इराण देशाची संपूर्ण माहिती Iran information in Marathi

Iran information in Marathi इराण हा पश्चिम आशियातील एक स्वतत्र देश आहे. हा एक इस्लामिक प्रजासत्ताक देश आहे. या देशाची राजधानी तेहरान आहे. तसेच या देशातील सर्वात मोठे शहर तेहरान, मशहद, इस्फाहान, काराज, शिराझ आणि तबरीझ आहेत. हे मोठे उद्योगिक आणि भांडवलीचे शहर आहेत. या देशाचे बोधवाक्य “स्वातंत्र्य इस्लामिक रिपब्लिक” हे आहे. इराण हा देश संपूर्ण आशियातील चौथा सर्वात मोठा देश आणि सौदी अरेबियाच्या मागे पश्चिम आशियातील दुसरा सर्वात मोठा देश आहे. या देशामध्ये न्याय व व्यवस्था करण्यासाठी स्वतःचे संविधान आहे, या देशामध्ये लोकशाही आहे. चला तर मग जाणून घेऊया या देशाविषयी सविस्तर माहिती.

Iran information in Marathi

इराण देशाची संपूर्ण माहिती Iran information in Marathi

विस्तार व क्षेत्रफळ :

इराण देशाचे एकूण क्षेत्रफळ 16,48,195 किलोमिटर येवढे आहे. आणि क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनाने हा देश जगात 18 व्या क्रमांकावर येतो. तसेच या देशाच्या सीमेला लागून पश्चिम दिशेला इराक व तुर्कस्तान देश आहेत. आणि वायव्य दिशेला अझरबैजान व आर्मेनिया प्रदेश आहेत. व उत्तर दिशेला कॅस्पियन समुद्र व तुर्कमेनिस्ताने विभागले आहे. आणि पूर्व देशाला अफगाणिस्तान व पाकिस्तान देश आहेत. व दक्षिणेस ओमानचे आखात व पर्शियन आखात प्रदेश आहेत.

लोकसंख्या :

इराण देशाची एकूण लोकसंख्या 2011 च्या जनगणनेनुसार 6,84,67,413 ऐवढी आहे, आणि लोकसंख्येच्या बाबतीत हा देश जगात 18 व्या क्रमांकावर येतो. तसेच या देशात विविध जाती व धर्माचे लोक राहतात. परंतु येथे सर्वात जास्त मुल्सिम लोक आढळून येतात. इराण देशातील तेहरान हे या देशातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेल शहर आहे.

चलन :

इराण देशाचे चलन इरानी रियल आहे. येथील स्थानिक लोक या चलनाचा वापर करतात. व्यवहार व उद्योगात या चलनाचा वापर केला जातो. या देशाचे चलन भारतीय चलनाच्या तुलनेत खूप कमी किंमत आहे. 1 ईरानी रियल कॉइन म्हणजे 0.0019 भारतीय रुपये होतात. म्हणजे भारतीय चलन या देशातील चलनापेक्षा महाग आहे.

हवामान :

इराण देशाचे हवामान उष्ण व दमट आहे. या देशामध्ये काही भागात दुष्काळ आणि पाणी टंचाई समस्या निर्माण झाली आहे. या देशात हिवाळा मध्ये अतिशय थंड वातावरण राहते. ओमानच्या आखाताच्या किनारपट्टीच्या मैदानावर सौम्य हिवाळा आणि खूप दमट आणि उष्ण उन्हाळा असतो.

या देशात उच्च उंचीवर विशेषत दक्षिणेकडील भाग वगळता देशभरात उन्हाळा गरम असतो. उत्तर आणि मध्य भागात वसंत ऋतु पासून शरद ऋतूपर्यत अधूनमधून जोरदार गडगडाटी वादळे व पाणी येऊ शकते. येथील उन्हाळी सरासरी तापमान हे 25° ते 30° पर्यत राहते. तर वार्षिक सरासरी पाऊस हा 400 ते 450 मी मी एवढा राहतो.

प्राणी व पक्षी :

इराण देशात मोठ्या प्रमाणात वनक्षेत्र आहे. त्यामुळे येथे अनेक प्राणी व पक्षी आढळून येतात. इराणच्या वन्यजीवांमध्ये अस्वल, युरेशियन लिंक्स, कोल्हे, गझेल्स, राखाडी लांडगे, कोल्हे, पँथर आणि वन्य डुक्कर हे प्राणी जास्त प्रमाणात आढळून येतात. तसेच पाळीव प्राण्यांमध्ये आशियाई पाण्यातील म्हशी, उंट, गुरेढोरे, गाढवे, शेळ्या, घोडे आणि मेंढ्या यांचा समावेश होतो.

आणि गरुड, फाल्कन, तीतर फाल्कन आणि सारसते हे पक्षी पहिले इराण मध्येच आढळून येते. पर्शियन बिबट्या जो जगातील सर्वात मोठा बिबट्याची उपप्रजातील आहे. आणि तो प्रामुख्याने उत्तर इराणमध्ये राहतो. तसेच येथे अनेक पक्षी आढळून येतात. काही स्थलांतरित पक्षी आहेत, तर काही स्थानिक पक्षी आहेत.

भाषा :

इराण देशाची मुख्य भाषा पर्शियन ही येथे मोठ्या प्रमाणात बोलली जाते. याचबरोबर या देशात आणखी विविध भाषा बोलल्या जातात. इतरांमध्ये मोठ्या इंडो आणि युरोपियन कुटुंबातील लोक इराणी भाषा बोलतात आणि इराणमध्ये राहणार्‍या काही इतर वंशांच्या भाषांचा सुध्दा समावेश आहे. या देशात उत्तर इराणमध्ये मुख्यत गिलान आणि माझेन्डरन पर्यत गिलाकी आणि माझेंदरानी भाषा मोठ्या प्रमाणावर बोलल्या जातात. तसेच ह्या दोन्ही शेजारच्या कॉकेशियन भाषांशी संबंधित भाषा आहेत.

या देशातील गिलानचा काही भागांमध्ये तालिश भाषा देखील मोठ्या प्रमाणावर बोलली जाते. कुर्दिस्तान प्रांतात आणि जवळपासच्या भागात कुर्दीचे प्रकार मोठ्या प्रमाणावर बोलले जातात. खुजेस्तानमध्ये पर्शियन भाषेच्या अनेक भिन्न जाती बोलल्या जातात. दक्षिण इराणमध्ये लुरी आणि लारी देखील बोलल्या जातात. अशा अनेक भाषा इराण देशात बोलल्या जातात. देशाच्या व्यवहारात पर्शियन भाषेचा उपयोग होतो.

खेळ :

इराण देशाचा फ्रीस्टाइल कुस्ती हा पारंपारिकपणे इराणचा राष्ट्रीय खेळ मानला जातो. आणि राष्ट्रीय कुस्तीमध्ये अनेक जागतिक विजेते ठरले आहेत. तसेच फुटबॉल हा इराणमधील सर्वात लोकप्रिय खेळ म्हणून ओळखला जातो. पुरुषांच्या राष्ट्रीय संघाने 3 वेळा आशियाई चषक जिंकला आहे. हा खेळ मोठ्या प्रमाणात खेळला जातो.

आणि व्हॉलीबॉल हा इराणमधील दुसरा सर्वात लोकप्रिय खेळ आहे. यांमध्ये  2011 आणि 2013 आशियाई पुरुष व्हॉलीबॉल चॅम्पियनशिप जिंकली आहे. त्यामुळे पुरुषांचा राष्ट्रीय संघ सध्या आशियातील सर्वात मजबूत संघ आहे. याचबरोबर कब्बडी, होलीबॉल, टेनिस खेळ खेळले जातात.

इतिहास :

इराण देशाचा इतिहास खूप प्राचीन व ऐतिहासिक इतिहास आहे. पुर्वी 7 व्या शतकात मेडीज प्राचीन इराणी लोकांद्वारे हे प्रथम एकीकरण करण्यात आले, आणि 6 व्या शतकात इ स पूर्व इतिहासात आणि जगातील पहिली प्रभावी महासत्ता म्हणून वर्णन केले गेले आहे. व अचेमेनिड साम्राज्य अलेक्झांडर द ग्रेटच्या हाती लागले.

नंतर 4 थ्या शतकात आणि त्यानंतर अनेक हेलेनिस्टिक राज्यांमध्ये विभागले गेले. इराणी बंडाने बीसी 3 र्‍या शतकात पार्थियन साम्राज्याची स्थापना करण्यात आले. जे पुढील 4 शतकांसाठी एक प्रमुख जागतिक महासत्ता असलेल्या ससानिड साम्राज्य बनले. आणि अरब मुस्लिमांनी इसवी सन 7 व्या शतकात साम्राज्य जिंकले. ज्यामुळे इराणचे इस्लामीकरण झाले. व आता हे एक इस्लामिक स्टेट आहे. नंतर कालांतराने ते इस्लामिक संस्कृती आणि शिक्षणाचे एक प्रमुख केंद्र बनले.

पहिल्या महायुद्धात इराणची तटस्थता असूनही ऑट्टोमन रशियन आणि ब्रिटीश साम्राज्यांनी पश्चिम इराणच्या भूभागावर कब्जा करण्यात आला आणि 1921 मध्ये त्यांचे सैन्य पूर्णपणे मागे घेण्यापूर्वी पर्शियन मोहिमेशी लढा दिला व किमान 2 लाख पर्शियन नागरिक थेट लढाईत मरण पावले. या काळात देशात अतिशय दुष्काळ पडला ज्यामधे देशात असंतोष निर्माण झाला. पुढे देशात द्वितीय विश्वयुद्धाच्या मध्यभागी जून 1941 मध्ये नाझी जर्मनीने मोलोटोव्ह रिबेनट्रॉप करार तोडला, आणि इराणचा उत्तर शेजारी असलेल्या सोव्हिएत युनियनवर आक्रमण केले.

व्यवहार व उद्योग :

इराण देशाचा मुख्य व्यवसाय शेती आहे. येथे मोठ्या प्रमाणावर शेती व्यवसाय केला जातो. प्रामुख्याने गहू, ज्वारी, मका, बाजरी, तसेच कापुस यासारखे पीके घेतल्या जातात. याचबरोबर इराणमध्ये जर्दाळू, चेरी, आंबट चेरी, काकडी आणि घेरकिन्स, खजूर, वांगी, अंजीर, पिस्ता, क्विन्स, नट आणि अक्रोड हे मुख्य पीक घेऊन व्यवसाय केला जातो.

उद्योगामध्ये या देशात शेती विषयी सामान बनवणे. तसेच काही प्रमाणात या देशात कंपनी व कारखाने उपलब्ध आहेत. यातून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होतात. कच्चा माल बनून विदेशात विकणे, हा व्यापार या देशात केला जातो. तेल उत्पादनचे मोठे कारखाने येते आहेत. विविध कच्चा व पक्का माल बनून त्याचे देशात उद्योग केले जातात. हा देश चहा उत्पादन करण्यासाठी जगात 5 व्या क्रमांकावर येतो.

पर्यटक स्थळ :

इराण देशात कमल-ओल मोल्कचा मिरर हॉल आहे. जो अतिशय सुंदर आणि इराणी आधुनिक कलेचा प्रारंभ बिंदू मानला जातो. हे एक ऐतिहासिक स्थळ मानल्या जाते. हे पाहण्यासाठी लोक येथे जात असतात.

इराण मधील इस्फहान नक्श ए जहाँ स्क्वेअरचे जागतिक वारसा स्थळ आहे आणि हे पाहण्यासाठी लोक येथे जात असतात. या देशात अर्मेनियन चर्च आहे. जे ख्रिचन समाजाचे धार्मिक स्थळ आहे, येते लोक प्रार्थना करण्यासाठी जात असतात.

इराण देशात एक मोठी मज्जित आहे. जे इस्लामिक लोकांचे धार्मिक स्थळ आहे. येते मोठ्या संख्येने लोक नमाज करण्यासाठी जात असतात.

ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांना शेअर करा.

हे निबंध सुद्धा अवश्य वाचा :-

माझे नाव सृष्टी आहे आणि मी या ब्लॉग ची संस्थापक आहे. मला माहिती लिहायला खूप आवडतात, म्हणून मी या माझ्या ब्लॉग वर मराठी मध्ये माहिती लिहित असते.

Leave a Comment