महात्मा गांधी यांची संपूर्ण माहिती Mahatma Gandhi Information In Marathi

Mahatma Gandhi Information In Marathi नमस्कार मित्रांनो ज्ञान आणि मनोरंजनाच्या या प्रवासात मी तुमचे सहर्ष स्वागत करते. तर मित्रांनो ज्यांनी संपूर्ण देशाला अहिंसा ,सत्याग्रह याचे महत्त्व पटवून दिले त्या थोर महापुरुषाबद्दल म्हणजे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल या लेखात आपण माहिती पाहणार आहोत.

भारत देशाच्या स्वातंत्र्यसंग्रामातील एक अग्रभागी असलेले नेते व तत्वज्ञ म्हणजेच महात्मा गांधी होय .त्यांनी अहिंसा व सत्याग्रहाच्या मार्गाने आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी लढा दिला. त्यांना राष्ट्रपिता ही उपाधी बहाल करण्यात आलेली आहे .थोर विचारवंत मार्टिन ल्युथर किंग व नेल्सन मंडेला यांच्यावर देखील महात्मा गांधींच्या सत्य व अहिंसेच्या विचारधारेचा प्रभाव पाहावयास मिळतो .महात्मा गांधींनी आफ्रिकेमध्ये देखील 21 वर्ष वर्णभेद ,अन्याय या विरुद्ध लढा दिला. ज्याची किंमत ही भारतातील ब्रिटिशांना देखील भोगावी लागली.

Mahatma Gandhi Information In Marathi

महात्मा गांधी यांची संपूर्ण माहिती Mahatma Gandhi Information In Marathi

प्राथमिक माहिती-

महात्मा गांधींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी हे होते. तर त्यांच्या वडिलांचे नाव हे करमचंद उत्तमचंद गांधी व आईचे नाव पुतळी बाई गांधी असे होते. या राष्ट्रपित्याचा जन्म 2 ऑक्टोबर 1859 रोजी पोरबंदर गुजरात येथे झाला होता. ते हिंदू धर्मीय होते व गुजराती या प्रवर्गात मोडणारे होते. त्यांनी बॅरिस्टर पर्यंतचे शिक्षण घेतलेले होते व ते पेशाने वकील, राजकारणी, कार्यकर्ते व लेखक होते .

त्यांच्या पत्नीचे नाव हे कस्तुरबा गांधी होते व त्यांच्या आपत्यांची नावे ही हरिलाल ,मनीलाल ,रामदास ,देवदास अशी होती.
महात्मा गांधींनी असे संबोधले होते,” की एखाद्या देशाची संस्कृती तेथील रहिवाशांच्या हृदयात आणि आत्म्यात वसलेली असते.”

महात्मा गांधींचे बालपण व सुरुवातीचे आयुष्य-

महात्मा गांधींचे वडील हे पानसरी जातीचे सनातन धर्मातील व्यक्ती होते. ब्रिटिश राजवटीच्या काळखंडात काठीयावाडच्या पोरबंदर संस्थानांचे ते दिवाण होते. त्यांच्या आई या अतिशय धार्मिक स्त्री होत्या. महात्मा गांधी यांचा विवाह साल 1883 मध्ये कस्तुरबा माखनजी यांच्याशी झाला .त्यावेळी त्यांचं वय 13 वर्ष होतं. कस्तुरबा या त्यावेळी 14 वर्षांच्या होत्या. महात्मा गांधी व कस्तुरबा गांधी यांचा देखील बालविवाह झालेला होता.

महात्मा गांधींचे शिक्षण –

सन 1887 मध्ये नोव्हेंबर महिन्यात महात्मा गांधींनी मॅट्रिकची परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण केली व पुढे जाऊन त्यांनी पदवीचे शिक्षण देखील पूर्ण केले. 4 सप्टेंबर 1888 साली महात्मा गांधीजींनी लंडन येथे जाऊन आपले कायद्याचे शिक्षण पूर्ण केले व बॅरिस्टर ही पदवी मिळवली.

दक्षिण आफ्रिकेमधील कामगिरी सन 1893 मध्ये महात्मा गांधींनी हिंदी कंपनीचे वकील म्हणून आफ्रिकेत जाण्याचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकेत गेल्यावर महात्मा गांधींना देखील वर्णभेदामुळे भेदभावाला सामोरे जावे लागले. व तेथे त्यांनी भारतीयांना दिली जाणारी तुच्छ वागणूक देखील पाहिली त्यावर त्यांनी भयंकर संताप व्यक्त केला.

महात्मा गांधी आफ्रिकेला जात असताना त्यांच्याकडे पहिल्या वर्गाचे तिकीट होते पण रेल्वे अधिकाऱ्यांनी त्यांना तृतीय वर्गाच्या डब्यामध्ये बसण्यास सांगितले महात्मा गांधींनी हे करण्यास नकार दिला त्यावेळी त्यांना अपमानित करण्यात आले व रेल्वेच्या डब्यामधून त्यांना बाहेर हकलले गेले .ती वेळ होती रात्रीची त्यामुळे महात्मा गांधींनी रेल्वे फलाटावरच गेस्ट रूम मध्ये राहून कशीबशी रात्र काढली.

त्यांनी मनोमनी ही गाठ बांधली की या वर्णभेदाच्या विरुद्ध आपण लढा द्यायचा. मतदानाचा हक्क हा भारतीयांकडून काढून घेणारा कायदा लागू केला जाणार होता या कायद्याविरोधात देखील गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेमध्ये खूप लढा दिला पण त्यात ते यशस्वी ठरले नाही.

पण वर्णभेला विरुद्ध ची चळवळ त्यांनी यशस्वी करून दाखवली. सन 1894 साली दक्षिण आफ्रिका येथे भारतीय काँग्रेसची स्थापना महात्मा गांधींनी केली व दक्षिण आफ्रिकेमध्ये जे विखुरलेले भारतीय होते त्यांना एकाच राजकीय चित्राखाली आणण्यासाठी महात्मा गांधींनी हे प्रयत्न केले.

सन 1906 रोजी ट्रान्सवाल सरकारने अशी घोषणा केली की कायद्याद्वारे प्रत्येक भारतीय नागरिकाला स्वतःची नोंदणी करणे हे बंधनकारक असेल .त्यावेळी त्यांनी भारतीयांना असा उपदेश दिला की अहिंसक पद्धतीने या कायद्यास विरोध केला जावा व विरोध करताना होणारे अत्याचार हे सहन करावे.

महात्मा गांधी यांचा भारताकडे प्रवास- सन 1915 रोजी महात्मा गांधी हे कायमचे भारतात परतले. महात्मा गांधी हे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते होते .त्यांनी अनेक संमेलनांमध्ये भाषणे देखील केलेली होती .महात्मा गांधींची आंतरराष्ट्रीय ख्याती वेगवेगळ्या नावांनी प्रसिद्ध होती .थिओरिस्ट, संघटक प्रमुख ,भारतीय राष्ट्रवादी अशी त्यांची ख्याती प्रसिद्ध होती.

महात्मा गांधींना भारतातील सर्व राजकीय घडामोडी व समस्यांचा परिचय हा गोपाळ कृष्ण गोखले यांनी करून दिला होता. गोपाळ कृष्ण गोखले हे तेव्हाचे काँग्रेसमधील प्रमुख नेते होते. त्यावेळी गोपाळ कृष्ण गोखले यांचे संयमी व भारतीय व्यवस्थेमध्ये राहून काम करणारे नेते अशी ओळख होती. गोपाळ कृष्ण गोखले यांना महात्मा गांधींचे राजकीय गुरु म्हणून देखील संबोधले जाते. सन 1920 मध्ये बाळ गंगाधर टिळक जे काँग्रेसचे नेते होते यांच्या निधनानंतर गांधीजी काँग्रेसचे प्रमुख नेते बनले .

महात्मा गांधींचे महान कार्य –

महात्मा गांधींनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आता चळवळी करण्यास प्रारंभ केला होता. गांधीजींनी अनेक चळवळी चालवल्या व त्या यशस्वीरित्या इंग्रज सरकार विरुद्ध पार देखील पाडल्या. आता आपण महात्मा गांधींनी स्वातंत्र्यलढ्यासाठी केलेल्या चळवळींचा थोडक्यात आढावा घेऊयात.

  • चंपारण्य सत्याग्रह 1917
  • खेडा सत्याग्रह 1918
  • रौलट कायदा 1919
  • जालियनवाला बाग हत्याकांड 1919
  • खिलाफत चळवळ 1920
  • असहकार चळवळ 1920
  • चौरी चौरा दुर्घटना उत्तर प्रदेश 1922 मिठाचा सत्याग्रह 1930
  • दांडी यात्रा
  • हरिजन चळवळ 1933
  • दुसरे महायुद्ध आणि भारत छोडो आंदोलन 1939

महात्मा गांधींनी बिहार मधील चंपारण्य या ठिकाणी युरोपियन लोकांच्या निळीच्या मळे मालकांकडून गरीब शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराविरुद्ध चंपारण्य सत्याग्रह केला होता. त्याचबरोबर सन 1918 रोजी गुजरात या ठिकाणी खेडा जिल्ह्यामध्ये भयंकर दुष्काळ पडला होता संपूर्ण पिके ही जळून गेली होती पण अशातही शासकीय अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून जबरदस्तीने शेत सारा वसूल केला असताना महात्मा गांधींनी या जुलमी शासकीय अधिकाऱ्याविरुद्ध खेडा सत्याग्रह 1918 पार पाडला.

पंजाब मधील डॉक्टर सफुद्दीन चिचळू व सत्यपाल या दोन नेत्यांना ब्रिटिश अधिकाऱ्यांनी अटक केलेली होती .त्यामुळे पंजाब मधील अमृतसर या ठिकाणी याविरुद्ध एक निषेध सभा आयोजित करण्यात आली होती. लोकांमधील हा द्रोश पाहून सरकारने जमावबंदी लागू केली होती.

परंतु सरकारचा हा आदेश जुगारून येथील स्थानिक लोकांनी सण 1919, १३ एप्रिल रोजी जालियनवाला बाग येथे सभा आयोजित केली. मोठ्या संख्येने लोक या ठिकाणी जमलेले होते. ब्रिटिश अधिकाऱ्यांचा आदेश जुगारून एवढ्या मोठ्या संख्येने लोक उपस्थित झाल्याने तेथे बंदोबस्ताला असलेल्या जनरल डायर या अधिकाऱ्याला आपला राग अनावर झाला त्यांनी ब्रिटिश अधिकाऱ्यांना बोलावून घेतले व जमावावर गोळीबार करण्याचा आदेश दिला. या घटनेच्या विरुद्ध महात्मा गांधीजींनी कैसर ए हिंद या पदवीचा त्याग देखील केला .

रौलट कायदा, जालियनवाला बाग हत्याकांड ,खिलाफत चळवळ, देशातील ब्रिटिशांची वाढती दडपशाही जुलूमशाही त्यामुळे भारतीय जनता इतकी त्रस्त झाली होती की देशातील संपूर्ण वातावरण हे सरकारच्या विरोधातच गेलेले होते. देशातील सर्व भारत वासियांच्या भावना लक्षात घेऊन महात्मा गांधींनी असहकार चळवळ सुरू करण्याचा दृढनिश्चय केला. त्यांनी 10 मार्च 1920 साली असहकार चळवळीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला व चार सप्टेंबर 1920 साली त्यांनी लाला लजपतराय यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसचे विशेष अधिवेशन कलकत्ता येथे बोलवले.

या अधिवेशनामध्ये असहकार चळवळीला मान्यता देण्यासंबंधीचा ठराव हा बहुमताने पारित करण्यात आला .1939 रोजी दुसरे महायुद्ध सुरू असताना जेव्हा ब्रिटिशांनी भारताचा संविधान बनवण्याचा अधिकार सुरुवातीला नाकारला तेव्हा महात्मा गांधींनी असे घोषित केले की जर तुम्ही भारताचे स्वातंत्र्य नाकारत असाल तर भारत कोणत्याही युद्धात तुमची मदत करणार नाही. जस जसे दुसरे महायुद्ध तीव्र होत गेले तसतसं महात्मा गांधींनी भारत छोडो आंदोलनाची मागणी तीव्र केली.

महात्मा गांधी यांनी लिहिलेली काही पुस्तके- महात्मा गांधी हे राजकारणी व्यक्तिमत्व असून एक उत्तम लेखक देखील होते त्यांनी आपल्या स्वतःच्या जीवनावर व इतर प्रगलभ विषयांवर अनेक पुस्तके लिहिली- गांधींची आत्मकथा म्हणजेच सत्याचे प्रयोग ही एक उत्तम आत्मकथा आहे.

माझ्या स्वप्नातील भारत
हिंद स्वराज्य
आरोग्याची गुरुकिल्ली
भगवद्गीता ही गांधींनी लिहिलेली काही प्रसिद्ध पुस्तके आहेत.

महात्मा गांधींचा मृत्यू-

1948 रोजी 30 जानेवारी या दिवशी नथुराम गोडसे यांनी महात्मा गांधींची हत्या केली. महात्मा गांधींना तीन गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली त्यांनी शेवटचे हे राम हे शब्द उच्चारून आपली जीवन यात्रा समाप्त केली. महात्मा गांधींची समाधी ही दिल्लीतील राजघाट येथे असून वयाच्या 79 व्या वर्षी महात्मा गांधींनी या भारत देशाचा निरोप घेऊन देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात खारीचा वाटा उचलला. अशा या थोर राष्ट्रपित्याला शतशः नमन

माझे नाव सृष्टी आहे आणि मी या ब्लॉग ची संस्थापक आहे. मला माहिती लिहायला खूप आवडतात, म्हणून मी या माझ्या ब्लॉग वर मराठी मध्ये माहिती लिहित असते.

Leave a Comment