इटली देशाची संपूर्ण माहिती Italy Information In Marathi

Italy Information In Marathi इटली हा देश दक्षिण युरोपमध्ये भूमध्य समुद्राच्या मध्यभागात असलेला स्वतंत्र देश आहे, हा देश एक बेट आहे. हा देश पश्चिम युरोपचा भाग मानला जातो. या देशाची राजधानी रोम शहर आहे. हा देश प्रजासत्ताक देश म्हणून ओळखला जातो. या देशातील सर्वात मोठे शहर सुध्दा रोम आहे. येथे मोठ्या प्रमाणत व्यापार व उद्योग केले जातात.  तर चला मग पाहूया या देशाविषयी सविस्तर माहिती.

Italy Information In Marathi

इटली देशाची संपूर्ण माहिती Italy Information In Marathi

इटली हा देश युरोपियन युनियनमध्ये तिसरे सर्वाधिक लोकसंख्या असलेले सदस्य राज्य आहे. या देशाला दिवस 17 मार्च 1861 रोजी स्वतंत्र मिळाले. इटली देशाचे नाव इटालसच्या नावावर ठेवण्यात आले आहे. इटली देशाचे “इल कॅन्टो देगली इटालियन” हे राष्ट्रगीत आहे. या देशामध्ये न्याय व व्यवस्था टिकून ठेवण्यासाठी या देशाचे संविधान आहे. येथील लोक स्वतंत्रपणे या देशात राहतात.

विस्तार व क्षेत्रफळ :

इटली या देशाचे एकूण क्षेत्रफळ 3,01,230 किलोमीटर एवढे आहे. आणि क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनाने हा देश जगात 71 व्या क्रमांकावर येतो. तसेच या देशाच्या सीमेला लागून उत्तर दिशेला इटलीची सीमा आणि फ्रान्स, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रिया आणि स्लोव्हेनियाला देश लागून आहेत आणि दक्षिण दिशेला इटालियन द्वीपकल्प आणि दोन सर्वात मोठे बेट सिसिली  आणि सार्डिनिया लाभलेले आहेत आणि पश्चिमेला लिगुरियन समुद्र आणि टायरेनियन समुद्र आहे. आणि इतर देशाच्या सीमेला लागून समुद्र किनारपट्टी व काही छोटे मोठे बेट लाभलेले आहेत.

लोकसंख्या :

इटली देशाची लोकसंख्या 2011 च्या जनगणनेनुसार एकूण 5,94,33,744 ऐवढी आहे. आणि लोकसंख्येच्या बाबतीत हा देश जगात 23 व्या क्रमांकावर येतो. येथे विविध जाती व धर्माचे लोक राहत. पश्चिम युरोपीय देशांपेक्षा जास्त लोकसंख्या येथे आहे.

या देशात सर्वात जास्त दाट लोकवस्ती क्षेत्र पोव्हॅली शहरात आहे. ज्यामध्ये राष्ट्रीय लोकसंख्येच्या जवळपास अर्धा भाग आहे आणि रोम आणि नेपल्स या शहरात सुध्दा लोकसंख्या वाढत आहे. येथे सर्वात जास्त ख्रिचन समाज आहे.

चलन :

इटली या देशाचे चलन युरो आहे. येथील स्थानिक लोक व येथील व्यवहार व व्यापार करण्यासाठी युरो चलनाचा वापर केला जातो. युरो चलन हे भारतीय चलनाच्या तुलनेत एक युरो कॉइन म्हणजे 80.74 रुपये होतात.

हवामान :

इटली देशातील हवामान हे उष्ण आणि दमट आहे. इटलीच्या हवामानावर भूमध्य समुद्राच्या पाण्याच्या मोठ्या भागाचा प्रभाव आहे. जो उत्तरेशिवाय सर्व बाजूंनी इटलीला वेडलेले आहे. त्यामुळे येथे समुद्री वारे वाहतात. म्हणजे येथील वातावरण सतत बदलत असते. या समुद्रातून इटलीसाठी उष्ण हवामान तयार होते. या देशातील किनारी भागातील हवामान हे अतिशय थंड असते. किनाऱ्या वरील परिस्थिती देशाचा आतील भागांपेक्षा वेगळी आहे.

हिवाळ्याच्या महिन्यांत जेव्हा उच्च उंचीवर थंड व ओले आणि बर्फाचा कल असतो. तेव्हा  किनारपट्टीच्या प्रदेशात हलका हिवाळा आणि उष्ण आणि कोरडा उन्हाळा असतो. हिवाळ्यातील सरासरी तापमान सुमारे 0° ते 12° पर्यत असते. त्यामुळे येथे अती थंड वातावरण राहते. त्यामुळे उन्हाळ्यातील सरासरी तापमान 20° ते 27° पर्यत राहते. याचा परिणाम स्थानिक लोकांवर होत असतो.

पक्षी व प्राणी :

इटली देशामध्ये मोठ्या प्रमाणत वने उपलब्ध आहे. इटली देशामध्ये 4,778 स्थानिक प्राण्यांच्या प्रजाती आहेत. ज्यामध्ये प्रामुख्याने येथे सार्डिनियन लांब कान असलेली बॅट, सार्डिनियन लाल हरण, सॅलॅमंडर, तपकिरी गुहा सॅलॅमंडर, इटालियन न्यूट, इटालियन बेडूक, अपेनिन पिवळ्या बेली असलेला इटालियन टोड, एपेनिन यलो बेलीड टोड, इटालियन टोड वॉल लिझार्ड, आणि सिसिलियन वॉल लिझार्ड, इटालियन एस्कुलॅपियन साप तसेच सिसिलियन तलावातील कासव हे प्राणी येथे मोठ्या प्रमाणात आढळून येतात. तसेच इटलीमध्ये सस्तन प्राण्यांच्या 119 प्रजाती आहेत आणि या देशामध्ये 550 पक्ष्यांच्या प्रजाती आहेत, यातील काही स्थानिक पक्षी आहेत.

व्यवसाय व उद्योग :

इटली देशामध्ये जास्त प्रमाणात शेती हा व्यवसाय केला जातो. येथील लोक प्रामुख्याने मका, बाजरी, गहू, बार्ली, कापुस, भुईमुग यासारखे पीक घेतात व आपले व्यवसाय करत असतात. तसेच या बरोबर येथे काही प्रमाणात पशुपालन हा व्यवसाय केला जातो.

इटली हा देश जगातील सर्वात मोठा वाइन उत्पादक देश आहे. येथे ऑलिव्ह ऑईल, फळे सफरचंद, ऑलिव्ह, द्राक्षे, संत्री, लिंबू, नाशपाती, जर्दाळू, हेझलनट्स, पीच, चेरी, प्लम्स आणि स्ट्रॉबेरी हे पीक मोठ्या प्रमाणात घेतली जातात आणि यातून व्यवसाय केले जातात.

ह्या पिकांना विदेशात पाठवून त्याचे व्यापार केले जातात. तसेच येते मोठे कारखाने उपलब्ध आहेत. ज्यामधे लोकांना आवश्यक वस्तू बनवणे, इलेक्ट्रॉनिक वस्तू बनवणे, लोखंड व पोलाद उद्योग केले जातात. यातून येथील लोकांना रोजगार उपलब्ध होतात. काही छोटे मोठे उद्योग पण येते केले जातात. शेतातील लागणारे अवजार बनवले जातात.

भाषा :

इटली देशाची मुख्य भाषा ही इटालियन आहे. हे भाषा येथे मोठ्या प्रमाणात बोलली जाते. त्याच बरोबर या देशामध्ये आणखी ऐतिहासिक भाषा म्हणून ओळखल्या जातात. त्या प्रामुख्याने अल्बेनियन, कॅटलान, जर्मन, ग्रीक, स्लोव्हेनियन, क्रोएशियन, फ्रेंच, फ्रँको प्रोव्हेंसल, फ्रियुलियन, लाडिन, ऑसीटान आणि सार्डिनियन ह्या भाषा येथे कमी प्रमाणात बोलल्या जातात.

येथील लोक रोमानियन भाषेचा सुद्धा वापर करतात. येथे इंग्रजी भाषेचा वापर केला जातो. हे भाषा फार मोठा प्रमाणात येथील लोकांना येत नाही. येथील शाळा व कनिष्ठ महविद्यालय मध्ये ही भाषा शिकवली जाते.

खेळ :

इटली देशाचा सर्वात लोकप्रिय खेळ फुटबॉल आहे, आणि हा खेळ येथील राष्ट्रीय खेळ मानला जातो. इटलीमध्ये राष्ट्रीय फुटबॉल संघ आहे, हा संघ 4 वेळा फिफा विश्वचषक विजेता आहे. या देशाचा हा संघ जगातील सर्वात यशस्वी संघांपैकी एक आहे.

इटालियन क्लबने 48 प्रमुख युरोपियन ट्रॉफी जिंकल्या आहेत. आणि ज्यामुळे इटली हा युरोपियन फुटबॉलमधील दुसरा सर्वात यशस्वी देश बनला आहे. इटली देशाच्या फुटबॉल लीगचे नाव सेरी ए आहे, आणि यांचे जगभरातील लाखो चाहते आहेत.

याचबरोबर इटली देशामध्ये इतर लोकप्रिय खेळ सुध्दा आहेत. येथील खेळांमध्ये बास्केटबॉल, व्हॉलीबॉल आणि रग्बी व सायकल रेसिंग या खेळाचा समावेश आहे. या देशामध्ये पुरुष आणि महिला राष्ट्रीय व्हॉलीबॉल संघांना जगातील सर्वोत्तम संघांमध्ये स्थान दिले जाते. या देशात खेळाला मोठे महत्त्व आहे.

इतिहास :

इटली देशामध्ये प्रथम परदेशी वसाहती स्थापन करणारे फोनिशियन होते. ज्यांनी सुरुवातीला प्रथम वसाहती स्थापन केल्या आणि सिसिली आणि सार्डिनियाच्या किनारपट्टीवर विविध एम्पोरियमची स्थापना केली.

यापैकी काही लवकरच लहान शहरी केंद्र बनत गेली आणि प्राचीन ग्रीक वसाहतींच्या समांतर विकसित झाला. मुख्य केंद्रांमध्ये मोत्या झिझ सिसिलीमधील सोलंटम आणि सार्डिनियामधील नोरा सुलसी आणि  थारोस ही शहरे अस्तिवात आली.

इटली मध्ये 19 व्या शतकाच्या शेवटच्या दोन दशकांपासून सुरू झालेल्या इटलीमध्ये पूर्व आफ्रिकेतील इरिट्रिया आणि सोमालिय व उत्तर आफ्रिकेतील त्रिपोलिटानिया आणि सायरेनायका आणि डोडेकेनीज या बेटांवर जबरदस्ती करून वसाहतवादी शक्ती म्हणून विकसित केले.

नंतर 2 नोव्हेंबर 1899 ते 7 सप्टेंबर 1901 पर्यत इटलीने चीनमधील बॉक्सर बंडाच्या वेळी आठ राष्ट्रीय आघाडीच्या सैन्याचा भाग म्हणून भाग घेण्यात आला. पुढे 7 जून 1903 रोजी सवलत इटालियन ताब्यात घेण्यात आला, व आपली हुकूमत स्थापन केली.

पर्यटक स्थळ :

इटली मधील रोम शहरातील कोलोझियम जगातील सर्वात लोकप्रिय पर्यटन व आकर्षणीय स्थळ आहे. हे लोक मोठ्या प्रमाणात जात असतात.

येथील मिलान कॅथेड्रल हे मिलानमधील व्यस्त पर्यटन स्थळ आहे. हे जगातील चौथे सर्वात मोठे कॅथेड्रल आहे. आणि अतिशय सुंदर आहे, विदेशातून लोक येत असतात.

या देशात अमाल्फी कोस्ट व्हिला सिम्ब्रोन येथून दिसणारा रॅव्हेलो, कॅम्पानिया, इटलीमधील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक आहे.

ही माहिती कशी तुम्हाला वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांना शेअर करा.

हे निबंध सुद्धा अवश्य वाचा :-

माझे नाव सृष्टी आहे आणि मी या ब्लॉग ची संस्थापक आहे. मला माहिती लिहायला खूप आवडतात, म्हणून मी या माझ्या ब्लॉग वर मराठी मध्ये माहिती लिहित असते.

Leave a Comment