New Zealand Information in Marathi न्युझीलँड हा जगात प्रगत व समृद्ध देश मानला जातो. येथील मानवी विकास निर्देशांक जगात पाचव्या क्रमांकावर आहे. या देशांमध्ये भ्रष्टाचाराचे प्रमाण जगात सर्वात कमी आहे. भ्रष्टाचाराच्या बाबतीत या देशाचा पाचवा क्रमांक जगात लागतो. न्युझीलँड या देशाला किवी पक्षांचा देश म्हणूनही ओळखला जातो तसेच किवी येथील राष्ट्रीय पक्षी आहे, जो उडू शकत नाही. वेलिंग्टन हे न्युझीलँडची राजधानी आहे. तर चला मग पाहूया या देशाविषयी सविस्तर माहिती.

न्यु झीलँड देशाची संपूर्ण माहिती New Zealand Information in Marathi
क्षेत्रफळ व विस्तार :
न्युझीलँड चे क्षेत्रफळ 2,68,776 चौरस किमी असून या देशाची पूर्व पश्चिम रुंदी ही 454 किमी. आहे. तसेच दक्षिण उत्तर लांबी 1620किमी. आहे. या देशाच्या चारही बाजू समुद्रकिनाऱ्यांनी वेढलेल्या असून त्याची लांबी 6,946 किमी. आहे.
हा देश अनेक बेटांचा एक समूह असून त्यापैकी नॉर्थ वेटे, साऊथ बेटे, व स्ट्यूअर्ट बेटे हे तीन बेटसमूह प्रमुख आहेत. याव्यतिरिक्त यामध्ये चॅतम, कँबेल, कर्मॅडेक, थ्री किंग्ज, स्नेअर्झ, अँटिपडीझ, सोलँडर, बाउन्टी, ऑक्लंड या बेटांचाही समावेश होतो.
यापैकी केवळ सहा बेटांवरच वनस्पती आढळते तर बऱ्याच बेटांवर अजून मानवी वस्ती अस्तित्वात नाही.
या बेटांच्या पश्चिम दिशेला पॅसिफिक महासागराचा टाम्सन या नावाने ओळखला जाणारा समुद्र असून उत्तर, पूर्व आणि दक्षिण या दिशांना पॅसिफिक महासागर आहे.
हवामान :
या देशाची समुद्रसपाटीपासूनची उंची तसेच प्राकृतिक घटक व समुद्र सानिध्य लाभल्यामुळे येथील हवामान हे बदलते राहते. उन्हाळ्यात समुद्रावरून येणारे गार वारीही हवेतील उष्मा कमी करतात तर हिवाळ्यात ते उबदार असतात. उत्तरेकडील प्रदेशांमध्ये सरासरी तापमान 15°c असते तर दक्षिणेकडे ते हळूहळू कमी होत जाते.
डोंगराळ प्रदेशांमध्ये हिवाळ्यातही नियमित बर्फ पडतो परंतु खोऱ्यात दाढ दुखी असते न्युझीलँड मध्ये लहान मोठ्या भूकंपाचे प्रमाण अधिक असून तेथील लोकांना दरवर्षी सरासरी 100 भूकंपाचे धक्के बसतात. येथील सर्वात मोठा भूकंपाचा धक्का हा 1931 मध्ये बसला होता त्यामध्ये 255 लोकांचा मृत्यू झाला होता.
इतिहास :
न्युझीलँडचा प्राचीन इतिहास सुसंगतपणे माहित नाही. चौदाव्या शतकात पोलीनीशियन खलाशी याच्या उत्तर किनाऱ्यावर अनेकदा आले. सतराव्या शतकात हे लोक दक्षिण बेटातही पसरले होते. काही तज्ञांच्या मते, पॉलिनीशियन माओरी हे उत्तर भेटायला किनारपट्टीमध्ये स्थायिक झाले असावेत.
आबेल यानसन टास्मान या डच प्रवाशाने 1642 मध्ये न्युझीलँड हे सर्वप्रथम पाश्चात्यांच्या नजरेत आले. परंतु हे सत्य डच ईस्ट इंडिया कंपनीने अनेक वर्ष लपवून ठेवले. कारण तिथे इतर व्यापारी कंपन्या तिथे चंचूप्रवेश करतील अशी भीती त्यांना वाटत होती.
याच नेदरलँड्समधील झिलंड या प्रांतांच्या नावावरून नवीन झिलंड म्हणून न्युझीलँड असे नाव दिले. 1975 मध्ये मजूर पक्षाचा पराभव करून पुन्हा राष्ट्रीय पक्षाचा हातात सत्ता आल्यानंतर रॉबर्ट मूल्डून पंतप्रधान झाला. 1962 मध्ये न्युझीलँडच्या प्रशासकीय व्यवस्थेखाली असलेल्या पश्चिम सॅमोआने स्वातंत्र्य मिळवले.
नद्या व सरोवरे :
या देशात अनेक लहान मोठ्या नद्या आहेत ह्या नद्या उथळ व शीघ्र प्रवाहाच्या आहेत. तसेच या नद्या समुद्रास जाऊन मिळतात. या नद्यांमध्ये वाइकॅटो, वाँगनूई, रँगिटीकी आणि वाइरोआ ह्या नद्या उत्तर बेटातून वाहतात.
तसेच क्यूथा, वाइटॅकी, टाइरी, मॅताउरा, वाइमॅकरीरी आणि वाइआऊ या दक्षिण बेटातून वाहतात. कृता ही दक्षिण बेटातील सर्वात लांब नदी आहे. टास्मन व मर्चिसन ह्या न्यूझीलँडमधील हिमनद्या प्रसिद्ध आहेत.
या देशात अनेक सरोवरे आहेत. ताउपो हे उत्तरेकडील सर्वात मोठे क्षेत्रफळ असलेले सरोवर आहे. तसेच दक्षिण बेटात टी ॲनाऊ व वाकटिप हे सुद्धा दोन मोठी सरोवरे आहेत. दक्षिण बेटाच्या पश्चिमेकडे डोंगराळ भागात सदर्लंड हा 580 मी. उंचीचा धबधबा मिलफर्ड साउंडजवळ असून तो जगातील चौथा उंच धबधबा आहे.
शेती :
न्युझीलँडमध्ये शेती हे अत्यंत आधुनिक पद्धतीने केले जाते. तसेच येथील भागात पशुपालन व मेंढी पालन याचा धंदा असल्यामुळे गवत हे एक प्रकारचे प्रमुख उत्पन्नाचे पीक झाले आहे याशिवाय येथे ओट, गहू, बार्ली, क्लोव्हर सीड ही मुख्य पिके घेतली जातात तसेच फारच थोडा गहू परदेशामध्ये निर्यातही केला जातो. याव्यतिरिक्त त्यांच्या गरजा भागवण्यासाठी कांदा,बटाटा, मक्का, गळीताची धान्य, ताग व सफरचंदाच्या बागा देखील आहेत.
वनस्पती व प्राणी :
न्युझीलँडचा बराच भाग वनस्पतींनी व्यापला असून येथे पाईन, पर व बीच या प्रमुख वनस्पती आढळतात तसेच येथील बरीच झाडी सदाहरित आहेत. कमी पावसाच्या प्रदेशांमध्ये वनस्पती निवजी गवताचे प्रमाण जास्त दिसून येते. दक्षिण आल्प्सवर सतत पाऊस पडत असल्याने तेथे बीचची सदाहरित वने आहेत. उत्तरेकडील बेटांवर 32-33 मीटर एवढी उंचीचे झाडे आढळतात. त्यामध्ये मटाई, रिमू, कोनार हे वृक्ष आढळून येतात.
न्युझीलँडमध्ये कमी प्रमाणात प्राणी आढळून येतात. त्यामध्ये उंदीर, रान कुत्री, पांढऱ्या लोकरीचा प्राणी, विझल इत्यादी प्राणी आढळतात. या देशात सरड्याच्या 20 वेगळ्या जाती व बेडकांच्या फक्त दोनच जाती आढळतात.
या देशांमधील पक्षी जीवन पाहिजेत असे उपलब्ध नाही पक्षांमध्ये दोन प्रकारचे वटवाघोडे महत्त्वाचे असून आखूड शेपटीच्या वटवाघळाची जात हे न्युझीलँडचीच आहे. याव्यतिरिक्त पोपट, वेका,
काकॅपो, टकाहे आणि राष्ट्रीय पक्षी कीवी आढळतो.
समाज जीवन :
न्युझीलँडमधील सर्वसाधारण लोकांची राहणीमान हे उच्च प्रतीची असून तेथील नागरिक हा मेहनती आहे. तिथे खाणेपिणे तसेच कपडे व घरे यांसाठी कमी पैसे मोजावे लागतात. तसेच करांचा ही बोजा येथे खूपच कमी आहे, फक्त मोटारीसाठी त्यांना जास्त खर्च येतो. येथील लोक त्यांच्या आहारामध्ये अमेरिकन प्रमाणे सर्व खाद्यपदार्थ चीज लोह लोणी यांचे प्रमाण अधिक असते. चहा हे त्यांचे नित्याचे पेय आहे.
लेझर्लंडमधील बहुतेक लोक ख्रिस्ती धर्म असून ते इंग्लंड मधील चर्चला मानतात. तसेच रोमन कॅथलिक, मेथडिस्ट व प्रेसबिटेरियन चर्चचेही आणि आई येथे आहेत. येथील बरेच लोक युरोपीय इंग्रजी भाषा बोलतात तर माओरी लोक माओरी भाषा बोलतात.
मलायो पॉलिनिशियन भाषा समूहातील भाषा असून रोमन लिपीत लिहिण्याची ही पद्धत आहे. आर्थिक समृद्धीबरोबरच स्विझरलँड मध्ये 1917 पासून संस्कृती व साहित्य यांचाही विकास झालेला दिसून येतो.
खेळ :
या देशांमध्ये फुटबॉल, रग्बी, क्रिकेट नेटबॉल हे लोकप्रिय खेळ असून येथे त्यांचे राष्ट्रीय संघ आहेत.
वाहतूक व्यवस्था :
न्युझीलँडमध्ये रेल्वे वाहतूक व रस्ते वाहतूक ही सुखकारक असून येथे विमान सेवा उपलब्ध आहेत. तसेच जहाजांमार्फत व्यापार चालतो. म्हणजेच येथे जलवाहतूक ही सेवा उपलब्ध आहे.
पर्यटन स्थळ :
न्यूझीलंडमध्ये अनेक पर्यटक पर्यटनासाठी येत असतात न्यूझीलंडचे नैसर्गिक सौंदर्य हे पर्यटनांच्या मनाला मोहून टाकणारे असल्यामुळे हे असंख्य पर्यटकांचे आकर्षण बनले आहे.
न्युझीलँड मधील हिमनद्या, पर्वत, सरोवरे, गरम पाण्याचे झरे, ज्वालामुखी पर्वत या सर्व मनोरंजनाच्या सौंदर्य स्थळी प्रवाशांना सहज जाता येते व हे सौंदर्य जवळून पाहता येते.
रोटोरुआ हे एक सरोवर काठी असलेले आरोग्यधाम आहे. इथे पर्यटकांसाठी स्नानगृहांची व्यवस्था केलेली आहे. टास्मन व मर्चिसन या मोठ्या हिमनद्या, सदर्लंड धबधबा व ओटिरा नावाचा सुंदर बोगदा ही त्या व्यतिरिक्त आणखीन काही पर्यटन स्थळ आहेत.
ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांना शेअर करा.