मुंबई उपनगर संपूर्ण माहिती Mumbai Suburban Information In Marathi

Mumbai Suburban Information In Marathi मुंबई उपनगर हा जिल्हा महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र वांद्रे (पूर्व) येथे आहे.

 Mumbai Suburban Information In Marathi

मुंबई उपनगर संपूर्ण माहिती Mumbai Suburban Information In Marathi

मुंबई शहर हे मुंबई जिल्हा व मुंबई उपनगर जिल्हा मिळून तयार होते. म्हंणजेच मुंबई उपनगर जिल्हा हा बृहन्मुंबई महापालिकेच्या प्रशासनाच्या अखत्यारीत येतो.  मुंबई शहरातील (बृहन्मुंबई महानगरपालिका) 14 प्रभाग या जिल्ह्यात असून त्यांस पूर्व व पश्चिम उपनगरे असे संबोधले जाते.

क्षेत्रफळ व विस्तार :

मुंबई उपनगर जिल्ह्याचे क्षेत्रफळ 386.56 वर्ग कि.मी.आहे. मुंबई उपनगर जिल्ह्याच्या उत्तरेला वाशीची खाडी, दक्षिणेला माहीमचा पूल कॉज-वे (Causeway), पश्चिमेला अरबी समुद्र आहे व पुर्वेला ठाणे जिल्ह्याची सीमा लागून आहे.

मुंबई उपनगर जिल्ह्याच्या या प्रशासकीय सीमा आहेत. शहराचे मर्यादित क्षेत्रफळ आणि औद्योगिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मुंबई महत्वाचे असल्याने कालांतराने मुंबई शहर आणि मुंबई उपनगर हे स्वतंत्र दोन जिल्हे आज अस्तित्वात आलेत.

इतिहास :

1743 मध्ये मुंबई बेटे व आसपासचा परिसर पोर्तूगीजांच्या अमला खाली होता. साधारण 1760-61 मध्ये पोर्तूगीजांनी हा प्रदेश ब्रीटनच्या महाराणीला भेट म्हणून दिला. मुंबई उपनगर जिल्ह्याची निर्मीती होण्यापुर्वी या भूभागाचे नाव साष्टी बेटे होते व सन 1771-72 पर्यंत हा प्रदेश पोर्तूगीज अमलाखालील गोवा राज्यात समावीष्ट होता.

1771-72 नंतर ह्या प्रदेशावर ब्रिटीश साम्राज्याचा अधिकार आला. सन 1871 मध्ये पुर्व कोंकण व मुंबई बेटा अंतर्गत असलेल्या साष्टी तालूक्या पासून ठाणे जिल्ह्याची निर्मीती करण्यात आली.

सन 1917 मध्ये वांद्रे मुख्यालय असलेला स्वतंत्र महल बनविण्यात आला. सन 1920 मध्ये साष्टी तालूक्याची दक्षिण साष्टी व उत्तर साष्टी अशा 2 तालूक्यात विभागणी करण्यात आली. 84 गावे वांद्रे पासून दहिसर पर्यंत व कुर्ल्या पासून मुलूंड पर्यंत असलेल्या मुंबई उपनगर जिल्ह्याची निर्मीती करण्यात आली.

या वेळी ठाणे जिल्ह्यातून काही गावे वगळून मुंबई उपनगर जिल्ह्यात समाविष्ट करण्यात आली. सन 1962 मध्ये बोरीवली तालूक्यातील काही गावे व दक्षिण साष्टी तालूक्यातील काही गावे वेगळी करून अंधेरी व कुर्ला तालूक्यांची निर्मिती करण्यात आली

तालुके :

मुंबई उपनगर जिल्ह्यात  कुर्ला, बोरीवली व  अंधेरी हे तालुके असून त्यातील लोकसंख्या 85,87,561 इतकी आहे. ह्या जिल्ह्यातील 100% लोकसंख्या नागरी आहे. जिल्ह्याचे क्षेत्रफळ 370 चौ.कि.मी. आहे.

हा जिल्हा महाराष्ट्रातील प्रगत जिल्ह्यांपैकी एक आहे. मिठी नदी ही येथील प्रमुख नदी आहे.

समाज जीवन :

मुंबई ही भारताची आर्थिक व मनोरंजनाची राजधानी आहे. मुंबईमध्ये गरीब ते श्रीमंत या मधील सर्व वर्ग दिसून येतात. सध्याच्या जागतिकीकरणात मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर बनले आहे.

मुंबईची स्थापना करणाऱ्या मूळ कोळी जमातीच्या लोकांचे येथे वास्तव्य होते. आजही मुंबई शहरात कोळी जमातीच्या लोकांचे वास्तव्य दिसून येते.

शिक्षण व्यवस्था:

मुंबईत खासगी व महापालिकेच्या शाळा असून बहुतेक शाळा महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळ तर उर्वरित केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएस्‌ई / आयसीएस्‌ई) बोर्डाशी संलग्न आहेत.

महानगरपालिकेच्या शाळांमध्ये बहुतांश वेळी अपुऱ्या सुविधा पहायला मिळतात. पण गरीब जनतेसाठी दुसरा पर्याय नसल्यामुळे मुलांना या शाळांमध्ये शिकायला लागते.  भारताच्या 10+2+3 शिक्षणपद्धतीप्रमाणे दहावीनंतर विद्यार्थी महाविद्यालयात (कला, वाणिज्य किंवा विज्ञान) प्रवेश घेतात.

12 वी नंतर साधी पदव्युत्तर पदविका (पदवी) किंवा अभियांत्रिकी, कायदा, वैद्यकीय अशा व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतले जातात. मुंबईची बहुतेक महाविद्यालये मुंबई विद्यापीठांशी संलग्न आहेत.

आय. आय. टी. मुंबई वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट (व्हिक्टोरिया ज्युबिली टेक्निकल इन्स्टिट्यूट-VJTI ) व एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ या इतर संस्था मुंबईत आहेत. मुंबईत मराठी व इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत. सध्या इंग्रजी माध्यमाच्या वाढत्या प्रभावामुळे अनेक मराठी माध्यमाच्या शाळांमधील विद्यार्थीसंख्या घटत आहे.

जिल्ह्यातील नवीन योजना :

जिल्ह्यात यावर्षी नाविन्यपूर्ण आणि इतर योजनांअंतर्गत इस्माईल युसुफ महाविद्यालय, जोगेश्वरी येथे सौर ऊर्जेद्वारे विद्युतीकरण करणे, महिलांना रोजगार निर्मिती अंतर्गत कापडी पिशव्या बनविण्याचा प्रकल्प, बंदरांचा विकास व प्रवासी सुखसोयी, नागरी दलितेतर वस्त्या (सौंदर्यीकरण) योजनेअंतर्गत सुशोभीकरण आदी कामे पूर्ण करण्यात आली आहेत.

तर, स्मार्ट अंगणवाडी, अक्सा बीच येथील सागर किनाऱ्याच्या पर्यटनदृष्ट्या विकासाचे संकल्पन चित्र, मुलांसाठी खेळण्याची जागा, ज्येष्ठ नागरिकांसाठी उद्याने, ओपन जिम, योगा स्पेस, बांबू शेड्स, गजिबो आणि हिरवळीचे क्षेत्र, गोराई कांदळवन उद्यान आदी वैशिष्ट्यपूर्ण कामे मंजूर करण्यात आली आहेत. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव अंतर्गत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील गांधी टेकडी परिसराचा विकास प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.

मुंबई उपनगर वाहतूक व्यवस्था :

मुंबई हे भारताच्या व दक्षिण, पश्चिम आणि मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील पाचवे सर्वांत मोठे शहर आहे.

मुंबई शहराला नैसर्गिक बंदर लाभलेले असून या बंदरातून भारताची सागरी मार्गाने 50% मालवाहतूक होते. मुंबई हा एक जिल्हा सुद्धा आहे. मात्र तिथे जिल्हापरिषद नाही. मुंबई शहर हे त्याच्या रेल्वे वाहतुकीसाठी प्रसिद्ध आहे.

खेळ :

क्रिकेट हा खेळ मुंबईत लोकप्रिय आहे. प्रत्येक गल्लीत, मैदानात सर्वत्र क्रिकेट खेळले जाते. मुंबईच्या क्रिकेटपटूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवले आहे. बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडियाचे मुख्यालय येथे असून महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांवेळेस मुंबईतील रस्त्यांवर कमी वर्दळ असते.  ब्रेबॉर्न स्टेडियम व वानखेडे स्टेडियम ही दोन आंतरराष्ट्रीय दर्जाची मैदाने मुंबईत आहेत. मुंबईच्या क्रिकेट संघाने रणजी सामन्यांत सातत्याने अव्वल दर्जाची कामगिरी केली आहे व सर्वाधिक रणजी करंडक जिंकण्याचा मान मुंबईकडेच आहे.

त्याचबरोबर मुंबईने आजवर अनेक क्रिकेटपटू भारतास दिले आहेत.  अजित वाडेकर, सुनिल गावस्कर, दिलीप वेंगसरकर, सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, संजय मांजरेकर, रवी शास्त्री, झहीर खान, अजित आगरकर, रोहित शर्मा,अजिंक्य रहाणे हे भारताचे अव्वल क्रिकेटपटू मुंबईचे आहेत.

पर्यटन स्थळ :

जिल्ह्यातील पर्यटनस्थळे जुहू बीच, बोरीवली राष्ट्रीय उद्यान, मार्वे व मनोरी बीच, कान्हेरी व जोगेश्वरी गुंफा, एसेल वर्ल्ड, गोरेगांव चित्रनगरी, माऊंट मेरी चर्च, आरे कॉलनी, इ. या जिल्ह्याच्या अंधेरी उपनगरात गिल्बर्ट हिल नावाची टेकडी आहे.

ही टेकडी अमेरिकेतील डेव्हिल्स टॉवर सारखी आहे. मात्र डेव्हिल्स टॉवर ही टेकडी येलो स्टोन या प्रकारच्या दगडाची आहे. मात्र मुंबईतील गिलबर्ट हील ही ब्लॅक बेसॉल्ट या अतिकठीण दगडापासून बनलेली आहे. या दृष्टिकोनातून ही टेकडी जगातील अशा प्रकारची एकमेव टेकडी ठरते.

जुहु बीच :

जुहू हा परिसर श्रीमंतांचा परिसर म्हणुन मुंबईत ओळखला जातो. अनेक मोठमोठया कलाकारांचे आणि निर्मात्यांचे या परिसरात बंगले पहायला मिळतात.

जुहु बीच हे फेमस पर्यटनस्थळ असुन दिवसभर हा बीच लोकांनी अगदी गच्च भरलेला पहायला मिळतो. संध्याकाळी तर याला काही औरच रंग चढतो.

महाकाली गुफा :

मुंबई सारख्या शहरात चोहोदुर आपल्याला सिमेंटच्या मोठमोठ्या ईमारती दिसतात आणि या इमारतींमधेच जवळजवळ 2000 वर्षापुर्वीच्या गुफा देखील आहेत, असे जर मी तुम्हाला म्हंटले तर तुम्ही नक्कीच आश्चर्यचकीत होणार. पण हे खरे आहे येथे अंधेरी पुर्व भागात महाकाली गुफा म्हणुन आजही पाहाता येतात.

ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.

हे निबंध सुद्धा अवश्य वाचा :-

Child Labour Essay In Marathi

Doordarshan Essay In Marathi

Essay On Metro Rail In Marathi

Essay On World Wildlife Day In Marathi

My Country India Essay In Marathi

Subhash Chandra Bose Essay In Marathi

My School Essay In Marathi

Essay On Makar Sankranti In Marathi

माझे नाव सृष्टी आहे आणि मी या ब्लॉग ची संस्थापक आहे. मला माहिती लिहायला खूप आवडतात, म्हणून मी या माझ्या ब्लॉग वर मराठी मध्ये माहिती लिहित असते.

Leave a Comment