Pollution Information In Marathi प्रदूषण म्हटलं की आजकाल आपल्याला धसका बसत आहे. कुठेही गेलं तरी आपल्याला प्रदूषणाचा सामना करावा लागतो. आज घडीला केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या मूल्यांकनानुसार २०२२ मध्ये १५६ शहरातील तीन शहरे अशी आहेत, ज्यांची हवेची गुणवत्ता अतिशय नकारात्मक स्वरूपाची आहे. त्याचबरोबर २१ शहरे ही खराब गुणवत्तेची हवा असणारी आहेत.
प्रदूषणाची संपूर्ण माहिती Pollution Information In Marathi
प्रदूषण ही अशी एक जागतिक समस्या आहे जी संपूर्ण जगाला त्रासदायक ठरत आहे. मानवाने निसर्ग व्यवस्थेमध्ये हस्तक्षेप केल्यामुळे आज आपल्याला प्रदूषणाची फळे भोगावे लागत आहेत. चांगला धडा घेऊन प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न केले नाही, तर येणाऱ्या पिढीसाठी चांगले हवामान उरणार नाही. येणाऱ्या पिढीला शुद्ध हवा, शुद्ध अन्न, आणि शुद्ध पाणी याकरिता मुकावे लागेल. त्यामुळे प्रदूषण नियंत्रित करणे फार काळाची गरज ठरलेली आहे.
आजच्या भागामध्ये आपण प्रदूषणाविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत, चला तर मग सुरु करूया या ज्ञानवर्धक माहिती ला…
नाव | प्रदूषण |
प्रकार | सामाजिक |
वर्गीकरण | जलप्रदूषण, वायू प्रदूषण, मृदा प्रदूषण, ध्वनी प्रदूषण |
कारणे | अनावश्यक घटकांची आवश्यक घटकांमध्ये प्रमाण वाढणे |
उपाय | मानवाने निसर्गामध्ये हस्तक्षेप न करणे |
प्रदूषण म्हणजे काय:
प्रदूषण म्हणजे दुसरे तिसरे काही नसून, पर्यावरणामध्ये असणाऱ्या विविध साधन संपत्ती मध्ये दूषितपणा होणे होय. अर्थातच या घटकांची जेथे आवश्यकता असेल, त्यापेक्षा त्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढणे म्हणजे प्रदूषण असून, नैसर्गिक व्यवस्थेला यामुळे तडा जात असतो. त्याचबरोबर प्राणी व वनस्पती पर्यायाने संपूर्ण पर्यावरणाची हानी होत असते.
प्रदूषणाचे प्रकार:
प्रदूषण कोणत्या स्तरावर झालेले आहे, किंवा कोणत्या घटकात प्रदूषण झालेले आहे त्यानुसार प्रदूषणाचे विविध प्रकार पडत असतात. ज्यामध्ये वायू, जल, मृदा, ध्वनी, प्रकाश यासारख्या विविध प्रकारांचा समावेश होत असतो.
वायु प्रदूषण म्हणजे हवेमध्ये प्रतिकूल पदार्थांच्या प्रमाणाचे अधिक्य असणे होय. ज्यावेळी कारखाने, वाहने, यांच्यामधून विषारी बाहेर निघतात त्याला देखील वायू प्रदूषणाचा समजले जाते. या प्रकारच्या प्रदूषणामुळे श्वसन मार्गाच्या अनेक समस्या दिसून येत असतात. हे प्रदूषण फार झपाट्याने वाढत आहे, कारण उद्योगधंदे व वाहने यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. या प्रकारावर आळा आणण्यासाठी बी एस सिक्स प्रकारची वाहने वापरणे, सार्वजनिक वाहनांचा वापर वाढविणे, आणि कारखान्याच्या धुरावर प्रक्रिया करणे, किंवा त्यांच्या चिमण्या उंचावर सोडणे इत्यादी उपाय केले जाऊ शकतात.
त्याचप्रमाणे जलप्रदूषण म्हणजे स्वच्छ पाण्यामध्ये दूषित पदार्थ मिसळणे होय. यामध्ये अनेक स्वरूपाचा कचरा पाण्यामध्ये टाकला जातो. या प्रदूषणाचे मुख्य स्त्रोत हे औद्योगीकरण क्षेत्रामधील कंपन्या असून, विघटनशील प्रदूषण असेल तर त्याचे रूपांतर पुन्हा स्वच्छ पाण्यामध्ये केले जाऊ शकते. मात्र अविघटनशील कचरा व दूषित पदार्थांमुळे पाणी कायमसाठी दूषित होत असते.
मृदा प्रदूषण हा देखील प्रदूषणाचा प्रकार असून, जमिनीमध्ये अनेक प्रकारचा कचरा वाढणे, जमिनीची सुपीकता नष्ट होणे, आणि जमिनीवर कुठल्याही प्रकारची पिके न उगवणे, याला मृदा प्रदूषण म्हणून ओळखले जाते.
ध्वनी प्रदूषण हा देखील एक प्रदूषणाचा प्रकार आहे. याबद्दल हल्ली दिवाळीच्या काळामध्ये फार चर्चा होताना आपण बघत असतो. विविध प्रकारचे कारखाने, त्यामधील यंत्रसामग्री, फटाके, लाऊड स्पीकर, रस्त्यांवरील वाहतूक, लोकांचे मोठ्याने बोलणे, इत्यादी गोष्टीमुळे ध्वनी प्रदूषण मोठ्या प्रमाणावर होत असते. या ध्वनी प्रदूषणामुळे माणसाचा स्वभाव चिडचिडा होऊ शकतो. तसेच त्याच्या मनावर नकारात्मक परिणाम दिसून येत असतात. त्याचबरोबर ऐकण्याची क्षमता देखील घटत असते.
प्रदूषणाचा आणखी एक प्रकार डोके वर काढू लागला आहे, तो म्हणजे प्रकाश प्रदूषण होय. मुख्यतः संध्याकाळच्या वेळी प्रकाश असेल तर माणसाच्या झोपेचे चक्र बिघडण्यास सुरुवात होते. शहराच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर प्रकाश पसरलेला असतो, त्यामुळे शहरी भागांमध्ये लोकांना लवकर झोप येत नाही. हा एक प्रदूषणाचा प्रकार असून, त्याचे दुष्परिणाम हल्ली दिसू लागले आहेत.
विविध प्रकारचे स्फोट, खाणकाम, इत्यादीमुळे किरणोत्सर्गी प्रदूषण किंवा रेडिओॲक्टिव्ह प्रदूषण वाढत चाललेले आहे.
थर्मल प्रकाराचे प्रदूषण देखील हल्ली सुरू झालेले असून, ज्यावेळी विविध ठिकाणी तापमान नियंत्रित करण्याकरिता विविध घटक वापरले जातात, त्यावेळी या प्रदूषणाची निर्मिती होते. त्याच प्रकारे दृश्य प्रदूषण हा एक प्रदूषणाचा प्रकार असून, विविध बहुमजली इमारती, मोटार गाड्या, होर्डिंग यामुळे दूरपर्यंत दिसणे कमी होते. याला दृश्य प्रदूषण असे म्हटले जाते.
जगभरामध्ये अनेक प्रदूषित शहरे असून, काही शहरांचे प्रदूषण मोठ्या प्रमाणावर वाढत चाललेले आहे. यामध्ये वाराणसी, कानपूर, दिल्ली, पेशावर, पाटणा, कराची, हेझ, बेमेंडा, मॉस्को, आणि बीजिंग इत्यादी शहरांचा समावेश होत आहे.
निष्कर्ष:
प्रदूषण ही आज जागतिक पातळीवरची समस्या बनलेली असून, त्यामुळे मानवाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. या सृष्टीमधील वनस्पती प्राणी यांना देखील या प्रदूषणाचा फटका बसत आहे. त्यामुळे प्रदूषण कमी करणे काळाची गरज ठरलेली आहे.
आजच्या भागांमध्ये आपण प्रदूषणाविषयी संपूर्ण माहिती बघितली आहे. त्यामध्ये प्रदूषण म्हणजे काय, प्रदूषणाचे विविध प्रकार काय असतात, ज्यामध्ये वायू प्रदूषण, जलप्रदूषण, ध्वनी प्रदूषण, जमीन प्रदूषण, प्रकाशाचे प्रदूषण, थर्मल प्रदूषण, दृश्य प्रदूषण, आणि किरणोत्सर्गी प्रदूषण इत्यादी वेगवेगळ्या प्रकारची माहिती घेतली आहे.
त्याचबरोबर जगामध्ये व भारतामध्ये असणाऱ्या शहरांपैकी सर्वात प्रदूषित शहरे कोणती आहेत, प्रदूषण कसे कमी करावे, इत्यादी गोष्टींबद्दल माहिती बघितली आहे. त्याचबरोबर काही नेहमी विचारले जाणारे प्रश्न देखील बघितलेले आहेत.
FAQ
प्रदूषण म्हणजे काय?
प्रदूषण म्हणजे कोणत्याही घटकांमध्ये आवश्यक असणाऱ्या घटकांपेक्षा अनावश्यक असणाऱ्या घटकांचे प्रमाण वाढणे, म्हणजे प्रदूषण असते. जसे हवेमध्ये उपयुक्त वायू पेक्षा विषारी वायूंचे प्रमाण वाढले, की आपण त्याला प्रदूषित वायू म्हणतो. त्याचप्रमाणे इतर घटकांचे सुद्धा आहे.
प्रदूषणामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या प्रदूषणांचा समावेश होतो?
प्रदूषणामध्ये वायू प्रदूषण, जलप्रदूषण, ध्वनी प्रदूषण, जमीन प्रदूषण अर्थात मृदा प्रदूषण, किरणोत्सर्गी प्रदूषण, प्रकाशाचे प्रदूषण, दृश्य प्रदूषण आणि थर्मल प्रदूषण इत्यादी प्रकारांचा समावेश होतो.
मुख्यतः प्रदूषण कशामुळे होत असते?
प्रदूषण होण्यामागे अनेक कारणे असली, तरी देखील जीवाश्म इंधन जाळणे, वाहने चालविणे, शेतीमध्ये विविध रासायनिक घटक टाकणे, आणि विविध उद्योग व्यवसाय चालविणे इत्यादी गोष्टींमुळे प्रदूषण होत असते.
प्रदूषण थांबवणे काळाची गरज का ठरत आहे?
प्रदूषणामुळे मानवी आरोग्यासह पर्यावरणावर फार घातक परिणाम होत आहेत. त्यामुळे हवा, पाणी, जमीन यांसारखे नैसर्गिक संसाधन नाश पावत चालले आहेत. त्याचबरोबर आरोग्याच्या समस्या देखील उद्भवत आहेत. असेच प्रदूषण सुरू राहिले, तर पुढे येणाऱ्या भावी पिढ्यांसाठी जगणे मुश्किल होईल. तसेच त्यांना नैसर्गिक साधन संपत्ती चांगल्या स्थितीत उरणार नाही, म्हणून प्रदूषणात थांबवणे काळाची गरज ठरत आहे.
प्रदूषणामुळे कोणकोणत्या स्वरूपाचे परिणाम दिसून येत असतात?
प्रदूषणामुळे पर्यावरणावर गंभीर परिणाम होण्याबरोबरच मानवी आरोग्यावर देखील अनेक नकारात्मक परिणाम दिसून येतात. ज्यामध्ये हृदय विकार, फुफुसांचा कर्करोग, श्वास घ्यायला त्रास होणे, विविध श्वसन मार्गाचे संसर्ग होणे, यांसह अनेक अल्पमुदतीचे व दीर्घ मुदतीचे परिणाम होत असतात.
आजच्या भागामध्ये आपण प्रदूषण म्हणजे काय, या विषयावर सखोल चर्चा केलेली आहे, व त्याबद्दल माहिती घेताना त्याचे विविध प्रकार देखील जाणून घेतलेले आहेत. ही माहिती नक्कीच तुमच्या फायद्याची ठरली असेल, अशी आम्हाला आशा आहे. ही माहिती इतरांना देखील फायदेशीर ठरावी, याकरिता या माहितीला जास्तीत जास्त शेअर करून, तुम्ही या महत्त्वाच्या कार्यामध्ये हातभार लावू शकता.