सरकारी योजना Channel Join Now

आंबा झाडाची संपूर्ण माहिती Mango Tree Information In Marathi

Mango Tree Information In Marathi फळांचा राजा या नावाने सर्वत्र परिचित असणारे फळ म्हणजे आंबा होय. फळांचा राजा असण्याबरोबरच ते भारताचे राष्ट्रीय फळ म्हणून देखील ओळखले जाते. आंब्याचे झाड हे अनेक वर्ष जगते, आणि आपल्याला रसाळ आंब्याचे फळ देत राहते. सावलीसाठी देखील उत्तम असणारे हे झाड भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. चांगले लक्ष दिले आणि चांगली जमीन असली की हे झाड तब्बल साठ फुटापर्यंत वाढू शकतात. आजच्या भागामध्ये आपण या आंबा झाडाविषयी माहिती बघणार आहोत, चला तर मग सुरु करूया…

Mango Tree Information In Marathi

आंबा झाडाची संपूर्ण माहिती Mango Tree Information In Marathi

नावआंबा
इंग्रजी नावMango tree
इतर नावेआम
शास्त्रीय नावMangifera indica
कुटुंब / कुळAnacardiaceae
किंगडमप्लांटी
ऑर्डरसॅपीनाडेल्स
उच्च वर्गीकरण / जिनसMangifera
प्रजाती / स्पेसिजइंडिका

भारतीय उपखंडामध्ये उगम पावलेले एक आंबटसर मधुर फळ म्हणजेच आंबा होय. यानंतर भारतातून हे फळ हळूहळू इतर देशांमध्ये पसरले, आणि पाहता पाहता सर्व जगभर झाले. भारताने राष्ट्रीय फळ आणि बांगलादेशने राष्ट्रीय वृक्ष म्हणून घोषित केलेल्या या आंब्याचे सर्व जगभर चाहते आढळून येतात.

भारतीय आंबा इतर देशांमध्ये प्रसारित होण्याची एक कहाणी आहे, ज्यावेळी इसवी सन १४९८ यावर्षी पोर्तुगीज व्यापारी केरळमध्ये मसाल्यांच्या व्यापारासाठी दाखल झाले, तेव्हा त्यांनी आंब्याची फळे चाखली. ती त्यांना खूप आवडली, त्यामुळे आपल्याही देशात अशी फळे उगवता येतील का, यावर त्यांनी विचार केला. आणि काही आंबाची फळे आणि रोपे त्यांनी आपल्या मायदेशी नेली. त्यांनी आंब्याला मांगा म्हणून नाव दिले, आणि त्यापासून पुढे मँगो हा शब्द रूढ झाला.

भारत आणि आंबा यांचे फार जवळचे असे नाते आहे. संपूर्ण जगभरातील आंब्यांपैकी ७५ टक्के आंबा हा आशिया खंडात, आणि संपूर्ण देशाच्या आंबा उत्पादनापैकी सुमारे ४१ टक्के आंबा हा भारतात उत्पादित होतो. भारताखालोखाल चीन आणि थायलंड हे आंबा उत्पादक देशांमधील सर्वात आघाडीवर आहेत.

आंब्याचे झाड संपूर्ण वर्षभर हिरवेगार राहत असले, तरी देखील त्याला फळे फक्त उन्हाळ्याच्या ऋतू मध्येच येतात. आंब्याला बहार येण्याच्या वेळेनुसार इतरही पिकांसाठीची आंबा बहार ही संकल्पना रूढ झालेली आहे.

आंब्याचे झाड हे आकाराने प्रचंड मोठे असते. तसेच ते चांगले वातावरण मिळाल्यास सुमारे ६० फूट उंचीपर्यंत वाढवू शकते. या झाडाची पाने ही लांबट असून त्याला समोर टोके असतात. या पानांची लांबी ही सुमारे पाऊण ते एक फुटापर्यंत असते. हिरव्या रंगाची ही पाने धार्मिक महत्त्वाची देखील असतात. त्याचा वापर विविध कलश निर्मिती करणे, किंवा तोरण बांधणे या कामांसाठी केला जातो.

आंब्याची फळे ही एका हातात मावू शकतील इतक्या आकाराची असतात, मात्र आजकाल विविध संकरित वाणांमुळे हा आकार वाढत चाललेला आहे. सुरुवातीला हिरव्या रंगात असणारा हा आंबा कैरी म्हणून ओळखला जातो. याचा वापर लोणचे निर्मिती करण्यासाठी केला जातो. ज्यावेळी आंबा पिकतो त्यानंतर केशरी किंवा लालसर पिवळा व्हायला लागतो. तर देठाच्या भागाजवळ अतिशय बारीक ठिपक्यांच्या खुणा असतात.

आंबा सेवनाचे फायदे:

सर्वांना आवडणारा हा आंबा अतिशय फायदेशीर देखील आहे, यामुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. तसेच उन्हाळ्यात होणारा उष्माघात देखील टाळला जाऊ शकतो. हा आंबा पचनक्रिया मजबूत करण्याबरोबरच डोळ्यांचे आरोग्य देखील वाढवतो, आणि कर्करोगाचा धोका देखील कमी करतो. ज्या लोकांना विसरभोळेपणाची समस्या असेल त्यांनी आंबा सेवन केल्यास त्यांची स्मरणशक्ती चांगली वाढू शकते.

आंबा सेवनाचे तोटे किंवा नुकसान:

आंबा हा गोडसर फळ असल्यामुळे ज्यांना डायबिटीस आहे त्यांच्यासाठी आंबा सेवन करणे नुकसानदायी ठरू शकते, तसेच उच्च रक्तदाबाचा त्रास असणाऱ्या रुग्णांनी आंबा हा योग्य प्रमाणातच खायला हवा. मित्रांनो, आंबा सेवनाने पोट साफ होत असले तरी देखील अति प्रमाणात आंबा खाणे अतिसारसारखे त्रास घडवून आणू शकतात. कारण आंब्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. काही लोकांना आंबा सेवनामुळे एलर्जी देखील होऊ शकते.

आंब्या विषयीची काही मनोरंजक तथ्ये:

आंबा हे भारताचे राष्ट्रीय फळ असून, त्याला फळांचा राजा म्हणून देखील ओळखले जाते. इतर फळांप्रमाणे आंबा संपूर्ण वर्षभर न येता फक्त उन्हाळ्यातच पिकतो, मात्र हल्ली संकरित वाणांची निर्मिती करून वर्षभर पिकणाऱ्या आंब्यांची निर्मिती करण्याचे सुरू आहे.

आंबा आपल्या पिकण्याच्या टप्प्यावर हळूहळू रंग बदलतो. त्यामध्ये प्रमुखतेने हिरवा, केसरी आणि पिवळ्या रंगाचा समावेश होतो. आंबा सेवनामुळे आपल्याला जीवनसत्व अ, क आणि ड मुबलक प्रमाणात मिळते.

आंबा हे भारतात उगम पावल्यामुळे भारताचे आंबा उत्पादन खूप मोठ्या प्रमाणावर आहे. ज्यामध्ये अंबानी कुटुंबीयांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज चा देखील मोठा वाटा आहे. त्यांनी त्यांच्या कारखान्यामधून निघणाऱ्या प्रदूषणाला कमी करण्याकरिता मोठ्या प्रमाणावर आंब्याची लागवड केलेली आहे.

आंबा हे खाण्याचे पदार्थ असला, तरीदेखील हिंदू धर्मामध्ये त्याला पूजनीय स्थान देऊन पवित्र मानले जाते. तसेच विविध धार्मिक प्रसंगी आंब्याची पाने वापरून तोरण किंवा कलश बनविले जातात.

निष्कर्ष:

आंबा आवडत नाही असा कोणीही मनुष्य अपवाद वगळता तरी नसेल. आंबा हे वर्षातून एकदा येणारे फळ असून, ते उन्हाळ्यामध्ये येते. यावेळी आपण सर्वजण या आंबा फळाची मेजवानी लुटत असतो. आमरस, कापून खाणे, लोणचे बनवणे असा कितीतरी रूपाने आंबा आपल्याला खाता येत असतो.

मात्र आजकाल शहरांमध्ये मिळणारे आंबे हे कृत्रिम पद्धतीने पिकवण्यात आलेले असतात, त्यामुळे शक्यतो आंबा घेताना तो चाचपून घेणे अतिशय गरजेचं असतं. अन्यथा आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते.

शक्यतो गावाकडील मंडळींनी विकण्यासाठी ठेवलेल्या, भले थोड्याशा सुरकुत्या पडलेल्या आंब्यांची निवड केली तर तुम्हाला निरोगी आणि निकोप अन्न खायला मिळेलच, वरून लक्षात राहण्याजोगी अनोखी चव देखील चाखायला मिळेल. जर शक्य असेल तर गावाकडे जाऊन आंबे खाणे कधीही उत्तमच.

FAQ

आंब्याच्या निकोप वाढीसाठी कोणत्या घटकांची आवश्यकता असते?

आंब्याच्या वाढीसाठी उष्णकटिबंधीय प्रदेश, कमी थंडी, आणि वसंत ऋतू दरम्यान लागवड करणे तसेच चांगली कसदार जमीन आणि आवश्यकतेनुसार पाणी इत्यादी घटक आवश्यक असतात.

आंब्याचे झाड इतके प्रसिद्ध होण्यामागे काय कारण आहे?

मित्रांनो, आंब्याची फळे ही सर्वांनाच आवडणारी फळे आहेत. त्याचा काहीसा आंबटसर गोड मधुर रस किंवा गर प्रत्येकाच्या जिभेवर वेगळीच चव रेंगाळत ठेवतो. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे वर्षातून एकाच हंगामामध्ये हे फळ खायला मिळत असल्यामुळे प्रत्येक जण त्याची आतुरतेने वाट बघतो. त्यामुळे आंब्याचे झाड फार प्रसिद्ध झालेले आहे.

आंब्याचे झाड कोण कोणत्या देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळते?

आंब्याचे झाड मेक्सिको, टूरीडा, दक्षिण अमेरिका ,हैती भारत इत्यादी देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळते.

आंबा उत्पादनात कोणता खंड आघाडीवर आहे?

आंबा उत्पादनामध्ये आशिया हा खंड सर्वात आघाडीवर आहे. जगातील एकूण आंबा उत्पादनाच्या सुमारे ७५ टक्के आंबा उत्पादन एकट्या आशिया खंडात होते.

आंबा या फळझाड वर्गीय पिकाचे उगमस्थान कोणत्या देशात आहे?

आंबा या फळझाड वर्गीय पिकाचे उगमस्थान भारत या देशांमध्ये आहे.

आजच्या भागामध्ये आपण आंबा या फळ झाडाविषयी ची माहिती पाहिली. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही आम्हाला न चुकता कळवत असताच, मात्र ही माहिती शेअर करण्यात देखील मागे राहू नका, ही तुम्हाला विनंती.

 धन्यवाद…

माझे नाव सृष्टी आहे आणि मी या ब्लॉग ची संस्थापक आहे. मला माहिती लिहायला खूप आवडतात, म्हणून मी या माझ्या ब्लॉग वर मराठी मध्ये माहिती लिहित असते.

Leave a Comment