Majha Avadta Kavi Marathi Nibandh कवी कुसुमाग्रज हे माझे अत्यंत आवडते कवी आहेत कारण त्यांची एक कविता आहेत ती खूपच नव-युवकांना प्रेरणा देणारी आहेत. कवी कुसुमाग्रजांचा जन्मदिवस हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो.
माझा आवडता कवी मराठी निबंध Majha Avadta Kavi Marathi Nibandh
हे मराठी भाषेतील अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार कथाकार व समीक्षक होते. त्यांनी कुसुमाग्रज या टोपणनावाने कवितालेखन केले. ते आत्मनिष्ठ व समाजनिष्ठ जाणीव असणारे मराठीतले महत्त्वाचे लेखक मानले जातात.
त्यांच्यातल्या शोधक आणि चिकित्सक स्वभावाने त्यांना प्रत्यक्ष ईश्वरासंबंधी प्रश्न उपस्थित करायला आणि माणसाच्या समग्रतेचे आकलन करायला प्रवृत्त केले. त्यांचे समृद्ध आणि प्रगल्भ व्यक्तिमत्त्व वैविध्यपूर्ण आणि प्रसन्न रूपात त्यांच्या साहित्यात प्रतिबिंबित झाले आहे. मराठी कुसुमाग्रजांच्या कविता तरुणांना प्रेरणा देणा-या आहेत. त्यांची कणा ही कविता युवकांना स्फूर्ती देणारी आहे.
ओळखलत का सर मला?’ पावसात आला कोणी, कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी.
क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून, ‘गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहुन’.
माहेरवाशिणीसारखी चार भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली.
भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते नेले, प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले.
कारभारणीला घेउन संगे सर आता लढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे.
खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला ‘पैसे नकोत सर’, जरा एकटेपणा वाटला.
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेउन, तुम्ही फक्त लढ म्हणा!
कवी कुसुमाग्रज यांचे पूर्ण नाव विष्णू वामन शिरवाडकर आहेत. आणि त्यांना कुसुमाग्रज या टोपण नावाने ओळखले जातात. कुसुमाग्रज यांचा जन्म २७ फेब्रुवारी १९१२ रोजी पुणे येथे झाला होता.त्यांचे मूळ नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर असे होते.
त्यांचे काका वामन शिरवाडकर यांनी त्यांना दत्तक घेतल्याने त्यांचे नाव विष्णु वामन शिरवाडकर असे बदलले गेले. कुसुमाग्रजांचे वडील वकील होते, वकिलाच्या व्यवसायासाठी ते पिंपळगाव बसवंत या तालुक्याच्या गावी आले, कुसुमाग्रजांचे बालपण येथेच गेले.
कुसुमाग्रजांना सहा भाऊ आणि कुसुम नावाची एक लहान बहीण होती, एकुलती एक बहीण सर्वांची लाडकी म्हणून कुसुमचे अग्रज म्हणून ‘कुसुमाग्रज’ असे नाव त्यांनी धारण केले. तेव्हापासून शिरवाडकर कवी ‘कुसुमाग्रज’ या टोपण नावाने ओळखले जाऊ लागले.
नाशिक येथे त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. बी.ए.ची पदवी मिळाल्यानंतर काही काळ त्यांनी चित्रपट व्यवसायात पटकथा लिहिणे, चित्रपटात छोट्या भूमिका करणे अशी कामे केली.
यानंतर सोबत, स्वराज्य, प्रभात, नवयुग, धनुर्धारी, अशा विविध नियतकालिकांचे, वृत्तपत्रांचे संपादक म्हणून त्यांनी काम केले. १९३२ साली झालेल्या काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहात त्यांचा सहभाग होता. १९३३ साली त्यांनी ‘ध्रुव मंडळा’ची स्थापना केली. अनेक सामाजिक चळवळीत, सत्याग्रहांमधे सहभाग घेतला. पुढील काळातही त्यांनी नाशिक जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत केली.
’नटसम्राट’या नाटकाला ला १९७४ मध्ये साहित्य अकादमीचा पुरस्कार तर “ययाती आणि देवयानी” या नाटकास १९६६ या वर्षी तसेच संगीत “वीज म्हणाली धरतीला” या नाटकास १९६७ मध्ये राज्य शासनाचे पुरस्कार मिळाले.
हे निबंध सुद्धा अवश्य वाचा :-
- Child Labour Essay In Marathi
- Doordarshan Essay In Marathi
- Essay On Metro Rail In Marathi
- Essay On World Wildlife Day In Marathi
- My Country India Essay In Marathi
- Subhash Chandra Bose Essay In Marathi
- My School Essay In Marathi
- Essay On Makar Sankranti In Marathi
FAQ
कुसुमाग्रज यांचे पूर्ण नाव काय आहे?
कुसुमाग्रज यांचे पूर्ण नाव विष्णू वामन शिरवाडकर आहेत.
कुसुमाग्रज यांचा जन्म केव्हा झाला?
कुसुमाग्रज यांचा जन्म २७ फेब्रुवारी १९१२ रोजी पुणे येथे झाला होता.
कुसुमाग्रज यांचे मूळ नाव काय आहे?
मूळ नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर असे होते.
कुसुमाग्रजांना कोणता पुरस्कार मिळाला?
त्यांना नटसम्राट, पद्मभूषण (1991) आणि 1987 मध्ये ज्ञानपीठ पुरस्कारासाठी 1974 चा मराठीतील साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता
कुसुमाग्रज यांचा मृत्यू कधी झाला?
१० मार्च १९९९, नाशिक