ओमान देशाची संपूर्ण माहिती Oman Information In Marathi

Oman Information In Marathi  ओमान हा देश मध्यपूर्वेतील अरबी द्वीपकल्पाच्या आग्नेय दिशेच्या टोकावर वसलेला असून या देशाची राजधानी  सर्वात मोठे शहर मस्कत आहे. या देशाचे राष्ट्रीय भाषा अरबी असून या देशांमध्ये संपूर्ण राजेशाही अस्तित्वात आहे.

Oman Information In Marathi

ओमान देशाची संपूर्ण माहिती Oman Information In Marathi

क्षेत्रफळ व सीमा :

या देशाचे क्षेत्रफळ हे 2,12,400 चौरस किलोमीटर आहे या देशाच्या उत्तरेला ओमानचे आखात पूर्व व दक्षिण दिशेला अरबी समुद्र तर नैऋत्य दिशेला दक्षिण येमेन असून पश्चिमेला सौदी अरेबिया व वायव्य दिशेला संयुक्त अमीर राज्य आहे.

हॉर्मझच्या समुद्रधुनीमध्ये शिरलेला हा रूऊस अल्-जबल ओमानचा डोंगराळ द्वीपकल्पीय भाग तसेच कल्‌बा आणि फुजाइरा या संयुक्त अरब अमीर राज्यांनी ओमानच्या मुख्य भूमीपासून वेगळा केलेला आहे.

ओमान देशाचे हवामान :

ओमान या देशाचे हवामान हे उष्णता समुद्रकिनारपट्टीवर दमट असे आढळते. येथील हवामानामध्ये भिन्नता दिसून येते. समुद्राचे पाणी किनाऱ्याजवळ गरम असते.

किनारपट्टीवर नोव्हेंबर ते मार्च तापमान 160-210c असते तर उन्हाळ्यामध्ये 370c च्या वर असते पर्वत शिखरांवरील हवामान मात्र या तुलनेने सौम्य असते. या देशातील वार्षिक सरासरी पर्जन्यमानाचा विचार केला असता पूर्व किनाऱ्यावर 10 सेंमी. तर पर्वत प्रदेशांवर पाऊस बऱ्याच प्रमाणात पडतो.

लोकसंख्या :

या देशाची लोकसंख्या ही 2009 च्या जनगणने प्रमाणे 28,45,000 एवढी आहे.

चलन :

या देशाचे चलन साधने 1970 पासून रियाल सौदी हे स्टर्लिंग च्या किमती बरोबरचे चलन या देशांमध्ये बनवले आहे ते 1000 बैझानमध्ये विभागलेले आहे तरी भारतीय रुपया व मारिया तेरेसा डॉलर यांचाही उपयोग ओमान या देशांमध्ये केला जातो.

वनस्पतीव प्राणी :

या देशाचे उष्णता जास्त व कमी पाऊस यामुळे मरूद्याने सोडल्यास उमांच्या अंतर्गत भागात वाळवंटी झुडपे फार कमी प्रमाणात आढळतात. डोंगराळ भागावर थोडी जंगले आपल्याला पाहायला मिळतात. त्या जंगलांमध्ये सांबर, हरीण, खोकड, लांडगा, ससा इत्यादी प्राणी आढळतात. त्याव्यतिरिक्त वन्य प्राणीही येथे आढळून येतात. प्राण्यां एवढीच पक्षांची संख्या ही येथे खूपच कमी दिसून येते.

इतिहास :

ओमान या देशाच्या किनाऱ्याहून बॅबिलोन पूर्व काळापासून वाहतूक होत असल्याचे पुरावे आढळतात. या देशांमध्ये उत्तरेकडून आलेल्या सेमिटीकांनी ओमान मधील स्थायिक झालेल्या हॅमाइटांना हुसकावून लावले होते. इ.स.पू. 536 मध्ये ओमानचा भाग पर्शियाच्या साम्राज्यामध्ये आल्याचा इतिहास मिळतो.

सातव्या शतकातील ओमान मुस्लिमधर्मीय निर्माण तिचा इतिहास पूर्णतः माहिती नाही. या देशांमधील लोकांनी इस्लाम हा धर्म स्वीकारला असला तरी येथे वंशभेद चालूच राहिलेला दिसून येतो. उत्तरेकडील आलेले ते हिनवी व मूळचे घाफिरी समजले जाऊ लागले.

नंतर ज्या देशातील धर्मामध्ये फूट निर्माण झाली आठव्या शतकात इस्लाम धर्मातील अब्दुल्ला इब्न इबाह याने ओमान मध्ये इबादीय पंथाचे स्थापना केली व लोकांनी 751 मध्ये जुलंद बिन मसूद याची ओमानचा पहिला इमाम म्हणून निवड केली.

त्यानंतर हे लोक इमामाची निवड करीत परंतु 1154 मध्ये बनू नभन याने आपल्या वंशाची स्थापना केली. नंतर 1429 पासून नवनी राजांबरोबर लोकनियुक्त इमामांचाही कारभार सुरू झाला. नवव्या शतकापासून उमांची संबंध हे पूर्व आफ्रिकेतील प्रदेशांशी जुळले. तसेच मोझॅम्बिक जवळील काही भाग त्यांच्या ताब्यात होता.

1508 मध्ये पोर्तुगीजांनी ओमानचा किनाऱ्यावरील प्रदेश व पूर्व आफ्रिकेतील प्रदेश यांचा ताबा आपल्याकडे घेतला व त्यांनी दीडशे वर्ष त्यावर राज्य केले. 1616 साली ओमानमधील नासिर बिन मुर्शिद या इमामाने आपली सत्ता प्रबळ करून यारुबी वंशाची स्थापना केली. 1708 मध्ये इमामला पाठिंबा असलेले हीनवि व घाफिरी यांच्यामध्ये यादवी युद्ध सुरू झाले, नंतर इराणचा पाठिंबा त्यांना मिळाला व 1737 मध्ये इराणच्या नादीरशहाणे ओमानवर आक्रमण केले.

शेती व उत्पादने :

या देशातील धोपार या किनारपट्टीवर शेती व पशुपालन हा मुख्य व्यवसाय असून या देशांमध्ये बार्ली, ज्वारी, ऊस, गहू, रताळी, तंबाखू, केळी, आंबा, डाळिंब, संत्री, ऑलिव्ह, बदाम, तुती, नारळ, अक्रोड अंजीर, अल्फाल्फा पिके काढली जातात. त्या व्यतिरिक्त भारतीयांनी चालवलेली फळे व भाजीपाला यांचे प्रयोगिक शीत केंद्रे ही नझवा व सुहार येथे आहे. येथील जंगलातून उत्पादन मिळवली जाते. त्यामध्ये डिंक, हिंग, उद, औषधी वनस्पती इत्यादी पदार्थ असून मच्छीमारी व मोती काढण्याचे उद्योग येथे महत्त्वाचे आहेत.

खनिजे :

या देशात मोठ्या प्रमाणात तेलाचे साठे असून जागतिक स्तरावर 22 व्या क्रमांकावर आहे. त्यांच्या अर्थव्यवस्थेच्या महत्त्वपूर्ण भागामध्ये पर्यटन आणि मासे, खजूर आणि इतर कृषी उत्पादनांचा समावेश आहे. ओमानची उच्च-उत्पन्न अर्थव्यवस्था म्हणून वर्गीकरण करण्यात आले आहे आणि जागतिक शांतता निर्देशांकानुसार जगातील 69 वा सर्वात शांत देश आहे.

लोक व समाजजीवन :

या देशांमध्ये बहुसंख्या लोक हे इस्लाम पंथीय असून सुन्नी इस्लामी आहेत. या देशात हिनवी आणि घाफिरी गटांत लोकांचे विभाजन झाले आहे. येथील समुद्र किनारपट्टीवरील शहरांमध्ये भारतीय बलुची निग्रोवंशिय लोक आढळून येतात. तर अंतर्गत डोंगराळ भागात भारतातील तोड्यांप्रमाणे असलेल्या जमाती राहतात.

राजधानी शहर व इतर मोठ्या शहरांमध्ये शाळा तंत्रनिकेतन, रुग्णालय पाणीपुरवठा अशा विविध सोयी उपलब्ध आहेत. तसेच या देशात मात्र राहण्यासाठी झोपडी किंवा तंबूचा वापर करतात तसेच अन्नपुरवठा देखील पूर्णतः मिळत नाही. मुलांना कुराण व प्राथमिक स्वरूपाचे अंकगणित यांची शिक्षण दिले जाते. याव्यतिरिक्त कोणतेही शिक्षण त्यांना दिले जात नाही. येथे पाण्याची टंचाई तसेच विविध रोग यांचे प्राबल्य दिसून येते.

येथील लोकांची राहणी ही अरबी लोकांप्रमाणे आहे. तसेच येथील मोठ्या वाळवंटामुळे ओमान हा देश या विभाजन झाले आहे. त्यामुळे ओमनी माणसांची संस्कृती ही इराणी किंवा भारतीयांसारखी दिसते. येथील लोकांचा पोशाख हा पायघोळ झगा व डोक्यावर पागोटे तर स्त्रियांचा गोषा ह्या जुन्या चालीरीती अजून पर्यंत आपल्याला येथे दिसतात तसेच आता सगळे न घालणाऱ्या युरोपीय स्त्रियांनाही दंड होत असे.

ओमान या देशातील पर्यटन स्थळ :

ओमान या देशातही पर्यटकांकरिता ऐतिहासिक स्थळ तसेच इतर शहर खुली करण्यात आलेली आहे येथे पर्यटक येऊन आनंद घेऊ शकतात. ओमान या देशांमध्ये पर्यटकांना विशेष असा ड्रेस कोड व केशभूषा दिलेली आहे. कारण यामध्ये त्या देशाचा मान असतो. हा देश मुस्लिम असला तरी येथील कायदे व्यवस्थित आहेत व त्याचे पालन करणे हे पर्यटकांना गरजेचे असते. येथे पाहण्याकरता खालील पर्यटन स्थळ आहेत.

उत्तरेकडील पर्वतरांगा अल हजर पर्वत आणि आग्नेय किनारपट्टी कारा, धोफर पर्वत, जिथे देशाची मुख्य शहरे आहेत. राजधानी मस्कत, सोहर व उत्तरेस सूर आणि दक्षिणेस सलालाह आणि मुसंदम आहे.

नैसर्गिक सौंदर्यासह, नेत्रदीपक पर्वत, वाऱ्याने वाहणारे वाळवंट आणि एक प्राचीन किनारपट्टी, ओमान हा अरबस्तानचा आधुनिक चेहरा शोधणाऱ्यांसाठी स्पष्ट पर्याय असून त्याचा प्राचीन आत्मा आपण अनुभवू शकतो.

मस्कतमधील मुतराह सौक येथील बाजारातील चकचकीत सोने आणि उदबत्तीचे हजारो प्रकार प्रसिद्ध आहेत. ओमानचे वैविध्यपूर्ण नैसर्गिक सौंदर्य हे मुख्य आकर्षण तर आहेच परंतु येथे तुम्हाला अत्यंत सुंदर समुद्रकिनारे, पर्वत रांगांची दातेरी तटबंदी आणि एम्पटी क्युअर्टर या वाळवंटातील उत्तम नक्षीदार वाळू पाहायला मिळेल.

ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.

हे निबंध सुद्धा अवश्य वाचा :-

माझे नाव सृष्टी आहे आणि मी या ब्लॉग ची संस्थापक आहे. मला माहिती लिहायला खूप आवडतात, म्हणून मी या माझ्या ब्लॉग वर मराठी मध्ये माहिती लिहित असते.

Leave a Comment