Kumbharli Ghat Information In Marathi कराड मार्गे चिपळूण प्रवास करायचा असेल तर तुम्हाला एक घाट ओलांडावा लागतो याला कुंभार्ली घाट म्हणून ओळखले जाते. मुख्यतः कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र या महाराष्ट्रातील दोन वेगवेगळ्या प्राकृतिक विभागांना एकत्र आणणारा घाट म्हणून या घाटाला ओळखले जाते.
कुंभार्ली घाटची संपूर्ण माहिती Kumbharli Ghat Information In Marathi
महाराष्ट्रातील रत्नागिरी आणि सातारा या दोन जिल्ह्यांमधील मार्ग या घाटाद्वारे जात असतो. समुद्रसपाटीपासून सुमारे दोन हजार शंभर फूट उंच असणारा हा घाट लांबीला मध्यम अर्थात १२ ते १४ किलोमीटर पर्यंत आहे. कोयनानगर पासून काही अंतरावर सुरू होणारा हा घाट उतरताना कोकण विभागामध्ये कधी प्रवेश झाला हे लक्षात देखील येत नाही कारण या घाटामध्ये असणारे निसर्ग सौंदर्य माणसाची नजर खेळवून ठेवत असते.
सौंदर्याच्या बाबतीत अतिशय अद्वितीय असणारा हा घाट निसर्गप्रेमींसाठी आकर्षणाचे ठिकाण आहे. दाट धुके, हिरवागार शालू पांगरलेले डोंगर, आणि वेगवेगळ्या स्वरूपाचे प्राणी यामुळे अतिशय स्वर्गमय अनुभव या घाटाच्या प्रवासामध्ये येत असतो. पावसाळ्यात या ठिकाणी पर्यटनाकरिता अनेक लोक गर्दी करत असतात. अगदी एखाद्या स्वप्नवत वाटणाऱ्या घाटाबद्दल अर्थात कुंभार्ली घाटाबद्दल आजच्या भागामध्ये आपण माहिती बघणार आहोत.
नाव | कुंभार्ली |
प्रकार | घाट रस्ता |
ठिकाण | सह्याद्री पर्वतरांग किंवा पश्चिम घाट |
साधारण लांबी | १२ ते १४ किलोमीटर |
जिल्हे | रत्नागिरी व सातारा |
मार्ग | कराड चिपळूण |
साधारण उंची | समुद्रसपाटीपासून २१०० फूट |
आसपासची पर्यटन स्थळे | रत्नागिरी लाईट हाऊस, मारलेश्वर मंदिर, कुंभार्ली महाकाली देवी. |
तुम्हाला पर्यटनासह प्रवासाची देखील आवड असेल तर कुंभार्ली घाट तुमच्यासाठी अतिशय उत्तम ठिकाण समजले जाऊ शकते. चिपळूण येथे असणारे एका लोकप्रिय हिल स्टेशन अशी ओळख असणारे हे ठिकाण कोकणाचे प्रवेशद्वार म्हणून देखील ओळखले जाते.
कुंभार्ली घाटाचे ऐतिहासिक महत्त्व:
कुंभार्ली हा घाट अतिशय प्राचीन काळी तयार केला गेलेला असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये कोकणातील व्यापार करणे तसेच लष्करी हालचाली करणे याकरिता हा घाट फारच महत्त्वाचा समजला जात असे. मराठी आणि मुघल सत्तेच्या संघर्षाचे साक्षीदार म्हणून या घाटाला ओळखले जाते. आज या घाटाला आधुनिक स्वरूपाने रस्त्यामध्ये रूपांतरित केले गेले असले तरी देखील पूर्वीच्या काळी देखील हा घाट फार मोठ्या प्रमाणावर वापरला जात असे.
कुंभार्ली घाटातील निसर्ग वैभव:
निसर्गसंग्रहाच्या दृष्टीने अतिशय उत्कृष्ट असलेला हा घाट हिरवेगार झाडे, फेसाळत वाहणारे धबधबे आणि नद्या आणि धुक्याने वेढलेले डोंगर यांसाठी प्रसिद्ध आहे. या घाटामध्ये सह्याद्री व्याघ्र प्रकल्प देखील स्थापन करण्यात आलेला असून येथे वाघांची संख्या देखील चांगली आहे.
ही एक समतोल परिसंस्था म्हणून ओळखली जाते कारण या ठिकाणी सर्वच प्रकारच्या प्राणी व वनस्पतींचे अस्तित्व आढळून येत असते ज्यामध्ये बिबटे, हरीण, विविध पक्षी यांच्यासारख्या प्राण्यांचा आणि वेगवेगळ्या प्रकारच्या वनांचा समावेश होत असतो. येथे सर्वात जास्त प्रमाणावर आढळणारा प्राणी म्हणून माकडाला ओळखले जाते. रस्त्याच्या कडेला ही माकडे आपल्याला बसलेले दिसून येतात.
कुंभारली घाटाच्या प्रवासादरम्यान भेट देण्यासारखे ठिकाणी:
कुंभार्ली घाटाचा तुम्ही प्रवास करत असाल तर येथे जवळच असलेले कोयना वन्यजीव अभयारण्य तुमच्यासाठी एकच चांगला पर्यटन पॉईंट होऊ शकतो. या ठिकाणी अनेक प्रकारचे वन्यजीव संवर्धन केलेले असून यामध्ये अस्वल, बिबट्या, वाघ यांच्याबरोबरच काही पक्षांचा देखील समावेश होतो. या ठिकाणी ट्रेकिंग करण्यासाठी देखील खूप उत्तम जागा असल्याचे सांगितले जाते.
यासोबतच येथे नेहरू गार्डन नावाचे एक गार्डन असून आसपास असणाऱ्या विविध प्रकारच्या लँडस्केप साठी हे ठिकाण ओळखले जाते. ज्या लोकांना हिरवेगार प्रदेश आवडत असतील त्यांच्यासाठी ही एक पर्वणीच समजली जाते.
कुंभार्ली घाटामध्ये सर्वात आवडीचे एक ठिकाण म्हणून शिवथर घळ ओळखली जाते. एक प्रेक्षणीय स्थळ असल्याबरोबरच याला तीर्थक्षेत्राचा देखील दर्जा देण्यात आलेला आहे. अतिशय शांत वातावरण असलेले हे ठिकाण ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचे आहे. या ठिकाणी समर्थ रामदासांनी दासबोध हा ग्रंथ लिहिला होता असे देखील सांगितले जाते.
कुंभार्ली घाटाला भेट देण्याकरिता सर्वोत्तम कालावधी:
कुंभार्ली घाट हा वर्षभर पर्यटकांसाठी आणि प्रवाशांसाठी खुला असला तरी देखील पावसाळ्यामध्ये या ठिकाणी भेट देणे खूपच फायदेशीर समजले जाते. त्यातही जून ते सप्टेंबर हा कालावधी येथील निसर्ग सौंदर्याला अधिकच खुलवत असतो. त्याचबरोबर पावसाच्या पाण्याने फेसाळत वाहणारे धबधबे अतिशय नरम्य दिसत असतात.
ज्या लोकांना पावसाळ्यामध्ये येथे प्रवास करणे शक्य नसेल ते ऑक्टोबर ते फेब्रुवारी दरम्यान देखील प्रवास करू शकतात. यादरम्यान पाऊस नसला तरी देखील अल्हादायक वातावरण आढळून येते मात्र फेब्रुवारी नंतर उन्हाळ्यामध्ये या ठिकाणी प्रवास करणे आनंददायी असत नाही.
निष्कर्ष:
लॉंग ड्राईव्ह हे अनेकांचे स्वप्न असते आपल्या आवडीच्या व्यक्तीसोबत गाडीमध्ये लांबच्या प्रवासाला जाणे प्रत्येकालाच आवडत असते. या प्रवासादरम्यान जर निसर्गसौंदर्याची साथ लाभली तर सोन्याहून पिवळे असते. अनेक लोकांचे लॉंग ड्राईव्ह साठीचे आवडते ठिकाण म्हणून कुंभार्ली घाटाला ओळखले जाते.
कुंभार्ली घाट निसर्गाने अतिशय नटलेला असल्यामुळे या ठिकाणी अनेक पर्यटक दरवर्षी भेट देत असतात. हा केवळ एक दोन ठिकाणांना जोडणारा मार्ग नसून उत्तम पर्यटन स्थळ म्हणून देखील विकसित झालेला आहे. या घाटामध्ये सहसा धुक्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आढळून येते त्यामुळे निसर्गाच्या सुंदरतेमध्ये अजूनच भर पडत असते. असे असले तरी देखील वाहनांच्या दृष्टीने हे धुके काहीसे घातक समजले जाते त्यामुळे या घाटाबद्दल काही आख्यायिका देखील सांगितल्या जातात.
आजच्या भागामध्ये आपण या कुंभार्ली घाटाबद्दल माहिती बघितलेली असून कुंभार्ली घाट कुठे वसलेला आहे? कोणत्या डोंगरामध्ये या घाटाची निर्मिती करण्यात आलेली आहे? कोणकोणत्या ठिकाणांना हा घाट जोडतो? या ठिकाणाच्या आसपास असणारी उत्कृष्ट प्रेक्षणीय स्थळे, या घाटाची लांबी या घाटाचे ऐतिहासिक महत्त्व, निसर्गप्रेमींसाठीचे योग्य ठिकाण, येथे आपले जाणारे विविध ६०० उपक्रम, या घाटाला भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ, येथे राहण्याच्या सुविधा, त्याचबरोबर पर्यावरण दृष्टीने या घाटाचे महत्त्व इत्यादी गोष्टींबद्दल माहिती बघितली आहे.
FAQ
कुंभार्ली घाट कोणत्या ठिकाणी वसलेला आहे?
कुंभार्ली घाट हा महाराष्ट्राच्या पश्चिम घाटामध्ये आता सह्याद्री पर्वत त्यामध्ये वसलेला असून त्याचे कार्यक्षेत्र सातारा आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांमध्ये आहे.
कुंभार्ली घाटाची साधारण लांबी किती समजली जाते व समुद्रसपाटीपासून हा घाट किती उंचीवर वसलेला आहे?
कुंभार्ली घाटाची साधारण लांबी ही १३ ते १४ किलोमीटर समजली जाते त्याचबरोबर समुद्रसपाटीपासून हा घाट साधारणपणे २१०० फूट उंचीवर वसलेला आहे.
कुंभार्ली घाटाचा प्रवासामध्ये तुम्ही इतर कोणकोणत्या प्रेक्षणीय स्थळांना भेट देऊ शकता?
कुंभार्ली घाट स्वतः एक उत्तम पर्यटन स्थळ असून त्याच्या आसपास असणाऱ्या अनेक पर्यटन स्थळांना यामुळे महत्त्व प्राप्त झालेली आहे त्यामध्ये थिबा पॅलेस, रत्नागिरी लाईट हाऊस, कुंभार्ली महाकाली देवी आणि मारलेश्वर मंदिर इत्यादी महत्त्वाच्या ठिकाणांचा समावेश होतो.
कुंभार्ली घाट कोणकोणत्या दोन ठिकाणांना जोडण्याचे कार्य करत असतो?
कुंभार्ली मुख्यतः कराड व चिपळूण या दोन शहरादरम्यान आहे जो सातारा व रत्नागिरी या दोन जिल्ह्यांमध्ये दुवा समजला जात असतो.
निसर्ग सौंदर्याच्या दृष्टीने कुंभार्ली घाटामध्ये काय काय आहे?
निसर्ग सौंदर्याच्या दृष्टीने अतिशय उत्कृष्ट असलेल्या या घाटामध्ये माकडांची संख्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर आहे त्याचबरोबर या ठिकाणी फेसाळत वाहणारे धबधबे सौंदर्यामध्ये अधिकच भर घालतात.