Manipur Information In Marathi मणिपूर हे एक निसर्गसुंदर असून अनेकदा त्याची तुलना स्वित्झर्लंडशी केली जाते. मणिपूर खोऱ्याच्या मध्यभागात वसलेले इंफाळ हे राजधानीचे शहर सांस्कृतिक, व्यापारी व राजकीय दृष्ट्या महत्त्वाचे आहे. येथील बाजारपेठ, पोलो मैदान, वस्तुसंग्रहालय, राजवाडा, सुवर्ण मंदिर, नृत्य अकादमी इ. उल्लेखनीय आहेत. तर चला मग पाहूया मणिपूर राज्याविषयी माहिती.

मणिपूर राज्याची संपूर्ण माहिती Manipur Information In Marathi
क्षेत्रफळ व विस्तार :
क्षेत्रफळ 22,356 चौ. किमी. असून अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय विस्तार अनुक्रमे 23° 50′ ते 25° 41′ उ. अक्षांश व 93° 2′ ते 94° 47′ पू. रेखांश यांदरम्यान आहे.
मणिपूर राज्याच्या उत्तरेस नागालँड राज्य, पूर्व व आग्नेय दिशांना ब्रह्मदेश, दक्षिणेस मिझोराम हा केंद्रशासित प्रदेश, पश्चिमेस आसाम राज्य असून इंफाळ ही मणिपूरची राजधानी आहे. मणिपूर राज्यातील हवामान थंड, आरोग्यवर्धक आहे. उन्हाळ्यातही हवा सामान्यपणे थंडच असते.
मणिपूरचा इतिहास :
मणिपूरचा प्रदीर्घ आणि गौरवशाली इतिहास इसवी सनाच्या सुरुवातीपूर्वीच उपलब्ध आहे. येथील राजवंशांचा लिखित इतिहास इसवी सन 33 मध्ये पखंगबाच्या राज्याभिषेकापासून सुरू होतो. त्याने या भूमीवर पहिला शासक म्हणून 120 वर्षे राज्य केले. त्यानंतर अनेक राजपुत्रांनी येथे राज्य केले. महावीर राजांनी मणिपूरवर राज्य केले आणि तिची सीमा संरक्षित केली.
मणिपूरचे स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व 19 व्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत टिकले. यानंतर बर्माच्या राज्यकर्त्यांनी येथे कब्जा केला आणि सात वर्षे राज्य केले. 1891 मध्ये मणिपूर ब्रिटीश सरकारच्या अधिपत्याखाली गेले आणि 1947 मध्ये त्याला इतर राज्यांपासून स्वातंत्र्य मिळाले.
मणिपूरची राजभाषा :
मणिपूर राज्यामधील प्रमुख मणिपुरी भाषा आहे. ही भाषा ईशान्य भारतातील सुमारे 15 लाख लोक वापरतात. भारताच्या संविधानामधील आठव्या अनुसूचीनुसार मणिपुरी ही भारताच्या 22 अधिकृत भाषांपैकी एक आहे.
समाजजीवन :
राज्यात 40 जमाती व उपजमाती आहेत. मणिपुरी लोक कमाल, लुआंग, मोइरंग व मेईथेई या चार जुन्या जमातींचे वंशज होत. आता ते मेईथेई या नावाने ओळखले जात असून इतरही काही जमाती त्यांतच मिसळल्या आहेत. राज्याच्या एकूण लोकसंख्येपैकी दोनतृतीयांश लोक हिंदू धर्मीय असून ते प्रामुख्याने मणिपूर खोऱ्यात रहातात.
ते विष्णुभक्त आहेत. ते स्वतःला हिंदू क्षत्रिय समजतात. मेईथेईशिवाय फुंगनाई जमातीचे लोक येथे असून त्यांच्या पाच उपजमाती आहेत. नागा व कुकी याही जमाती प्रमुख असून नागा जमाती सामान्यपणे उत्तर भागात, तर कुकी दक्षिण भागात आढळतात. नागांमध्ये तंगखुल, काबुई, कोईराव, मारिंग या उपजमातींचा समावेश होतो.
समाजात स्त्रियांना महत्त्वाचे स्थान आहे. मणिपूर खोऱ्यात व्यापार, तसेच खरेदी विक्रीचे सर्व व्यवहार त्याच पाहतात. पुरुष कुकी लोकांमध्ये मुलाला मामाच्या मुलीशी विवाह करावा लागतो. तसेच वराला वधूच्या घरी जाऊन रहावे लागते व त्या कुटुंबातील कामाचा भार उचलावा लागतो. अशीच प्रथा इतरही काही उपजमातीमध्ये आढळते.
मणिपूर राज्यातील उत्सव :
मणिपूर राज्यात वैष्णव पंथाशी निगडित असे सर्व धार्मिक सण व उत्सव साजरे केले जातात. होळी, दुर्गापूजा, दिवाळी हे येथील प्रमुख सण आहे. जून-जुलैमध्ये रथजत्रा, तर मार्चमध्ये दोलजत्रा असते. फाल्गुन महिन्यात येणारी होळी विशेष उत्साहाने साजरी केली जाते. होळीला येथे ‘माउ शांग’ असे म्हणतात. होळीच्या वेळी ‘थावल चोम्बा’ हे नृत्य केले जाते. हा नृत्य सोहळा 15 दिवसांपर्यंत चालतो.
नृत्य :
मणिपूरच्या लोकनृत्यांना देशाच्या सांस्कृतिक क्षेत्रात वेगळे स्थान आहे. मणिपूरचे लोक अतिशय धार्मिक आहेत आणि विशेषत: हिंदू देवता राधा आणि कृष्ण यांच्याशी संबंधित आहेत, जे बहुधा मणिपुरी लोकनृत्यांमध्ये चित्रित केलेले मुख्य पात्र आहेत.
पुंग चोलम नृत्य :
हा एक लोककला प्रकार आहे ज्यामध्ये पुंग चोलम आवाज आणि हालचालींचा समावेश आहे.
खंबा थाबी खंबा :
थाबी नृत्य हा एक लोकप्रिय कला प्रकार आहे, जो मणिपूरमध्ये मोठ्या प्रमाणावर सादर केला जातो.
रासलीला :
रासलीला हे मणिपूरचे आणखी एक लोकनृत्य आहे जे लोकांच्या मनात खोल भावना जागृत करण्यास सक्षम आहे.
माई नृत्य :
मणिपूरच्या खोऱ्यात राहणार्या मीतेई मणिपुरी लोकांचा वार्षिक विधी लाय हरोबा या सणाच्या उत्सवादरम्यान माई नृत्य केले जाते.
वनक्षेत्र :
राज्याचे 68 % क्षेत्र वनांनी व्यापले असून ते पर्वतीय भागात आढळते. मणिपूरमध्ये हत्ती, वाघ, गेंडा, अस्वल, हरिण, रानडुक्कर इ. वन्यप्राणी आढळतात. आग्नेयीकडील पर्वतरांगांमध्ये गेंडा व गवा, तर उंच पर्वतश्रेण्यांत अधूनमधून सिरो किंवा गोटअँटिलोप आढळतात. रानडुक्कर, हरिण हे प्राणी मैदानी प्रदेशातही दिसून येतात. लोकटाक सरोवरात रानघोडे तसेच बदके आहेत. तितर, कृकणपक्षी व वन्यपक्षी सर्वत्रच आढळतात.
पाइन, फर, ओक, बांबू, साग, सिंकोना, पाम हे येथील प्रमुख वृक्षप्रकार आहेत. जरदाळू, सफरचंद, नासपती, अलुबुखार ही फळझाडेही भरपूर आहेत. काही ठिकाणी चहाचे मळे आहेत. गवताची कुरणेही पुष्कळ आहेत. मणिपूर खोऱ्यात मात्र विरळ वनश्री आढळते. जळाऊ व इमारती लाकूड हे जंगलातून मिळणारे प्रमुख उत्पादन असून बांबू, गवत, सुगंधी द्रव्ये, दालचिनी ही इतर उत्पादनेही मिळतात.
शेती व उद्योग :
शेती हा येथील लोकांचा मुख्य व्यवसाय आहे. राज्याच्या एकूण उत्पादनापैकी 51% उत्पादन शेतीव्यवसाय व पशुपालन यांपासून मिळते. शेतीच्या दृष्टीने मणिपूर खोरे महत्त्वाचे आहे. या खोऱ्यातील मृदा गाळाची, तांबडी व पुरेशी खोलीची असून तीत भाताचे पीक चांगले निघते. एकूण कृषि उत्पादनापैकी 80% उत्पादन तांदळाचे असते. याशिवाय मोहरी, ऊस, विविध प्रकारची कडधान्ये, तंबाखू, खसखस, पालेभाज्या, गहू, ओट इ. पिकेही घेतली जातात. संत्री, लिंबू, अननस, केळी, फणस, सफरचंद, नासपती यांचेही उत्पादन घेतले जाते.
राज्यात चराऊ क्षेत्र पुरेसे असल्यामुळे पशुधनही भरपूर आहे. गाई, बैल, म्हशी, शेळ्या, मेंढ्या इ. प्राणी पाळले जातात. मणिपूरी तट्टू प्रसिद्ध असले, तरी चांगल्या जातीच्या तट्टूंची संख्या अलीकडे बरीच घटलेली आढळते. डोंगराळ भागातील आदिवासी जमाती केवळ मांसासाठीच काही प्राणी पाळतात.
मणिपूरचे हवामान व जमीन तुतीच्या झाडांच्या वाढीला पोषक असल्याने त्यावर रेशमाचे किडे पोसून त्यांपासून रेशीम मिळविले जाते. ओक टसर उत्पादन करणारे मणिपूर हे भारतातील पहिले राज्य असून राज्यात एकूण 54 टसर उत्पादन क्षेत्रे आहेत.
त्याव्यतिरिक्त लघुउद्योगात सुतारकाम, लोहारकाम, चर्मोद्योग, भरतकाम, विटा बनविणे, शिवणकाम, सोनार काम, वाहनांची दुरूस्ती व संधारण, कथिलकाम या उद्योगांचा समावेश होतो. लघुउद्योगांना कच्चा माल पुरविणे व पक्क्या मालाची विक्रीव्यवस्था करणे, ही कामे मणिपूर लघुउद्योग महामंडळातर्फे पार पाडली जातात.
दळणवळण मार्ग :
मनिपुरमध्ये डोंगराळ भूप्रदेशामुळे व राज्याचे स्थान काहीसे एकाकी असल्यामुळे वाहतूक आणि दळणवळणाच्या साधनांची न्यूनता भासते. येथील बरेचसे रस्ते कच्चे आहेत. येथे दोन प्रमुख रस्ते असून त्यांपैकी एक पश्चिमेस आसामच्या काचार जिल्ह्यात, तर दुसरा काझीरंगा (आसाम) ते दक्षिणेस ब्रम्हदेशाच्या सीमेपर्यंत जाणारा राष्ट्रीय महामार्ग इंफाळ वरून जातो.
मणिपूर राज्यमार्ग परिवहन महामंडळाशिवाय पाच खाजगी कंपन्यांकडून मोटार वाहतूक केली जाते. राज्यात लोहमार्ग नाहीत. नागालँडमधील दिमापूर व आसाममधील सिल्चर ही सर्वात जवळची लोहमार्ग स्थानके आहेत. ही दोन्ही ठिकाणे रस्त्याने मणिपूरशी जोडलेली आहेत. इंफाळ हे कलकत्ता, सिल्चर व गौहाती यांच्याशी हवाईमार्गाने जोडलेले आहे.
पर्यटन स्थळ :
मणिपूरमध्ये अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत, येथील खाद्यपदार्थ आणि कपडे देखील पर्यटकांना आकर्षित करतात. दरवर्षी देश-विदेशातील पर्यटक मोठ्या संख्येने येथे येतात.
चुरचंदपूर: तुम्हाला मणिपूरला जायचे असेल तर तुम्ही चुरचंदपूरला जाऊ शकता. हे एक अतिशय प्रसिद्ध ठिकाण आहे.
इंफाळ : इंफाळ ही मणिपूरची राजधानी आहे, जिथे तुम्हाला अनेक प्रेक्षणीय स्थळे पाहायला मिळतील. निसर्गाने इथे अनेक दऱ्या आणि आकर्षणाची अनेक केंद्रे आहेत.
चंदेल : चंदेल हा मणिपूरचा जिल्हा आहे, जो त्याच्या सौंदर्यासोबतच त्याच्या संस्कृतीसाठीही ओळखला जातो. येथे तुम्हाला निसर्गाचे अनेक अद्भुत नजारे पाहायला मिळतील. तसेच येथील नृत्य आणि संगीत खूप प्रसिद्ध आहे.
थौबल: मणिपूरमधील थौबल ठिकाणी जाऊन तुम्ही तुमच्या सुट्टीचा खरोखर आनंद घेऊ शकता.
ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेयर करा.
हे निबंध सुद्धा अवश्य वाचा :-
- Child Labour Essay In Marathi
- Doordarshan Essay In Marathi
- Essay On Metro Rail In Marathi
- Essay On World Wildlife Day In Marathi
- My Country India Essay In Marathi
- Subhash Chandra Bose Essay In Marathi
- My School Essay In Marathi
- Essay On Makar Sankranti In Marathi
FAQ
1. मणिपूर कशासाठी प्रसिद्ध आहे?
मणिपूर केवळ त्याच्या समृद्ध संस्कृती आणि परंपरांसाठी प्रसिद्ध नाही तर त्याच्या दोलायमान नृत्य प्रकार आणि संगीत, निसर्गरम्य लँडस्केप्स आणि स्वादिष्ट स्थानिक पाककृतींसाठी देखील प्रसिद्ध आहे.
2. मणिपूरचे मुख्य अन्न कोणते आहे?
मणिपुरी पाककृतीचे मुख्य अन्न भात आहे, जे अनेकदा मांस, मासे आणि भाज्यांच्या विविध पदार्थांसह दिले जाते. मासे, भाज्या आणि विविध प्रकारच्या औषधी वनस्पती आणि मसाल्यांसारख्या स्थानिक स्रोतांच्या वापरासाठी पाककृती ओळखली जाते.
3. मणिपूर खास का आहे?
नैसर्गिक सौंदर्यामुळे याला “रत्नजडित जमीन” असे संबोधले जाते. हे रास लीला, शास्त्रीय मणिपुरी नृत्याचे जन्मस्थान आहे. याशिवाय, मणिपूर आपल्या स्वादिष्ट पाककृतीसाठी देखील प्रसिद्ध आहे. मणिपूरचे अन्न अतिशय आरोग्यदायी मानले जाते.
4. मणिपूरचे खरे नाव काय आहे?
मणिपूरला इतिहासातील विविध कालखंडात वेगवेगळ्या नावांनी ओळखले जात होते, जसे की, तिल्ली-कोकटोंग, पोइरेई-लाम, सन्ना-लीपाक, मितेई-लीपाक, मीत्रबक किंवा मणिपूर (सध्याचे). त्याची राजधानी कांगला, युम्फळ किंवा इंफाळ (सध्याचे) होती.
5. मणिपुरी ड्रेस म्हणजे काय?
इन्नाफी आणि फणेक हे मणिपूरमधील महिलांसाठी मणिपुरी पारंपरिक पोशाख आहेत. सर्व मणिपुरी स्त्रिया हे पोशाख परिधान करतात. फाणेक सरोंग सारखा परिधान केला जातो. मणिपुरी पोशाख आडव्या रेषेत हाताने विणले जातात.