Majhi Aawadti Samajsevika Essay In Marathi समाजसेविका म्हणजेच समाजाची सेवा करणारी. आपल्या महाराष्ट्रात अशीच एक समाजसेविका होती तिने कुष्ठरोग्यांची सेवा करण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य अर्पण केले. मित्रांनो तुम्ही यांना ओळखलेच असेल, तर ती साधनाताई आमटे आहेत. हि माझी आवडती समाजसेविका आहेत.
माझी आवडती समाजसेविका – मराठी निबंध Majhi Aawadti Samajsevika Essay In Marathi
साधनाताई आमटे यांनी आपले पती बाबा आमटे यांच्यासोबत कुष्ठरोग्यांची निशुल्क सेवा केली. यांच्या या कार्यासाठी यांना चतुरंग प्रतिष्ठानाद्वारे २००७ साली चतुरंग जीवनगौरव पुरस्काराने सम्मानित करण्यात आले. तर आता आपण पाहूया यांचे संपूर्ण जीवनकार्य ….
साधनाताई आमटे यांचा जन्म कृष्णशास्त्री घुले यांच्या घरी ५ मे १९२७ रोजी नागपूर येथे झाला. त्यांचा जन्म ब्राह्मण कुटुंबात झाला होता, तसेच त्यांनी आपले शिक्षण इंटर पर्यंत घेतले होते. एकदा बाबा आमटे कौटुंबिक लग्नात गेले असता त्यांनी इंदूला पहिले आणि एकमेकांचे मन जुळले. अखेर ८ डिसेंबर १९४६ रोजी त्या विवाहबद्ध झाल्या.
बाबा आमटे यांचा विचार लग्न करण्याचा नव्हता पण त्या लग्नात इंदुना पाहिल्या बरोबर त्यांची मने जुळली आणि बाबा आमटे यांनी आपले ब्रम्हचर्य व्रत सोडले. बाबा आमटे यांनी तिच्या सर्व कार्यात तिला प्रेरणा, शक्ती आणि पाठबळ दिले.
बहिष्कृत समाजात राहण्यासाठी म्हणून तिला आपल्या कुटुंबातून हद्दपार व्हावे लागले. पण तिने कोणत्याही प्रकारची खंत न बाळगता बाबा आमटे सोबत ठाम उभी राहिली. आपल्या पतीसोबत कुष्ठरोग्यांची नि:स्वार्थ सेवा करण्यासाठी ती मागे केव्हाच हटली नाही, तर तिने बाबा आमटे यांच्या पावलावर पाउल ठेऊन ठामपणे आपले कार्य करत राहिली.
आश्रमचा सर्व कारभार साधनाताई बघत असत. यानंतर त्यांनी कुष्ठरोग निर्मुलन कार्य करण्यास सुरवात केली. कुष्ठरोगाचा संपूर्ण आभ्यास सुरु केला. त्यासाठी त्या बाबांबरोबर कलकत्याला गेले. विनोभा भावे यांनी हि त्यांना मदत केली. आनंदवनात कितीही पाहुणे आले तरी साधनाताई त्यांच्यासाठी स्वयंपाक करीत असत.
बाबा आनंदवनात बाबा महारोग्यचे जीवन घडवत होते. तर साधनाताई त्यांना या कामात मदत करीत होत्या. हळूहळू आनंदवनातील महारोग्याची संख्या वाढू लागली. आनंदवनात बाबांनी शेती व भाजीपाला लागवड करायला सुरुवात केली. आनंदवनातील जंगल जमीन शेतीखाली आली. संसारोपयोगी वस्तूचे उत्पादन या ठिकाणी होऊ लागले.
बाबा आमटे यांना जेव्हाही पुरस्कार मिळत होते तेव्हा ते नेहमी सौ. साधनाताई माझ्या पाठीशी असल्यामुळे मला हे सर्व शक्य झाले असे ते म्हणायचे. “समिधा” या आत्मचरित्र पुस्तकात या दोघांच्या जीवनाची गाथा सांगितली आहेत.
साधना ताई यांचे जीवन संघर्ष, मानवी मनाच्या दुर्बलतेविरूद्ध संघर्ष, जगाच्या क्रौर्याविरूद्ध संघर्ष ही एक गाथा होती. तिने बर्यापैकी कामगिरी करून, नवीन मार्ग मोकळा करून, नंतरच्या पिढ्यांना बरीच कर्तव्ये आणि सामाजिक जबाबदाऱ्या सोपवून अखेर ९ जुलै २०११ रोजी अंतिम श्वास घेतला. तिच्या कल्पना आणि आदर्शांद्वारे तसेच कार्याद्वारे ती सदैव जिवंत आहे.
हे निबंध सुद्धा अवश्य वाचा :-
Essay On Importance Of Cleanliness In Marathi
Essay On Save Electricity In Marathi
My Best Friend Essay In Marathi
My Country India Essay In Marathi
Subhash Chandra Bose Essay In Marathi
Essay On