group

ओडिसा राज्याची संपूर्ण माहिती Odisha Information In Marathi

Odisha Information In Marathi ओडिसातील जगन्नाथ आणि कोणार्क सूर्य मंदिरे पुरीमधील भक्तांच्या श्रद्धेची मुख्य केंद्रे आहेत.  समृद्ध परंपरा आणि नैसर्गिक संपत्ती असलेला ओरिसा आपल्या सुंदर पर्यटन स्थळांसाठीही जगात खूप प्रसिद्ध आहे. ओडिशा राज्यात 30 जिल्हे आहेत. ओड़िशाला विविध नावाने ओळखला जातो. ते म्हणजे उच्छल, उत्कल,  उड्रदेश, उडीशा,  उडीसा, ओडिसा, ओढिया, ओदिशा इ. तर चला मग पाहूया या राज्य विषयी माहिती.

Odisha Information In Marathi

ओडिसा राज्याची संपूर्ण माहिती Odisha Information In Marathi

विस्तार व क्षेत्रफळ :

ओड़िसा भारताच्या पूर्व किनारपट्टीच्या उत्तरे असून त्याच्या दक्षिणेला व आग्नेय दिशेला बंगालचा उपसागर, पूर्वेला व ईशान्य दिशेला पश्चिम बंगाल , उत्तरेला झारखंड, पश्चिमेला छत्तीसगढ, नैर्त्येला तेलंगण आणि दक्षिणेला व नैर्त्य दिशेस आंध्र प्रदेश राज्ये आहेत.

भुवनेश्वर ओरिसाची राजधानी व सर्वात मोठे ही शहर आहे.  भुवनेश्वर आणि कटकही जुली शहरे आहेत. उडिशा राज्याचे क्षेत्रफळ  155,707 चौ. किमी असून क्षेत्रफळानुसार ओरिसा भारतातील 9 व्या क्रमांकाचे तर 11 व्या क्रमांकाचे लोकसंख्येचे राज्य आहे.  ओरिशाला 485 वर्ग अतिचा समुद्रकिनारा लाभला आहे.

ओडीशा राज्य इतिहास :

ओडिशा राज्याचा इतिहास खूप प्राचीन आहे, असे दिसून येते. कारण ऐतिहासिक काळात ओड़िशा कलिंग  साम्राज्याचा भाग होता. इ.स.पूर्व 261 मध्ये सम्राट अशोकने कलिंगवर आक्रमण केले. त्याची परिणती कलिंगच्या युद्धात झाली.

ऋग्वेदात उल्लेख आलेल्या कक्षीवान ऋषी हा कलिंग देशाच्या राणीच्या दासीचा पुत्र होता.  महाभारतात कलिंगाचे स्थान आर्यावर्ताच्या पूर्वेस असल्याचे सांगितले आहे. महाभारतातील  अर्जुन कलिंगच्या तीर्थयात्रेला गेला होता.  कर्णाने व कृष्णाने या प्रदेशावर स्वारी केली होती. परशुरामानेही  कलिंग जिंकला होता. इतिहासावरून असे दिसते की मौर्य साम्राज्याच्या स्थापनेपूर्वी हे एक प्रबळ राज्य होते.

धार्मिक स्थान :

जगन्नाथपुरी हे ओडिसामध्ये भुवनेश्वरपासून  वीस मैलांवर समुद्रतीरी वसलेले एक नगर आहे. हे एक प्राचीन तीर्थक्षेत्र असून याला श्रीक्षेत्र, पुरुषोत्तम क्षेत्र अशी अन्य नावेही आहेत. जगन्‍नाथपुरी शहरात जगन्नाथाचे एक पुरातन मंदिर आहे.

मंदिरामध्ये श्रीजगन्नाथ, श्रीबलभद्र, देवी सुभद्रा आणि सुदर्शन यांच्या लाकडी मूर्ती आहेत. जगन्नाथ मंदिराची रथयात्रा दरवर्षी आषाढ महिन्यात होते. त्यावेळी मूर्ती विराजमान झालेला प्रचंड वजनाचा लाकडी रथ ओढायला शेकडो माणसे लागतात.

सण, उत्सव :

दुर्गापूजा आणि रथयात्रेव्यतिरिक्त असे अनेक सणही येथे आहेत. सीतल शास्ती कार्निवल या उत्सवाचे नाव जितके अनन्य आहे, तेवढे वेगळे आहे. सीतल षष्ठी कार्निवल हा एक लोकप्रिय उत्सव आहे, जो कार्निवल म्हणून साजरा केला जातो.

See also  महाराष्ट्र राज्याची संपूर्ण माहिती Maharashtra Information In Marathi

पार्वतीबरोबर भगवान शिव यांचा विवाह कार्निवल किंवा उत्सवात साजरा करा. हा एक सर्वात लोकप्रिय सण आहे आणि ओडिशामधील सर्व शिव मंदिरांमध्ये साजरा केला जातो. हा सण जेष्ठ महिन्यात शुभ पंचमीच्या दिवशी साजरा केला जातो. ओडिशातील आणखी एक महत्त्वाचा आणि लोकप्रिय उत्सव म्हणजे छऊ महोत्सव.

ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेच्या रात्री आयोजित केले जाते. हा उत्सव भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र आणि सुभद्रा देवीसाठी साजरा केला जातो. ओडिशाच्या पुरी येथे त्या दिवसाच्या वेळी त्याच्या मूर्ती सुदर्शन चक्रात आंघोळीसाठी बाहेर काढल्या जातात. या उत्सवाचा उत्सव पंधरवड्यापर्यंत म्हणजे 14 दिवसांचा असतो. सणांच्या वेळी अनेक प्रथा आणि धार्मिक प्रथा परंपरेनुसार केल्या जातात.

प्रमुख नद्या :

महानदी, ब्राह्मणी व वैतरणी या राज्यातल्या मुख्य नद्या वायव्येकडून आग्नेयीकडे जवळजवळ समांतर वहात जाऊन बंगालच्या उपसागराला मिळतात. त्यांच्याखेरीज राज्यात उत्तर भागात सालंदी, बुराबलंग व सुवर्णरेखा आणि दक्षिण भागात ऋषिकूल्या, वंशधारा, नागावली, इंद्रावती, कोलाब आणि मचकुंद या लहान नद्या आहेत. मध्य प्रदेशातून येणारी महानदी ओरिसात 853 किमी. लांब वाहते. ती येथील सर्वांत मोठी नदी असून 1,32,600 चौ. किमी. क्षेत्रातले पाणी वाहून नेते.

खनिज संपत्ती :

राज्यात लोहधातुकाचे प्रचंड साठे आहेत. 60 प्रतिशतपेक्षा अधिक लोहांश देणारे कच्चे खनिज विशेषत: सुंदरगढ, केओंझार व मयूरभंज जिल्ह्यांत सापडते. कटक जिल्ह्यातही नवे साठे मिळाले आहेत. भारतातले 20 प्रतिशत मँगॅनीज केओंझार, सुंदरगढ, बोलानगीर व कालाहंडी जिल्ह्यांत निघते. केओंझार, धेनकानाल व कटक जिल्ह्यांत क्रोमाइट उपलब्ध आहे. धेनकानालच्या तालचेर तालुक्यात भरपूर कोळसा मिळतो. गंजाम जिल्ह्याच्या गंगपूर भागात डोलोमाइट व चुनखडक काढण्यात येतात.

शेती व मुख्य पिके :

येथील 80 टक्के लोक शेतीवर निर्भर आहेत व येथे भागात तांदूळ मोठ्या प्रमाणावर पिकवला जातो. मुख्य पिके तांदूळ, बटाटे, ऊस, डाळी, ताग व तेलबिया असून त्यांखेरीज अंबाडी, हळद, मिरची, मोहरी, तंबाखू वगैरे पिकांचे थोडे उत्पादन होते. राज्यातील 80% लोक तांदळावर अवलंबून आहेत.

See also  त्रिपुरा राज्याची संपूर्ण माहिती Tripura Information In Marathi

राज्याला अनुकूल समुद्रकिनारा तसेच चिल्का सरोवर, हिराकूद जलाशय, इतर तळी व अनेक नद्या असूनही मच्छीमारीचा विकास पुरेसा नाही. समुद्रातून व चिल्का सरोवरातून मॅकेरल, सरंगा, हिलसा, वोय या जातीचे मासे काढण्यात येतात. मच्छीमारीच्या एकूण 14,300 चौ. किमी. क्षेत्रातून 4 कोटी रु. किंमतीचे मत्स्योत्पादन होते.

दळणवळण मार्ग :

राज्यात 1971 साली 1713 किमी. लांबीचे लोहमार्ग आग्‍नेय रेल्वेच्या कक्षेत पूर्व किनाऱ्याला, उत्तर सीमेवर आणि पश्चिमेकडे वळणारे असे होते. त्यात आणखी 211 किमी.ची भर खाणी व कारखान्यांच्या वाढत्या विकासासाठी दुसऱ्या व तिसऱ्या योजनांत मिळून पडली आणि संकल्पित बैलादिला-कोट्टलवलसा हा 502 किमी. मार्ग पुरा झाल्यावर राज्याच्या दूरच्या भागांपर्यंत रेलवाहतूक सुलभ होणार आहे.

भुवनेश्वरच्या मुख्य विमानतळा खेरीज राज्यात इतर तीन तळ व कित्येक धावपट्ट्या आहेत. शासकीय राज्यवाहतुकीच्या 450 वर बसगाड्या दिवसाला पाऊण लाख उतारूंची वाहतूक करतात. राज्याचे पारादीप बंदर भारताच्या आठ प्रथमश्रेणीच्या बंदरांपैकी एक आहे  व कच्च्या खनिजांच्या निर्यातीसाठी याचा उपयोग होऊ लागला आहे. चांदबाली व गोपालपूर ही ओरिसातली दुय्यम बंदरे आहेत त्यांचा उपयोग मुख्यत: मच्छीमारी नौकांना होतो.

लोक व समाज :

राज्यात वेळोवेळी वेगवेगळ्या वंशांचे लोक येऊन स्थायिक झाल्यामुळे राज्यातील लोक एकजिनसी नाही. लोकसंख्येत अनुसूचित जमातींचे प्रमाण 15.7% आहे आणि आदिवासी 24% आहेत. 94 अनुसूचित जमातींपैकी पाण, गंदा, डोम, धोबा, बावरी व कांद्रा हे बहुसंख्य आहेत. आदिवासींच्या 62 जमातींपैकी कोंड, गोंड, संताळ, सावरा, मुंडा, कोल, भुइयाँ, ओराओं, भूमिजी, भौमिया व शबर यांची संख्या जास्त आहे.

कोरापुट, मयूरभंज, सुंदरगढ व गंजाम जिल्ह्यांत यांची वस्ती जास्त आहे. आदिवासींचे धर्म प्राथमिक स्वरूपाचे जडप्राणवादी आहेत. ओरिसातले इतर लोक बव्हंशी वैष्णव किंवा शैव पंथी हिंदुधर्मीय आहेत. पुरीचा जगन्नाथ हे राज्यातले प्रधान दैवत असून त्याच्या भक्तांखेरीज भुवनेश्वराचे शिवभक्त व अल्पप्रमाणात जैन मताचे लोक राज्यात आहेत.

See also  मणिपूर राज्याची संपूर्ण माहिती Manipur Information In Marathi

ओडिशा राज्यातील कला व नृत्य :

ऍप्लिक त्याच्या कलाकृतीसाठी ओळखले जाते.  पुरी येथील जगन्नाथ मंदिर, भुवनेश्वर येथील लिंगराजाचे मंदिर, मुक्तेश्वरा, राजराणी आणि इतर अनेक मंदिरे त्यांच्या दगडी बांधकामासाठी प्रसिद्ध आहेत.  कटक त्याच्या चांदीच्या तारकाशी काम, पाम प्लेट पेंटिंग, प्रसिद्ध निलगिरी दगडी भांडी आणि विविध आदिवासी प्रभावित संस्कृतींसाठी ओळखले जाते.

कोणार्क येथील सूर्य मंदिर त्याच्या स्थापत्य वैभवासाठी प्रसिद्ध आहे, तर संबलपुरी कापड, विशेषत: संबळपुरी साडी, त्याच्या कलात्मक वैभवात तितकीच आहे.  ओडिशातील मुख्य हस्तशिल्पांमध्ये ऍप्लिक वर्क, पितळ आणि बेल मेटल, फिलीग्री आणि दगडी कोरीव कामांचा समावेश आहे.

ओडिशा राज्यातील नृत्य ओडिसी आहे. ओडिसी नृत्य हे इतिहासातील अनेक शैलींचे एकत्रीकरण दाखवते.  ओडिसी हा भारतातील आठ शास्त्रीय नृत्य प्रकारांपैकी एक आहे. ओडिशात, पुरीमध्ये सँड आर्ट हा एक अनोखा प्रकार विकसित झाला आहे.

ओडिसी परंपरा तीन शाळांमध्ये अस्तित्वात आहे: महारी, नर्तक आणि गोटीपुआ. महारी : या ओरिया देवदासी किंवा मंदिरातील मुली होत्या. गोटीपुआ : ही तरुण मुले होती ज्यांना मुलींचे कपडे घातले होते आणि त्यांना महारींनी नृत्य शिकवले होते.
राजदरबारात नर्तक नृत्य व्हायचे.

पर्यटन स्थळ :

ओडिशातील पुरीमध्ये असलेले जगन्नाथ मंदिर, कोणार्कचे सूर्य मंदिर आणि भुवनेश्वरमध्ये असलेले लिंगराज्य मंदिर ही ओडिशातील प्रमुख विशेष पर्यटन स्थळे आहेत. दरवर्षी लाखो भाविक येथे दर्शन घेण्यासाठी येतात.

ओडिशात फिरण्यासाठी चिल्का तलाव हा उत्तम पर्याय म्हणता येईल. हे एक अद्भुत पर्यटन स्थळ आहे, जे सुंदर दृश्यांनी परिपूर्ण आहे. धौलीगिरीच्या डोंगरांचा समावेश ओडिशातील सुंदर पर्यटन स्थळांमध्ये होतो. तुम्ही ओदिशाला गेल्यानंतर इथे नक्की भेट द्या.

ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.

हे निबंध सुद्धा अवश्य वाचा :-

Child Labour Essay In Marathi

Doordarshan Essay In Marathi

Essay On Metro Rail In Marathi

Essay On World Wildlife Day In Marathi

My Country India Essay In Marathi

Subhash Chandra Bose Essay In Marathi

My School Essay In Marathi

Essay On Makar Sankranti In Marathi

Leave a Comment