सरकारी योजना Channel Join Now

लव बर्ड्स विषयी संपूर्ण माहिती Love Birds Information In Marathi

Love Birds Information In Marathi पोपट हा सर्वांचा आवडीचा पक्षी आहे, आणि याच पक्षाची एक प्रजाती म्हणून लव्ह बर्ड्स यांना ओळखले जाते. मूळ आफ्रिकेमध्ये उगम पावलेला हा पक्षी अतिशय प्रेमळ वर्तनाकरिता सर्वत्र प्रसिद्ध आहे. रंगीबेरंगी पिसे असणारे हे पक्षी अगपोर्णिस वंशाचे समजले जातात. ते पक्षी नेहमी जोडीदारांसोबत जोडीने आढळत असतात. त्यांच्या या मजबूत बंधाकरिता त्यांना लव बर्ड्स हे नाव देण्यात आलेले आहे.

Love Birds Information In Marathi

लव बर्ड्स विषयी संपूर्ण माहिती Love Birds Information In Marathi

अतिशय आकर्षक दिसणारे हे पक्षी तेवढेच प्रेमळ देखील असतात. अनेक लोक या पक्षांना पाळत असतात. सामाजिक प्रकारचा पक्षी असल्यामुळे नेहमी जोडीने आढळणारा हा पक्षी नेहमी एकमेकांना अलंगण देताना दिसत असतो. या पक्षांच्या जवळपास नऊ प्रजाती आढळून येत असतात.

तुम्ही जर हे पक्षी पाळत असाल तर हिवाळ्याच्या काळामध्ये त्यांची काळजी घेणे खूपच गरजेचे ठरते, कारण थंडी त्यांना फारशी सहन होत नाही. तुम्ही जर त्यांना घरामध्ये पाळत असाल, आणि पिंजऱ्यामध्ये ठेवले असेल तर त्यांना थंडी लागणार नाही याची व्यवस्था केली पाहिजे.

त्याचबरोबर योग्य काळजी घेऊन तुम्ही त्यांना अतिशय निरोगी व आनंदी ठेवू शकता, जेणेकरून हे पक्षी सुरक्षित राहतील, आणि तुम्हाला देखील फायदा होईल. आजच्या भागामध्ये आपण या लव्ह बर्ड्स विषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत…

नावलव बर्ड्स
प्रकारपक्षांची प्रजाती
उपप्रकार सामाजिक पक्षी
कळपाचा आकारचार ते सहा पक्षी
शास्त्रीय नावअगपोर्णिस
किंगडमएनीमलिया
साधारण आयुष्य१५ ते २५ वर्षांपर्यंत

लव बर्ड्स पक्षाची शरीर रचना:

साधारणपणे १३ ते १७ सेंटीमीटर लांब असणारा हा पक्षी वजनाने अवघा ४० ते ६० ग्राम पर्यंतच आढळून येतो. अतिशय गुबगुबीत शरीर, गोल वळलेली शेपटी, आणि छोटेसे शरीर हे या पक्षाची वैशिष्ट्ये सांगता येतील. त्याची पिसे अतिशय तेजस्वी व ठळक रंगांमध्ये असतात.

मुख्यतः हिरवट निळा रंग असलेला हा पक्षी काही भागांमध्ये लाल व पिवळ्या रंगाच्या छटांमध्ये देखील आढळतो. त्याच्या शरीरावर काही विशिष्ट खुणा देखील असतात. तसेच गळ्याभोवती विशिष्ट रंगाचा पट्टा देखील दिसून येत असतो.

लव बर्ड्स पक्षाचे व्यक्तिमत्व:

अत्यंत सामाजिक स्वरूपाचा हा पक्षी नेहमी जोडीने आढळून येत असतो. त्यांच्यामधील बंध खूपच घनिष्ठ असतात. अतिशय प्रेमळ असणारे हे पक्षी बऱ्याचदा आपल्याला एकमेकांना अलिंगन देताना देखील दिसून येत असतात. एकाच ठिकाणी बसणारे हे पक्षी एकमेकांना पंख लावून प्रेम व्यक्त करत असतात.

प्रेमळ असण्याबरोबरच हा पक्षी अतिशय बुद्धिमान देखील आहे. तो माणसाची भाषा देखील शिकू शकतो.  विविध युक्त्या करून ते आपले मनोरंजन देखील करत असतात. सर्वात उत्साही आणि खेळकर स्वरूपाचा समजला जाणारा हा पक्षी वेगवेगळ्या ठिकाणी फिरणे पसंत करत असतो.

लव बर्ड्स पक्षाची राहण्याची ठिकाणे:

मुख्यतः आफ्रिकेतील देशांमध्ये उगम पावलेला हा पक्षी आफ्रिकेच्या गवताळ प्रदेशामध्ये व सवाना जंगलांमध्ये आढळून येतो. अनेक ठिकाणी या पक्षांना पाळले जात असले, तरी देखील त्यांना पाळण्याकरिता जास्तीत जास्त जागा लागत असते. सुमारे दोन फूट लांब दीड फूट रुंद आणि दीड फूट उंच असा पिंजरा अवघ्या दोन पक्षांसाठी अर्थात जोडीसाठी गरजेचा असतो.

त्याचबरोबर त्यांच्या आहाराचे देखील काळजी घेणे, फार गरजेचे ठरते. त्यांना दररोज विविध प्रकारची फळे, बिया, हिरव्या पालेभाज्या, इत्यादी आहार द्यावा लागतो. हे पक्षी सामाजिक स्वरूपाचे असल्यामुळे पाळल्यानंतर त्यांच्यावर नेहमी लक्ष देणे गरजेचे असते, अन्यथा हे पक्षी कंटाळत देखील असतात.

लव्ह बर्ड्स मधील प्रजनन:

हे पक्षी आपल्या जोडीदारासोबत नेहमी राहत असतात. त्याचबरोबर त्यांचा एकमेकांशी अतिशय मजबूत बंध जुळलेला असतो. हे पक्षी एकमेकांना प्रेम करण्याबरोबरच आलिंगन देण्यासाठी देखील ओळखले जातात. यादरम्यान ते प्रजनन देखील करत असतात. वर्षभर प्रजनन करू शकणाऱ्या या पक्षांकडून मुख्यतः वसंत ऋतूपासून शरद ऋतू पर्यंत प्रजनन केले जात असते.

प्रजननाच्या वेळी या पक्षांद्वारे घरटे देखील बांधले जाते, ज्यामध्ये हे पक्षी किमान चार तर कमाल सहा अंडी घालत असतात. या अंड्यांना जवळपास २३ दिवसांची उब आवश्यक असते. त्यानंतर या अंड्यांमधून पिल्ले बाहेर येतात. पहिले सहा आठवडे हे पक्षी गटामध्येच राहतात, ज्या दरम्यान पालक त्यांची काळजी घेत असतात, व खायला प्यायला देखील देत असतात. त्यानंतर मात्र हे पक्षी सक्षम होण्यास सुरुवात करत असतात.

लव बर्ड्स ची काळजी:

तुम्ही जर हे पक्षी पाळत असाल तर त्यांची काळजी घेणे फारच गरजेचे ठरते. हिवाळ्यामध्ये यांच्यावर फार लक्ष द्यावे लागते. हे सामाजिक स्वरूपाचे पक्षी असल्यामुळे नेहमी त्यांच्यासोबत संवाद साधने गरजेचे ठरते, सोबतच त्यांचे अन्न व त्यांना देण्यात येणारे पाणी याची देखील काळजी घेतली पाहिजे, व हे पाणी नियमितपणे बदलले पाहिजे. जेणेकरून त्यांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत मिळते.

त्याचबरोबर आठवड्यातून एकदा या पक्षांना आंघोळ घालण्याचा देखील सल्ला दिला जातो. या अंघोळीपूर्वी त्यांना जंतुनाशक औषधाने फवारणी करणे देखील सुचविलेले आहे, जेणेकरून त्यांना विविध रोगापासून व संसर्गापासून वाचवले जाऊ शकते. आणि अधिक दीर्घकाळपर्यंत हे पक्षी जिवंत राहू शकतात.

निष्कर्ष:

मानव असो की कुठला प्राणी निसर्ग सौंदर्य प्रत्येकालाच आवडत असते. निसर्गाने इतर प्राण्यांना आकर्षित करून घेण्यासाठी विविध रहस्यमय पध्दतीने प्राणी, पक्षी, फुले, झाडे, वनस्पती यांची निर्मिती केलेली आहे. त्यामुळे प्रत्येकाला या निसर्ग सानिध्यात फार चांगले वाटत असते. निसर्ग म्हटलं की वेगवेगळ्या स्वरूपाचे प्राणी पक्षी आलेच, यातील एक सर्वोत्कृष्ट सामाजिक पक्षी म्हणून लव बर्ड्स यांना ओळखले जाते.

अतिशय प्रेमळ असणारे हे पक्षी नेहमी जोडीने आढळून येतात. त्यांचा चार ते सहा पक्षांचा एक कळप असतो. हे पक्षी अतिशय सुंदर दिसत असल्यामुळे अनेक लोकांकडून हे पक्षी पाळले जातात. आकाराने अगदी छोटे असणारे हे पक्षी विविध रंगांनी माखलेले असतात, त्यामुळे त्यांच्या सौंदर्यामध्ये फारच भर पडत असते.

आजच्या भागामध्ये आपण या लव्ह बर्ड्स विषयी संपूर्ण माहिती बघितली आहे. ज्यामध्ये या पक्षांची काळजी कशी घ्यावी, त्यांच्या अंघोळीबद्दल माहिती, लव बर्ड्स काय काय खातात, हे पक्षी पाळले तर त्यांना कुठे ठेवावे, व त्यांचा सांभाळ कसा करावा, या पक्षांना थंडीत त्रास होतो तर मग यांच्यासाठी तापमान किती असावे, इत्यादी प्रकारची माहिती बघितलेली आहे.

FAQ

लव बर्ड्स ही कोणत्या प्राण्याची प्रजाती समजली जाते?

लव बर्ड्स ही एक पोपटाची प्रजाती म्हणून ओळखली जाते.

लव बर्ड्स या पक्षाचे उगमस्थान किंवा मूळ कोणत्या देशातील समजले जाते?

लव बर्ड्स हा पक्षी आफ्रिका खंडातील किंवा देशातील उगमाचा असून हेच त्याचे मूळ समजले जाते.

लव बर्ड्स बद्दल काय वैशिष्ट्ये सांगता येतील?

लव बर्ड्स बद्दल वैशिष्ट्ये सांगायचे असतील तर हे पक्षी अतिशय सामाजिक स्वरूपाचे असून, नेहमी जोडीने आढळून येतात. त्याचबरोबर ते चार ते सहा पक्षांचे मिळून एक गट देखील बनवत असतात.

लव्ह बर्ड्स या पक्षाच्या जगभरात साधारणपणे किती प्रजाती आढळून येतात?

लव्ह बर्ड्स या पक्षाच्या जगभरात साधारणपणे नऊ प्रजाती आढळून येतात.

लव बर्ड्स या पक्षाचे आकारमान व वस्तुमान साधारणपणे किती असते?

लव बर्ड्स हा पक्षी आकाराने साधारणपणे १३ ते १७ सेंटीमीटर लांब, तर वस्तुमानाने किंवा वजनाने ४० ते ६० ग्रॅम इतकाच असतो.

माझे नाव सृष्टी आहे आणि मी या ब्लॉग ची संस्थापक आहे. मला माहिती लिहायला खूप आवडतात, म्हणून मी या माझ्या ब्लॉग वर मराठी मध्ये माहिती लिहित असते.

Leave a Comment