Panna Stone Information In Marathi रत्न आणि आभूषणे हे प्रत्येकालाच आवडत असतात. त्यातीलच एक महत्त्वाचे रत्न म्हणजे पन्ना होय. पन्ना हे अतिशय मौल्यवान व आकर्षक असणारे रत्न आहे. हिरव्या रंगांमध्ये असणारे हे रत्न पाहणाऱ्याला आपल्याकडे खिळवून ठेवत असते.

पन्ना रत्नाची संपूर्ण माहिती Panna Stone Information In Marathi
पुराणानुसार नऊ रत्ने आहेत, त्यापैकी एक असणारे रत्न म्हणजे पन्ना होय. हे पन्ना रत्न बुध या ग्रहाचे प्रतीक मानले जाते. पन्ना रत्न घालणाऱ्या व्यक्तीच्या परिस्थितीमध्ये अनुकूल बदल घडवून येतात, आणि ईश्वराचा आशीर्वाद कायम त्याच्या पाठीशी असतो असे म्हटले जाते. पन्ना रत्न धारण करण्याकरिता सोने किंवा चांदी हे सर्वोत्तम धातू मानले जातात.
पन्ना हे रत्न ब्रेसलेट, पेंडंट, अंगठी, नेकलेस, इत्यादी आभूषणांमध्ये वापरले जाते. मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण पन्ना या नवरत्नांपैकी एक असणाऱ्या रत्नाबद्दल माहिती घेणार आहोत…
नाव | पन्ना |
प्रकार | रत्न |
कुटुंब | नवरत्नांपैकी एक |
वापर | आभूषणे किंवा अलंकार बनवण्यात |
फायदे | भरभराटीसाठी |
पन्ना रत्नाचा उगम:
पन्ना या रत्नाचा उगम तुर्की किंवा पर्शियन संस्कृतीमध्ये झाला असावा असे सांगितले जाते. पन्ना या रत्नाच्या नामकरनामागे एमराल्ड हा लॅटिन शब्द आहे असे देखील सांगतले जाते. तसेच एक सेमेटिक शब्द इजमारगड या शब्दाचा देखील पन्ना नावाशी संबंध आहे. कारण त्याचा अर्थ हिरवा किंवा पन्ना असा होतो.
पन्ना रत्न धारण करण्याचे फायदे:
- पन्ना रत्न धारण करणाऱ्या व्यक्तीची बुद्धिमत्ता आणि चपळपणा मोठ्या प्रमाणावर वाढत असते.
- पन्ना हे रत्न बुध ग्रहाशी संबंधित असल्यामुळे, बुद्धिमत्तेसह व्यक्तिमत्व, कला, शहाणपणा, आणि सर्जनशीलता इत्यादी गुण वाढण्यास मदत होते.
- पन्ना हे रत्न समर्पण आणि विश्वासार्हता याचे प्रतीक असल्यामुळे, समोरच्यावर चांगली छाप पडण्यास मदत होते.
- पन्ना परिधान केल्यामुळे व्यक्तीची स्मरणशक्ती वाढते, आणि मन देखील खंबीर होण्यास मदत मिळते.
- ज्या लोकांना संभाषण करण्यामध्ये अडथळा येतो, किंवा लाज वाटते त्यांच्यासाठी पन्ना हे रत्न धारण करण्याचा सल्ला दिला जातो.
- व्यावसायिक लोकांसाठी पन्ना खूपच फायदेशीर आहे, यामुळे व्यवसायामध्ये भरभराट होण्यास मदत मिळते.
- जे लोक लेखक असतील किंवा माहिती प्रसारण, दूरसंचारण, टेलिफोन, रेडिओ, कनेक्टिव्हिटी किंवा रेल्वे यांसारख्या विभागांमध्ये काम करत असतील त्यांच्यासाठी पन्ना हे रत्न परिधान करण्याचा सल्ला दिला जातो.
- पन्ना हे रत्न कलेसाठी सुद्धा उत्तम समजले जाते. त्यामुळे जे चित्रकला, संगीत, नृत्य,साहित्य, इत्यादी विषयातील कलाकार असतील त्यांच्यासाठी पन्ना या रत्ना पासून बनवलेल्या अंगठ्या किंवा पेंडंट परिधान करणे खूपच फायदेशीर ठरते. तसेच यामुळे माणसाच्या मेंदूचा विकास होऊन तो अधिक कल्पकतेने कलेला न्याय देऊ शकतो.
- पन्ना बुध ग्रहाशी संबंधित असल्यामुळे आणि बुध ग्रह वाणीची देवता असल्यामुळे पन्ना धातू परिधान करणाऱ्या लोकांमध्ये वकृत्व गुण चांगला आढळून येतो. ही लोक उत्तम वक्ते असतात. तसेच समोरच्याशी संभाषण करताना ते अधिक चांगल्या पद्धतीने करू शकतात.
- पाचू या रत्नाचा वैवाहिक जीवनामध्ये देखील खूपच फायदा होतो. वैवाहिक जोडप्यांना पन्ना या ग्रहाच्या अंगठ्या घालण्याचा सल्ला दिला जातो.
- विद्यार्थ्यांकरिता सुद्धा पन्ना अतिशय उत्तम असते. यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर चांगला प्रभाव होतो, असे सांगितले जाते. चांगला आर्थिक फायदा मिळावा याकरिता व्यापारी वर्गाकडून सुद्धा पन्ना रत्नांची आभूषणे वापरली जात असतात.
- सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे पन्ना रत्न धारण केलेल्या व्यक्तींना शक्यतो आरोग्याच्या समस्या जाणवत नाहीत. तसेच ज्यांना आधीपासूनच आरोग्याच्या समस्या आहेत त्यांना देखील आराम मिळतो.
कोणत्या प्रकारच्या लोकांनी पन्ना रत्न धारण करण्याचा सल्ला दिला जातो:
ज्या लोकांची रास ही मिथुन अथवा कन्या असेल, त्यांनी पन्ना रत्न घालावे असे सांगितले जाते. मात्र त्यांच्या कुंडलीतील ग्रहांची स्थिती तपासणी करणे तेवढेच गरजेचे असते.
मिथुन राशीच्या व्यक्तींना कौटुंबिक त्रास असेल तर अशा लोकांना देखील पन्ना धारण करण्याचा सल्ला दिला जातो.
ज्या लोकांवर बुध ग्रहाची कुदृष्टि पडली असेल आणि बुध आठवे किंवा बारावे घर सोडून इतर घरात असेल तरीदेखील पन्ना घालणे फायदेशीर असते.
ज्या लोकांच्या कुंडली मधील मंगळ, बुध, शनि, व राहू या ग्रहांनी आघाडी केली असेल व त्यांना नोकरीची समस्या जाणवत असेल तरीदेखील पन्ना हे रत्न घालण्याचा सल्ला दिला जातो.
पन्ना कोणी धारण करू नये:
- ज्या लोकांच्या कुंडली मधील बुध हा तिसऱ्या किंवा बाराव्या घरात असेल त्यांनी पन्ना हे रत्न धारण करू नये.
- बुध हा ग्रह आठव्या किंवा बाराव्या घरात असताना बुध ग्रहाची कुदृष्टि असेल तेव्हा देखील पन्ना धारण करू नये.
- बुध ग्रह जर सहा, आठ किंवा बारा या अंकांचा अधिनस्त असेल तरीदेखील पन्ना रत्न धारण करणे खूप मोठे नुकसानदायी ठरू शकते.
- मित्रांनो, कुठलेही रत्न धारण करताना ज्योतिषांचा सल्ला अवश्य घ्यावा, जेणेकरून कुठलेही नुकसान होणार नाही.
निष्कर्ष:
भारत हा असा देश आहे ज्याने विविध प्रकारचे शास्त्र संपूर्ण जगाला दिलेले आहे. त्यामध्ये ज्योतिषशास्त्राचा सुद्धा समावेश होतो. मित्रांनो ज्योतिष शास्त्रामध्ये नऊ प्रकारच्या नवरात्नांना फार महत्त्व मानले जाते, आणि व्यक्ती परत्वे आणि राशी परत्वे विविध प्रकारचे रत्न धारण करण्याचा सल्ला दिला जातो. हे रत्न परिधान केल्यामुळे अनेक सामाजिक, आर्थिक, राजकीय व आरोग्याचे फायदे होतात असे अनेक लोकांचे मानणे आहे.
या नवरत्नांपैकी एक महत्त्वाचा रत्न म्हणून ओळखला जाणारा पन्ना हिरव्या रंगांमध्ये उपलब्ध असतो. पन्ना धारण केल्यामुळे अनेक आरोग्यदायी फायद्यांबरोबरच भरभराट होते, आणि ईश्वराचा नेहमी आशीर्वाद पाठीशी राहतो, असे मानण्यात येते. त्याचबरोबर आपल्या कुठल्याही कामासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होते, असे अनेकांचे मानणे आहे. आज आपण या पन्ना रत्नाविषयी माहिती पाहिलेली आहे.
FAQ
पन्ना म्हणजे काय?
पन्ना हे एक हिरव्या रंगाचे रत्न असून, ते नवरत्नांपैकी एक आहे. याला ज्योतिष शास्त्रामध्ये खूप महत्त्व असून, पौर्वात्य देशांमध्ये याची फार लोकप्रियता आहे. भारतात त्याला पाचू, मर्कट मनी किंवा बुधरत्न या नावाने देखील ओळखले जाते.
पन्ना हे रत्न कधी परिधान करण्याचा सल्ला दिला जातो?
पन्ना रत्न सर्वप्रथम वेळेस परिधान करताना बुधवारचा दिवस निवडण्याचे अनेक ज्योतिषी सांगतात. कारण बुध हा पन्ना रत्नाचा प्रतीक ग्रह म्हणून मानला जात असल्यामुळे बुध ग्रहाचे पन्ना या रत्नावर अधिपत्य असते. शक्यतो शुक्ल पक्षाच्या बुधवारी मंगलमय पहाटे किंवा सकाळी पन्ना परिधान केला जावा.
पन्ना हे रत्न परिधान केल्यामुळे कोणते फायदे होतात?
पन्ना हे रत्न परिधान केल्यामुळे कान, डोळे आणि त्वचा यांच्या संदर्भातील समस्या दूर केल्या जातात. तसेच बोलण्यामध्ये विकृती असेल किंवा मानसिक आजार असतील त्याचप्रमाणे श्वसन मार्गाच्या आजारांसाठी सुद्धा पन्ना हे रत्न उत्कृष्ट समजले जाते.
पन्ना रत्न घालण्याचे काही दुष्परिणाम होऊ शकतात का?
मित्रांनो, पन्ना रत्न हे फायदेशीर असले तरी देखील मोती या रत्नासोबत ते परिधान केल्यामुळे मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागते. त्यामुळे शक्यतो पन्ना आणि मोती सोबत परिधान करण्याचे टाळले पाहिजे.
पन्ना या रत्नासह आणखी कोणते रत्न घातले जाऊ शकतात?
पन्ना या रत्नाबरोबरच पुष्कराज, नीलम, किंवा हिरा इत्यादी रत्न घातले जाऊ शकतात.
आजच्या भागामध्ये आपण पन्ना या रत्नाबद्दल माहिती बघितलेली आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट मध्ये लिहा, आणि त्यासोबतच पन्ना रत्नाविषयी तुमचे अनुभव आणि इतरही माहिती असेल तर ती देखील आमच्यासोबत शेअर करा. तसेच ज्योतिष शास्त्राची आवड असणाऱ्या आपल्या इतर मित्र मैत्रिणींना ही माहिती असली पाहिजे म्हणून त्यांच्यासोबत देखील शेअर करा.
धन्यवाद…