे पक्के कार्यकर्ते आहेत.
संभाजी भिडे यांची संपूर्ण माहिती Sambhaji Bhide Information In Marathi
बऱ्याच काळ हिंदू राष्ट्रवादी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संघटनेसाठी त्यांनी काम केलेले आहे. त्यानंतर त्यांनी १९८० या दशकाच्या उत्तरार्धात स्वतःची शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान ही संघटना स्थापन केली. शिवरायांचे विचार जगभर पसरविणे हे या संघटनेचे मूळ उद्देश होते.
आजच्या भागामध्ये आपण संभाजी भिडे अर्थात भिडे गुरुजी यांच्या विषयी माहिती बघणार आहोत.
नाव | संभाजी / मनोहर भिडे |
उप नाव | भिडे गुरुजी |
जन्म दिनांक | १० जून १९३३ |
जन्म ठिकाण | सबनिसवाडी, सातारा |
वास्तव्य | सांगली |
नागरिकत्व | भारतीय |
धर्म | हिंदू |
पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, मुंबई, आणि बेळगाव इत्यादी ठिकाणी मोठा चाहता वर्ग असणारे संभाजी भिडे हे भारतीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या निकटवर्तीय म्हणून समजले जातात.
फारसे माहीत नसलेले भिडे गुरुजी इसवी सन २००८ साली संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रकाशझोतात आले, त्याचे कारण म्हणजे ज्यावेळी जोधा अकबर या चित्रपटाचे प्रदर्शन झाले, त्यावेळी हा चित्रपट दाखवणाऱ्या चित्रपटगृहांची भिडे गुरुजींच्या अनुयायांनी तोडफोड केली. यासाठी त्यांना अटक देखील करण्यात आली होती. त्यानंतर भिडे गुरुजी सर्वत्र प्रसिद्ध झाले.
आज घडीला ८७ वर्षांचे असणारे भिडे गुरुजी यांचा जन्म सबनीसवाडी जिल्हा सातारा येथे झाला, सध्या मात्र ते महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यामध्ये वास्तव्य करत आहेत.
संभाजी भिडे यांच्या विषयी थोडक्यात माहिती:
मित्रांनो, संभाजी भिडे यांचे मूळ नाव मनोहर भिडे असे असून, त्यांचा जन्म १० जून १९३३ रोजी झाला. आपल्या मूळ गावी प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर पदवीचे शिक्षण घेण्यासाठी ते पुण्यात आले. तेथे त्यांनी आपले पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले.
त्यांनी १९८० पर्यंत हिंदू राष्ट्रवादी राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी कार्य केले, त्यानंतर मात्र त्यांनी स्वतःची शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान नावाची संस्था सुरू केली. आणि या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी छत्रपती शिवराय व शिवपुत्र संभाजी महाराज यांच्या विषयी जनजागृती करण्यास सुरुवात केली. संभाजी भिडे हे काही काळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थात आर एस एस या संस्थेशी देखील संबंधित राहिलेले आहेत.
इतरांना साधे जीवन जगण्याचा सल्ला देणारे संभाजी भिडे गुरुजी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात देखील अगदी साधेपणाने जीवन जगणे पसंत करतात. ते आज देखील सायकल आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करायला प्राधान्य देतात.
भिडे गुरुजी चर्चेमध्ये येण्याची कारणे:
संभाजी भिडे गुरुजी हे प्रखर हिंदुत्ववादी व्यक्ती आहेत. हे आपल्याला माहीतच आहे. त्यांच्या शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान या संघटनेने इसवी सन २००८ साली जोधा अकबर या चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध केला, मात्र तरीही हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आल्याने संभाजी भिडे गुरुजींच्या कार्यकर्त्यांनी ज्या ज्या चित्रपटगृहांनी हा सिनेमा दाखविला त्या त्या चित्रपटगृहांची तोडफोड करण्यास सुरुवात केली.
या घटनेमुळे संभाजी भिडे गुरुजी यांना अटक देखील करण्यात आली होती. तसेच इसवी सन २०१७ साली पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी यात्रेला उशीर झाल्याच्या कारणावरून देखील काही वाद निर्माण झाला होता.
संभाजी भिडे यांचा सर्वात मोठा वाद २०१८ साली झाला. त्याचे कारण म्हणजे १ जानेवारी २०१८ रोजी पुणे शहराजवळील भीमा कोरेगाव येथे विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी काही दलित बांधव जमले होते. हा विजयस्तंभ म्हणजे मराठा आणि दलित यांच्यातील लढाईच्या विजयाचे प्रतीक म्हणून उभारला गेला होता.
जी लढाई १ जानेवारी १८१८ रोजी झाली होती. यामध्ये दलितांनी ईस्ट इंडिया कंपनीकडून पेशव्यांविरुद्ध युद्ध केले होते. या घटनेला २०० वर्षे पूर्ण झाल्यामुळे तेथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमादरम्यान अनेक हिंदू संघटनांनी या कार्यक्रमाला बहिष्कृत केले, त्यामुळे त्या ठिकाणी हिंसाचार उसळला.
मोठ्या प्रमाणावर जाळपोळ करण्यात आली. याच घटनेच्या आधी काही दिवस संभाजी भिडे यांनी दलितांबाबत वक्तव्य केल्याने या घटनेचा मुख्य सूत्रधार म्हणून संभाजी भिडे यांच्याकडे बोट दाखवण्यात आले. या घटनेची चौकशी करण्यात यावी म्हणून सरकारने सत्यशोधक समितीची स्थापना केली. या समितीने अनेक पद्धतीने चौकशी केली, आणि या घटनेचा मुख्य सूत्रधार संभाजी भिडे गुरुजी हेच आहेत असा आरोप केला, त्यामुळे संभाजी भिडे गुरुजी खूपच चर्चेत आले होते.
संभाजी भिडे गुरुजी यांचे वैयक्तिक आयुष्य:
वैयक्तिक जीवनामध्ये भिडे गुरुजी हे अतिशय साध्या प्रकारचे जीवन जगतात, आणि ब्रह्मचर्याचे कसोशीने पालन करतात. ते कधीच चप्पल घालत नाहीत. त्यांच्या जेवणाची आणि राहण्याची सोय सुद्धा त्यांचे कार्यकर्तेच करत असतात. त्यांच्या भाषणाप्रमाणेच ते अतिशय साधे जीवन जगतात.
संभाजी भिडे गुरुजी यांची राजकारणातील सक्रियता:
संभाजी भिडे गुरुजी यांची अनेक राजकारणी लोकांशी जवळीक आहे, मात्र तरी देखील त्यांनी कधीही निवडणुकीमध्ये सहभाग घेतला नाही.
संभाजी भिडे गुरुजी व नरेंद्र मोदी यांचे घनिष्ठ संबंध असल्याचे सांगितले जाते, त्यांचे सोबतचे फोटो देखील बऱ्याचदा व्हायरल होतात. नरेंद्र मोदी संभाजी भिडे गुरुजी यांना केवळ गुरुजी या नावानेच हाक मारतात, जे त्यांच्यातील एक अतूट नाते दर्शविते. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असणारे छत्रपती उदयनराजे भोसले हे देखील संभाजी भिडे गुरुजी यांच्या समर्थनार्थ उभे असतात.
असे असले तरी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे आणि संभाजी भिडे गुरुजी यांचे पटत नाही, अशा नेहमी चर्चा होत असतात. त्यांच्यामध्ये नेहमी वाद पेटल्याचे देखील आपण बघतो.
निष्कर्ष:
स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये जहालवादी नेत्यांच्या गटाचे प्रमुख बाळ गंगाधर टिळक हे होते. त्यांचा तो धीर गंभीर आवाज, झुबकेदार मिश्या, आणि नेहमी मोहिमेवर निघायची तयारी. असे अगदी भारदस्त व्यक्तिमत्व होते. संभाजी भिडे गुरुजी यांच्याकडे बघितल्यानंतर नेहमी टिळक यांचीच आठवण येते, कारण सर्व बाबतीत संभाजी भिडे यांचे व्यक्तिमत्व हुबेहूब बाळ गंगाधर टिळकांसारखेच आहे.
आजकाल मात्र ते नेहमी चर्चित राहतात, आणि त्याचे कारण त्यांची वादग्रस्त विधाने. काही लोकांना त्या विधानांमध्ये बरोबर वाटते तर काहींना चूक.आता त्यांची विधाने बरोबर आहेत की चूक हा ज्याचा प्रश्न, मात्र संभाजी भिडे गुरुजी यांचे नेतृत्व गुण, संघटन कौशल्य आणि फटकेबाज भाषण बघितल्यावर कोणालाही त्यांचा हेवा वाटतो.
FAQ
भिडे गुरुजी यांचे खरे नाव काय आहे?
भिडे गुरुजी यांचे नाव मनोहर भिडे असे असून, ते मात्र आपले नाव संभाजी असे लावतात.
भिडे गुरुजींचा जन्म कुठे झाला?
भिडे गुरुजी यांचा जन्म सातारा जिल्ह्याच्या सबनीसवाडी येथे १० जून १९३३ रोजी झाला.
संभाजी भिडे गुरुजी यांचे पदव्युत्तर शिक्षण कोठे झाले?
संभाजी भिडे गुरुजी यांचे पदव्युत्तर शिक्षण पुण्याचा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे झाले.
संभाजी भिडे गुरुजी यांच्या संघटनेचे नाव काय आहे?
संभाजी भिडे गुरुजी यांच्या संघटनेचे नाव शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान असे आहे.
संभाजी भिडे गुरुजी यांचे निकटवर्तीय म्हणून कोणाला समजले जाते?
संभाजी भिडे गुरुजी यांचे निकटवर्तीय म्हणून नरेंद्र मोदी यांना समजले जाते.
आजच्या भागामध्ये आपण सध्या नेहमी चर्चेत राहणारे संभाजी भिडे गुरुजी यांच्या विषयी माहिती पहिली. ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. तसेच आपल्या इतरही मित्र-मैत्रिणींना ही माहिती नक्की शेअर करा.
धन्यवाद…