इराक देशाची संपूर्ण माहिती Iraq Information In Marathi

Iraq Information In Marathi बगदाद इराक या देशाची राजधानी असून या देशाचे चलन हे इराणी दिनार आहे. या देशाचे राष्ट्रीय चिन्ह सोनेरी गरुड आहे. मौतिनी हे इराकचे राष्ट्रगीत आहे. टायग्रीस व युफ्रेटीस या दोन नद्यांमधील प्रदेश इराक असून याला पूर्वी मेसोपोटीमिया असेही नाव होते. येथे फार प्राचीन काळी ऍसिरिया व बॅबिलोनिया ही राज्य होते. इराक मध्ये 5000 पूर्वीपासून मधमाशांचे पालन केले जाते व ही मधमाशांचे पालन प्रत्येक कुटुंबामध्ये केला जाते. तर चला मग पाहुया या देशा विषयी सविस्तर माहिती.

Iraq Information In Marathi

इराक देशाची संपूर्ण माहिती Iraq Information In Marathi

क्षेत्रफळ व विस्तार :

इराक या देशाचे क्षेत्रफळ 4,37,222 असून या देशाच्या उत्तरेला तुर्कस्थान तर पश्चिमेला सीरिया व जॉडर्न हे देश असून दक्षिणेस सौदी अरेबिया, अशाशीत प्रदेश, कुवेत व इराणचे आखात आणि पूर्व दिशेला इराण हा देश आहे.

या देशाच्या सीमांना लागून असलेल्या जॉर्डन व सौदी अरेबिया या देशांना इराकच्या सीमा निश्चित नाहीत. तर इराण व इराक यांच्यामधील सरहद्द ही 400 किमी असून इराकला 64 किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. बगदाद इराकची राजधानी आहे.

भाषा :

इराकमध्ये सर्वाधिक बोलली जाणारी भाषा ही अरबी असून येथे दुसऱ्या नंबरवर बोलली जाणारी भाषा कुर्दिश आहे. कुर्दिश या भाषेमध्ये सोरानी व कुरमांजी ही बोली आढळते. त्यानंतर तुर्कीची इराकी तुर्कमेन बोली आणि निओ-अरॅमिक भाषा अरबी हे अरबी लिपी वापरून लिहीली जाते आणि कुर्दिश हे सुधारित पर्सो-अरबी लिपीने लिहिले जाते.

हवामान :

इराक या देशांमधील हवामानाचा आपण विचार केला तर मे ते ऑक्टोबर या काळात अतिशय कडक व शुष्क आशा तापमानाचा हा उन्हाळा असतो. या काळातील तापमान हे 43 अंश ते 49 अंश सेल्सिअस पर्यंत असते. येथे उन्हाळ्यामध्ये जोरदार वाऱ्यांच्या वादळामुळे धुळीची किंवा मारू ची मोठे वादळे निर्माण होतात.

जुलै हा वादळाच्या दृष्टीने अतिशय संकटकालीन महिना असतो, तर हिवाळा म्हणजे डिसेंबर ते मार्च हा काळ खुपच थंडीचा व आखातावर येणाऱ्या वाऱ्यांमुळे दमट हवेचा असतो. हिवाळ्यातील तापमान येथे -5.2° असते. या देशांमध्ये जवळजवळ संपूर्ण देशभरात सरासरी वार्षिक पर्जन्यमान अतिशय असतो तर ईशान्य इराकमध्ये 38.10-63.50 सेंटिमीटर पाऊस पडतो.

इतिहास :

इराक या देशाचा इतिहास खूपच प्राचीन इतिहास म्हणून ओळखला जातो या देशाची संस्कृती ही विविध संस्कृति मिळून बनलेली आहे. तीन हजार वर्षापूर्वी सुमेरी लोकांनी दक्षिण इराकमधील गाळाची सुपीक जमीन असलेल्या प्रदेशात आपली वस्ती स्थापन केली. सुमेरियन संस्कृती ही इराकमधील सर्वात प्राचीन संस्कृती समजली जाते.

इ.स.पू. 2500 मध्ये लॅगॅश ह्या सुमेरी नगरराज्याने चार प्रतिस्पर्धी नगरराज्ये जिंकली व आपले क्षेत्र नैऋत्य इराणमध्ये वसलेल्या इलम या संस्कृतीपर्यंत आपला ताबा केला. मोहेंजोदडो येथील लिपी व मोहरा यांचे सुमेरी लिपी व मोहरा यांच्याशी बरेच सारखेपणा दिसतो.

सुमेरिया लोकांच्या या प्राचीन नगरात वापरली जाणारी भांडी ही मोहेंजोदडो येथील भांड्या प्रमाणेच आढळून आली. सिंधू संस्कृती मध्ये प्रचारात असलेली हत्ती व गेंडा हे प्राणी असलेली मोहर इराकच्या एशनुन्ना या प्राचीन नगरा मध्ये सापडल्या होती. त्या व्यतिरिक्त या नगरात आणखीन काही वस्तू सापडल्या.

1970 मध्ये कुर्द लोकांशी चाललेले युद्ध संपले तो या लोकांना स्वतंत्रता देण्यात आली व मंत्रिमंडळाच्या कामकाजात पाच कुर्द मंत्री घेण्यात आले. आखातामधील रास अल् खाइमा ह्या ट्रूशियल राज्यांपैकी एका राज्याच्या मालकीची टंब बेटे इराणने नोव्हेंबर 1971 मध्ये काबीज केल्यामुळे पुन्हा इराण व इराक या दोन देशांमध्ये संघर्ष निर्माण झाला. त्याचा परिणाम इराकने इराण व ग्रेट ब्रिटन या दोन देशांशी आपले संबंध तोडून देशातील 60,000 इराणी लोकांना देशाबाहेर काढले.

इराकचा उपराष्ट्राध्यक्ष म्हणून एका कुर्द प्रतिनिधीची निवड करण्यात आली ती 1974 मध्ये आणि देशाच्या प्रशासनाच्या दृष्टीने 14 प्रांत निर्माण करण्यात आले व त्यावर एकेका मुख्य मुहाफिजाची नियुक्ती केलेली असे. या प्रांताचे पुन्हा दोन भागात विभाजन करण्यात आले असून त्याचे प्रशासकीय व्यवस्था क्वैमक्वॅम व मुदीर ह्या अधिकार्‍यांकडे देण्यात आली होती 1960च्या काळात उत्तरेकडील व दक्षिणेकडील आणि अल जाझीरा हे तीनही वाळवंटी प्रदेश 14 प्रांतात प्रशासनाच्या सोयीसाठी सामील करण्यात आले होते.

वनस्पती व प्राणी :

इराक या देशांमध्ये युफ्रेटिस व टायग्रीसमध्ये नद्यांच्या खोऱ्यात कमळे, लव्हाळे व उंच बोरुची झाडे दाट उगवतात तसेच येथे पॉपलर, आल्डर आणि विलो ही वृक्ष आढळून येतात. लिकोराइस नावाची रानटी झुडपे मोठ्या प्रमाणात दिसून येतात तसेच व्हॅलोनिया ओक जातीचे वृक्ष झॅग्रॉस पर्वताच्या उंच भागात दमट हवेत वाढतात.

येथे रानटी प्राण्यांमध्ये कोल्हा, चित्ता, खोकड, तडस हे प्राणी दिसून येतात तसेच सारंग, चिचुंद्री, लहान काळविटांचे कळप वाळवंटी ससे वाघुळ, लांडगा गाढव, बिव्हर इत्यादी प्राणीही दिसतात. जंगली पक्ष्यांमध्ये हंस, बदक हे शिकारी पक्षी तर शहामुर्ग फार थोडे राहिले आहेत. गिधाड, घुबड, डोमकावळे व बुजड हे पक्षी युफ्रेटिसच्या खोऱ्यात दिसतात.

शेती :

इतर देशांप्रमाणे इराक हा सुद्धा कृषिप्रधान देश आहे. या देशातील एकूण लोकसंख्येपैकी 75 टक्के लोक शेती व पशुपालन हा व्यवसाय करतात.

येथील प्रदेशात बार्ली, गहू तंबाखू व कवचाची फळे प्रमुख पिके आहेत. तसेच जलसिंचन प्रदेशांमध्ये खजूर बार्ली व तांदूळ ही मुख्य पिके आहेत. त्या व्यतिरिक्त या देशांमध्ये ताग, अल्फा अल्फा, अंबाडी, तीळ, बटाटे, भुईमूग, रताळी व क्लोव्हर ही पिके काढण्याचे प्रयोगही चालू आहेत.

उद्योग धंदे :

इराणमध्येस्तील उद्योग मोठ्या प्रमाणात चालतात. त्या व्यतिरिक्त येथे वीज निर्मिती व पाणीपुरवठा सिमेंट उद्योग उद्योग असे मोठे उद्योग आहे तसेच लहान उद्योगांमध्ये पादत्राणे, कटाई व विनणाई, रसायने, सिगारेट, फर्निचर, दागिने व इतर धातू यांचे उत्पादन होते.

खेळ :

या देशातील लोकांमध्ये खेळ खेळण्याचा तेवढा उत्साह दिसत नाही. तरी पण थोड्या प्रमाणात फुटबॉल हा खेळ येथे खेळला जातो तसेच शिकारी व मर्दानी सामने पाहण्यात इराकी लोकांना आनंद मिळतो.

खनिज संपत्ती :

इराकमध्ये मोठ्या प्रमाणात तेलाच्या खाणी आहेत त्याव्यतिरिक्त उत्तर इराकमध्ये क्रोमाइट, लोहधातुक, तांबे, शिसे व जस्त ह्यांच्या खाणी असून निरनिराळ्या भागात चुनखडी, मीठ, जिप्सम, डोलोमाइट, बिट्यूमेन, फॉस्फेट व गंधक ह्यांचे साठे सापडले आहेत. येथील शासनाने 1969 मध्ये इराक नॅशनल मिनरल्स कंपनीची स्थापन केली.

पर्यटन स्थळ :

इराकमध्ये पर्यटन स्थळांमध्ये बरीच शहर आहे, जी पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे येथे अनेक पर्यटक भेट देण्यासाठी येत असतात. या स्थळाविषयी आपण माहिती पाहूया.

अमाडिया :

अमाडिया अत्यंत दुर्गम अशा खडकाळ पर्वताच्या शिखरावर वसलेले एक सुंदर शहर आहे. हे शहर समुद्रसपाटीपासून पंधराशे मीटर उंचीवर असून खडकात कोरलेल्या पायर्‍या मधून येथे प्रवेश करता येतो. येण्या-जाण्यासाठी हा एकच मार्ग आहे.

येथे राजाच्या थडग्या मशिदीवर चे दृश्य मार्केट स्ट्रीट, मोठे बदिनान गेट आणि गाणी हे गाव पाहण्यासारखे आहे. त्यामुळे येथे पर्यटक देऊन आपला आनंद द्विगुणीत करतात.

हत्र :

मात्र हे पश्चिम इराकच्या वाळवंटातील भव्य खांब आणि अलंकृत असे प्राचीन मंदिर आहे. या देशातील हे ठिकाण सर्वात आश्चर्यकारक व पुरातत्त्वफळांपैकी एक ओळखले जाते.

बगदाद :

बगदाद हे शहर इराक या देशाची राजधानी असून हे शहर मोठे व सुंदर आहे. या शहरांमध्ये रस्त्यावर बॉम्ब स्पोट आणि हल्लेखोरांना कडून हल्ले होत असतात. परंतु या शहराचा ग्रीन झोनसाठी प्रसिद्ध असून ते पाण्यासाठी परमिशन घ्यावी लागते.

अर्बील :

अर्बील या शहराचा 7000 वर्ष जुना इतिहास असून येथे एकप्राचीन किल्ला आहे. या किल्ल्याचा असा एक गौरवशाली इतिहास आहे.
ज्याची तुलना कॅडीझ आणि बायब्लॉस या सारख्या महान व्यक्तींशी केला जातो. या शहराच्या मध्यभागी मोठा राजवाडा असून हे मुख्य आकर्षणाचे ठिकाण आहे.

ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.

हे निबंध सुद्धा अवश्य वाचा :-

Leave a Comment